Back
गोंदियात मोटारसायकल चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
Bhandara, Maharashtra
मोटारसायकल चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Anchor : स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया
पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल २ लाख ३५ हजार रुपयांच्या चार चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या.
सुनील रहांगडाले (रा. हिरापूर) हा कुन्हाडी परिसरात चोरीच्या मोटारसायकल विक्रीसाठी फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिस पथक गस्त घालत असताना कुन्हाडी ते हिरापूर रस्त्यावर संशयित हालचाली करणाऱ्या सुनील रहांगडालेला मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत राजनांदगाव, हिवरा (गोंदिया), सालेकसा येथून चार मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चार मोटारसायकल जप्त करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम,साडेचार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय..धरण 76 टक्के भरले..
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम आहे.त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे,असून धरणातून वारणा नदी पात्रात येथे 24 तासात साडेचार हजार क्युसेक् पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय धरण प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सूर असून धरणात 34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात 27.50 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे,त्यामुळे धरण 76 टक्के भरले आहे.तर पावसाचा जोर आणि अतिवृष्टी कायम असल्याने धरणातुन वारणा नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात येणार असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे,असा इशारा पाटबंधारे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0307ZT_WSM_REPLANTING_OLD_TREES
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथे वाऱ्यामुळे अर्धवट पडलेलं ५० वर्ष जुनं पण अजूनही जिवंत असलेलं वडाच्या झाडाला स्थानिक वृक्षप्रेमींनी वाचवले आहे.झाडाची भैरवगड शिव मंदिराजवळ,धारकांटा फाटा परिसरात या वडाच्या झाडाची पुनर्लागवड करण्यात आली.या कामासाठी दोन क्रेन व एक ट्रेलरचा वापर करण्यात आला, तर राजू वानखेडे यांनी स्वतःच्या शेतात जागा उपलब्ध करून दिली.या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील सामान्य माणसाचा ही सहभाग महत्त्वाचा आहे, याचा सकारात्मक संदेश दिला गेला आहे.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
मुंबई नंतर डोंबिवलीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या कार्यकर्ते कडून बॅनर बाजी
ठाकरेच्या विजयी सभे आधी झलकळे 5 तारखेच्या आमंत्रणाचे बॅनर
*महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस 'मराठी' बोलतांना पाहायचं आहे... मग ही सुरवात आहे!... आपल्याला जाहिर आमंत्रण राज ठाकरे - उद्धव ठाकरे*...अश्या अश्याचे बॅनर
तर मनसे कडून " **मी अंत्यत कडवट मराठी आहे आणि माज्यावरचे संस्कार पण तेच आहेत. - राज ठाकरे*माय मराठीच्या अस्मितेसाठी बहुसंख्येने उपस्थित राहूया!*
*
अश्या आशयाचे झळकले बॅनरस....
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME -SAT_ROAD_ISSUE
सातारा - साताऱ्यातील सैदापूर येथील मुख्य गावठाणकडे जाणाऱ्या भर रस्त्यातील डोहात नागरिकांनी वृक्षारोपण करून आंदोलन केलं आहे. यावेळी रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायत व प्रशासना विरोधात घोषणा दिल्या. आंदोलन कर्त्यांकडून येथील रस्त्यामधील खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले. या आंदोलनाला युवक,महिला आणि नागरिकांचा उपस्थित होते. या रस्त्यातील खड्ड्यांची तात्पुरती डागडूजी करून रस्ता नव्याने करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.
byte -नागरिक
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
लग्नानंतर १० महिन्यांतच विवाहितेची आत्महत्या...निलंग्यातील कोराळवाडी येथील घटना... पती, सासू, सासऱ्याच्या त्रासाने विहिरीत उडी घेतल्याचा नातेवाईकांचा आरोप....
या अगोदर पाठवलेल्या बातमीचा स्लग आहे हा
0307ZT_LTR_SUICIDE
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_CHIKHALDARA दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
चिखलदरा शहराला पाणीपूरवठा करणारा शक्कर तलाव कोरडा ठण; शहराला दोन दिवसाआड होतो पाणीपुरवठा
अँकर :– अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील चिखलदरा शहराला पाणीपूरवठा करणारा शक्कर तलाव कोरडा ठण पडला आहे त्यामुळे विदर्भाचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. तलाव कोरडा पडल्याने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होतो तलाव कोरडा पडला असल्याने यावर अवलंबून असलेला पर्यटनाचा व्यवसाय देखील ठप्प झाला असून तलावातील बोटींगही बंद करण्यात आली आहे त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
शिंपोली मेट्रो स्टेशन नामांतराला स्थानिकांचा विरोध
Anchor - बोरिवली पश्चिम येथील शिंपोली मेट्रो स्टेशनचे नाव बदलून ‘आदित्य कॉलेज शिंपोली मेट्रो स्टेशन’ करण्यात आल्याने स्थानिकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. या निर्णयाविरोधात स्थानिकांनी मेट्रो स्थानकाखाली जमाव करून घोषणाबाजी केली.
यूबीटी शिवसेना शाखाप्रमुख सागर सर्फर यांनी सांगितले की, “शिंपोली हे १५० वर्षे जुने गाव आहे. खासगी कॉलेजच्या नावामुळे गावाची ओळख पुसण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही.”
स्थानिकांनी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, तोपर्यंत नाव न बदलल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Byte - सागर सफरे (UBT शिवसेना - शाखा प्रमुख)
0
Share
Report
Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Kolhe Gmrt
File:02
Rep: Hemant Chapude (Junnar)
*खोडद दुर्बीण भरती प्रक्रिया गैरव्यवहार संसदेत मांडणार..खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची माहिती*
Anchor:आशिया खंडातील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प अशी ओळख असलेल्या खोडद ग्रामस्थांनी आज शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची नारायणगाव येथे भेट घेत निवेदन दिलेय.."जुन्नर तालुक्याच्या विकासाला पाचर ठोकणाऱ्या 'जी एम आर टी' चा जाहीर निषेध करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर 14 प्रश्न उपस्थित करत सध्या सुरू असणाऱ्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारावला वाचा फोडली आहे...दोन दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी एक विशेष ग्रामसभा घेत काही सवाल सुद्धा केले होते.
आज खासदार डॉ.कोल्हे यांची भेट घेतल्यानंतर डॉ कोल्हे यांनी सुद्धा या विषयात आपण जातीने लक्ष घालणार असल्याची माहिती दिलीये..
Gmrt सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रोजेक्ट मध्ये खोडद ग्रामस्थांचं मोठं योगदान असताना कामगार भरती प्रक्रियेत स्थानिकांना पूर्णपणे डावलण्यात आलं आहे आणि एकुणच भरती प्रक्रियेत असंख त्रुटी असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.शिवाय सिलेक्ट झालेले उमेदवार स्थानिक कायम कर्मचा-यांचे नातेवाईक असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या असून ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी प्रशासनाला उत्तर द्यावे लागेल आणि हा प्रश्न आपण प्रश्न संसदेत सुद्धा मांडणार असून संबंधित मंत्र्याना सुद्धा पत्रव्यवहार करून पारदर्शक पद्धतीने भरती व्हावी या साठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिलीये..
----------------
बाईट-डॉ अमोल कोल्हे, खासदार
---------------
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
फोटो असाइन्मेंट नंबर वर व्हाट्सअप केला आहे
---
*एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल येथे प्लास्टिक सर्जरीद्वारे लिंगाची पुनर्रचना*
• 9.5 तासांची यशस्वी शस्त्रक्रिया.
लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर येथे प्लास्टिक सर्जनच्या चमूने मध्यभारतात पहिल्यांदाच राजस्थानमधील एका तरुणाचे (वय 40) संपूर्ण लिंग एकाच टप्प्यात पुन्हा तयार करून एक दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. या रुग्णाला 8 वर्षांपूर्वी कर्करोगामुळे लिंग गमवावे लागले होते.
लिंगाच्या रचनेसाठी, रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट आणि मूत्रमार्ग (मूत्रमार्गाची नळी) पुनर्बांधणी करण्यात आली आणि नंतर जघन भागात लावण्यात आले. लिंगात रक्तपुरवठा करणे, नसांमध्ये पूर्ण संवेदना प्रदान करणे आणि एक कार्यशील अवयव निर्माण करण्यासाठी सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे या बाबींचा समावेश या शस्त्रक्रियेमध्ये होता. ही संपूर्ण शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या चमूला पूर्ण करण्यासाठी 9.5 तास लागले.
अशा शस्त्रक्रियांना मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रिया म्हणतात. यासाठी आवश्यक असलेला अत्याधुनिक ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोप लता मंगेशकर हॉस्पीटल येथे उपलब्ध आहे. कर्करोगाव्यतिरिक्त अशा पुनर्रचनात्मक प्रक्रिया, ट्रॉमाटिक (अपघाती) लिंग विच्छेदन आणि लिंग पुष्टीकरण शस्त्रक्रिया (लिंग बदल शस्त्रक्रिया) असलेल्या रुग्णांसाठी या सुविधा फायदेशीर ठरू शकतात.
अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या कार्याचे कौतुक केले आणि प्लास्टिक सर्जरी विभागाच्या वैद्यकीय चमूचे अभिनंदन केले. डॉ. जितेंद्र मेहता, डॉ. समीर महाकाळकर, डॉ. अश्विनी पंडितराव, डॉ. देव पटेल, डॉ.अभिराम मुंडले, डॉ. कंवरबीर, डॉ. पल्लवी या चमूने ही कामगिरी पार पाडली. डॉ. अंजली भुरे, डॉ. मधुश्री शहा, डॉ. केतकी मारोडकर, डॉ. रचना नैताम, डॉ. गुंजन यांनी या प्रक्रियेसाठी बधिरीकरणाचे काम केले. वैद्यकीय अधिक्षक व उपअधिष्ठाता डॉ. नितीन देवस्थळे यांनी सर्व लॉजिस्टिक सपोर्ट प्रदान केला. शस्त्रक्रियेतून रुग्ण पूर्ण बरा झाला आहे.
-----
असाइन्मेंट नंबर वर व्हाट्सअप ला फोटो पाठवला आहे
तर हॉस्पिटल चा व्हिडिओ 2cला जोडला आहे
_-----**-
2c ला फोटो आणि डॉ बाईट जोडला आहे
--------
0
Share
Report
Kolhapur, Maharashtra:
Kop CPR Body
Feed:- 2C
Anc:- कोल्हापूर शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भर पावसात एका व्यक्तीच्या मृत्युदेहाची हेळसांड करण्यात आली आहे. एका अर्थाने मृत्यूनंतरही छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय प्रशासनाने संबंधित मृत व्यक्तीला नरक यातना दिल्याचे समोर आले आहे.. एक तासाहून अधिक काळ मृत्यदेह पावसात ठेऊन कर्मचारी गायब झाला होता.. हा प्रकार ज्या लोकांच्या नजरेस पडला त्यांनी याचे व्हिडिओ समाज माध्यमावर टाकले आहेत..
0
Share
Report