Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Buldhana443001

आषाढी एकादशी: शेगाव मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, भक्तिमय वातावरण!

MAYUR NIKAM
Jul 06, 2025 04:02:40
Buldhana, Maharashtra
आषाढी एकादशीनिमित्त शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची अलोट गर्दी! Anchor - विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर शेजारील मध्य प्रदेश आणि गुजरात येथूनही लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले असून, मोठ्या उत्साहात आषाढी एकादशीचे कार्यक्रम पार पडत आहेत. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. भाविकांना अखंड दर्शन घेता यावे यासाठी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. आज दिवसभर शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. गजानन महाराजांच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने शेगाव नगरी दुमदुमून गेली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement