Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

मावळात शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे भात लागवड करण्याचा घेतला निर्णय!

CHAITRALI RAJAPURKAR
Jun 27, 2025 03:36:33
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 2706ZT_MAVAL_PIKPANI Total files : 03 Headline -आंदर मावळात शेतकऱ्याचा यंत्राने लागवडीवर भर Anchor: मावळात भात शेतीसाठी समाधानकारक पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू असून मात्र वेळेवर शेत मजूर मिळत नसल्याने शेतकरी यंत्राद्वारे शेती करत आहे. आंदर मावळात मागील काही वर्षा पासून शेतमजूर टंचाई होत असल्याने शेतकऱ्यांनी यंत्राने लागवड करण्यावर भर दिला आहे. ह्यावर्षी मे महिन्यापासून पडणाऱ्या पावसामुळे भात रोपवाटिका टाकण्यात अडचणी आल्या. त्यामुळे ह्यावर्षी यंत्राने लागवड करण्यासाठी प्लास्टिक ट्रे खरेदी करून त्यामध्ये रोपवाटिका तयार केल्या आहेत. सध्या मजुरांची टंचाई त्यामुळे वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे मशीनने भात लागवड हा एक उत्तम पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. यावर्षी मावळ तालुक्यातील डाहुली गावचे शेतकरी सोमनाथ पिंगळे कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्लॅस्टिक ट्रे मध्ये माती खत मिक्स करून त्यात इंद्रायणी जातीचे बियाणे टाकून उत्तम रोपवाटिका तयार केल्या आहेत. त्यासाठी बाजारातून 400 प्लास्टिक ट्रे विकत घेतले. रोपवाटिका सद्यस्थितीत चांगली आलेली आहे. यंत्रांनी भात लागवड करण्यासाठी साधारण एक एकराला 100 ट्रे लागतात त्यासाठी 10 ते 15 किलो बियाणे लागते. त्यामुळे यंत्राने भात लागवड करताना साधारणपणे निम्मे बियाणे कमी लागते. त्यामुळे खर्च ही कमी येतो. आणि इंद्रायणी भात फुटव्यांची संख्या देखील जास्त येत असल्याने उत्पादनात मोठी वाढ होते... बाईट : नविनचंद्र बोराडे,सहाययक कृषी अधिकारी (file no.03)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement