Back
विरारमध्ये शुल्लक वादामुळे रेल्वे कर्मचाऱ्यावर भयंकर हल्ला!
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 01, 2025 04:01:06
Virar, Maharashtra
Date-1july2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR CCTV
Feed send by 2c
Type-AV
Slug- विरार मध्ये शुल्लक वादातून एकाला बेदम मारहाण
ग्लोबल सिटी परिसरातील घटना
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मारहाण कैद
विरार:- विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील सोसायटीत सोलर पॅनल बसविण्याच्या वादातून, "रेल्वे कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.... लाठी, काठी ने सोसायटीच्या आवारात दोन जण बेदम मारहाण करीत आहेत, मारहाण ची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे।
हितेश कपिलदेव प्रसाद कुमार असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून, हे भारतीय रेल्वे मध्ये एक प्रतिष्ठित शासकीय अधिकारी पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे....
२३ जून २०२५ रोजी हा हल्ला झाला असून, हा पूर्वनियोजित असल्याचा त्यांचा आरोप आहे. याबाबत बोळिंज पोलीस ठाण्यात आरोपी सोमनाथ मधु गराई व समीर मधु गराई यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे...
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowJul 18, 2025 08:05:55Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1807ZT_PURNDRJEJURI
FILE 4
मार्तंड देवस्थानच्या प्रमुख विश्वस्त पदी मंगेश घोणे यांची निवड,,,,,,,
Anchor : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पदी (अध्यक्ष) जेजुरी नगरीचे सुपुत्र मंगेश अशोकराव घोणे यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घोणे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी
अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड.विश्वास पानसे, अनिल सौंदडे, ॲड. पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 18, 2025 08:05:48Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1807ZT_MAVAL_PLASTIC_FLOWER
Total files : 05
Headline -प्लास्टिक फुलावरील बंदीमुळे मावळातील शेतकरी आनंदीत
Anchor:
शेतकरी काबाड कष्ट करून आपल्या शेतातून फुलपिकाचे उत्पन्न काढतात. त्यासाठी शेतकऱ्यांना खते, कलमे, बियाणे, औषधे, मजुरी, कच्चा माल खरेदी करून फुलपिकाचे उत्पन्न घेतात. परंतु फुलपीके तयार होऊन बाजारपेठेत, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, या सणासुदीला आली की प्लास्टिक पासून बनवलेल्या फुलामुळे शेतकऱ्यांनी शेतातून पिकवलेल्या फुलपिकांना हवा तसा दर मिळत नाही आणि बळीराजाला आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यामुळे प्लास्टिक फुलावर बंदी घातल्याने मावळातील शेतकरी आनंदित झाला आहे. प्लास्टिक फुलावर बंदी घालणे शेतकरी आणि निसर्गाच्या हिताचे आहे. प्लास्टिक फुले ही नष्ट करू शकत नाहीत. त्यामुळे ते निसर्गासाठी हानिकारक आहे. ही प्लास्टिक ची फुले माती आणि पाण्याला दूषित करतात. तसेच मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे. प्लास्टिकच्या उत्पादनामुळे आणि विघटनामुळे विषारी वायू बाहेर पडतात त्यामुळे हवा पाणी जमीन दूषित होते. वन्यजीव प्राण्यासाठी ही हे धोकादायक आहे त्याच्या शरीरात जाऊन त्रास करते त्यामुळे मृत्यू ही होतो. प्लास्टिक मध्ये रासायनिक हानिकारक पदार्थ मिसळलेले असतात त्यामुळे मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता मात्र आता प्लॅस्टिक फुलांवर बंदी घातल्याने मावळ मधील फुल उत्पादक शेतकरी आनंदून गेला आहे. सरकारच्या या निर्णयाचे मावळ मधील फुल उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
बाईट : मुकुंद ठाकर, गुलाब उत्पादक शेतकरी (file no.04)
बाईट : दिगंबर तरस, शेतकरी(file no.05)
1
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 18, 2025 08:03:29Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज
AC ::- पेरणी करून शेतकऱ्याने आभाळाकडे डोळे लावून वाट पाहिली… पण पेरणी झाल्यापासून पावसाने पाठ फिरवली… एकीकडे नापिकीचा धोका, दुसरीकडे कर्जाचा डोंगर आणि त्यातच शेतीमालाला मिळणारा अल्प बाजारभाव… या सगळ्या विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्याने अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. देवणी तालुक्यातील गुरधाळ येथील 52 वर्षीय शेतकरी श्रीधर घोगरे असं त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. श्रीधर घोगरे यांची शेती व कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर अवलंबून होता. यावर्षी पेरणी केल्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने पीक येईल का नाही आणि पेरणीचा खर्च आणि घेतलेलं कर्ज फिटेल का नाही या चिंतेत हा शेतकरी होता.या शेतकऱ्यांनी बँकेतून पीककर्ज घेतलं होतं आणि त्यासोबतच काही खासगी सावकाराकडून ही कर्ज घेतलं होत असं सांगीतले जात आहे.
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 18, 2025 08:01:29Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1807ZT_MAVAL_KAMSHET
Total files : 02
Headline : मावळ मधील कामशेत खिंडीत अपघातांचे सत्र सुरूच
Anchor:
जुना पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत खिंडीत अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. याच महिन्यात हा सलग तिसरा अपघात असून, मुंबईहून पुण्याकडे जाणारा आयशर ट्रक कामशेत खिंडीतील तीव्र उतारावर वळण घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आयशर ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झालाय असून या खिंडीत वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या ठिकाणी चालकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खिंडीत वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वळणे, अपुरी सूचना फलक आणि अपुऱ्या सुरक्षात्मक उपाययोजनांमुळे ही परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे एमएसआरडीसी तसेच आयआरबी प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. सद्यस्थितीत कामशेत खिंड हा अपघायाचा 'ब्लॅक स्पॉट' बनला असल्याचे स्पष्ट होत आहे...
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 18, 2025 08:01:16Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash
*काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बाईट पॉइंटर*
महाराष्ट्रात जे घडत आहे ते दुर्देवी..
हत्या, हल्ले यासारख्या अनेक घटना घडल्या आहेत..
कालचा विधानभवनातील प्रकार दहशत निर्माण करण्याचा प्रकार..
गुंडाना आणि वाचाळवीरांना अनिर्बंध मुभा भाजपने दिलीय..
जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे लाजिरवाणे..
आता तर गुंड थेट विधानभवनात येऊन मारहाण करतात..
अन्याय करणाऱ्याला सौरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा..
ही लोकशाहीची अधोगती..
ऑन महायुती सरकार
धर्माच नाव घेऊन राजकारण करण्याचा सोपा फंडा..
अनेक आश्वासन सरकारने दिली..
लाडक्या बहिणींना 2100 देण्या ऐवजी त्यांची संख्या कमी करण्यावर लक्ष..
शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील उभ राहण्यात हलगर्जीपणा सुरू आहे..
आता जनतेने याबाबत आवाज उठवला पाहिजे...
bite - बाळासाहेब थोरात , काँग्रेस नेते
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 18, 2025 08:00:32Pune, Maharashtra:
Reporter name: Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1807ZT_MAVAL_LON_POCSO
Total files : 03
Headline : लोणावळयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
लोणावळा शहर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपींना ठोकल्या बेड्या
Anchor:
लोणावळा शहरात खासगी बंगल्यासमोर एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला असून या प्रकरणी, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीने अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग करून विनयभंगाची संधी साधली, तसेच अल्पवयीन मुलीचे नाव आणि मोबाईल नंबर जबरदस्तीने घेऊन या मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ७४, ७८ आणि पोक्सो अधिनियम कलम ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे...
बाईट : राजेश रामाघरे, पोलीस निरीक्षक लोणावळा (file no.03)
0
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 18, 2025 07:39:46Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KADU_MEETING दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
आंदोलन आणि राजकारण दोनही वेगळे, आंदोलन यशस्वी झाल्याने लोकं मतं मारतीलच अस नाही; बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना आढावा बैठकीत दिल्या सूचना
अँकर :- येत्या 24 जुलै ला बच्चू कडू राज्यभर ट्रॅक्टर घेऊन चक्काजाम आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची पुढची दिशा आणि रणनीती ठरवण्यासाठी आज बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्ण येथे कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचत कार्यकर्त्यांना काही कानमंत्र दिले आहे. आंदोलन यशस्वी झाल्याने लोक मतं मारतीलच असं नाही आंदोलन वेगळं आहे आणि राजकारण वेगळं आहे असे म्हणत बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहे. बाळासाहेब ठाकरे भाषण करायचे आणि मोठमोठ्या सभा गाजवायचे तरीही त्यांचे आमदार निवडून येत नव्हते तिसरी वेळ प्रयत्न केला तेव्हा त्यांचे आमदार निवडून आले आणि वाढले. त्यामुळे मी आंदोलनात पुढे आहे म्हणून मला लोक मारतीलच आणि मी निवडून येईल असं होणार नाही. आणि असं झालं नाही तर तुमचा भ्रमनिराश होईल असेही बच्चू कडू म्हणाले आहे.
साऊंड बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
2
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 18, 2025 07:35:39Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1807ZT_JALNA_PIKPANI_CHL(9 FILES)
जालना : तिखट मिरची झाली गोड,मागणी वाढल्यानं भाव पोहचले 9 हजार रुपये क्विंटलवर,'कोकडा'व्हायरसच्या प्रादूर्भावातून वाचलेल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आले अच्छे दिन
अँकर : जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद या दोन तालुक्यात मिरची लागवडीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यंदा मिरची पिकावर 'कोकडा'व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं हजारो एकरावरील मिरची पीक उध्वस्त झालंय. त्यामुळे मिरची पिकाची बाजारपेठेत आवक घटली आहे.याचा परीणाम बाजार भावावर झालाय.मिरचीला प्रतीक्विंटल 9 हजार रुपये भाव मिळतोय.त्यामुळे 'कोकडा' रोगाच्या प्रादुर्भावातून वाचलेल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चांदी झालीय.मिरचीला 9 हजारांचा भाव मिळत असल्यानं शेतकरी खुष झालाय.
बाईट :हरी लोखंडे, मिरची उत्पादक शेतकरी,पारध
(पिवळा शर्ट ,गळ्यात रुमाल असलेला शेतकरी )
बाईट : शिवा पाटील लोखंडे,व्यापारी(पांढरा शर्ट)
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 18, 2025 07:32:41Beed, Maharashtra:
बीड: उमाकिरण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनी लैंगिक शोषण प्रकरणात विजय पवार व खाटोकरला जामीन; बीड येथील न्यायालयाने दिला निर्णय
anc- बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात क्लासचा मालक विजय पवार व शिक्षक प्रशांत खाटोकर याला अटक करण्यात आली होती.. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत होते.. त्यांच्या जामीन अर्जावर बीड येथील न्यायालयात सुनावणी झाली.. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला.. परंतु न्यायालयाने या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी जाहीर करण्यात आलेली एसआयटी ची टीम बीडमध्ये दाखल झाली असून त्यांच्याकडून तपास केला जात आहे तर दुसरीकडे आरोपींना जामीन मिळाला आहे.. दरम्यान विजय पवार याच्यावर आणखी एक गुन्हा यापूर्वी दाखल झाला असून त्या प्रकरणात आता काय कार्यवाही होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 18, 2025 07:32:27Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1807ZT_JALNA_LADKI_BAHIN(3 FILES)
जालना : लाडक्या बहिणींवरील राज्य सरकारचं प्रेम आटलं,जिल्ह्यातील 57 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद
सप्टेंबरपासून नोंदणीही झाली बंद
अँकर | लाडक्या बहिणींवरील राज्य सरकारचं प्रेम आटल्याचं चित्र जालना जिल्ह्यात पाहायला मिळतंय. कारण जालना जिल्ह्यातील 57 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेत.सप्टेंबरपासून लाडक्या बहिणींची नोंदणीही बंद करण्यात आलीय.ही योजना सुरु करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात 5 लाख 42 हजार 392 महिलांनी अर्ज दाखल केले होते.राज्य सरकारकडून या योजनेची पडताळणी सुरू करण्यात आल्यानंतर 57 हजार 698 महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेत.या योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी जुलै 2024 मध्ये विशेष पोर्टल सुरू करण्यात आले होते. मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून पोर्टल बंद करण्यात आले आहे. यामुळे नवीन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे.
या कारणांमुळे अर्ज बाद
वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणे, सरकारी कर्मचारी कुटुंबातील सदस्य असणे, चारचाकी वाहन मालकी किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरविण्यात आलं आहे.
तसेच आधार क्रमांक आणि बँकेचा खाते नंबरात बदल असणे, चुकीचा अर्ज, वय जास्त असणे, सरकारच्या निराधार योजनेतील लाभार्थी असताना लाडकी बहिण योजनेचा लाभ यासह इतर कारणांमुळे महिलांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत.
लाडकी बहिण योजनेत आयकर भरणाऱ्या महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यानुसार, अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आलेले आहेत.
