Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

शिर्डी कनेक्शन वाला नाशिक महिला प्रकरण: करोड़ों जमीन का मामला उजागर

KJKunal Jamdade
Mar 18, 2026 11:34:04
Shirdi, Maharashtra
नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपीचे शिर्डी कनेक्शन... अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याचे शिर्डी कनेक्शन आले समोर... अशोक खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे शिर्डीत चार एकर भुखंड... शिर्डीतील प्राईम लोकेशनला कोट्यावधींचा भुखंड... खरात याने नाशिकसह सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव परिसरात मोठी संपत्ती जमवल्याची चर्चा... शिर्डीतील भूखंडावर पेरला होता गहू... कॅप्टन अशोक खरात च्या नावे असलेल्या जमिनीची किंमत अंदाजे 50 कोटी हून अधिक असल्याची माहिती समोर.. काल रात्री खरात याला नाशिक क्राईम ब्रांचने घेतले ताब्यात... मात्र काल दुपारीच तातडीने शिर्डीतील भूखंडावरील गव्हाची करण्यात आल्याचे आले समोर... आरोपी कॅप्टन अशोक खरातच्या नावे असलेल्या जमिनीच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 12:32:50
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम...नव्या समीकरणाची नांदी... अँकर - सांगली जिल्हा परिषदेमध्ये अखेर भाजपाचा करेक्ट कार्यक्रम झालाय,जयंत पाटील विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या त्रिमूर्तीनी भाजपला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून रोखत,महाविकास आघाडीचा झेंडा सांगली जिल्हा परिषदेवर फडकवलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटात पडलेली उभी फुट हे महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली,त्या जोरावर महाविकास आघाडीने भाजपाला सांगली जिल्हा परिषदेत सत्ते पासून रोखले आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम महाविकास आघाडीने फडकवला जिल्हा परिषदेवर झेंडा जयंत पाटील,विश्वजीत कदम आणि विशाल पाटील त्रिमूर्तीनी भाजपचा केला करेक्ट कार्यक्रम राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेऊन भाजपाला सत्तेपासून ठेवलं चार हात लांब सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाला बसला मोठा धक्का व्हि वो - सांगली जिल्हा परिषदेत सत्तेपासून भाजपाला रोखण्यात महाविकास आघाडीला अखेर यश आले आहे. भाजपाचा अध्यक्ष होईल असा दावा वारंवार पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून करण्यात येत होता मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फिरवत,सांगली जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस ( SP ) व्ही वो - वास्तविक सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हता,मात्र काँग्रेस महाविकास आघाडी ही सत्तेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली होती,महाविकास आघाडीचे 30 सदस्य संख्या निवडून आले,अवघ्या एका जागेमुळे महाविकास आघाडी ही सत्तेपासून दूर होती,भाजपाचे अवघे 16 सदस्य निवडून आले होते ,तर शिवसेना शिंदे गटाचे सात,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा असे सदस्य आणि जनसुराज्य व रयत क्रांती संघटनेचे प्रत्येकी एक,त्यामुळे भाजपाच्या सत्तेची मदार मित्र पक्षांवर अवलंबून होती. एक नजर टाकूया पक्षीय बलाबलवर.. भाजपा - 16 राष्ट्रवादी अजित पवार - 06 शिवसेना शिंदे पक्ष - 07 रयत क्रांती संघटना - 01 जनसुराज्य शक्ती पक्ष - 01 काँग्रेस - 11 राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - 18 शिवसेना ठाकरे पक्ष -01 व्ही वो - जिल्ह्यातील स्थानिक राजकारण जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर संघर्ष व भाजपा विरोधात असणारा रोष, यामुळे जयंत पाटील,विश्वजीत कदम,विशाल पाटील,रोहित पाटलांनी एकत्रित एक राष्ट्रवादी अजित पवार गटाला निवडणूक आधीच सोबत घेतलं होतं,त्यामुळे निवडणुकीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जोरावर सत्ता स्थापनेची व्यूहरचना आखली होती. व्हि वो - परंतु महायुती म्हणून राज्यातल्या सत्तेच्या समीकरणाप्रमाणेच जिल्हा परिषद सत्तेत देखील राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत येईल,अशी अपेक्षा भाजपाला होती, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटात उभी फूट पडल्याने चार सदस्य हे महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्याने,भाजपाची गोची झाली,मात्र तरी देखील निवडणुकीत चमत्कार होईल,अशी अशा शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाच्या नेत्यांना होती. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार - भाजपा. व्ही वो - काँग्रेस राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी एकत्रित भाजपाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून रोखायची अशी रणनीती आखली होती,माजी खासदार संजयकाका पाटील,यांनी ऐनवेळी भाजपाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत ऐनवेळी ट्विस्ट येण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात होती. बाईट - संजयकाका पाटील - माजी खासदार, - राष्ट्रवादी अजित पवार . व्ही वो - मात्र राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी माव विकास आघाडी सोबतच जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील या 34 मतांनी अध्यक्ष पदाच्या निवडीत तर उपाध्यक्ष पदाच्या निवडीत काँग्रेसचे ऋषिकेश लाड हे विजयी झाले त्या दोघांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार स्वप्नाली मासाळ जाधव यांचा नव मतांनी पराभव केला. व्ही वो - सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता काबीज करण्यात महाविकास आघाडीने यश तर मिळवलंचं,याशिवाय सांगली जिल्ह्यात भाजपाला रोखण्यासाठी नव्या समीकरणाच्या नांदीची सुरुवात झाल्याचे देखील दाखवून दिलंय..
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 18, 2026 12:32:11
Bhimashankar, Maharashtra:खासदार निशिकांत दुबे यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान भिमाशंकरमध्ये आग? Anc :- भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान गंभीर प्रकार समोर आलाय Vo :- झारखंडचे खासदार निशिकांत दुबे हे दर्शनासाठी भिमाशंकरला हेलिकॉप्टरने आले असताना, लँडिंगसाठी वापरण्यात आलेल्या स्मोक मार्करमुळे जंगल परिसरात आग लागल्याची घटना घडली होती सुदैवाने आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही, मात्र पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या या भागात अशा प्रकारामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. या घटनेमुळे नियमांचे पालन, सुरक्षा आणि जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे...
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 18, 2026 12:31:57
Ambernath, Maharashtra:पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या बदलापूर पोलिसांनी केली पतीला अटक बदलापूर पूर्वेतील यादवनगर परिसरात कौटुंबिक वादातून चंद्रकांत थोरात नावाच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीची कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून हत्या केली आहे. या प्रकरणात बदलापूर पोलिसांनी पत्नीची हत्या करणारा आरोपी चंद्रकांत थोरात याला बेड्या ठोकल्या आहेत. या बाबत बदलापूर पोलिस वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन पाटील यांनी सांगितले की, पती पत्नी्मध्ये सातत्याने कौटूंबंधिक वाद सुरु होता. या दोघांची १७ वर्षाची मुलगी आहे. ती रात्री बाहेर का फिरते ? या वरुन पत्नी अश्विनी थाेरात आणि पती चंद्रकांत थोरात यांच्यात वाद होता. या वादातून मंगळवारी परत एकता याच कारणावरुन वाद झाला. मुलगी झोपली असता चंद्रकांत थोरात यांनी गळा आवळून पत्नीची हत्या केली. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 18, 2026 12:18:29
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरकर सध्या स्वयंपाकाच्या गॅस टंCnाईने हैराण झालेत. 2-2 आठवडे बुकिंग केले असले तरी सिलिंडर घरी पोचत नसल्याने लांबच लांब रांगा लागत आहेत. आपली मजुरी, व्यवसाय बुडवून ग्राहक रांगेत उभी आहेत. विशेष म्हणजे लहान मुले, महिलाही या कारणासाठी तासनतास तिष्ठत आहेत. ओटीपी येऊनही सिलिंडर घरपोच येत नसल्याने एजन्सीवर तोबा गर्दी उसळली आहे. एजन्सी धारकानाही कंपन्यांकडून अनियमित गॅस सिलिंडर पुरवठा होत आहे. मोठ्या प्रयत्नाने सिलिंडर मिळाले तर अति धोकादायक गॅस सिलिंडरची ग्राहकांना दुचाकी आणि आटो मधून वाहतूक करावी लागत आहे. नागरिक गॅस टंचाईमुळे नियम भंग करण्यास बाध्य आहेत. भरलेले गॅस सिलिंडर मिळाल्यावर विश्व चषक मिळाल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे.
594
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 18, 2026 12:05:29
Dharashiv, Maharashtra:माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांना धक्का; पुतणे धनंजय सावंत यांची पत्नी मुलगा, मुलगी यांचा भाजपमध्ये प्रवेश धनंजय सावंत यांच्या कार्यकर्त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश राज्याचे माजी आरोग्यमंत्री तसेच भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांना राजकीय धक्का बसला आहे. त्यांचे पुतणे व धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंत यांच्यासह मुलगा, मुलगी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी धनंजय सावंत ही त्या ठिकाणी उपस्थित होते धनंजय सावंत हे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत त्यामुळे या घडामोडीला स्थानिक राजकारणात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रवेशामुळे भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. आगामी राजकीय समीकरणांवर या पक्षप्रवेशाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधी गटाकडून धनंजय सावंत निवडणूक लढवली होती
962
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 18, 2026 11:51:03
Akola, Maharashtra:अकोला जिल्हा परिषदेत तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ घेण्यासाठी बोगस दिव्यांग (UDID) आणि खोट्या आजारांची प्रमाणपत्रं सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.. तक्रारकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते गणेश कुरई यांनी तक्रार केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे.. माहिती अधिकारात तक्रारकर्ता कुरई यांनी ही माहिती काढली आहे.. आतापर्यंत चार शिक्षकांसह एका गट शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे.. तर इतर शिक्षकांची चौकशी सुरू आहे.. Vo 1: अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांचा बदली घोटाळा समोर आला आहे.. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही माहिती समोर आली आहे.. माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश कुरई यांनी ही माहिती समोर आणली आहे.. त्यांनी याची तक्रार केल्यानंतर खळबळून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणात चार शिक्षकांसह एका गट शिक्षणाधिकारी यांना निलंबित केले आहे.. शासनाचा नियम होता की याची तपासणी 'जिल्हा शल्य चिकित्सकांनी' करावी, पण अकोला प्रशासनाने या प्रकरणात तालुका स्तरावरच्या डॉक्टरांकडून (THO) करून घेतली आणि बोगस प्रमाणपत्रांना 'क्लीन चिट' दिली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अकोला जिल्हा परिषदेत झालेला शिक्षक बदली घोटाळा हा केवळ प्रशासकीय चूक नसून, तो राज्य शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून केलेला हजारो कोटींचा 'भ्रष्ट संघटित गुन्हा' असल्याचा आरोप आमदार हरीश पिंपळे यांनी मुख्य सचिव यांच्याकडे देण्यात आलेल्या तक्रार मध्ये केला आहे. या प्रकरणात 268 शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे आणि अंतराचे खोटे दाखले देऊन शासनाची फसवणूक केली आहे. या घोटाळ्याला अभय देणाऱ्या आणि दस्तऐवज लपवणाऱ्या खालील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित व बडतर्फ करण्याची मागणीही करण्यात आली आहे.. Byte- गणेश कुरई, माहिती अधिकार कार्यकर्ते Vo 2: दरम्यान या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर पाच जणांना निलंबित करण्यात आले असून इतरांची चौकशी सुरू असल्याचं सीईओ यांनी म्हटलं आहे.. Byte : अनिता मेश्राम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला
897
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 18, 2026 11:48:22
1016
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 18, 2026 11:30:37
Kolhapur, Maharashtra:ANC :- आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इजराइल, अमेरिका आणि इराण मध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका सर्वच घटकांवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.. घरगुती गॅस ग्राहक, व्यावसायिक गॅस ग्राहक यांच्याबरोबरच आता LPG रिक्षा चालक चांगलाच भरडला जात आहे.. युद्धापूर्वी 40 रुपयांचा घरात असणारा LPG गॅस आता 80 रुपये लिटर झाला आहे त्यामुळे रिक्षा चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे… मध्यपूर्वेत इजरायल आणि इराण यांच्यात वाढलेला संघर्ष… त्यात अमेरिकेची आक्रमक भूमिका… या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरात मोठी चढ-उतार सुरू झाली आहे.. त्यामुळे जगभरातील अनेक देश इंधन तुटवडा आणि इंधन महागाईला सामोरे जात आहे.. या युद्धाचा थेट परिणाम भारतात दिसून येत आहे. घरगुती LPG इंधनांसह इतर इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एलपीजी रिक्षाला लागणाऱ्या गॅसचा तर एक प्रकारे भडकाच उडालाय. कोल्हापुरात पूर्वी 40 रुपये लिटर ने मिळणारा गॅस आता 80 रुपयांच्या घरात आला आहे. एक प्रकारे एलपीजी रिक्षा असणाऱ्या रिक्षा चालकाचे कंबरडे मोडले आहे. रिक्षासाठी वापरल्या जाणाऱ्या LPG गॅसचा दर 40 रुपयांवरून थेट 80 रुपयांपर्यंत पोहोचला आहे…युद्ध सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून दरवाढीचा सिलसिला सुरू झाला… कधी २ रुपये तर कधी थेट १० रुपयांनी दर वाढत असल्यामुळे रिक्षाचालकांची आर्थिक गणितं पूर्णपणे कोलमडली आहेत. त्यामुळेच कोल्हापूरातील रिक्षा चालकांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन एकतर एलपीजी गॅसचे दर कमी करा अन्यथा रिक्षाचे दर वाढवायला परवानगी द्या अशी मागणी केली आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
1027
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 18, 2026 11:16:21
Yavatmal, Maharashtra:पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने माकडावर मारलेला डार्ट निशाणा चुकल्याने ग्रामस्थाला लागला. त्यामुळे माकडा ऐवजी ग्रामस्थ जखमी झाला. हा गंभीर तेवढाच मानवी जीवित्वाशी खेळ करणारा प्रकार यवतमाळ च्या भवानी गावात घडल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे. VO १ : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील भवानी या गावात एक माकड काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे, ग्रामस्थांवर हल्ले करीत आहे त्यामुळे या पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे पथक गावात पोहोचले. त्यांनी माकडाला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅन्क्विलायझर गन मधून डार्ट सोडला, मात्र निशाणा चुकल्याने तो डार्ट थेट गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे यांना लागला. त्यामुळे माकडा ऐवजी ग्रामस्थच बेशुद्ध झाल्याने गावकरी संतप्त झाले. जखमी सदानंद खराटे यांचेवर तातडीने उपचार करण्यात आले, डार्ट शरीरात खोलवर न गेल्याने त्यांचा जीव बचावला. बाईट : डॉ किशोर मानकर : मुख्य वनसंरक्षक VO २ : पिसाळलेल्या माकडाने दोन ग्रामस्थांसह एका वन कर्मचाऱ्यालाही जखमी केले आहे. आता या माकडाला पुन्हा जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी वन्य प्राण्यांना डार्ट करताना मानक प्रणालीचे पालन होणे गरजेचे आहे, तेथे वन विभागाचे जबाबदार अधिकारी, तज्ज्ञ पशुवैद्यक, औषधीचा योग्य डोस, आणि सुरक्षित अंतराची आवश्यकता असते. प्राण्यांच्या जीवाला धोका होई नये तसेच मानवी सुरक्षेबाबतही लक्ष देणे अनिवार्य आहे. फक्त प्रशिक्षित वन्यजीव पशुवैद्यक किंवा वन विभागाच्या मान्यताप्राप्त पथकाकडूनच डार्टिंग करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे आहेत. मात्र अनेकदा या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. भवानी येथेही डार्ट करताना चुकलेला निशाणा आणि झालेली ग्रामस्थांची गर्दी बघता वन विभागाची मार्गदर्शक तत्वे पाळल्या गेली का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. बाईट : डॉ किशोर बन्सोड : पशुसंवर्धन अधिकारी (गुलाबी शर्ट) : यादव तरटे : वन्यजीव अभ्यासक (टी शर्ट) VO ३ : वन्य जीव व जंगल संपत्तीचे रक्षण करण्याचे काम जोखमीचे आहे, त्यामुळे पुरेशी साधनसामग्री व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण हे महत्त्वाचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने यवतमाळच्या हिवरी वन क्षेत्रात वनवा विझविताना एका वनपालाचा जळून मृत्यू झाला तर त्या पाठोपाठ आता माकडाचा बंदोबस्त करताना डार्ट चा निशाणा चुकला, अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातही वन कर्मचारी ठार झाले. या गंभीर घटना बघता वन विभागाने ही आता गांभीर्य दाखवणे गरजेचे आहे.
990
comment0
Report
SKShubham Koli
Mar 18, 2026 11:04:42
Thane, Maharashtra:*गँगस्टर रवी पुजारीला दहा दिवसाची पोलीस कोठडी...* Anchor ठाणे : कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारीला आज ठाणे कोर्टामध्ये हजर करण्यात आला... रवी पुजारी याला ठाणे न्यायालयातील मोक्का कोर्टामध्ये हजर करण्यात आला... काही वर्षांपूर्वी ठाण्यातील कासरवाडी पोलीस स्टेशनमध्ये रवी पुजारी यांनी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.... रवी पुजारी यांचा ताबा बेंगलोरु कोर्टातून घेऊन आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आला यावेळी सरकारी पक्षाचे वकील संजय मोरे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करून पंधरा दिवसाची रवी पुजारीला पोलिस कोठडीची मागणी केली होती परंतु ठाणे मोक्का न्यायालयाने दहा दिवसाची पोलीस कोठडी रवी पुजारीला सुनावलेली आहे.... 27 मार्चला पुन्हा एकदा रवी पुजारीला ठाणे मोक्का कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे...
