Back
महाद्वार चौकात गिरीश महाजनने केले भाविकांचे व्यवस्थापन, जानून घ्या कसे!
Pandharpur, Maharashtra
06072025
Slug - PPR_GIRISH_MAHAJAN
feed.on 2c
file 05
------
Anchor - राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी स्वतः महाद्वार चौकात उभे राहत केले भाविकांच्या येण्या जाण्याचे नियोजन
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये लाखो वारकरी दाखल झाले आहेत. महाद्वार चौक येथे पहाटेपासून वारकऱ्यांची गर्दी होत असते. स्नान करून मंदिराकडे जाणारे, मंदिरा कडून स्नानाला जाणारे तसेच प्रदक्षिणा करणारे वारकरी अशा भाविकांची गर्दी होते. त्याचे व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिसांच्या मदतीने केले आहे. वारकऱ्यांना सूचना देऊन त्यांना शिस्तीत चालण्याचे आवाहन ते करत होते
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 0607ZT_INDAPURACCIDENT
FILE 2
भिगवण मध्ये दुचाकीला वाहनाची धडक,दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू..
अपघात सीसीटीव्हीत कैद...
Anchor_पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये दुचाकी ला अपघात झालाय. यात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे.मल्हारी पवार असं मृत व्यक्तीचं नाव असून तो श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावचा असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या MH 16 AG 2343 या दुचाकी ला चार चाकी वाहनाने जोराची धडक दिली यात मल्हारी पवार यांना गंभीर दुखापत झाली. यात पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघात ग्रस्त चार चाकी वाहन फरार झालं आहे. अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
0
Share
Report
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0507ZT_DAUNDCCTV
FILE 1
स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद..... पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने आरोपींना केलं घेतलं ताब्यात..... आरोपींना ताब्यात घेतानाच सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.... 30 जून रोजी पहाटे सभा चार वाजता घडली होती भयानक घटना
Anchor_पुण्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अत्याचार प्रकरणातील दोन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. समीर उर्फ लकी पठाण आणि विकास सातपुते अशी आरोपींची नावे असून या दोघांनाही पोलिसांनी आता जेरबंद केलं आहे.
रांजणगाव येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल आहे आणि या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलं आहे. यातील समीर उर्फ लकी पठाण हा माळशिरस तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे तर दुसरा आरोपी विकास सातपुते हा इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पोलिसांच्या पथकाला रांजणगाव या ठिकाणी आरोपी थांबला आहे याची खबर मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली आहे आणि या कारवाईची ही सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहेत.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याण खडकपाडा पोलिसांची कारवाई
विना परवाना गावठी कट्टा आणि पोलिस गणवेश बाळगणाऱ्यास अटक
Anchor - विना परवाना गावठी कट्टा आणि पोलिस गणवेश बाळगणाऱ्यास खडकपाडा पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव सनीकुमार विजय पाल उर्फ चौहाण असे आहे. तो कल्याणच्या मिलिंदनगर परिसरात राहत होता.
Vo...खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गौरीपाडा मिलिंदनगर परिसरात एक व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. खडकपाडा पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय गायकवाड यांनी 3 जुलै रोजी सापळा रचला. त्याठिकाणी एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव सनीकुमार विजय पाल उर्फ चौहाण असे होते. त्याच्याकडे गावठी कट्टा मिळून आला. त्याच्या घरीचा झडती घेतली असता. त्याच्या घरी पोलिसांचे दोन जोडी गणवेश आढळून आले. गणवेशासोबत एक स्टारही मिळून आले. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या इंस्टाग्रामवर त्याने पोलिसाचा गणवेश घालून हाती गावठी गट्टा घेत एक फोटोही पोस्ट केला आहे.
Byte :- कल्याणजी घेटे ( एसीपी )
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0607ZT_WSM_ZEE_NEWS_IMPACT
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अमानी ते करंजी मार्गाची अत्यंत खराब अवस्था होती.रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.झी 24 तासने ही बातमी प्रसारित केल्यानंतर बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू केले. या सकारात्मक बदलामुळे गावकऱ्यांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत.
