Back
रोह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी, नागरिकांची धांदल!
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 15, 2025 08:01:16
Raigad, Maharashtra
स्लग : रोह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी ....... सर्वत्र पाणीच पाणी ...... रायगड जिल्ह्यात २४ तासांचा रेड अलर्ट .....
अँकर - रोहा तालुक्यात आज पहाटेपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. रोहा शहराच्या बाजारपेठ, दमखाडी, छत्रपती शिवाजी नगर, त्रिमूर्ती नगर, नगर परिषद परिसर, वरसे आणि भुवनेश्वर येथे रस्त्यांवर पाणी साचले. पावसाने अचानक घेतलेल्या जोरदार धरल्याने काही घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांची धांदल उडाली. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नदीकाठच्या गावांसह सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
2
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 15:30:14Dhule, Maharashtra:
Anchor - कौटुंबिक वादातून मित्राची हत्या केल्याप्रकरणी धुळे सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. धुळे शहरातील मिल परिसरात राहणाऱ्या निखिल पाटील याचा त्याचा मित्र मयूर सोवत वाद झाला होता. या वादात झालेल्या मारहाणीत निखिल पाटील यांचा मृत्यू झाल्याने धुळे शहर पोलीस ठाण्यात तिघां विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून प्रकरणी शवविच्छेदन अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे याच्या आधारावर जिल्हा सत्र न्यायालयाने मयूरसह तिघांना दोषी ठरवत प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 15, 2025 15:05:36Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ 18 तारखेला अक्कलकोट बंदची हाक
- संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकारांनी मराठा समाज आक्रमक
- मराठा समाजाच्या वतीने 18 तारखेला अक्कलकोट तालुका बंदची हाक
- दोशी आरोपींवर जोपर्यंत मोक्का लागणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा
- मराठा समाजाच्या बैठकीत झालेल्या हाणामारीनंतर समाजातील नेत्यांची सारवा सारव
बाईट -
माऊली पवार ( मराठा समन्वयक )
बाईट -
दिलीप कोल्हे ( मराठा क्रांती मोर्चा )
8
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 15:01:55Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळे शहराचे एम आय एम चे माजी आमदार डॉक्टर फारुक शहा यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथे पार पडला. प्रवेशाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री हसनमुश्री यांची उपस्थिती होते. शहा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने एम आय एम ला मोठा धक्का बसला आहे. 2019 ला धुळे शहर विधानसभा मतदार संघातून फारुक शहा विजयी झाले होते. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष धुळे शहर विधानसभा निकालने वेधून घेतला होतं. धुळे शहरात अल्पसंख्यांक भागात राष्ट्रवादी काँग्रेस ची ताकद वाढली असून, धुळ्यात भाजपाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहा यांच्या प्रवेशामुळे युतीत राहून भाजपाला शह दिल्याचे बोलले जातं आहे. या पक्षप्रवेशाचा महानगरपालिका निवडणूकितही परिणाम दिसून येणार आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 15, 2025 15:01:28Ambernath, Maharashtra:
कात्रप परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली
रस्त्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली
शेकडो लिटर पाणी वाया , नागरिकांचा रस्ता बंद
Bdl water pipe line
Anchor बदलापूर शहरातील कात्रप परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेलं , या परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबी ने रस्ता खणत असताना ही पाईपलाईन फुटली, त्यामुळे सर्व पाणी हे रस्त्यावर आल्याने पूर्णतः रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे अष्टविनायक संकुलाकडे जाणाऱ्या नागरिकांचा रस्ता बंद झाला त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही पाईपलाईन फुटल्याचा नागरिकांचे म्हणन आहे.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 15, 2025 14:35:10Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - मराठा समाजाच्या बैठकीत रोहित फावडे यांच्या भाषणादरम्यान उडाला गोंधळ
- वकील रोहित फावडे यांच्या भाषणानंतर उडाला गोंधळ..
- जन्मजयराजे भोसले, अमोल राजे भोसले यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे कार्यकर्त्यांनी केला गोंधळ..
