Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

संगमनेरात २७०० किलो गोमांस जप्त, स्थानिक पोलिसांची कारवाईवर प्रश्नचिन्ह!

Kunal Jamdade
Jul 01, 2025 06:39:57
Shirdi, Maharashtra
Anc - अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरातील जमजम कॉलनी येथे छापा टाकून २७०० किलो गोमांससह ३४ लाख ८४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सतत कारवाया करुनही येथील अवैध कत्तलखाने सुरूच असल्याचे या कारवाईमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून स्थानिक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई केली. संगमनेर मध्ये अवध्यरीत्या कत्तलखाने सुरू असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे स्थानिक पोलिसांना अद्याप पर्यंत ते बंद करण्यात अपयश येत असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरात लाखो रुपयांच्या किमतीच्या अवैध गोमांस कत्तलखान्यांवर कारवाई केल्याने एकच खळबळ उडालीये.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement