Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

प्रकाश आंबेडकर ने मोदी सरकार पर एपस्टीन लिंक और अमेरिकी नीति को लेकर आरोप लगाए

SRSHRIKANT RAUT
Mar 16, 2026 13:52:05
Yavatmal, Maharashtra
नरेंद्र मोदी यांनी हे आधी मुद्रा मोदी थे ते आता मुजरा मोदी झाले, अमेरिका जस सांगेल तसा मुजरा करायला लागले आहे अशी भोसरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अर्थ व्यवस्था मध्ये अमेरिका मधून येणार माल हा झिरो टेरीफ वर येईल आणि भारताकडून जाणाऱ्या मालावर 18टक्के टेरीफ लागेल अशी परिस्थिती आहे. मोदींच्या काळात राजकीय सार्वभौमता आणि आर्थिक स्वायत्तता धोक्यात आली आहे. नरेंद्र मोदींचे नाव एपिस्टन फाईल मध्ये आल्या पासून देश हा अमेरिकेला गहाण ठेवला आहे असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. नरेंद्र मोदी यांचे एपस्टीन बरोबर असलेले संबंध हे मुजरा करण्यासाठी बाहेर आले आहेत. या सर्व बाबींसाठी भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याने येत्या 23 मार्च रोजी संघ कार्यालयावर मोर्चा काढण्यात असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 16, 2026 14:32:49
Washim, Maharashtra:अँकर : वाशिम जिल्ह्यात घरगुती गॅसचा अवैध वापर करणाऱ्यांविरोधात पुरवठा विभागाने कारवाईची मोहीम सुरू आहे.आज पुरवठा विभागाने मालेगाव शहरातील हॉटेल्सवर धाड टाकून तपासणी केली.मालेगाव शहरात पुरवठा विभागाच्या वतीने एकूण १४ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.या तपासणीदरम्यान दोन हॉटेल्समध्ये घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले.त्यामुळे संबंधित हॉटेल्समधून दोन घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.ही कारवाई मालेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या पथकाने केली असून, अशा प्रकारचा अवैध वापर करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
1070
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 16, 2026 14:03:29
Chakan, Maharashtra:चाकण, पुणे: आंबेठाण चौक के पास भटकते कुत्तों के झुंड ने सोमवार रात दो बजे एक स्पार्क मिंडा कंपनी में काम करने वाली शोभा वाघमारे (32) के ऊपर हमला कर दिया। छह से सात भटकते कुत्तों के समूह ने उन्हें घेर लिया। शोभा ने अपने बचाव के लिए पत्थर उठाकर कुत्तों को भगाने का प्रयास किया, पर हिंसक झुंड के सामने उनकी जंग असफल रही। इस भीषण हमले से उनके हाथ, पांव, मुंह और गले पर गंभीर चोटें आईंं और अत्यधिक रक्तस्राव के कारण वह मौके पर ही मर गईं। सुबह उनका शव निर्वस्त्र अवस्था में मिला, जिसकी वजह से पहले लोगों ने खून या अत्याचार का संदेह किया, लेकिन पुलिस ने सीसीटीवी के आधार पर कुत्तों के हमले की सच्चाई बताई। गांववालों ने चाकण नगरपरिषद की नसबंदी और टीकाकरण के दावों पर सवाल उठाए हैं, क्योंकि प्रशासन दावा कर रहा है कि कुत्तों की संख्या नियंत्रित है, फिर भी घटनाएं क्यों बढ़ रही हैं? स्थानीय नागरिकों और प्रशासन से जवाब मांगे जा रहे हैं ताकि भटकते कुत्तों के नियंत्रण और सुरक्षा के उपाय स्पष्ट हों। प्रतिनिधि: Hemant Chapude; Zhī Media, Chakan, Pune
1019
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 16, 2026 14:03:08
Navi Mumbai, Maharashtra:पाकिस्तानातून भारतात ड्रग्स तस्करीसाठी ड्रोनचा वापर होत असल्याची धक्कादायक बाब नवी मुंबई पोलिसांच्या तपासात उघड झालीये. पंजाब राज्यातून महाराष्ट्रातील विविध शहरात ट्रक आणि रेल्वेमार्गे ड्रग्स तस्करी करण्यात येत होती. याप्रकरणी आतापर्यंत नवी मुंबईत 6 गुन्हे दाखल असून 40 जणांना अटक करण्यात यश आलेय. तपासात बल्लजीत सिंग व त्याच्या दोन साथीदारांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी ट्रकद्वारे पंजाबवरून मध्यप्रदेशमार्गे महाराष्ट्रातील विविध शहरात ड्रग्स तस्करी करत होते. सदर आरोपीकडून 41 लाख 30 हजार किंमतीचे 82 ग्रॅम हेरॉइन, 1 पिस्टल, 2 मॅगझीन, 4 जिवंत काडतूस, 1 ट्रेलर, 4 मोबाईल आणि 1 वजनकाटा असा एकूण 1 कोटी 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. मात्र हे ड्रग्स पंजाबमध्ये बनत नसून पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये येत असल्यामुळे तेथून महाराष्ट्रात विकण्यात येत होते. नवी मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.
1097
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 16, 2026 13:51:22
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य मार्गावर वाहनातून उतरून वाघाचा पाठलाग करणाऱ्या पर्यटकांविरोधात वनविभाग ऍक्शन मोडवर, व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर खडबडून जागा झाला वनविभाग अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली मुख्य मार्गावर वाहनातून उतरून जवळून वाघाचा पाठलाग करणाऱ्या पर्यटकांविरोधात वनविभाग ऍक्शन मोडवर आलाय. हा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत. घटनेतील या सर्व पर्यटकांची वाहने देखील जप्त केली जाणार आहेत. आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. पर्यटकांनी वाघ व वन्य जीवांना इजा पोहोचेल व नियम भंग होईल अशी कृत्य टाळण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. बाईट १) संतोष थिपे, वनपरिक्षेत्राअधिकारि, मोह्रोली आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
1022
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 16, 2026 12:53:29
Rui, Maharashtra:बारामती शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिला आहे LPG गैस की तंगी महसूस हो रही है. आदरणीय दादांनी साहेबांनी बारामतीला कभी किसी चीज की कमी नहीं आने दी. अब डोमेस्टिक गैस हो या कमर्शियल गैस, मिल नहीं रही. मुख्यमंत्री कहते हैं गैस का सुरळीत पुरवठा. गैस का पुरवठा नहीं हो रहा. आप लोगों से जाकर पूछिए क्या गैस मिलती है या नहीं. घरगुती या commercial gas मिल रहा/नहीं मिल रहा, वस्तुस्थिति यही है. बारामती पोटनिवडणूक उमेदवार सुकुरिया सुले यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या पक्षाची भूमिका तीच असणार आहे. आपलं सर्वांची इच्छा आहे, महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील साहेब असतील ताई असतील मी असेल आमच्या कुटुंबाची सर्वांची इच्छा आहे बारामतीकरांची पण इच्छा आहे आणि बारामतीची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी. ती बिनविरोध झाली पाहिजे. आमच्याकडून महाविकास आघाडी कडून बारामतीसाठी कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही. आमच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असेल. कुठलाही उमेदवार आम्ही देणार नाही, आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ मदत करू बारामतीचे काही प्रश्न असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या ताईंच्या मार्गदर्शनाखाली काकींच्या मदतीने बारामतीच्या जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. धनगर समाजातील काही नेते निवडणूक लढवण्यावर ठाम. बारामतीतील ते रुग्णालय दादांनी आणलं. या रुग्णालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव दादांनी दिलं. वैद्यकीय शासकीय महाविद्यालय असेल किंवा आयुर्वेदिक महाविद्यालय असेल शेवटी पवार कुटुंबाने साहेब असतील दादा असतील कधीच आम्ही असं राजकारण केलं नाही जात धर्म पहिला नाही. हे दुर्दैव आहे त्यांच्यासह चर्चा करणार आहोत. दादांचे तालुक्यावर उपकार आहेत, त्यांनी खूप काही आपल्यासाठी केले आणि आजही निवडणूक त्यांच्यासाठी आपण सर्वांनी मिळून बिनविरोध करावी आणि हीच खरी श्रद्धांजली असेल. बारामतीची पोटनिवडणुकीची चर्चा, बारामतीची निवडणूक बिनविरोध जावी यासाठी प्रयत्न करू. राष्ट्रीय विलीनीकरण चर्चा. आज सुनेत्रा काकी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, एक कार्यकर्ता म्हणून नागरिक म्हणून किंवा पुतण्या म्हणून मी त्यांच्याकडे जाऊ शकतो. लोकांची काही काम असतील मी विश्वास आहे ती 100% मार्गे लावतील. राज्य सरकारने काढलेला आदेश रद्द करण्याची धनगर समाजातील व्यक्तींची मागणी. हा निर्णय शासनाने घेतला. Baramatiची पोटनिवडणूक झाली तर काय? सशक्त लोकतंत्रात सर्वांना अधिकार आहेत; ते कुठेही जाऊन कोणाच्याही विरोधात निवडणूक लढू शकतात. तर त्यांची इच्छा असेल तर ते निवडणूक लढू शकतात.
