Back
बदलापूरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली, नागरिकांचा रस्ता बंद!
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 15, 2025 15:01:28
Ambernath, Maharashtra
कात्रप परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली
रस्त्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली
शेकडो लिटर पाणी वाया , नागरिकांचा रस्ता बंद
Bdl water pipe line
Anchor बदलापूर शहरातील कात्रप परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेलं , या परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबी ने रस्ता खणत असताना ही पाईपलाईन फुटली, त्यामुळे सर्व पाणी हे रस्त्यावर आल्याने पूर्णतः रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे अष्टविनायक संकुलाकडे जाणाऱ्या नागरिकांचा रस्ता बंद झाला त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही पाईपलाईन फुटल्याचा नागरिकांचे म्हणन आहे.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
1
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 16, 2025 02:01:33Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Motewadi Dalimb Theft Open
File:03
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: शिरूर तालुक्यातील मोटेवाडी येथे शेतकऱ्यांच्या शेतातून डाळिंब चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मस्क्या आवळण्यात शिरूर पोलिसांना यश आले असून चोरट्यांनी संदीप येलभर या शेतकऱ्यांच्या शेतातून एक लाख 40 हजार रुपये किंमतीच्या डाळिंबाची चोरी केली होती या प्रकरणी शिरूर पोलिसांनी कसून तपास करत आकाश काळे या आरोपीला अटक केलीय.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 16, 2025 02:01:02Beed, Maharashtra:
बीड: जिल्ह्यातील 1035 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर
Anc: बीड जिल्ह्यातील 1035 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले.. प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आपल्या गावाला कोणते आरक्षण सुटते? हे पाहण्यासाठी गाव पुढारी उपस्थित होते. जिल्ह्यातल्या 1035 ग्रामपंचायतींपैकी 219 ग्रामपंचायतीचे आरक्षण ओबीसींसाठी सुटले.. 140 ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जाती साठी सोडण्यात आले. तर 13 ग्रामपंचायतींचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी सोडण्यात आले. उर्वरित ग्रामपंचायतीचे आरक्षण सर्वसाधारणसाठी सुटले आहे.
ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण यापूर्वी जाहीर करण्यात आले होते.. मात्र ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयात प्रकरण सुरू होते.. 6 मे 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे आरक्षण जैसे थेच ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातल्या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानुसार रात्री उशिरा जिल्ह्यातील हे चित्र स्पष्ट झाले आहे.
0
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 16, 2025 01:31:56Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- लातूर शिक्षणाचं शहर की ड्रग्जचा बाजार ? .. लातूर मध्ये तीन महिन्यांत दोन कोटींहून अधिकचा ड्रग्ज जप्त. .. ड्रग्स प्रकरणी आणखीन तिघांना अटक... पालकांमध्ये चिंतेचे वातावरण....
AC ::- लातूर हे शिक्षणासाठी देशभर ओळखलं जाणारं शहर… पण या शिक्षणाच्या गाभाऱ्यात आता अंमली पदार्थांचं विष झिरपतंय… मुंबई आणि हैदराबादहून लातुरात पोहोचणाऱ्या ड्रग्जचा पसारा एवढा वाढलाय की, मागील तीन महिन्यांत पोलिसांनी तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं…लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तीन मोठ्या कार्यवाही करत अकरा जणांना अटक करण्यात आले होते.त्यानंतर आता पोलीसांनी आणखीन तिघांना अटक केली आहे. तरीही या ड्रग्ज सिंडिकेटच्या मुळापर्यंत पोलीस अजून पोहोचले नाहीत. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
बाईट ::- पालक
बाईट ::- पालक
0
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 16, 2025 01:31:45Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश... आठवी वर्गास जिल्हा परिषदेची मंजुरी... विद्यार्थ्याने केलं होतं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या धरणात ठिया आंदोलन....
AC ::- लातूरच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्याच्या दालनात शाळेला इयत्ता आठवी वर्गासाठी मान्यता मिळावी आणि शाळेमध्ये शिक्षक द्यावी या मागणीसाठी एकुर्गा येथील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल 150 विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं… विद्यार्थीनी सकाळी 11 वाजता हे आंदोलन सुरू केलं होतं हे ठिय्या आंदोलन दिवसभर सुरू राहीलं… दालनाबाहेरच वही-पुस्तकं काढून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात शाळाच भरविली होती . विद्यार्थीनी घोषणाबाजी करत आपल्या हक्कासाठी संघर्ष केला आणि अखेर विद्यार्थ्यांच्या चिकाटीपुढे प्रशासन झुकलं आणि रात्री 10 वाजता जिल्हा परिषदेच्या वतीने अधिकृतपणे आठवी वर्ग मान्यतेचे पत्र देण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी गावात फटाके वाजवून आनंद व्यक्त केला...
2
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 16, 2025 01:31:37Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ का उडाला ?
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक नंतर मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक
सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले
यामध्ये अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले हे देखील आपल्या समर्थकासह उपस्थित होते
या बैठकीत पंढरपूरहुन आलेल्या ऍड. रोहित फावडे या तरुणाने मनोगत व्यक्त करताना अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले यांचा ऐकरी उल्लेख केला
यावेळी ऍड. रोहित फावडे याने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्या कानात अमोलराजे भोसले काय म्हणाले? असा आरोप केला
याच ऐकरी उल्लेख आणि आरोपनंतर जन्मजेयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले
आक्रमक समर्थक ऍड. रोहित फावडे याच्या अंगावर धावून गेले, प्रचंड मारहाण यावेळी या तरुणाला करण्यात आली
यावेळी बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला आणि बैठकीत उपस्थित समन्वयकांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला
काहीच वेळात बैठकीच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले, ऍड. रोहित फावडे याला पोलिसांनी आधी बाहेर काढलं
जन्मजेयराजे भोसले आणि त्याचे समर्थक बैठकीच्या ठिकाणाहून निघून गेले
पोलिसांच्या सुरक्षेमध्ये मराठा समाजाची बैठक पुन्हा एकदा सुरु झाली
मराठा समाजाच्या बैठकीत शासकीय विश्रामगृहात घडलेल्या प्रकारावर पडदा टाकत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली
18 जुलै रोजी मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट तालुका बंदची घोषणा देण्यात आली...
जोपर्यंत संबंधित आरोपींवर मुक्का लावणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा मराठा समाजाने दिला...
बैठक संपून बाहेर पडतात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली..
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 16, 2025 01:31:26Yeola, Maharashtra:
अँकर:-
येवला शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी दुचाकी वरून जात असताना दुचाकीच्या हॅंडलखालील खोपडीतून अचानक साप वर आल्याने विद्यार्थ्याने त्वरित दुचाकी थांबवत सर्पमित्र दीपक सोनवणे यांना संबंधित घटनेची माहिती सांगतात सर्पमित्र घटनास्थळी पोहोचताच त्यांनी काळजीपूर्वक पाहणी केली. दुचाकीच्या खोपडीच्या अरुंद जागेत साप लपल्याने रेस्क्यू अधिक कठीण झाले होते. मात्र, अनुभवी सर्पमित्राच्या कौशल्यामुळे आणि धीराने अखेर सापाला सुखरूप बाहेर काढण्यात काढत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या वेळी परिसरातील नागरिकांनी सर्पमित्राचे कौतुक केले. सर्पमित्रांनी देखील नागरिकांना अशा परिस्थितीत घाबरून न जाता तात्काळ मदत मागण्याचे आवाहन केले.
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 16, 2025 01:30:45Yeola, Maharashtra:
अँकर:-
येवला बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, येवला उपजिल्हा रुग्णाला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे शु शोभीकरण करावे अशा विविध मागण्यांसाठी येवल्यातील ऑल इंडिया पॅंथरच्या वतीने विंचूर चौफुली येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
बाईट : प्रवीण संसारे
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 16, 2025 01:30:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - रस्त्यासाठी ग्रामस्थ चक्क चढली झाडावर,पोलिसांसह प्रशासनाची उडाली तारांबळ
अँकर - रस्त्याच्या मागणीसाठी चक्क झाडावर चढून आंदोलन करण्यात आला आहे.सांगलीच्या विटा येथील शेळकबाव
या ठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी झाडावर चढून बसत आंदोलन केले आहे.गावातल्या एका वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागत आहे.याबाबत गेल्या 9 वर्षापासून वारंवार मागणी करून देखील सर्व स्तराकडे दुर्लक्ष होत,असल्याचा आरोप करत कंटाळलेल्या ग्रामस्थांनी गावातल्या झाडावर चढून बसत रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन केले,ग्रामस्थांच्या या पवित्रामुळे मात्र पोलीस प्रशासनाची चांगलीचं तारांबळ उडाली होती.
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 15, 2025 18:00:39Parbhani, Maharashtra:
अँकर- पुणे येथून परभणीकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवास करत असलेल्या १९ वर्षीय विवाहितेची झाली,प्रसुती नंतर ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून पुरुष जातीचे अर्भक महामार्गावर फेकले. ही घटना तालुक्यातील देवनांद्रा शिवारात काल घडली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतलय. पाथरी सेलू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वर शहरापासून दोन किमी अंतरावर देवनांद्रा शिवारात हा प्रकार उघडकीस आला. शेतात काम करणाऱ्या एका व्यक्तीने सदर प्रकार पाहिल्या बरोबर ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. गाडीतून प्रवास करणारी १९ वर्षीय तरुणी आणि २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधितां विषयी
मिळालेली अधिक माहिती अशी की, सदर दोघांनी अंतरजातीय प्रेम संबंधातून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे पुणे येथे कामाला होते. सोमवारी तरुणीच्या पोटात वेदना होत असल्याने पुण्याहून परभणीला खाजगी ट्रॅव्हल्सने येत होते. ट्रॅव्हल्समध्ये या तरुणीने बाळाला जन्म दिला. सदर बाळ मृत जन्मले,त्यानंतर हे अर्भक चालत्या गाडीतून महामार्गावर फेकून दिले होते. संबंधित दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 94 आणि 3(5) नुसार पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 15, 2025 17:02:37Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मराठी भाषेचे नावाखाली दादागिरी करू नये,दादागिरी करायची असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा - मंत्री रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला..