- रोहित फावडे याच्या भाषणाच्या मुद्द्यांवरून मराठा समाजाच्या बैठकीत फिल्मी स्टाईल हाणामारीचा प्रकार...
- जन्मजेयराजे भोसले, अमोल राजे भोसले यांना महाराज म्हणणार नसल्याचाही केला भाषणात उल्लेख..
- अमोलराजे भोसले यांनी आरोपीला पोलीस गाडीत घातल्यानंतर राजे भोसले यांचा मुलगा काय बोलत होता असाही सवाल रोहित फावडे यांनी उपस्थित केला..
- रोहित फावडे यांच्या भाषणानंतर संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते आणि जन्मजय राजे भोसले कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाल्यानंतर मारहाण पर्यंत गेलं प्रकरण..
Sound bite : रोहित फावडे, वकील
*( याच व्यक्तीच्या भाषणादरम्यान गोंधळ उडाला )*
11
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 15, 2025 14:34:23Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग- सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत झाली हाणामारी
- सोलापुरातील प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ..
- स्वामी समर्थ अन्नछत्र महामंडळाचे अध्यक्ष जन्मजय राजे भोसले यांचे समर्थक आणि संभाजी ब्रिगेडच्या समर्थकांमध्ये हाणामारी..
- अमोल राजे भोसले यांच्या विरोधात एकेरी उल्लेख केल्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांकडून फिल्मी स्टाईल हाणामारी...
- जन्मजय राजे भोसले यांनी बैठकीच्या येथून घेतला काढता पाय..
- प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व समाजाच्या बैठकीचे करण्याचा होता आयोजन..
Byte : जन्मजय राजे भोसले, स्वामी समर्थ अन्नछत्र अध्यक्ष
Byte : माऊली पवार , मराठा समन्वयक
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 15, 2025 14:31:10Beed, Maharashtra:
बीड:मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा झालेल्या नारायणगडावर आर्थिक गैरव्यवहार..! महंत शिवाजी महाराजांचा ट्रस्टवरच्या दोन पदाधिकाऱ्यांवर थेट आरोप...!
Anc:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा बीडच्या श्रीक्षेत्र नारायण गडावर भव्य स्वरूपात पार पडला होता. त्यानंतर नारायण गडाची राज्यात चर्चा झाली. आता याच नारायण गडावर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय..
ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप महाराजांनी केला आहे. या आरोपानंतर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. या दोन भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी गडाची बदनामी केली. मला प्रचंड नाहक त्रास दिला. मी अस्वस्थ झालो होतो. दोन दोन दिवस या तणावात असताना मी जेवण देखील केले नाही. गडावर पंचवीस कोटीच्या विकास कामाचा आराखडा निधी मंजूर करण्यात आला होता. सदर निधी दिवंगत नेते विनायक मेटे यांनी आणला होता. आणि याचेच टेंडर आम्हाला द्या. म्हणून या दोन पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. यांना टेंडर मिळालं नाही म्हणून यास दोन पदाधिकाऱ्यांनी गडाची बदनामी करत कोर्टात चुकीची माहिती दिली. असा आरोप देखील महंत शिवाजी महाराजांनी केला आहे.
बाईट: महंत शिवाजीमहाराज, नारायणगड
दरम्यान या संपूर्ण गंभीर आरोपावर ट्रस्टचे सदस्य बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. या उलट महंत शिवाजी महाराजांनी ते टेंडर कोणाला दिले याचे सर्व पुरावे व्हिडिओ ऑडिओ यासह आम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याचा दावा ट्रस्टीचे सदस्य बळीराम गवते यांनी केला आहे.
बाईट: बळीराम गवते - आरोप झालेले सदस्य
धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायण गडावरच आता जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यानंतर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. आता या गैर व्यवहार प्रकरणात नेमकी काय चौकशी होईल याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे..
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 15, 2025 14:31:00Beed, Maharashtra:
बीड: मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा झालेल्या नारायणगडावर आर्थिक गैरव्यवहार..! महंत शिवाजी महाराजांचा ट्रस्टवरच्या दोन पदाधिकाऱ्यांवर थेट आरोप...!
Anc:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा बीडच्या श्रीक्षेत्र नारायण गडावर भव्य स्वरूपात पार पडला होता. त्यानंतर नारायण गडाची राज्यात चर्चा झाली. आता याच नारायण गडावर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय..
ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप महाराजांनी केला आहे. या आरोपानंतर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. या दोन भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी गडाची बदनामी केली. मला प्रचंड नाहक त्रास दिला. मी अस्वस्थ झालो होतो. दोन दोन दिवस या तणावात असताना मी जेवण देखील केले नाही. गडावर पंचवीस कोटीच्या विकास कामाचा आराखडा निधी मंजूर करण्यात आला होता. सदर निधी दिवंगत नेते विनायक मेटे यांनी आणला होता. आणि याचेच टेंडर आम्हाला द्या. म्हणून या दोन पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. यांना टेंडर मिळालं नाही म्हणून यास दोन पदाधिकाऱ्यांनी गडाची बदनामी करत कोर्टात चुकीची माहिती दिली. असा आरोप देखील महंत शिवाजी महाराजांनी केला आहे.
बाईट: महंत शिवाजीमहाराज, नारायणगड
दरम्यान या संपूर्ण गंभीर आरोपावर ट्रस्टचे सदस्य बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. या उलट महंत शिवाजी महाराजांनी ते टेंडर कोणाला दिले याचे सर्व पुरावे व्हिडिओ ऑडिओ यासह आम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याचा दावा ट्रस्टीचे सदस्य बळीराम गवते यांनी केला आहे.
बाईट: बळीराम गवते - आरोप झालेले सदस्य
धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायण गडावरच आता जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यानंतर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. आता या गैर व्यवहार प्रकरणात नेमकी काय चौकशी होईल याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे..
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 15, 2025 14:12:20Raigad, Maharashtra:
स्लग – आंबेनळी घाटरस्ता अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद ........ 15 ऑगस्ट पर्यंत अवजड वाहनांना बंदी ........ रेड आणि ऑरेंज अलर्ट कालावधीत हलक्या वाहनांना बंदी ........ रात्रीच्या वेळी सर्व प्रकारची वाहतूक बंद ......... दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेवून निर्णय रायगड जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांची अधिसूचना
अँकर - कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारया पोलादपूर ते महाबळेश्वर या आंबेनळी घाटरस्त्यावरील वाहतूकीबाबत रायगड जिल्हा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला. हा मार्ग 15 ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. तर हलक्या वाहनांसाठी हा रस्ता पावसाच्या ऑरेंज आणि रेड अलर्टच्या काळात बंद असेल. पावसाळयाच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. या मार्गावर पावसाळयाच्या दिवसात दरडी कोसळून वाहतूक ठप्प होत असते दरड कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेवून हा नि र्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांनी पया्रयी मार्ग म्हणून ताम्हाणी घाटमार्गे पुणे किंवा चिपळूण पाटण सातारा मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
5
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 15, 2025 13:34:34Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1507ZT_WSM_RAIN_15JULY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:मागील दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात वातावरण उघडं होतं.मात्र,आज पुन्हा मालेगाव,वाशिम, रिसोड तालुक्यासह जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.या नव्या पावसामुळे आधीच पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळालं असलं,तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्यापही रखडल्या आहेत.शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पेरणीचे काम थांबले असून, यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली आहे. वेळेवर पेरणी करता न आल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाने काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 15, 2025 13:34:20Pandharpur, Maharashtra:
15072025
Slug - PPR_MWEDA_CRIME
feed on 2c
file 05
------
Anchor - प्रियकरा सोबत पळून जाण्यासाठी विवाहित महिलेने रचला स्वतःच्या मृत्यूचा डाव, अज्ञात महिलेचा मृतदेह कडब्याच्या गंजीत जाळला , मंगळवेढ्यात झालेल्या गूढ प्रकाराने पोलिसही बुचकळ्यात पडले
मंगळवेढ्यातील पाटकळ येथे काल विवाहित महिला किरण नागेश सावंत हिला नवऱ्याने कडव्याच्या गंजीत जाळून मारले अशी प्राथमिक घटना उघडकीस आली.