998
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 18, 2026 10:24:23
Kolhapur, Maharashtra:गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी… ऑनलाइन साडी अर्पण करण्याच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे… AI Generated वीडियोच्या माध्यमातून भक्तांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू असून त्यामुळे भक्तांनो सावधान करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीच्या भक्तानो सावधान. गुडी पाडावा निमित्ताने भक्तांना ऑनलाइन लुटणारी टोळी सक्रिय. 351 रुपये दया आम्ही तुमची साडी गुढीಪाडव्याच्या निमित्ताने आई अंबाबाईला अर्पण करू अस आश्वासन देणारे भामटे उघड. गुढीपाडव्याच्या निमित्ताने देवीला साड़ी अर्पण केली तर घरात सुख समृद्धी आणि भरभराट येणार असल्याचा केला जात आहे दावा. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अलर्ट मोडवर. देवस्थान समितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून भक्तांना गंडवणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात केला गुन्हा दाखल. कोल्हापूर सायबर पोलिसांकडे देखील दिली तक्रार. भक्तांची देवीप्रती असणारी श्रद्धा आता काही भामट्यांनी कमाईचं साधन बनवली आहे… सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय… ज्यामध्ये “फक्त ३५१ रुपया द्या, महालक्ष्मी साडी सेवा आणि शृंगार सेवा” देऊ असा दावा या व्हिडिओत करण्यात आल आहे… यामध्ये घरबसल्या देवीच्या चरणी साड़ी अर्पण होईल, व्हिडिओ मिळेल, ब्लाऊज पीस आणि हलदी-कुंकू घरपोच दिलं जाईल, असं देखील आमिष दाखवलं जातं आहे… खरंतर हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा आहे… हा व्हिडिओ AI तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आला असून, मंदिर प्रशासनाचा याच्याशी काहीही संबंध नाही… त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने संबंधित व्हिडिओ ज्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आला त्यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. फक्त प्रशासनच नाही, तर अंबाबाई मंदिरातील हक्कदार पुजाऱ्यांनी देखील या प्रकारावर आक्षेप घेतलाय… देवीच्या नावाने अशा प्रकारचं मार्केटिंग करून भक्तांचे पैसे लुटण्याची कृती चुकीचं असून, मंदिरात ठरलेल्या विधी व्यतिरिक्त कोणतीही पूजा केली जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मंदिरात अधिकृतरित्या पाद्य पूजा, कुकुमार्चन पूजा, महाअभिषेक और शाश्वत पूजा अशा सेवा उपलब्ध आहेत… त्यामुळे इतर कोणत्याही ऑनलाईन सेवांचा दावा करणाऱ्यांपासून भक्तांनी सावध राहणं गरजेचं आहे…दररोज ऑनलाईन पद्धतीने अनेकांची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहे, पण आता देवीवर असणाऱ्या श्रद्धेचा बाजार करून काहीजण अंबाबाई देवीच्या भक्तांना लुटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणतीही ऑनलाईन सेवा घेण्यापूर्वी तिची अधिकृतता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे.. भक्तांनो… देवीवरील श्रद्धा ठेवा, पण ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहा.. अन्यथा तुमची फसवणूक अटळ आहे.
1050
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 10:24:04
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून आमदार जयंत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आमने-सामने सांगली जिल्हा परिषदेतल्या महाविकास आघाडीच्या विजयानंतर आमदार जयंत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर कार्यकर्ते आले समोरा-समोर गोपीचंद पडळकर जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर येताच जयंत पाटील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी जयंत पाटलांच्या विजयाबरोबर आता कसं वाटतंय गार गार वाटतंय अशी घोषणाबाजी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमोरच जयंत पाटील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी जयंत पाटील समर्थकांकडुन झालेल्या घोषणेनंतर पडळकर समर्थक देखील आक्रमक पडळकर समर्थकांकडून देखील जोरदार घोषणाबाजी करत देण्यात आले प्रत्युत्तर पडळकर व पाटील समर्थकांकडुन देण्यात आलेल्या घोषणामुळे वातावरण बनला तणावपूर्ण पोलिसांकडून पडळकर समर्थकांना बाजूला करत ,पडळकरांना निघून जाण्याची केली विनंती पोलिसांची सतर्कता आणि सुरक्षा व्यवस्था मुळे टळला मोठा अनर्थ
1089
comment0
Report
Advertisement
Back to top