अँकर - मराठी भाषेच्या नावाखाली राज ठाकरेंनी दादागिरी करू नये,दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना आर्मी मध्ये पाठवावे,असा खोचक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना दिला आहे.मराठी ही आपली भाषा आहे,पण एखाद्याला मराठी येत नसेल तर त्याला मराठी बोलण्याबाबत सक्ती करू नये,देशाच्या अनेक राज्यात मराठी बांधव राहतात,त्यामुळे राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या नावाखाली कोणावरही दादागिरी करू नये आणि दादागिरी करायची तसे तर त्यांच्या मनसैनिकांना आर्मी मध्ये पाठवावं असा खोचक सल्ला मंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना लगावला आहे की सांगलीच्या वाळवा येथे पण मोशन नागनाथांना नायकोडी यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
साऊंड बाईट - रामदास आठवले - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.
14
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 15, 2025 16:34:00Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - जयंत पाटलांनी महायुती सोबत यावं, आपण मध्यस्थी करू - मंत्री रामदास आठवलेंची जयंत पाटलांना ऑफर..
अँकर - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती मध्ये येण्याची जाहीर ऑफर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.जयंत पाटील यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुती सोबत आले पाहिजे,जयंत पाटील हे संघर्षशील नेते आहेत.त्यांनी राजीनामा दिला असेल तर आणि विकास करायचा असेल, तर सत्ते सोबत आले पाहिजे.राष्ट्रवादी सोडणार असाल तर मी मध्यस्थी करून त्यांना महायुती मध्ये आणायला तयार आहे,असे देखील मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे, ते सांगलीच्या वाळवा येथे पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती निमित्त आयोजित समारंभ प्रसंगी बोलत होते.
बाईट - रामदास आठवले - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.
14
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 15, 2025 16:04:53Nashik, Maharashtra:
Breaking News -
- नाशिकच्या वडाळारोडवर भीषण अपघात
- अपघातात दुचाकीस्वार विद्यार्थिनीचा मृत्यू
- आयशर ट्रकने विद्यार्थ्यांनीला चिरडले
- ट्रक चालकाने मद्यपान केल्याचा प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं
- मुंबई नाका पोलिसांकडून तपास सुरू
14
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 15, 2025 16:04:46Yeola, Maharashtra:
येवला परिसतील हॉटेलमध्ये अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय महिलेला पोलिसांच्या विशेष पथकाने घेतले ताब्यात
पकडलेली महिला बांगलादेश असल्याची पोलीस सूत्रांची माहिती...
अँकर:-भारतामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नाशिकच्या येवला शहरात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक बांगलादेशी महिला येवला शहर व परिसरामध्ये असणाऱ्या हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करून अवैधरित्या देहविक्री सारखे व्यवसाय करण्यास आली असून पोलिसांनी छापा टाकून या महिलेला ताब्यात घेतलं दरम्यान सदरची महिला ही बांगलादेशी असून तिच्या ताब्यात मेड इन बांगलादेश असलेला एक फोन देखील मिळून आला आहे त्या फोनमध्ये असलेल्या कागदपत्रावरून ही महिला बांगलादेशी असल्याचा निष्पन्न झाला आहे दरम्यान आणखी कोणी आहे का याचा पोलीस शोध घेत आहे.
14
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 15, 2025 15:33:10Yeola, Maharashtra:
अँकर:-येवला शहर व परिसरामध्ये असणाऱ्या हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करून अवैधरित्या देहविक्री सारखे व्यवसाय करणाऱ्या एका परप्रांतीय महिलेला रायते शिवारातून मालेगाव पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे यावेळी दोन पंचा समक्ष या महिलेला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत
3
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 15, 2025 15:31:56Kalyan, Maharashtra:
मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पडणाऱ्या सराईत चोरट्याला डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
झटपट पैसे मिळवण्यासाठी हॉटेल कर्मचारी बनला चोर
परेश घावरी असे चोरट्याचे नाव
Anchor :- सकाळी मोकळ्या हवेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील लाखोंची चैन हिसकावून पळून गेलेल्या चोरट्याला डोंबिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. परेश घावरी असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून त्याने चोरी केलेला एक लाख 80 हजाराची सोन्याची चैन, दोन महागड्या दुचाकी असा साडे पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . परेश कडून डोंबिवली ,उल्हासनगर येथील तीन उकल करण्यात आली आहे.परेश घावरी एका हॉटेलमध्ये काम करत होता मात्र झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी त्याने चोरीचा मार्ग पत्करला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
Byte :- सुहास हेमाडे ( एसीपी)
0
Share
Report