Back
यवतमाळ भवानी गांव में पिसले माकड को डार्टिंग, ग्रामस्थ घायल
SRSHRIKANT RAUT
Mar 18, 2026 11:16:21
Yavatmal, Maharashtra
पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने माकडावर मारलेला डार्ट निशाणा चुकल्याने ग्रामस्थाला लागला. त्यामुळे माकडा ऐवजी ग्रामस्थ जखमी झाला. हा गंभीर तेवढाच मानवी जीवित्वाशी खेळ करणारा प्रकार यवतमाळ च्या भवानी गावात घडल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे.
VO १ : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील भवानी या गावात एक माकड काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे, ग्रामस्थांवर हल्ले करीत आहे त्यामुळे या पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे पथक गावात पोहोचले. त्यांनी माकडाला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅन्क्विलायझर गन मधून डार्ट सोडला, मात्र निशाणा चुकल्याने तो डार्ट थेट गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे यांना लागला. त्यामुळे माकडा ऐवजी ग्रामस्थच बेशुद्ध झाल्याने गावकरी संतप्त झाले. जखमी सदानंद खराटे यांचेवर तातडीने उपचार करण्यात आले, डार्ट शरीरात खोलवर न गेल्याने त्यांचा जीव बचावला.
बाईट : डॉ किशोर मानकर : मुख्य वनसंरक्षक
VO २ : पिसाळलेल्या माकडाने दोन ग्रामस्थांसह एका वन कर्मचाऱ्यालाही जखमी केले आहे. आता या माकडाला पुन्हा जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी वन्य प्राण्यांना डार्ट करताना मानक प्रणालीचे पालन होणे गरजेचे आहे, तेथे वन विभागाचे जबाबदार अधिकारी, तज्ज्ञ पशुवैद्यक, औषधीचा योग्य डोस, आणि सुरक्षित अंतराची आवश्यकता असते. प्राण्यांच्या जीवाला धोका होई नये तसेच मानवी सुरक्षेबाबतही लक्ष देणे अनिवार्य आहे. फक्त प्रशिक्षित वन्यजीव पशुवैद्यक किंवा वन विभागाच्या मान्यताप्राप्त पथकाकडूनच डार्टिंग करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे आहेत. मात्र अनेकदा या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. भवानी येथेही डार्ट करताना चुकलेला निशाणा आणि झालेली ग्रामस्थांची गर्दी बघता वन विभागाची मार्गदर्शक तत्वे पाळल्या गेली का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
बाईट : डॉ किशोर बन्सोड : पशुसंवर्धन अधिकारी (गुलाबी शर्ट)
: यादव तरटे : वन्यजीव अभ्यासक (टी शर्ट)
VO ३ : वन्य जीव व जंगल संपत्तीचे रक्षण करण्याचे काम जोखमीचे आहे, त्यामुळे पुरेशी साधनसामग्री व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण हे महत्त्वाचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने यवतमाळच्या हिवरी वन क्षेत्रात वनवा विझविताना एका वनपालाचा जळून मृत्यू झाला तर त्या पाठोपाठ आता माकडाचा बंदोबस्त करताना डार्ट चा निशाणा चुकला, अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातही वन कर्मचारी ठार झाले. या गंभीर घटना बघता वन विभागाने ही आता गांभीर्य दाखवणे गरजेचे आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 12:18:290
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 18, 2026 12:05:29919
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 11:51:03891
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:48:221005
Report
KJKunal Jamdade
FollowMar 18, 2026 11:34:04956
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 11:30:37953
Report
SKShubham Koli
FollowMar 18, 2026 11:04:42998
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 10:25:121078
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 10:24:231050
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 10:24:041089
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 10:02:44944
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 09:39:181032
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 09:38:53929
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 18, 2026 09:31:59998
Report