Back
धाराशिवमध्ये शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल, रस्ता रोको आंदोलनाची कहाणी!
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव: ब्रेकिंग
DHARA_FIR
धाराशिवमध्ये शक्तिपीठ महामार्गा विरोधात रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या चाळीस शेतकऱ्यावर गुन्हे दाखल
महामार्ग अडवला आणि जमावबंदीचे उल्लंघन केले म्हणून शेतकऱ्यावर गुन्हे दाखल
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी केला होता रास्ता रोको
एक तासापेक्षा जास्त काळ रस्ता अडवल्यामुळे धाराशिव मधील शेतकऱ्यावर धाराशिव पोलिसांकडून गुन्हे दाखल.
येत्या दहा तारखेपर्यंत धाराशिव जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0307ZT_JALNA_ARREST(4 FILES)
जालना : घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना घेतलं ताब्यात, 8 लाख 20 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त
बिड, पुण्यातून आरोपींना घेतलं ताब्यात
Anchor: जालन्यातील अंबड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केलीय.या आरोपींनी 6 दिवसांपूर्वी अंबड शहरातील ओम शांती कॉलेजजवळ असलेलं कुटुंबाच्या घरात कुलूप तोडून चोरी करत घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण 11 लाख 13 हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी अंबड पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता यातील मुख्य आरोपी शेख अशपाक शेख आसिफ हा बीड जिल्ह्यातील पेठ बिड पोलीस ठाण्याच्या हददीत लपुन बसलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल.ही चोरी त्याने शेख कलीम शेख अलीम या साथीदारासह केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी शेख कलीम शेख अलीम याला शिक्रापुर पुणे या ठिकाणाहून अटक केली.आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह 8 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करत आरोपी विरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बाईट:संतोष घोडके,पोलिस निरीक्षक अंबड,जालना
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0307ZT_JALNA_JUGAR(1 FILE)
जालना : जुगार अड्डयावर हसनाबाद पोलिसांचा छापा,1 लाख 35 हजारांची रोकड जप्त.
जुगार अड्ड्यावरुन 9 प्रतिष्ठितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Anchor : जालन्यातील चिंचोली फाट्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जुगार खेळणाऱ्या 9 प्रतिष्ठीतांना जुगार खेळताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.हसनाबाद पोलिसांनी ही कारवाई केली. एका शेतात अवैधरित्या हा जुगार अड्डा सुरु असतांना पोलीसांनी ही कारवाई केली. या कारवाईत जुगार चालकासह परिसरातील नऊ प्रतिष्ठितांना नागरिकांना जुगार खेळताना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून रोख 1 लाख 34 हजार आणि पाच दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक चौकशी करतायत.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn encroachment av
Feed attached
शहरात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत आज पडेगाव-मिटमिटा येथील मालमत्तांवर कारवाई होणार आहे. सुमारे ६०० मालमत्ता या रुंदीकरणात बाधित होऊ शकतात. चिकलठाणा, मुकुंदवाडी येथे थेट कारवाई करण्यात आली होती. मात्र या पडेगावात दोन दिवसांपूर्वी मार्किंग करण्यात आली तर भोंगा फिरवून सूचना दिल्याचा दावादेखील मनपाने केला आहे. ६० मीटरपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करणार असल्याचे मनपाने सांगितले. पडेगावातील रस्त्याचे सेंटर काढून दोन्ही बाजूने ३० मीटरच्या अंतरापर्यंत मार्किंग करण्यात आली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून रस्ता रुंदीकरणाची मोहीम होणार आहे. यासाठी ५००हून कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. विशेष म्हणजे या कारवाईत २५ पेक्षा अधिक जेसीबीद्वारे कारवाई होईल. पडेगावमध्ये यापूर्वी कचरा डेपो आणि धार्मिक प्रकरणामध्ये दोनदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत पूर्ण आढावा घेऊन मनपा आणि पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे. ज्यांच्याकडून तणाव निर्माण केला जाऊ शकतो किंवा कारवाईत अडथळा निर्माण केला जाऊ शकतो अशा नागरिकांची यादीच प्रशासनाने काढली आहे...
