Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

चंद्रपूरात भाजपने उबाठा पक्षाला दिला मोठा धक्का!

AAASHISH AMBADE
Jul 15, 2025 12:34:20
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1507ZT_CHP_UBT_JOLT ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात शिवसेना उबाठा पक्षाला झटका, जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचा भाजपात प्रवेश, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद खेचुन आणण्यासाठी भाजपची खेळी, शिंदे यांच्याकडे आहेत 3 संचालक, 21 संचालक असलेल्या बँकेत आता भाजपच्या 9 सदस्यांसह पक्षाकडे झाले एकूण 12 चे बहुमत अँकर:-- शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवडून आलेले नवनियुक्त संचालक रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश घेतल्याने उबाठा पक्षाला मोठा धक्का बसलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत हा पक्षप्रवेश झाला. रवींद्र शिंदे यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्ष पद दिलं जाण्याची शक्यता आहे. रवींद्र शिंदे आतापर्यंत चार वेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून निवडून आले आहेत.  बँकेच्या राजकारणात किंगमेकर अशी त्यांची ओळख आहे.  विशेष म्हणजे यावेळी मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 21 पैकी 9 भाजप समर्थक संचालक  निवडून आले आहेत. काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देत भाजपचे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात संचालक निवडून आले आहेत. रवींद्र शिंदे यांच्याकडे स्वतःचे 3 संचालक असल्याने भाजप त्यांना अध्यक्षपद देऊन बँकेवर पहिल्यांदाच झेंडा रोवणार आहे. भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या सक्रिय खेळीने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकणार आहे. या पक्षप्रवेश प्रसंगी माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील,  आ. जोरगेवार, आ. देवतळे यांची उपस्थिती होती. या नव्या घडामोडीने 13 वर्षानंतर झालेल्या निवडणूकीनंतर बँक काँग्रेसच्या ताब्यात आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न उधळून निघाले आहेत. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top