953
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 16, 2026 12:51:51
1090
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 16, 2026 12:16:15
Ambernath, Maharashtra:अंबरथ नगरपालिकाेत अधिकाऱ्यांच्या बदल्या राजेश तडवींच्या जागी पंकज पन्हाळे शहर अभियंता तर मेघा कदम यांच्याकडून मिळकत विभागाचा चार्ज काढला बांधकाम विभागाचे अभियंता राजेश तडवी यांना काही महिन्यांपूर्वी शहर अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आज अचानक त्यांना उपअभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आलीये. तर सध्या उपअभियंता असलेल्या पंकज पन्हाळे यांना शहर अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आलीये. मुख्याधिकाऱ्यांनी राजेश तडवी यांचं डीमोशन का केलं? हे मात्र समजू शकलेलं नाही. तर दुसरीकडे पालिकेच्या सभेत गेम खेळताना व्हिडीओ व्हायरल झालेल्या मिळकत पर्यवेक्षक मेघा कदम यांच्याकडचा चार्ज काढून तो नवनीत देवरे यांना देण्यात आलाय. मेघा कदम यांच्याकडे आता फक्त पालिकेच्या लीगल डिपार्टमेंटची जबाबदारी असणार आहे. मुख्याधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या या तडकाफडकी बदल्यांमुळे पालिकेत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
1078
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 16, 2026 11:51:32
Pandharpur, Maharashtra:उजनी धरण प्रदूषणमुक्त करा , आमदार समाधान आवताडे यांची विधानसभेत मागणी एकीकडे उजनी धरण परिसरात पर्यटन आराखडा मंजूर होत असताना , धरणाच्या पाण्याचे प्रदूषण ही गंभीर बाब आहे. सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात उजनी धरणावर अवलंबून आहे. शेती, पिण्याचे पाणी, मत्स्य व्यवसाय तसेच स्थानिक अर्थचक्रासाठी हे धरण अत्यंत महत्त्वाचे असून जिल्ह्याच्या विकासाशी ते थेट जोडलेले आहे. मात्र सध्या धरणातील प्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर बनली असल्यामुळे पर्यावरण, पिण्याचे पाणी आणि पर्यटन विकास या तिन्ही बाबींवर परिणाम होत आहे. राज्य शासनाने सन २०२५–२६ या आर्थिक वर्षाच्या विकास आराखड्यासाठी सुमारे ५४१.१८ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी सुमारे १०० कोटी रुपयांची तरतूद ही उजनी धरणाच्या विकासासाठी या आराखड्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. या निधीतून धरण परिसरातील विविध विकासकामे होत असताना उजनी धरणातील वाढत्या प्रदूषणाचा प्रश्नही तितक्याच प्राधान्याने हाताळला जावा, तसेच धरण प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना आराखड्यात समाविष्ट कराव्यात, अशी मागणी आमदार अवताडे यांनी केली --- Sound Byte - आमदार समाधान आवताडे
162
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 16, 2026 10:54:04
Chakan, Maharashtra:महिलेवर हल्ल्यानंतर कुत्र्यांच्या तोंडाला रक्त; चाकणमध्ये नागरिकांमध्ये भीती चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. सहा भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यानंतर कुत्र्यांच्या तोंडाला रक्त लागल्याची चर्चा परिसरात सुरू असून नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. महिलेवर हल्ला झाल्यानंतर या भटक्या कुत्र्यांच्या तोंडाला रक्त लागल्याने ते पुन्हा हल्ला करतील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे चाकण औद्योगिक क्षेत्रात रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने कामगार वर्ग काम आटोपून घरी जात असतो. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांकडून पुन्हा हल्ला होण्याची शक्यता व्यक्त होत असून कामगारांसह स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
144
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 16, 2026 10:51:27
Ambernath, Maharashtra:भाजपाकडून शिवसेनेच्या गुढ्या 'साभार परत!' सर्वसाधारण सभेत झालेल्या प्रकाराचा केला निषेध शिवसेनेच्या नगरसेवकांवर भाजपा नगरसेवकांची आगपाखड Anchor : शिवसेनेचे माजी विधानपरिषद सदस्य रविंद्र फाटक यांनी अंबरनाथमधील नगरसेवकांना गुढीपाडव्यानिमित्त पाठवलेल्या गुढ्या भाजपाच्या नगरसेवकांनी साभार परत पाठवल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने भाजपाच्या नगरसेवकांच्या प्रभागातल्या विषयांना विरोध करत ते रद्द केले होते. याचा निषेध म्हणून भाजपा नगरसेवकांनी ही भूमिका घेतली आहे. VO - भाजपाच्या अंबरनाथ शहर कार्यालयात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला भाजपाचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, गटनेते अभिजित करंजुले, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शिवसेनेने सभागृहात घेतलेल्या भूमिकेचा भाजपाने निषेध केला. तसंच आमची ही भूमिका शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनाही समजावी, म्हणून आम्ही या गुढ्या परत करत आहोत, कारण आम्हाला प्लॅस्टिकच्या गुढ्या नको, तर शहराच्या विकासाची गुढी पाहिजे, असं यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी म्हटलं. शिवसेनेच्या नगरसेवकांवरही भाजपाने यावेळी आगपाखड केली. तसंच रवींद्र फाटक यांनी पाठवलेल्या गुढ्या आणि शुभेच्छा पत्र साभार परत लिहिलेल्या एका बॉक्समध्ये भरण्यात आली. या सगळ्या गुढ्या त्यांना परत पाठवल्या जाणार असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं.
159
comment0
Report
Advertisement
Back to top