Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शेतकरी न्याय यात्रेतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, आशिष खुलसंगे

Aug 21, 2024 07:24:58
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि अतिपावसामुळे नापिकीचे संकट उभे राहिले आहे. कोळसा खाणीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. पीक विमा मिळवण्यात अडचणी आहेत आणि पांदण रस्ते योजना रखडली आहे. सरकार 'लाडकी बहिण' योजनेचा प्रचार करत असताना, शेतकऱ्यांना दुसऱ्या हाताने लुटून उध्वस्त करत असल्याचा आरोप आशिष खुलसंगे यांनी केला आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 04:01:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात मनपा निवडणुकीतील अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी शिंदेसेनेत नाराजीनाट्य उफाळून आले. त्याची सुरुवात पक्षाची पहिली शाखा स्थापन झालेल्या गुलमंडी प्रभागापासून झाली. आमदार प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे पुत्र बंडी याच प्रभागातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीत मध्य मतदारसंघातून विजयासाठी उद्धवसेनेची उमेदवारी तनवाणी यांनी नाकारली. त्याची परतफेड आता व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, जैस्वाल यांचे पुत्र रिंगणातून मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे पक्षाच्या समन्वय समितीमध्ये समावेश असूनही माजी आमदार तनवाणी अर्ज वाटपाकडे दिवसभरात फिरकलेही नाहीत. त्‍याचबरोबर राजेंद्र जंजाळ यांना पक्षात पुन्हा मान मिळाल्यामुळे माजी महापौर त्र्यंबक तुपे गायब असल्याची चर्चा शिवसेना कार्यालयात होती. शिवसेनेने प्रथमच इच्छुकांसाठी छापील अर्जाचे वाटप केले. पहिल्या दिवशी ५३६ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. शनिवारीही अर्जाचे वितरण सुरू असेल.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 13, 2025 04:01:31
Washim, Maharashtra:अँकर: वाशीम जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत ३ हजार ९०० मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. साठा दाखल होताच शेतकऱ्यांनी युरिया खरेदीसाठी खत दुकानांवर मोठी गर्दी केली होती. अशातच मालेगाव तालुक्यात युरिया वितरणात गैरप्रकार करणाऱ्या दोन खत दुकानदारांवर कृषी विभागाने कारवाई केली आहे. वैभव कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांच्या नावावर १७१ बॅग युरियाची बनावट बिले तयार केल्याचे, तर सरस्वती कृषी सेवा केंद्रात ६५ बॅग युरिया बिलाविनाच विक्री केल्याचे आढळून आले. दोन्ही दुकाने बंद करून विक्रेते पसार झाल्याचेही निदर्शनास आले. माहिती मिळताच कृषी विभागाच्या अधिकारीांनी तातडीने कारवाई करत गोदाम उघडून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष युरिया वितरित केला. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 13, 2025 03:45:12
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील बानगे इथल्या राजेंद्र गोविंदा शिंदे यांनी तब्बल 51 हजार रुपये किमतीची कोल्हापुरी चप्पल बनवली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ही चप्पल सर्वोत्कृष्ट ठरून कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केलं आहे. तब्बल ५१ हजार रुपयांची किंमत चप्पल आता इटलीला पाठवली जाणार आहे. राजेंद्र शिंदे हे ‘कोल्हापुरी चप्पल डेव्हलप प्रोजेक्ट’चे मास्टर ट्रेनर असून त्यांनी या क्षेत्रात २५ वर्षे या क्षेत्रात काम केले आहे. आगामी काळात एक लाख रुपयांच्या नाविन्यपूर्ण चपला तयार करण्याचा त्यांचा मानस असून, गिनिज बुकमध्ये कोल्हापुरी चप्पलचा समावेश व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 13, 2025 03:33:45
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरलगत असनाऱ्या नागरी वसाहतींच्या आणि गावांच्या सुनियोजित विकासासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ४० अन्वये 'विशेष नियोजन प्राधिकरण' (SPA) हा महत्त्वपूर्ण दर्जा दिला आहे. या प्रस्तावामुळे प्राधिकरणाच्या कक्षेतील ४२ गावांमधील विकासाचे प्रश्न मार्गी लागणार असून, कोल्हापूरच्या उपनगरांमध्ये सुनियोजित विकासाचे एक नवीन पर्व सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोल्हापूर हद्दवाढ विरोधी कृती समितीने कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर याचे आभार मानले आहेत.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 13, 2025 03:33:28
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 13, 2025 03:32:55
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा भाईंदर प्लेझंट पार्क मध्ये फर्निचर दुकानाला आग अग्निशमन जवानांकडून आगीवर नियंत्रण पालिकेच्या निष्काळजीपनामुळे आग लागल्याचा आरोप अँकर - मीरा–भाईंदरच्या प्लेझंट पार्क परिसरात मध्यरात्री भीषण आगीची घटना घडली आहे. अनधिकृतरित्या सुरू असलेल्या एका फर्निचर दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, दाट धुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वी दोन वेळा आग लागल्याच्या घटन घडल्या होत्या. तरीही महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच ही आग लागल्याचे सांगितले जात असून, पुढील चौकशी सुरू आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 13, 2025 03:32:29
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर गेले असून सकाळी व रात्री तीव्र थंडी जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे, मफलर, टोपी यांचा वापर सुरू केला आहे.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिक शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत.थंडीचा विशेष फटका लहान मुले व वृद्ध नागरिकांना बसत असून सर्दी, खोकला व इतर आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, गरम कपड्यांचा वापर करावा,तसेच लहान मुले व वृद्धांची योग्य निगा राखावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 13, 2025 03:18:09
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग มाजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना आज अखेरचा निरोप.... सकाळी साडे नऊ वाजता देवघरहून अंत्ययात्रा, ११ वाजता वरवंटी येथे अंत्यसंस्कार.... लातूरमध्ये आज राष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती... लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे राहणार उपस्थित.... लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर नेते हे येणार आहेत. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने देशाने एक अनुभवी, संयमी नेतृत्व गमावले आहे. अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिली आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 03:01:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरात आचारसंहितेपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू राहणार नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामे रखडण्याची भीती व्यक्त केली जातेय, आचारसंहितेपूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली वाढल्या आहेत.या पार्श्वभूमीवर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयांना शनिवार-रविवारच्या सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्ते, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या फायलींना प्राधान्य देत त्या तातडीने टेंडर स्तरापर्यंत नेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी मिळावी, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचे चित्र आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top