Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ तालुका काँग्रेस अध्यक्षावर भरचौकात चाकुहल्ला

Sept 27, 2024 05:01:45
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत गजबजलेल्या दत्त चौकामध्ये भरदिवसा प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामायण हॉटेल समोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश भीसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकूने हल्ला चढविला, यावेळी भीसनकर यांनी जखमी अवस्थेत एकाच्या हातून चाकू हिसकावल्याने दोघेही पसार झाले, त्यानंतर जखमी भीसणकर हे स्वतः ऑटोने रुग्णालयात पोहोचले. दरम्यान हा थरार शेकडो लोकांपुढे सुरू असताना कुणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Dec 10, 2025 04:05:08
79
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 10, 2025 04:03:39
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri mahayuti kailas puri Pune 10-12-25 feed by 2c Mahayuti पार्श्वभूमीवर शहरात एकमेकांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांना पक्षात प्रवेश देण्याच्या निर्णयावरून चर्चा सुरू असून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता बळावत आहे. भाजपकडून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जात असून आतापर्यंत आठशेहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत; राष्ट्रवादी काँग्रेसकडेही अनेक पदाधिकारी अर्जदार आहेत. महापौर पद, भूषवलेल्या शकुंतला धराडे, विधी समिती अध्यक्षपद भूषवलेले प्रसाद शेट्टी व अन्य ४० माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी भाजपकडे अर्ज केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. याच संदर्भात भाजप शहराध्यक्ष शत्रुघन काटे यांच्याशी चर्चा केली गेली.
79
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 10, 2025 04:01:10
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलपुरातील होम मैदानावर क्रिकेट खेळताना चक्कर आल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नरेंद्र गुडशेलू असे 42 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. काल संध्याकाळी गुडशेलू हे सोलापुरातील होम मैदान येथे आपल्या मित्रासह क्रिकेट खेळत होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जागेवरच कोसळले. सोबत असलेल्या मित्रानी त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे.
79
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 10, 2025 04:00:50
Shirur, Maharashtra:पुणे–अहिल्यानगर हायवे पर शिरूर तालुक्यात कासारी फाटा में भीषण अपघात हुआ। अहिल्यानगर से पुणे की ओर जा रहे फूलों से भरे पिकअप वाहन को पीछे से आए एक टेम्पो ने जोरदार धक्का दिया। धक्के के कारण पिकअप पलट गया और टेम्पो रस्ते के किनारे स्थित टपरी शेड में घुस गया। इसी दौरान पुणे से अहिल्यानगर की तरफ जा रही कीया कार को भी टेम्पो ने ठोकर दी। साथ ही दो–तीन दुपहिया वाहन भी टेम्पो के नीचे आ गए। घटनास्थाल पर कुछ यात्रियों के घायल होने की जानकारी है, फिलहाल जानमाल की भारी हानि नहीं बताई गई। पुणे–नगर हायवे पर यातायात काफ़ी जाम था जिसे स्थानीय पुलिस ने मौके पर पहुँचकर नियंत्रण में लिया और ट्रैफिक हटवाए।
69
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 10, 2025 03:51:33
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कारंजा,मंगरूळपीर ,रिसोड या तीन नगरपरिषदांसह मालेगाव नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली.मात्र वाशिम नगर परिषद आणि रिसोड नगर परिषदेतल्या दोन प्रभागांवरील न्यायालयीन अपील प्रलंबित असल्याने येथे सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.सुधारित कार्यक्रमानुसार,वाशिम नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज १० डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.त्यानंतर उद्या ११ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.आयोगाच्या पत्रातील चार मुद्द्यांमुळे आणि अपील प्रलंबित असल्याने वेळापत्रकात हा बदल करण्यात आला आहे.या घडामोडींमुळे वाशिम शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.रिसोड नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक ५-ब आणि १०-अ या दोन जागांसाठीही सुधारित कार्यक्रम जाहीर झाला असून,२० डिसेंबर रोजी मतदान तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.आता सर्व प्रमुख पक्षांनी आपला प्रचार या दोन प्रभागांवर केंद्रित केल्याने आगामी काळात राजकीय चुरस अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
104
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 10, 2025 03:49:55
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. केळीला दर मिळत नाहीत आणि करपाच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंतेत सापडला आहे. एकीकडे बाजारात केळीचे दर कोसळले असून उत्पादन खर्च देखील न निघण्याची अवस्था आली आहे. तर दुसरीकडे करपाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केळीची झाडे मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. अचानक वाढलेल्या थंडीच्या झटक्यामुळे आणि वातावरणातील बदलामुळे करपा रोग झपाट्याने पसरत असून अनेक बागांची वाढ ठप्प झाली आहे. पानांवर काळपट डाग, कुज, वाळणे यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. करपा नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणीचा मोठा खर्च करावा लागत आहे. मात्र सतत बदलणारे हवामान, वाढती आर्द्रता आणि फवारणीच्या खर्चात झालीले वाढ यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडत चालले आहेत. शेतकरी संघटनांनी सरकारकडे तातडीने मदत, योग्य दर हमी, तसेच करपा नियंत्रणासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि अनुदानित फवारणी योजना उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. हंगामाच्या मध्यावर आलेल्या या दुहेरी संकटामुळे केळी उत्पादक शेतकरी हतबल झाले असून पुढील काही दिवस परिस्थिती सुधारली नाही तर मोठ्या आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे. बाजारात योग्य दर नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत केळी खरेदीसाठी पोहचत नसल्याने परिणामी बागेतच झाडावर केळी पिकून जाऊ लागली आहेत. वेळेवर तोडणी न झाल्याने फळांचे वजन कमी होत असून दर्जाही खालावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी तोटा सहन करावा लागत आहे
133
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 10, 2025 03:49:34
118
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 10, 2025 03:47:56
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल मध्ये एक आगळा वेगळा मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडलाय. या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी शालेय मंत्रीमंडळाला शपथ दिली... विद्यार्थ्यांना लोकशाहीची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी ईव्हीएम द्वारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती...यामध्ये प्रत्येक वर्गातून दोन प्रतिनिधी निवडून आलेय...या निवडणूक कार्यक्रमात आचारसंहिता, नामांकन अर्ज दाखल करणे, अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप, प्रचार तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया समजवून सांगण्यात आली होती.. निवडून आलेल्या उमेदवारांचे शालेय मंत्रीमंडल स्थापन करण्यात आले , या मंत्रीमंडळाला शाळेच्या राज्यपालांनी शपथ दिलीय ..या सोहळ्यात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थ मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, कृषी मंत्री , आरोग्य मंत्री , क्रिडा मंत्री , सांस्कृतिक मंत्री आदींनी शपथ घेतली...हे मंत्रिमंडळ शाळेतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असते हे विशेष.. विद्यार्थाना लोकशाहीचे धडे गिरवण्या करिता हा उपक्रम राबविण्यात येत हैय
65
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 10, 2025 03:34:17
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय मधील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयीन कर्मचाऱ्याकडे वैद्यकीय बिल पास करण्यासाठी घेतलेल्या पैशाचा हिशोबाची वही सापडल्याने खळबळ उडाली होती. यानुसार कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने वैद्यकीय बिलाबाबत चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. ही चौकशी आरोग्य उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या समितीमध्ये तीन अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी किती पैसे घेण्यात आले याचे रेट कार्ड दिसणारी वही सापडल्याने CPR हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली आहे. या वहीमध्ये वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी वरिष्ठांना लाखो रुपये दिल्याचा उल्लेख आढळून आला आहे त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जाणार आहे.
136
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 10, 2025 03:33:49
120
comment0
Report
Advertisement
Back to top