या कृत्याबद्दल पोलिसांनी किरणच्या नवऱ्याला चौकशी साठी ताब्यात घेतले. मात्र तो आपण निर्दोष असल्याचे सांगत होता. यामुळे पोलिसही चक्रावले होते. अशातच
किरण चा मृतदेह पाहिल्यानंतर तिचे वडील दशरथ दांडगे यांनी याबाबत संशय व्यक्त केल्याची माहिती आहे. यानंतर पोलिसांनी सदर जळालेला मृतदेह फॉरेनसिक चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला
दरम्यान पोलिसांनी आपल्या गोपनीय माहितीच्या आधारे किरण ही नात्यातील निशांत सावंत या प्रियकरा च्या मदतीने कराड येथे पोहोचली होती.
यानंतर पोलिसांनी ज्या विवाहित महिलेला सर्व जण मृत समजत होते त्या किरण सावंत हिला ताब्यात घेतले. यानंतर किरण जिवंत असल्याचे समोर आले.
मात्र कडब्यात जाळलेला महिलेचा मृतदेह कोणाचा याचा तपास आता पोलिस करत आहेत. सदर मृतदेह फॉरेन्सिक तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठवला आहे.
मात्र किरणचा प्रियकर निशांत याने एक वेडसर महिला आणून तिलाच जाळून टाकल्याची चर्चा आहे. ज्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांचा समज होईल किरण मृत झाली आहे. यानंतर किरण निशांत यांना आपला संसार करता येईल.
मात्र पोलिसांची सतर्कता आणि नातेवाईकांचा संशय यामुळे किरण आणि निशांत यांनी रचलेला हा डाव उघड झाला आहे.
----
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 15, 2025 13:34:03Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn bidkin ps rada av
feed attched
ANC: पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या संशयित आरोपीसोबत आलेल्या एका महिलेने पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये घडली आहे. त्यावरून रजिया रियाज शेख हिच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
बिडकीन पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारी समीना अहमद शेख या ड्युटीवर असताना संशयित आरोपी रजिया शेख ही ठाण्यातील पीएसओ रूममध्ये आली. तू मला काय बोललीस? असे म्हणत तिने पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या समीना अहमद शेख यांना अरेरावी करत शिवीगाळ केली. यानंतर तिने कपडे ओढून गालात चापट मारली आणि गळ्यातील दोन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता, तिने महिला पोलिसाला ठार मारण्याची धमकीही दिली. त्यावेळी पोलीस ठाण्यात होत असलेल्या मारहाणीचा एका खासगी व्यक्तीने मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ काढला.