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडले आहे
-------
आषाढीनिमित्त विदर्भातील पंढरपुर अर्थात धापेवाडा येथे विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांचीं पहाटेपासूनच मोठी रिघ लागलीय... केवळ नागपूर, विदर्भातूनच नव्हे मध्य मध्य प्रदेशातूनही अनेक भक्त, वारकरी विठ्ठल रुक्माई च्या दर्शनासाठी धापेवाड्याला पोहोचले होते. भक्तगण आणि वारकऱ्यांचा टाळ मृदुंग, हरिनामाच्या गजरांन संपूर्ण परिसर दुमदुमला होता .. मंदिराचा गर्भगृह फुलांच्या आरासन सजवण्यात आला होता ... पुढील चार दिवस धापेवाडा येथे यात्रा सुरू राहणार आहे... दरम्यान लाखो भक्त विठुरायाचे दर्शन घेणार आहेत
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- मोहरम मिरवणूक
फीड 2C
अँकर:- राज्यासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर शहरातील मोहरम उत्सवातील सवारी विसर्जन मिरवणुकीला दुपारी बारा वाजता कोठला येथून प्रारंभ झाला आहे. कोठला परिसरामध्ये सवारीचे प्रदक्षिणा झाल्यानंतर सवारी कोठला परिसरातून निघून शहरातील विसर्जन मार्गावर निघते. ही मिरवणूक रात्र 8 वाजेपर्यंत चालते मिरवणूकीत सवाऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली पाहायला मिळाली. यासोबत मोहरमच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला असून यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात दोन अपर पोलीस अधीक्षक, चार पोलीस उपअधीक्षक, ६५ अधिकारी आणि ८२० अंमलदार यांचा समावेश आहे. शहरात सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवले जाणार आहे. शहरात मोहरमच्या पार्श्वभूमीवर 439 लोकांना हद्दपार करण्यात आले आहे, ज्यामध्ये कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील लोकांचा समावेश आहे.
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : राज्यात धार्मिक जातीय मुद्दे पुढे करून शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना बदल देण्यात येत आहे, राज आणि उद्धव ठाकरे मराठी हिंदू म्हणून एकत्र येत असतील, मराठा ओबीसी म्हणून कोणी एकत्र येत असेल तर शेतकरी शेतमजूर म्हणून देखील एकत्र यायला पाहिजे. अशी भूमिका प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मांडली आहे. बच्चू कडू उद्यापासून १४ जुलै पर्यंत सातबारा कोरा पदयात्रा काढत आहे, अमरावतीच्या पापळ ते यवतमाळच्या चिलगव्हाणपर्यंत 138 किलोमीटर ही पदयात्रा असणार आहे. या यात्रेत शेतकरी शेतमजूर जर एकवटले तर सत्तेतल्या माणसांना सुसू येईल, त्यांना पॅन्ट सोडण्याची देखील फुरसत मिळणार नाही असा इशारा कडू यांनी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील ही यात्रा राजकीय नाही, यात पक्षीय झेंडा नाही.
असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साडे तीन लाख शेतकरी महिलांचे सिंदूर पुसल्या गेले. सद्यस्थितीत सहा आठ महिन्यापासून मजुरांची मजुरी मिळाली नाही.
काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचे महत्व कुणालाही नाही. देशात शेती विकली पाहिजे असे षडयंत्र आहे. शेती व्यापार झाला पाहिजे त्यातून शोषण झाले पाहिजे अशा षडयंत्रातून
शेतीचे व्यापारीकरण करण्याचा आणि त्यातून कारखानदारी चालवण्याचा डाव असल्याचा आरोप कडू यांनी केला.
बाईट : बच्चू कडू
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर-हिंगोलीच्या नर्सी नामदेव येथे आज आषाढी एकादशीनिमित्त संत नामदेव महाराजांच्या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या कयाधू नदीवर कडती आणि इतर गावांना जाण्यासाठी असणाऱ्या पुलाचं सध्या बांधकाम सुरू आहे. परंतु पुलाच्या बाजूने केलेला पर्यायी रस्ता मात्र वाहून गेला आहे. त्यामुळे आज भाविकांना येण्यासाठी चिखल व पाण्यातून मार्ग काढून यावं लागत आहे. या भागातील शेतकऱ्यांना देखील दुरून वळसा घालून जावं लागत आहे.
बाईट- १,२- भाविक
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0607ZT_WSM_RAIN_6JULY
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर :वाशिम जिल्ह्यात आज दुपारपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय.अतिवृष्टी झाल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता असून त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.तर आज आषाढी एकादशीच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यानं विविध मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर या पावसामुळे शेती काम सुद्धा खोळंबली असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट
मनसेच्या पदाधिकार्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कल्याणात राजकीय वातावरण तापले
Anchor :- कल्याण मध्ये शिवसेना शिंदे गट आणि मनसे मध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे .
मनसेचे पदाधिकार्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली .ही पोस्ट व्हाटरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय .आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे मनसेचे पदाधिकारी रोहन पवार यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .या तक्रारी नुसार पोलिसांनी रोहन पवार विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय .याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी उगाच कुणी अशा पोस्ट टाकून वातावरण गढूळ करू नये ,कार्यकर्त्यामध्ये वातावरण पेटवू नये ..अशा पोस्ट मुळे शहरातील वातावरण गढूळ करू नये ,कार्यकर्त्यांनी शांत राहावं ..पोलीस कारवाई करतील ..इथून पुढे अशा आक्षेपार्ह पोस्ट खपवुन घेणार नाही असा इशारा दिला आहे .
Byte :-स्वप्निल एरंडे ( शिवसेना शिंदे गट तक्रारदार
Byte :- रवी पाटील ( शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख )
0
Share
Report