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0307_BHA_UPOSHAN
FILE - 3 VIDEO
१६ तास कृषी वीज द्या, अन्यथा खुर्ची खाली करा कोका परिसरातील शेतकरी आंदोलनावर उपोषणकर्त्यांनी केली मागणी
Anchor : भंडारा जिल्ह्याच्या पालोरा, जांभोरा, करडी, कोका परिसरातील शेतकऱ्यांनी १६ तासांऐवजी केवळ १२ तास कृषी वीज पुरवठा करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ, जांभोरा येथून पायदळ पदयात्रा काढून करडी येथील वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना लागणारा किमान १६ तास वीज पुरवठा करण्यासाठी हे आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
१२ फेब्रुवारी रोजी १६ तास वीज पुरवठा मिळावा, अशी मागणी करत उपोषण सुरू करण्यात आले होते. त्यावेळी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी भेट देऊन १२ तास वीज पुरवठ्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे उपोषण सोडवण्यात आले होते. वीज वितरण विभागाने पुढील १० दिवस १२ तास वीज पुरवठा केला, मात्र नंतर ते पुन्हा ८ तासांवर कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. शेतकऱ्यांना पीक घेताना पाणी आणि विजेची अत्यंत गरज असल्याने त्यांनी शेतात बोअरवेल लावले असून वीज कनेक्शनही घेतले आहे. मात्र ८ तासांमध्ये वारंवार वीज कट होऊन खऱ्या अर्थाने फक्त ४ ते ५ तास विजेचा पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे.
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0307_BHA_VILLAGE_ISSUE
FILE - 4 VIDEO
कोदामेडी वासीयांचे आरोग्य धोक्यात.... ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेकडो गावकऱ्यांच्या आरोग्य धोक्यात
ANCOR- भंडारा जिल्हातील लाखांदूर तालुक्यातील चिचाळ कोदामेडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोदामेडी गावातील सांडपाण्याच्या नाल्या ग्रामपंचायती ने पावसाळा सुरु होण्याआधी साफ सफाई न केल्यामुळे गेल्या आठ दिवसात पासून होणाऱ्या सततदार पावसामुळे गावातील नाल्या तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे समस्त कोदामेडी वाशीयांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने गावामध्ये असंतोष आहे. कोदामेडी हे गाव अतिशय संवेदनशील गाव आहे. या गावांमध्ये जास्तीत जास्त नाथ जोगी समाजाची लोक मोठ्या प्रमाणे राहत आहे. आजही हा समाज विकासापासून कोसो दूर आहे. पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंगू, मलेरिया चे मच्छर साचलेल्या पाण्यापासून तयार झाले आहेत आणि त्यापासून माणसाला आजाराची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत चिचाळ येथील प्रशासनाला माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक कोदामेडी येथील नाल्यांची सफाई करण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांनी आरोप केला आहे. गावकऱ्यांनी लेखी व तोंडी तक्रारी ग्रामपंचायतला देऊन सुद्धा आजपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाने कोदामेडी येथील नाल्या साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये साचून परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झालेअसून.गावातील सांडपाण्यांच्या नाल्या साफ करण्यात याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावाकऱ्यांनी दिला आहे.
Byte - कार्तिक वडस्कर स्थानिक नागरिक
Byte - शांता बाई चौव्हाण - ग्रामपंचायत सदस्य
Byte - सुरेश कुळसुंगे सरपंच चीचाळ
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ बाईट आणि स्कूल बस चे संग्रहीत व्हिडिओ जोडला आहे
-------
शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अनफिट स्कूल बसेसच्या मुद्दा विधिमंडळातील चर्चेत आला..स्कूल बसेसचे फिटनेस तपासण्याची मागणी आमदार प्रवीण दटके यांची औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागण केलीरा. राज्यात अनेक ठिकाणी ठिकाणी शाळा सुरू झाल्या असून मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी स्कूल बसच्या माध्यमातून प्रवास करत आहेत.नागपूर शहरात धावणाऱ्या 837 स्कूल बसेस फिटनेस सर्टिफिकेट शिवाय धावत आहेत, याबाबतची जनहित याचिका माननीय उच्च न्यायालयात सादर आहे .
