Back
गुन्हेगार सागर झेंडेची मस्ती बीड पोलिसांनी उतरवली!
Beed, Maharashtra
बीड:खाकीने उतरवली गुन्हेगाराची मस्ती!
दहशत माजवणाऱ्या गुन्हेगाराला बेड्या घालून शहरातून फिरवले
Anc- किरकोळ कारणावरून धक्का लागल्याने आरोपी सागर झेंडे याने हातातील बियरची बॉटल फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या गुन्हेगाराची मस्ती बीड पोलिसांनी उतरवली.. आरोपी सागर झेंडेला पोलिसांनी अटक करत शहरातून फिरवले.
या प्रकरणात झेंडे विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी झेंडे पोलिसांना चकवा देत पसार झाला होता.. अखेर पोलिसांनी याला अटक केली. या आरोपीवर इतर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आणि हीच दहशत उतरवण्यासाठी आरोपीची शहरातून पायी चालवत भाईगिरी उतरवण्यात आली..
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Pune, Maharashtra:
Feed 2C
Slug: Wagholi Unit Six Action
File:01
Rep: Hemant Chapude(Wagholi)
Anc:दरोड्याच्या गुन्ह्यातील आठ महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात पुणे पोलिसांच्या युनिट सहा ला यश आले असून फिरोजंखा दुल्होत अलं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीने रात्रीच्या वेळी पेट्रोलियम करणाऱ्या पोलिस अंमलदारावरती दरोड्याच्या बहान्याने धारदार शस्त्राने हल्ला केला होता
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया वाघोली पुणे...
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn university av
Feed attached
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना संलग्नता शुल्कावर २०१७ पासून १८ टक्के जीएसटी आकरण्यात आला आहे. हा कर भरण्यासाठी जीएसटी विभागाने विद्यापीठाला नोटीस पाठविलेली आहे. त्यावर विद्यापीठाने तिसऱ्यांदा महाविद्यालयांच्या प्राचार्याना स्मरणपत्र काढून जीएसटी भरण्याचे आदेश दिले आहेत, तसेच जीएसटी न भरल्यामुळे आयकर विभागाकडून आकारण्यात येणारा दंडही संबंधित महाविद्यालयांनाच भरावा लागणार असल्याचेही विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने स्पष्ट
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0307_BHA_DHAN_KHAREDI
FILE - 5 VIDEO
उद्दिष्ट नसल्याने शेतकऱ्याची धान खरेदी रखडली..... सरकारने उद्दिष्ट न वाढविल्यास व्यापाऱ्यांना कमी दरात धान विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ.....
Anchor :- भंडारा जिल्ह्यात धान खरेदी रखडली असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात 5 लाख 75 हजार क्विंटल धान खरेदीची उद्दिष्ट मिळाल्याने आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी पूर्ण झाली आहे, पण भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना चांगला उत्पादन झाल्याने आणखी जवळ्पास 25 लाख क्विंटल धान खरेदी होण्याची शकतात आहे. सद्या उद्दिष्ट नसल्याने शेतकऱ्यांचे धान तसेच पडून आहे. त्यामुळे शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून द्यावे अशी मागणी होत आहे. अन्यथा कमी दरात व्यापाऱ्याला धान विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आता खरीप हंगामाची पेरणी सुरू असून शेतकरी लागवडी करीता पैसा आणायचा कुठून असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे पडला आहे.
BYTE : खेमराज गिरेपुंजे, शेतकरी
BYTE : पुरुषोत्तम हेमने, शेतकरी
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn airport av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर च्या चिकलठाणा विमानतळावर महिनाभरापूर्वी ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या ३ अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. आता या पाहणीच्या अहवालाची विमानतळ प्राधिकरणाला प्रतीक्षा असून, अहवालानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेची दिशा ठरणार आहे. गृहमंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्टलाही मंजुरी मिळण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातून किमान हिवाळ्यात तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. ब्यूरो ऑफ इमिग्रेशनच्या ३ अधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. या सुविधा आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या दृष्टीने योग्य आहेत की नाही, त्यात काही बदल करणे गरजेचे आहे का, या संदर्भात ब्यूरो ऑफ इमिग्रेशनकडून विमानतळाला अहवाल दिला जाईल. अद्यापपर्यंत हा अहवाल आलेला नाही, परंतु काही बदल करावे लागतील, अशी चिन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- शिंगणापूर; आंदोलन स्थगित
फीड 2C
अँकर:- महाराष्ट्र काँग्रेस कमिटी कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी शनिशिंगणापूर येथे सुरू केलेल आमरण उपोषण आणि धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. शनिशिंगणापुर देवस्थानतील बनावट अॅप, बनावट देणगी पावत्या आणि बनावट QR कोडच्या माध्यमातून करोडो रूपयांची लुट केल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर ठोस करवाई करावी या मागणीसाठी माळवदे यांनी आंदोलन सुरू केले होते मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चार दिवसांत या प्रकरणी एफआयआर दाखल होईल असे आश्वासन दिले सोबतच स्थानिक आमदार विठ्ठलराव लंघे यांनी देखील याबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडू अशी ग्वाही दिल्याने उपोषण आंदोलन स्थगित केल्याचे माळवदे यांनी सांगितले.
बाईट:- संभाजी माळवदे, काँग्रेस कमिटी कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
मोटारसायकल चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Anchor : स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया
पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल २ लाख ३५ हजार रुपयांच्या चार चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या.
सुनील रहांगडाले (रा. हिरापूर) हा कुन्हाडी परिसरात चोरीच्या मोटारसायकल विक्रीसाठी फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिस पथक गस्त घालत असताना कुन्हाडी ते हिरापूर रस्त्यावर संशयित हालचाली करणाऱ्या सुनील रहांगडालेला मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत राजनांदगाव, हिवरा (गोंदिया), सालेकसा येथून चार मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चार मोटारसायकल जप्त करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- तरुणीची आत्महत्या
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगरच्या केडगाव परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तपस्या सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या तरुणीच नाव असून आज दुपारी राहत्या घरी गळफास लावून तिने आत्महत्या केलीये. (17 वर्षीय युवती असल्याने नाव वापरावे की नाही ते ठरवावे) आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट असून नेमकी घटना कशामुळे घडली याबाबत कोतवाली पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय. ही तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे त्या ठिकाणी तिचे काही विद्यार्थिनींसोबत वाद झाले असावेत त्यातून ही आत्महत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi av
Feed attached
नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वरील धरणांतून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सध्या ६ हजार ८७४ क्युसेकने सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा ४५ टक्क्यांवर आला असून मागील वर्षाच्या तुलनेत ४० टक्के पाणीसाठा अधिक आहे. मागील वर्षी याच दिवशी जायकवाडीत ४.५४ टक्के साठा होता. जायकवाडी धरण क्षेत्रात पाऊस नसला तरीही वरील भागात पाऊस झाल्याने गोदावरीवरील अनेक छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढला असून, मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातसुद्धा पाण्याची आवक दहा दिवसांपासून सुरू आहे. आवक सुरू असून धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आतापासून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. सध्याचा पाणीसाठा बघता मराठवाड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून पावणेदोन लाख हेक्टर शेतीलादेखील पाणी यातून मिळेल एवढे पाणी सध्या जायकवाडीत उपलब्ध आहे. आवक सुरू असल्याने जायकवाडी पुढील दोन-तीन दिवसांत पन्नास टक्क्यांवर जाईल
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
पावसाच्या साचलेल्या पाण्यात भरते शाळा ,
साचलेल्या घाण पाण्यात बसूनच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची वेळ
Amb school
Anchor अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील संत सावळाराम महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना पावसाच्या असलेल्या पाण्यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे . शाळेच्या वर्गातच पावसाचे पाणी साचत आहे. धक्कदायक म्हणजे या पाण्यात बाजूच्या गटारातील सांडपाणी मिसळत आहे पावसात पाण्याचा निचरा होत नसल्याने या घाण पाण्यात बसूनच शालेय धडे
गिरवण्याची विद्यर्थयावर येत आहे. सध्या हा व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. गेल्या अनेक दिवसांन पासून बदलापूर पाईपलाईन रोडचे सिमेंट कॉक्रीटीकरणाचे काम झाले आहे.मात्र गटारांची बांधणी तसेच सफाई योग्य न झाल्याने त्याचा फटक रस्त्याच्या लगत असलेल्या शाळकरी विद्यार्थ्याना बसला आहे.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_BHIMKUND_WKT दोन फाईल आहे
रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
चिखलदऱ्यातील भिमकुंड धबधबा प्रवाहित; विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, चिखलदरा हाऊसफुल्ल
अँकर :- पावसामुळे विदर्भाचे नंदनवन चिखलदरा निसर्ग सौंदर्याने नटले आहे. तसेच परिसरातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहे. ३ हजार ५०० फुटांवरून वाहणारा भिमकुंड धबधबाही प्रवाहित झाला असून ही मनमोहक दृश्य टिपण्यासाठी पर्यटक भिमकुंड पॉईंटवर गर्दी करत आहे. उंचावरून वाहणारा पांढऱ्या शुभ्र पाण्याचा हा धबधबा पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी भिमकुंडवर पर्यटकांची गर्दी झाली असून राज्यभरातील अनेक पर्यटक चिखलदऱ्यात हजेरी लावत असल्याने चिखलदरा सध्या हाऊसफुल्ल झाले आहे. दरम्यान या धबधब्याचा उल्लेख महाभारत काळात असून या ठिकाणी विराट राजाचे राज्य होते. ते अज्ञात वासात असताना पांडव वेशांतर करून विराट नगरीत राहायला आले. त्यानंतर महाबली भीमाने किचकाचा वध करून त्याचा मृतदेह खोल दरीत फेकला आणि भीमाने स्वतःचे रक्तरंजित हात आणि पूर्ण शरीर स्वच्छ करण्यासाठी ज्या कुंडामध्ये स्नान केले ते भीमकुंड नावाने ओळखले जाते अशी आख्यायिका देखील आहे. यंदा पासून या धबधब्याच्या वरून रोप वे आणि सायकलिंग सुरू केल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
WKT
0
Share
Report