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 15, 2025 13:33:48Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1507ZT_JALNA_MURDER(9 FILES)
जालना | किरकोळ वादातून एकाची हत्या
जालना तालुक्यातील बेथलेम येथील घटना
अँकर | जालन्यात किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आलीय. जालना तालुक्यातील बेथलेम येथे ही घटना घडलीय. 22 वर्षीय रोहित प्रकाश निर्मळ असं मयताचे नाव आहे. अभिषेक निर्मळ आणि रोहित निर्मळ यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्या वादातून अभिषेक याने रोहितचा गळा पकडला. यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपी अभिषेक निर्मळ यास ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून या घटनेनं जालना तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
Byte अनिता निर्मळ, मयताची आजी, बेथलेम, जालना
1
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 15, 2025 12:34:20Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1507ZT_CHP_UBT_JOLT
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात शिवसेना उबाठा पक्षाला झटका, जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचा भाजपात प्रवेश, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद खेचुन आणण्यासाठी भाजपची खेळी, शिंदे यांच्याकडे आहेत 3 संचालक, 21 संचालक असलेल्या बँकेत आता भाजपच्या 9 सदस्यांसह पक्षाकडे झाले एकूण 12 चे बहुमत
अँकर:-- शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवडून आलेले नवनियुक्त संचालक रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश घेतल्याने उबाठा पक्षाला मोठा धक्का बसलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत हा पक्षप्रवेश झाला. रवींद्र शिंदे यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्ष पद दिलं जाण्याची शक्यता आहे. रवींद्र शिंदे आतापर्यंत चार वेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून निवडून आले आहेत. बँकेच्या राजकारणात किंगमेकर अशी त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे यावेळी मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 21 पैकी 9 भाजप समर्थक संचालक निवडून आले आहेत. काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देत भाजपचे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात संचालक निवडून आले आहेत. रवींद्र शिंदे यांच्याकडे स्वतःचे 3 संचालक असल्याने भाजप त्यांना अध्यक्षपद देऊन बँकेवर पहिल्यांदाच झेंडा रोवणार आहे. भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या सक्रिय खेळीने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकणार आहे. या पक्षप्रवेश प्रसंगी माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. जोरगेवार, आ. देवतळे यांची उपस्थिती होती. या नव्या घडामोडीने 13 वर्षानंतर झालेल्या निवडणूकीनंतर बँक काँग्रेसच्या ताब्यात आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न उधळून निघाले आहेत.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 15, 2025 12:32:08Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1507ZT_MAVAL_POTATO_BYTE
Total files : 05
Headline -लोणावळ्यात पर्यटकांच्या जीवाशी खेळ. वडापाव च्या भाजीत नासका बटाटा वापरत असल्याचं उघड
-सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा किळसवाणा प्रकार उघड
-12 जुलै रोजी घडलेल्या या प्रकारचा व्हिडीओ सोशियल मीडियावर वायरल
मात्र वडापाव विक्रेते चौधरी यांनी हे आरोप फेटाळले
Anchor:
लोणावळा शहरातील मुख्य बाजारपेठेत परमार हॉस्पिटलसमोरील चौकात असलेल्या 'चौधरी वडेवाले' या दुकानात वडापाव आणि भजी बनवण्यासाठी चक्क टाकाऊ, सडलेले आणि उंदराने अर्धवट खाल्लेले बटाटे वापरले जात असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही, तर यासाठी अत्यंत गलिच्छ पाण्याचाही वापर केला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका जागरूक नागरिकाने हा प्रकार उघडकीस आणला. त्याने पाहिले की, चौधरी वडेवाले दुकानात सडलेले आणि उंदराने अर्धवट खाल्लेले बटाटे थेट प्रेशर कुकरमध्ये उकळले जात होते. या बटाट्यांसाठी वापरले जाणारे पाणीही अत्यंत अस्वच्छ होते. तक्रारदाराने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, भजी आणि वडे बनवण्यासाठी लागणारे पीठ देखील अशाच घाणेरड्या पाण्यात मिसळले जात होते. शनिवारी 112 या पोलीस हेल्पलाईनवर तक्रारदाराने तक्रार नोंदवली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता, दुकानाचा मुख्य आचारी पळून गेला होता. पोलिसांनी संबंधित तक्रारदाराकडून तक्रार अर्ज स्वीकारला असून, याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
बाईट : शाहीद शेख, सजग नागरिक,लोणावळा (file.no.04)
Vo :
याबाबत वडापाव विक्रेते असलेले रमेश चौधरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बटाट्याच्या पोत्यात काही सडके बटाटे होते परंतु कामगार ते बटाटे वेगळे करत होते. त्याचवेळी काही नागरिकांनी हा व्हिडीओ काढला व सोशल मीडियावर व्हायरल केला. कर्मचारी हे खराब बटाटे बाजूला करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील आपल्याकडे असल्याचा दावा वडापाव विक्रेते असलेले रमेश चौधरी यांनी केला आहे.
बाईट : रमेश चौधरी, वडापाव विक्रेते,लोणावळा (file no.05)
0
Share
Report