परिवहन विभागाने तात्काळ याची गंभीर दखल घेऊन नागपूर शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस, व्हॅन ऑटो रिक्षा यांचे रेकॉर्ड घ्यावेत आणि एकही अनफिट रिक्षा बस किंवा व्हॅन रस्त्यावर धावणार नाही याकरिता कार्यवाही करावी अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहात औचित्याचा मुद्द्याद्वारे उपस्थित केली.
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_MCCOCA
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपीवर मोक्का ची कारवाई होणार.
धाराशिव पोलिसांच्या हालचाली सुरू,
फाईल वरिष्ठांकडे पाठवली सूत्रांची माहिती
अँकर
धाराशिव ; राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींवर 'मोक्का' लावण्याच्या हालचाली धाराशिव पोलिसांकडून सुरू आहेत. पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण – आता थेट मोक्का अंतर्गत कारवाईच्या दिशेने वाटचाल सुरू!
या प्रकरणात ३७ आरोपी असून, अजूनही १५ आरोपी फरार आहेत. पोलिसांनी कारवाईची सर्व तयारी पूर्ण केली असून, मोक्कासाठीची फाईल वरिष्ठांकडे पाठवली गेली आहे.
पोलिसांच्या तपासात या ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शन केवळ तुळजापूरपुरतंच नाही, तर धाराशिव, सोलापूर, पुणे आणि मुंबईपर्यंत असल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणात पोलीस तपासावर वारंवार संशय घेतला जात होता. त्यामुळेच आता पोलिसांनी 'मोका' अंतर्गत कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
BYTE – रितू खोखर,
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - महाडच्या नाणेमाची धबधब्यावर जीवघेणी स्टंटबाजी ...... ट्रेकर्सच्या स्टंटचे व्हिडीओ समाज माध्यमांवर ..... स्थानिकांकडून कारवाईची मागणी ......
अँकर - पावसाळी पर्यटनात पर्यटकांच्या अतिउत्साहात जीव गमावण्याच्या घटना घडत असतानाच महाडच्या नाणेमाची धबधब्यावर ट्रेकर्सची जीवघेणी स्टंटबाजी समोर आलीय. धो धो वाहणाऱ्या धबधब्याच्या दोन्ही बाजूला दोरखंड बांधुन या चमूने केलेल्या साहसी खेळांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर पहायला मिळतात. काळजाचे ठोके चुकवणाऱ्या या व्हिडिओतील स्टंटबाजी जीवघेणी ठरू शकते. अशा स्टंटबाजांमुळे पावसाळी पर्यटन बदनाम होत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_marhan_cctv
सेतू कार्यालयात वकिलासह एकावर प्राणघातक हल्ला. माडसांगवी येथील घटना, सी सी टिव्ही मध्ये कैद
अँकर
नाशिकच्या मानसांगवी येथे सेतू कार्यालयात काम करत असताना एका वकिलासह सेतू मध्ये कामानिमित्त आलेल्या एका इसमावर चार ते पाच संशयतांनी प्राण गाथा खाल्ला गेल्याचा प्रकार घडलाय...हल्ल्यात वकीलासह अन्य एक गंभीर जखमी झालाय... मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे... याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे एडवोकेट रामेश्वर बोराडे यांचे मांग सांडवे येथे सेतू कार्यालय आहे दुपारी ते कार्यालयात असताना दिनकर टिळे टीव्ही सेतू कामानिमित्ताने आले होते... संगणकावर काम करत असताना चार ते पाच संशयित शेतू कार्यालय मध्ये आले.. अचानक शिवीगाळ करत होते त्याने एडवोकेट बोराडे यांच्यावर हल्ला केला दहा ते पंधरा मिनिटे संशयतांनी कार्यालयात धुडकूस घातली... हाल्यानंतर संशयित दुचाकीने फरार झाले.. घटनेनंतर एका वकिलाला स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले... याबाबत मांग सांगवी येथील ग्रामस्थ यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दहावीच संशयतांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे... या संदर्भात पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत...
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर:- निफाड तालुक्यातील नांदगाव डोंगरगाव शिवारातील एका विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या बिबट्याला रेस्क्यू केले बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले असून त्याच्यावर उपचार करून त्याला पुढील कारवाईसाठी वनविभाग कार्यालय येथे नेण्यात आले
0
Share
Report