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 18, 2025 07:31:09Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात अक्कलकोट मध्ये मोर्चाला सुरुवात ( WKT )
- संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात अक्कलकोट मध्ये मोर्चाला सुरुवात
- अक्कलकोट मधील एसटी स्टँड चौकातून मोर्चाला सुरुवात
- सर्व जाती-धर्माचे झेंडे घेऊन नागरिक मोर्चात सहभागी
- प्रवीण गायकवाड हल्ला करणारा आरोपींवर मोक्का लावण्याची करण्यात आली मागणी
याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 18, 2025 07:04:20Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn trishul av
feed attached
बजरंग दलाच्यावतीने संभाजीनगरमधे त्रिशूळचे वाटप.....
Anc...
छत्रपती संभाजीनगर मधील खडकेश्र्वर मंदिर परिसरात बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारीसह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी लव्ह जिहाद, धर्मांतरण रोखण्याचा संकल्प घेण्यात आला.खडकेश्वर मंदिरात बजरंग दलाच्यावतीने १५० जणांना 5 इंच आकाराचे त्रिशूळ वाटप करण्यात आले.दिल्ली येथील केंद्रातून हे त्रिशूळ पाठवण्यात आले होते. त्रिशूळ हे सेवा, संस्काराचा प्रतीक आहे.आगामी काळात प्रत्येक गाव, तालुक्यात अशा त्रिशुळांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली......
0
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 18, 2025 06:35:36Pune, Maharashtra:
pimpri action
kailas puri Pune 16-7-25
feed by 2c
हिंजवडी, पुणे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्यांना टायर मध्ये घालून मारा त्यांच्यावर 353 दाखल करा असा इशारा गेल्या रविवारी केलेल्या पाहणीत केला होता..अजित पवार यांच्या या इशाऱ्याचा परिणाम हिंजवडी मध्ये पाहायला मिळू लागला आहे पीएमआरडीएने कारवाई करण्यापूर्वीच हिंजवडी मधल्या वाहतूक कोंडी होणाऱ्या लक्ष्मी चौकात दुकानदारांनी साहित्य काढायला सुरुवात केली आहे त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....
kailas wkt+ vis
4
Share
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 18, 2025 06:35:26Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_TULJA_PASS
धाराशिव -दोन महिन्यात 886 वर्ग 1 च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निशुल्क दर्शनाचा प्रसाद
सामान्य भाविक दर्शना साठी त्रस्त असताना अधिकाऱ्यांना मात्र व्हीआयपी पास देत दर्शनाची खैरात
मंदिर संस्थांचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार उघड
गेल्या दोन महिन्यात तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत सव्वा दोन कोटी रुपये व्हीआयपी दर्शनातून मंदिर संस्थांनाला मिळाले
दोन महिन्यात 18 लाख भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन
एकीकडे व्हीआयपी दर्शनातून उत्पन्नात भर मात्र याचाच आधार घेत शासकीय अधिकाऱ्यांना मात्र मोफत दर्शन दिल्याने तुळजापुरातील भाविकात नाराजी
व्हीआयपी दर्शन पास च्या तक्रारी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोफत दर्शन देणाऱ्या
अधिकाऱ्यावर कार्यवाही करा अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा
Byte जयकुमार पांढरे
2
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 18, 2025 06:35:03Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1807ZT_MAVAL_DEHU
Total files : 02
Headline -देहू नगरपंचायतीची स्वच्छतेच्या दिशेने राष्ट्रीय क्रमांकात झेप
717 क्रमांकावरून थेट 368 व्या क्रमांकावर
Anchor:
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये संत तुकोबांच्या देहू नगरपंचायतने उल्लेखनीय यश मिळवले असून "छोट्या शहरां" वीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्या गटात देशात 368 वा क्रमांक पटकावला आहे. मागील वर्षी 2023 ला देहू नगरपंचायतीचा क्रमांक 717 होता. विशेष म्हणजे 2022 साली हाच क्रमांक 1937 हा होता. सलग 2 वर्षात स्वच्छतेत मोठी प्रगती करणाऱ्या संस्थेमध्ये देहू अव्वल स्थानी आहे. ही गरुड झेप म्हणजे नगरपंचायतच्या मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगरअध्यक्षा पूजा दिवटे, यांच्या कार्यप्रवणतेची, तसेच कर्मचारी वर्गाच्या अथक परिश्रमांची आणि नागरिकांच्या सहकार्याची साथ लाभल्यामुळे देहू नगर पंचायतीने हा पल्ला गाठला.
0
Share
Report