Back
आई अंबाबाई की भक्ति का आड़: ऑनलाइन साड़י सेवाओं से भक्तों की हो रही ठगी
PNPratap Naik1
Mar 18, 2026 10:24:23
Kolhapur, Maharashtra
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी… ऑनलाइन साडी अर्पण करण्याच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे… AI Generated वीडियोच्या माध्यमातून भक्तांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू असून त्यामुळे भक्तांनो सावधान
करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीच्या भक्तानो सावधान.
गुडी पाडावा निमित्ताने भक्तांना ऑनलाइन लुटणारी टोळी सक्रिय.
351 रुपये दया आम्ही तुमची साडी गुढीಪाडव्याच्या निमित्ताने आई अंबाबाईला अर्पण करू अस आश्वासन देणारे भामटे उघड.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने देवीला साड़ी अर्पण केली तर घरात सुख समृद्धी आणि भरभराट येणार असल्याचा केला जात आहे दावा.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अलर्ट मोडवर.
देवस्थान समितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून भक्तांना गंडवणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात केला गुन्हा दाखल.
कोल्हापूर सायबर पोलिसांकडे देखील दिली तक्रार.
भक्तांची देवीप्रती असणारी श्रद्धा आता काही भामट्यांनी कमाईचं साधन बनवली आहे… सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय… ज्यामध्ये “फक्त ३५१ रुपया द्या, महालक्ष्मी साडी सेवा आणि शृंगार सेवा” देऊ असा दावा या व्हिडिओत करण्यात आल आहे… यामध्ये घरबसल्या देवीच्या चरणी साड़ी अर्पण होईल, व्हिडिओ मिळेल, ब्लाऊज पीस आणि हलदी-कुंकू घरपोच दिलं जाईल, असं देखील आमिष दाखवलं जातं आहे…
खरंतर हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा आहे… हा व्हिडिओ AI तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आला असून, मंदिर प्रशासनाचा याच्याशी काहीही संबंध नाही… त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने संबंधित व्हिडिओ ज्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आला त्यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
फक्त प्रशासनच नाही, तर अंबाबाई मंदिरातील हक्कदार पुजाऱ्यांनी देखील या प्रकारावर आक्षेप घेतलाय… देवीच्या नावाने अशा प्रकारचं मार्केटिंग करून भक्तांचे पैसे लुटण्याची कृती चुकीचं असून, मंदिरात ठरलेल्या विधी व्यतिरिक्त कोणतीही पूजा केली जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मंदिरात अधिकृतरित्या पाद्य पूजा, कुकुमार्चन पूजा, महाअभिषेक और शाश्वत पूजा अशा सेवा उपलब्ध आहेत… त्यामुळे इतर कोणत्याही ऑनलाईन सेवांचा दावा करणाऱ्यांपासून भक्तांनी सावध राहणं गरजेचं आहे…दररोज ऑनलाईन पद्धतीने अनेकांची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहे, पण आता देवीवर असणाऱ्या श्रद्धेचा बाजार करून काहीजण अंबाबाई देवीच्या भक्तांना लुटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणतीही ऑनलाईन सेवा घेण्यापूर्वी तिची अधिकृतता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे.. भक्तांनो… देवीवरील श्रद्धा ठेवा, पण ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहा.. अन्यथा तुमची फसवणूक अटळ आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 18, 2026 11:34:040
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 11:30:370
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:16:21809
Report
SKShubham Koli
FollowMar 18, 2026 11:04:42970
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 10:25:121021
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 10:24:041089
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 10:02:44944
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 09:39:181032
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 09:38:53929
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 18, 2026 09:31:59998
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 09:31:08966
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 09:20:401092
Report
ABATISH BHOIR
FollowMar 18, 2026 08:50:411092
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 18, 2026 08:50:06951
Report