Back
वाशिममध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली!
GMGANESH MOHALE
Jul 15, 2025 13:34:34
Washim, Maharashtra
वाशिम:
File:1507ZT_WSM_RAIN_15JULY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:मागील दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात वातावरण उघडं होतं.मात्र,आज पुन्हा मालेगाव,वाशिम, रिसोड तालुक्यासह जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.या नव्या पावसामुळे आधीच पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळालं असलं,तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्यापही रखडल्या आहेत.शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पेरणीचे काम थांबले असून, यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली आहे. वेळेवर पेरणी करता न आल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाने काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 31, 2025 08:46:10Raigad, Maharashtra:
स्लग - गणेशोत्सव देखाव्यातून कौटुंबिक हिंसाचारावर प्रकाश .....
महाडच्या सरेकर आळी सार्वजनिक मित्र मंडळाचा देखावा ......
अँकर - आजही रस्त्यावर होणाऱ्या महिला अत्याचाराचा प्रश्ना इतकीच घरांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची समस्या गंभीर बनली आहे. अनेक घटना समोर येतात तर अनेक घटना समाजाच्या समोर देखील येत नाहीत. समाजातील या ज्वलंत विषयाला हात घालणारा जिवंत देखावा यंदा महाडमधील सरेकर आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सादर केला आहे. विषेश म्हणजे हा जीवंत देखावा असून यामध्ये मंडळाच्या सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत भुमिका पार पाडल्या आहेत. घरात सासुने आपल्या सुनेकडे मुली प्रमाणे पाहिले आणि वागवले तर कौटूंबीक हिंसाचाराच्या घटना कमी होतील असा संदेश मंडळाने या देखाव्याच्या माध्यमातून दिला आहे.
बाईट - जयंत कदम, सदस्य, सरेकर आळी मित्र मंडळ
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 31, 2025 08:45:58Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 3108ZT_MAVAL_ACCIDENT
Total files : 04
Headline : मुंबई-बेंगळुरू हायवेवर भीषण अपघात
28 वर्षीय नेपाळी युवकाचा मृत्यू
Anchor:
देहूरोड परिसरातील साई द्वारका सोसायटीसमोर आज सकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २८ वर्षीय दीपक साई या नेपाळी युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून, धडक एवढी जबरदस्त होती की घटनास्थळी हाहाकार माजला. मात्र, इतका मोठा अपघात होऊनही पोलिसांचा निष्काळजीपणा यानिमित्ताने समोर आला. अपघात झाल्यानंतर तब्बल एक तास मृतदेह जागेवर पडून होता. पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांचा आरोप आहे की हायवेवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहने सर्व्हिस रोडकडे वळवली जातात आणि याच रस्त्यावरून शाळांची वाहतूक तसेच रहिवाशांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत भरधाव ट्रक येणं म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचं मत रहिवाशांनी व्यक्त केलं.
0
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 31, 2025 08:45:32Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_martha_kirana
*मुंबईत मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांसाठी खाणे पिण्याच्या वस्तू घेऊन नाशिकमधून पाच ते सहा पिकअप गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना...*
अँकर
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करत आहे....राज्यभरातील हजारो मराठा बांधव देखील मुंबईत ठाण मांडून आहेत... मराठाबांधवांची खाण्यापिण्याची सोय होत नसल्याने नाशिकमधून विविध गाव खेड्यातून मराठा बांधवांकडून पाच ते सात हजार चपाती- भाकरी, लोणचे, ठेचा तसेच पाणी बाटली आणि बिस्कीट, फरसाणचे पुडे घेऊन पाच ते सात गाड्यांमध्ये घेऊन मुंबईच्या दिशेला बना झाले आहेत. ...नाशिक मधून काही मराठा बांधव मुंबईत दोन दिवस आंदोलनात सहभागी झाले होते... मात्र सोबत असलेल्या मराठा बांधवांची गैरसोय बघून पुन्हा ते नाशिक मध्ये येऊन मोठी रसत घेऊन पुन्हा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे... सरकारी कडून कोणतीही व्यवस्था होत नसल्याने पुढे कितीही दिवस आंदोलन सुरू राहिले तरी देखील आम्ही आमच्या बांधवांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था जबाबदाऱ्यांनी करू असे मत व्यक्त केले आहे...
बाईट-आंदोलक
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 31, 2025 08:33:55Beed, Maharashtra:
बीड : मुंबईतील आंदोलकांसाठी गावखेड्यातून शिदोरी, चटणीसह 30 हजार भाकऱ्या मुंबईला रवाना..!
Anc : मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनात हजारो मराठा आंदोलक मुंबईत आहेत. मात्र आंदोलकांना अन्न पाण्याची सोय नसल्याचे समोर आल्यानंतर आता बीडकर पुढे धजावले आहेत. आंदोलकांना निदान दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी आता बीडकरांनी पुढाकार घेतला आहे..बीडच्या गांधनवाडी, पांढरवाडी, सकुंडवाडी, उंडेवाडी, कोतन, खलाटवाडी या गावांतून 30 ते 35 हजार भाकऱ्या, चटणी आणि लोणच्याची शिदोरी मुंबईला रवाना करण्यात आली आहे..
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 31, 2025 08:17:17Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_HELP
मुंबईतल्या मराठा बांधवांसाठी कळंब हुन एक क्विंटल शेंगा चटणी व 20 हजार भाकरीची शिदोरी रवाना
Anchor
धाराशिव :
मराठा आरक्षणासाठी मुंबईत ठिय्या मांडून बसलेल्या मराठा बांधवांचे अन्नपाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी कळंब तालुक्यातून मोठ्या प्रमाणात खाद्यसामग्रीची रसद मुंबईला रवाना करण्यात आली आहे.
घराघरातून थापलेल्या भाकरी, कांदा-चटणी, बिस्कीट, औषधे अशा सर्व जीवनावश्यक वस्तू घेऊन तीन मालवाहू वाहने आज कळंब येथून मुंबईकडे रवाना झाली.
मुंबईतील आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बांधव सहभागी झाले असून त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होत असल्याने मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
कळंब शहर व तालुक्यातील नागरिकांनी ‘एक घर दोन भाकरी’ या सोशल मीडियावर फिरलेल्या संदेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. अखेर नागरीकांच्या सहभागातून तब्बल 20 हजार भाकरी, शेंगा चटणी आणि इतर खाद्यसामग्रीची वाहतूक मुंबईकडे करण्यात आली आहे.
0
Report
SNSWATI NAIK
FollowAug 31, 2025 08:04:34Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: नवी मुंबई मनपातर्फे अंघोळीसाठी 10 टँकर पाणी आणि 100 नळांची व्यवस्था.
नवी मुंबई मे मराठा आंदोलको को पानी की व्यवस्था
ftp slug - NM water supply
byet- nmmc enginer
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे मराठा आंदोलकांच्या अंघोळ आणि शौचाची व्यवस्था करण्यात आलेय. अंघोळीसाठी 10 टँकर पाणी तसेच 100 नळांची व्यवस्था करण्यात आलेय. यासोबतच शेकडो पोर्टेबल शौचालय आणि ते स्वच्छ करण्यासाठी संक्शन मशीन रुजू करण्यात आलेय. ्यासोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आलेय.
बाईट -: सचिन शिंदे (अभियंता पाणी पुरवठा विभाग)
1
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 31, 2025 08:04:28Pune, Maharashtra:
Reporter name.: Chaitralli Raajapurkar
Location ; Maval
File name : 3108ZT_MAVAL_HELP
Total files : 05
Headline : मुंबईतील मराठा बांधवांच्या मदतीसाठी मावळ तालुक्यातील मराठा बांधव एकवटले
तब्बल दहा टेम्पो भरून अन्न पाणी आणि ब्लॅंकेट मुंबईकडे रवाना
Anchor :
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील तीन दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले आहेत त्यांच्याबरोबर हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मात्र या मराठा बांधवांच्या जेवणाचे मुंबईमध्ये हाल होत असल्यामुळे मावळ तालुक्यातील मराठा बांधव आता एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मावळ तालुक्यातील वडगाव मावळ भागातून तब्बल 7000 पेक्षा जास्त भाकऱ्या चटणी सुका खाऊ पाण्याच्या बॉटल ब्लॅंकेट अशा वस्तू मुंबईकडे रवाना होत आहेत मुंबईमध्ये असणारा मराठा बांधवाला कोणत्याही प्रकारची कमी भासू नये यासाठी मावळ तालुक्यातील मराठा बांधवांनी हा पुढाकार घेतलेला आहे जोपर्यंत जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे तोपर्यंत मावळ तालुक्यातून ही मदत अविरतपणे चालूच राहणार असा निर्धार मावळ तालुक्यातील मराठा बांधवांनी केला आहे मावळ मधील वडगाव मावळ भागामधून तब्बल दहा टेम्पो सर्व अन्नधान्य पाणी आणि ब्लॅंकेट घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी
Wkt Chaitralli (file.no.03)
बाईट अतुल वायकर, मराठा बांधव (file.no.04)
बाईट मयूर ढोरे, मराठा बांधव (file no.05)
4
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 31, 2025 08:01:30Parbhani, Maharashtra:
अँकर- मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत,त्यांच्या सोबत लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. पण त्यांची तिथे मोठ्या प्रमाणात आबाळ सुरू आहे.त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील नांदेड हिंगोली महामार्गावर मराठा बांधवांनी रास्तारोको करीत शासनाचा निषेध नोंदवत मुंबई येथील मराठा आंदोलक बांधवांना सुविधा देण्याची मागणी केली,
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 31, 2025 07:19:59Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_SINA_DAM
*सीना-कोळेगाव धरण भरले १० दरवाजे खुले, १५२२५ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग*
*धरण पाणलोट क्षेत्रात मागील २ दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढली, आसपासच्या गावाणा सतर्कतेचा इशारा*
Anchor
धाराशिव परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव धरणात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढली. त्यामुळे शनिवारी रात्रीधरणाचे एक एक करत दहा दरवाजे उघडले असून, १५२२५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. खासापुरी, चांदणी व - साकत मध्यम प्रकल्प तुडुंब भरल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नगर भागात मागील १५ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्या दुथडी वाहत आहेत. या आधीच्या पावसाने परंडा तालुक्यातील सीना, निम्नखैरी, उल्फा, चांदणी, नळी आदी नद्यांना पूर आला होता. अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत पाणी शिरल्याने उसासह खरिपाचे नुकसान झाले आहे.आता सीना कोळेगाव धरण भरले असून त्याचे १० दरवाजे उघडले आहेत त्यापैकी ३ दरवाजे १० सेंटिमीटरने व ७ गेट ३० सेंटिमीटरने उघडले आहेत का सध्या एकूण पाण्याचा विसर्ग हा १५१२५.८७ क्यूसेकने विसर्ग - चालू धरण परिसरातील गावांना सतरकतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 31, 2025 07:19:51Raigad, Maharashtra:
स्लग – कोकणात शक्ती - तुरा नाचांची धूम .......... नवीन पिढीही जपतेय पारंपारिक लोककला ..... पुरूषांची मक्तेदारी मोडत महिलांचा वाढता सहभाग ........
अँकर – कोकणात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे . गावागावात आरतीबरोबरच शक्तीतुरयाचा आवाज ऐकायला मिळतोय.पारंपारीक नाचांचा कलगीतुरा पहायला नागरीकांची गर्दी होत आहे. कोकणच्या गणेशोत्सवाइतकाच इथला शक्ती - तुरा नाच गावागावात लोकप्रिय आहे. या नाचात शक्ती आणि तुरा अशी दोन संघांमध्ये स्पर्धा रंगते . प्रामुख्याने पौराणिक कथांवर आधारीत सवाल जवाबाचा हा सामना पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. याला शंकर आणि पार्वती यांच्यातील संवादाचादेखील संदर्भ आहे. या नाचाला बाल्याडान्स असेही संबोधले जाते. आज मनोरंजनाची अनेक साधनं उपलब्ध झाली आहेत . असं असलं तरी ही कला आजच्या पिढीनं जपली आहे. महत्वाचं म्हणजे एकेकाळी पुरूषांची मक्तेदारी असलेल्या या कलाप्रकारात महिलाही उतरल्या असून तरूणींचा यातील सहभाग वाढतो आहे.
बाईट 1 – किशोर सणस, शाहीर
बाईट 2 – पूनम आगरकर, महिला शाहीर
4
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 31, 2025 07:19:37Akola, Maharashtra:
Anchor : यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणेशोत्सव मंडळ, डेल्टा टीव्हीएस शोरूम, नेहरू पार्क चौक अकोला येथे देवांच्या स्वर्गारोहणाचा देखावा सादर करण्यात आला आहे.गेल्या 29 वर्षांपासून अलिमचंदानी कुटुंबियांच्या वतीने विविध धार्मिक देखावे साकारले जात आहेत. दरवर्षीच्या या धार्मिक संकल्पनेमुळे अकोलेकर मोठ्या संख्येने या ठिकाणी गणेश दर्शनासाठी हजेरी लावतात.यंदा साकारलेला आकर्षक देखावा आणि श्री गणेशाची भव्य मूर्ती भाविकांना मोहित करीत असून, परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
3
Report
SNSWATI NAIK
FollowAug 31, 2025 07:19:18Navi Mumbai, Maharashtra:
story slug- दोन लाख आंदोलकांची जेवणाची सोय नबी मुंबईत wkt
नवी मुंबई मे मराठा आंदोलको की सुविधा
ftp slug - nm maratha aandolan food facility
shots -
reporter - swati naik
navi mumbai
Anchor - नवी मुंबई मद्ये मोठ्या प्रमाणत मराठा आंदोलक दाखल होत वाशी रेल्वे स्टेशन परिसरात सहा हजार गाड्या उभ्या असून, एपीएमसी आणि संपूर्ण नवी मुंबई मद्ये ठीक - ठिकाणी
त्याची रहाण्यासाठी सिडको एक्झिब्युश सेंटर ,एपीएमसी ,माथाडी भवन , येथे केली असून जेवणाची सोय करण्यात आले आहेत , यात मोठ्या संख्येने मराठा बांधव आंदोलकांना तयार जेवण पुरवत आहेत , राष्ट्रवादी चे प्रदेशादयक्ष शशीकांत शिंदे यांनी देखील मराठा आंदोलकणाची सोया मोठ्या प्रमाणात सोया केली असून याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतीनेधी स्वाती नाईक।
बाईट- wkt with 1 to 1
==========
3
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 31, 2025 07:02:12Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील रानमसले गावात गणेशोत्सवाची अनोखी परंपरा, पूजेचा मान असलेल्या व्यक्तींना टाळ मृदुंगाच्या गजरात पूजेसाठी केले जाते आमंत्रित ( WKT )
- उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावच्या गरीब मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची जिल्हाभरात चर्चा
- श्री गणेशाच्या पूजेचा मान असलेल्या व्यक्तींच्या घराजवळ जात टाळ मृदुंगाच्या गजरात आमंत्रित करण्याची अनोखी परंपरा
- रानमसले गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित येत राबविण्यात येतोय उपक्रम
- गावातील तरुण पिढी व्यसनाधीनते पासून दूर राहण्यासाठी तसेच वारकरी संप्रदायाची प्रथा टिकवण्यासाठी गरीब मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम
- एकीकडे डॉल्बीच्या तालावर नाचणारी तरुणाई तर दुसरीकडे रानमसले सारख्या ग्रामीण भागात वारकरी परंपरा जपत गणेशोत्सवाचा होतोय जयघोष
याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
3
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 31, 2025 06:48:48Nashik, Maharashtra:
Feed send by mozo
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_mahakal_ganesh
*गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा देखावा ठरतोय भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू*
अँकर
नाशिकच्या सिडको परिसरातील राजे शिवछत्रपती मित्र मंडळातर्फे यंदाच्या वर्षी गणेशोत्सवामध्ये उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.... हा देखावा भाविकांसाठी आकर्षण ठरतो आहे ....61 फूट उंच आणि 40 फूट रुंदी असलेल्या महाकालेश्वर मंदिराच्या देखाव्यासाठी तब्बल दोन महिने लागले असून हे मंदिर बनविण्यासाठी मथुरा येथून कारागीर आणण्यात आले होते.... महाकालेश्वरला जसा साज शृंगार केला जातो.... त्याच पद्धतीचा साज शृंगार हा करण्यात येत असून भस्मारती देखील करण्यात येत आहे.... ज्या भाविकांना उज्जैन महाकालेश्वर येथे जाता येत नाही त्यांना हा देखावा.... पाहून उज्जैनची अनुभूती येत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.... या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
Wkt + 121 बंटी तिदमे
6
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 31, 2025 06:48:16Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 3108_GON_GIRL_SUICIDE
FILE - 1 VIDEO 1 IMAGE
तलावात आढळला तरुणीचा मृतदेह....
गोरेगाव तालुक्यातील ग्राम सोनी येथील प्रकरण ... शनिवारी निघाली होती घरातून...
Anchor : गोंदिया तालुक्यातील सोनी येथे नवीन तलावात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून चित्रांशी सुरेंद्र बोपचे (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे.
Vo: , चित्रांशी बोपचे ही शनिवारी (दि. २९) सकाळी ११:३० वाजता दरम्यान घरातून बाहेर निघून गेली होती. दुपारच्या सुमारास कुटुंबियांनी इकडे-तिकडे तिचा शोध घेतला. यातच सोनी येथील नवीन तलाव येथे तिच्या चपला असल्याचे कुणीतरी सांगितले. यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी नवीन तलाव येथे चित्रांशीचा शोध घेतला मात्र तिचा थांगपत्ता लागला नाही. मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकाने सकाळपासूनच नवीन तलावात शोध मोहीम राबविली असता चित्रांशीचा मृतदेह हाती लागला. चित्रांशीच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नसून तिच्या मृत्यूबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
5
Report