Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

अरुण तनपुरे यांचा अजीत पवार गटात प्रवेश, प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया काय?

Kunal Jamdade
Jul 02, 2025 11:36:19
Shirdi, Maharashtra
Anc - राहुरी येथील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर कर्जाच्या बोजाखाली असलेला कारखाना सुरू करण्यासाठी सत्तेसोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे काका आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे सख्खे बंधू अरुण तनपुरे यांनी अजीत पवार गटात प्रवेश केलाय...प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत.त्यामुळे प्राजक्त तनपूरे हे देखील अजित पवार गटात प्रवेश करणार का..? अशा अनेक चर्चांना उधान आले होते...तनपुरे यांनी मात्र मी शरद पवार यांचेसोबतच राहणार असल्याच स्पष्ट केलय... V/O - आमदार शिवाजी कर्डीले आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी तनपुरे कारखान्यातून माघार घेत निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 च्या 21 जागा जिंकत सत्ता काबीज केली...कारखान्यावर 140 कोटींचे कर्ज असल्याने कर्जाचे पुनर्गठन आणि नव्याने कर्ज घेण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नसल्याने अरुण तनपुरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम करत अजीत पवार गटात प्रवेश केलाय त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी आपली याबाबतची भुमिका स्पष्ट केली...कारखाना सुरू करण्यासाठी अरुण तनपुरे हे अजीत पवारांसोबत गेले मात्र मी शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलय... बाईट - प्राजक्त तनपुरे , माजी मंत्री
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement