Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

मालशेज घाट में 7–8 बाइकरों का खतरनाक स्टंट वीडियो वायरल

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 09, 2025 12:47:38
Ambernath, Maharashtra
माळशेज घाटात दुचाकी स्वारांचा जीव घेणा स्टंट सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल Murbad bike stunt कल्याण नगर महामार्गावरील मुरबाड मधील माळशेज घाटात ७ ते ८ बाईक रायडरांनी धुमाकूळ घालत जीवघेण्यं स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, धक्कादायक म्हणजे या सर्व दुचाकींवर नंबर प्लेट नव्हत्या. आज रविवार असल्याने पर्यटनाची मोठी गर्दी देखील होती. त्यामुळे अशा स्टंटबाजीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती . मात्र संपूर्ण घाटात एकही पोलीस कर्मचारी नव्हता पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे एखाद्याचा बळी देखील जाऊ शकत होता. चंद्रशेखर भुयार , मुरबाड
9
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Nov 09, 2025 16:18:08
Chendhare, Alibag, Maharashtra:पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात आमदार महेंद्र दळवी यांचा मोठा गौप्यस्फोट. राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी घात केल्याचा व्यक्त केला संशय. सुनील तटकरे यांच्यावरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची आठवण दिली. राज्यातील स्थिती गंभीर होत चालली आहे. महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली खंत. पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावर बोलताना अलिबागचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी गंभीर गौप्यस्फोट केलाय. निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण कसे बाहेर आले असा सवाल करताना राष्ट्रवादीच्याच लोकांनी त्यांचा घात केला असा संशय महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला. यावेळी दळवी यांनी अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. एक बाप आपल्या मुलासाठी किती खोटं बोलू शकतो हे सर्वांनी पाहिलं. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हे काही नवीन नाही हे सांगताना सुनील तटकरे यांच्यावर झालेल्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची आठवण करून दिली. धनंजय मुंढे यांनी कुणाची सुपारी कशी दिली हे सुद्धा आपण पाहिलं, state स्थिती गंभीर असल्याचं ते म्हणाले.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 09, 2025 16:17:29
Chendhare, Alibag, Maharashtra:प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना होमग्राऊंडवर जोरदार धक्का ...... कोलाड येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ....... सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक सुरेश महाबळे यांचा राष्ट्रवादीला रामराम ....... मंत्री भरत गोगावले यांनी खा. सुनिल तटकरे यांच्या होमग्राऊंड कोलाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय. तटकरे यांचे खंदे समर्थक माजी सरपंच सुरेश महाबळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहिर प्रवेश केला . कोलाडच्या नाक्यावर जाहिर सभा घेत मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर या गळतीचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.यावेळी व्यासपीठावरील कोलाड बदलतोय अशी अक्षरे असलेला बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 09, 2025 15:48:18
Kalyan, Maharashtra:कल्याणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे ठिय्या आंदोलन, पुण्यात पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळा प्रकरणी कारवाईची मागणी ANC-पुण्यातील महार वतनाच्या ४५ एकर जमिनीच्या घोटाळा प्रकरणात पार्थ पवार व त्यांच्या कंपनीतील साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) तर्फे कल्याणमधील कोळशेवाडी पोलीस ठाण्यासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात पार्थ पवार यांनी दलित समाजाच्या मालकीची जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याचा गंभीर आरोप करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.पार्थ पवार हाय हाय दलितांच्या जमिनी हडप करणाऱ्यांना अटक करा अशा घोषणा देत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी स्पष्ट चेतावणी दिली की जोपर्यंत पार्थ पवार आणि त्यांच्या साथीदारांवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार एट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही. या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) च्या महिला जिल्हाध्यक्ष शालिनी वाघ आणि जिल्हाध्यक्ष धर्म वक्ते यांनी केले. आंदोलनस्थळी आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पोलिसांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे निवेदन स्वीकारले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले बाइट - धर्मा वक्ते/जिल्हाध्यक्ष
2
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 09, 2025 15:31:21
Ratnagiri, Maharashtra:भाजपमधील वादा तुमच्या मीडियाच्या दृष्टिकोनातून.. कार्यकर्त्याला सन्मान जनक वागणूक मिळते का नाही? हे पाहणं भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी - नितेश राणे भाजपाच्या कार्यकर्त्याला मान भाजपाच्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळावा म्हणून आम्ही बोलतो... पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतं ते पाहू - नितेश राणे काही दिवस थांबा काळजी करू नका.. काळजी करू नका...तुमचे चॅनेल व्यवस्थित पद्धतीने चालतील याची काळजी आम्ही घेऊ... कणकवलीतील वादावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया 2019 ते 2024 yामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे.. गावागावांमधील कार्यकर्त्यांची जाळ..आमचं मतदान यामध्ये आमची ताकद वाढली आहे - नितेश राणे रत्नागिरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता सन्मानपूर्वक युती झाली तर सगळे समाधानी आहेत... नाही झाली तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम - नितेश राणे लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्याने भरपूर काम केले... त्यामुळे कार्यकर्त्याला आता अपेक्षा.... कुणी आम्हाला कमी लेखू नये... कोणी आम्हाला हलक्यात घेऊ नये.. कुणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये... कुणाला खुमখुमी काढायची असेल मिटवायचे असेल तर आम्ही तयार... एवढी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा... याबद्दल कार्यकर्ते काही बोलत असेल तर त्याची पक्षश्रेष्ठ दखल घेतील - नितेश राणे मोहम्मद अली रोड, बहराम पाडा किंवा आमच्या इकडच्या काही किनारपट्टी भागांमध्ये दुबार चौबार मतदार आहे ते दाखवतो - नितेश राणे हिंदूंच्या घरामध्ये यादी घेऊन घुसू नका हिम्मत असेल तर मोहल्लामध्ये जा - नितेश राणे बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिला असतात का? मोहल्लामध्ये जाऊन बडवण्याची भाषा करा - नितेश राणे अल्पसंख्यांक आयोगाची नोटीस माझ्या हातात आलेली नाही... त्यांनी त्यांचे काम करावे मी माझे काम करणार... हिंदु राष्ट्रासाठी मी बोलत राहणार... त्यांनी नोटीस पाठवत राहावं - नितेश राणे लोकेशन - गणेशगुळे, रत्नागिरी Byte - नितेश राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 09, 2025 14:51:58
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नर बछडा वाघ T-91 SAM-1 यशस्वीरित्या जेरबंद, मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार होता वावर अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार शिरकाव करत मानवी जीवितास धोका निर्माण करणारा नर बछडा वाघ T-91 SAM-1 वन विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे. जेरबंद केलेल्या वाघास सध्या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. 24 सप्टेंबर 2025 रोजी मोहर्ली (बफर) परिक्षेत्रातील नियतक्षेत्रानजीक शेतकाम करत असताना अमोल बबन नन्नवारे वय -37 वर्षे रा. भामडेळी यांचा सदर वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. 20 ऑक्टोबर 2025 रोजी आदेश जारी झाल्यावर्णमानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि आणखी मनुष्यहानी होऊ नये म्हणून या वाघाला जेरबंद करून ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलवण्याचे निर्देश दिले होते, त्याची अंमलबजावणी झाली आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 09, 2025 14:23:25
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील बिबट्याच्या गाईवर हल्ला व ताव मारतानाचा व्हिडिओ व्हायरल, शहरालगतच्या आयुध निर्माणी परिसरातील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या आयुध निर्माणी परिसरात वाघ व बिबट्याचा नेहमीच वावरणे दिसून येते. ताजा व्हिडिओ एक बिबट रस्त्याच्या कडेला गाईवर हल्ला करून ताव मारतानाचा आहे..जो वायरल झालाय. आयुध निर्माणीच्या मागचा परिसर ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाची बाह्य सीमा आहे. यामुळेच या भागात वाघ, बिबटे, अस्वल याचा नेहमीच संचार दिसून येतो. अनेकदा वनविभागाने या भागातून वाघ- बिबटे- अस्वल यांना जेरबंद करून अन्यत्र पाठवणी केली आहे. ताज्या व्हिडिओत पूर्ण वाढीचा बिबट एका गाईवर हल्ला करून तिला संपवताना दिसून येत आहे. रस्त्यावर अशा पद्धतीने गाईवर केलेला हल्ला परिसरात दहशत निर्माण करून गेला आहे.
5
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 09, 2025 13:33:18
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग- डायलॉगबाजीने शहाजीबापू तुम्ही आसामचा पर्यटन वाढवला,आता महाराष्ट्राचा पर्यटन वाढवा - शहाजीबापू पाटलांना पर्यटनाचा अँबेसिडर करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. अँकर - शहाजीबापूंना पर्यटनाचा ब्रँड अंबेसिडर करा,असे मिश्कील विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय, शहाजी बापू पाटलांनी डायलॉगबाजी केली,त्यामुळे आसामचा पर्यटन वाढलं, तशीच डायलॉगबाजी करून महाराष्ट्राचे पर्यटन वाढवावं,त्यासाठी पर्यटन मंत्री शंभुराजे देसाईंनी शहाजी बापू पाटलांना पर्यटनाचा ब्रांड अंबेसिडर करावे,असे देखील मुश्किल विधान या निमित्ताने केले, सांगलीच्या बोरगाव मध्ये चंद्रहार पाटलांकडून आयोजित बैलगाडी शर्यतीच्या प्रसंगी ते बोलत होते. साउंड बाईट - एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री
4
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 09, 2025 12:45:15
Dhule, Maharashtra:ANCHOR - अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावचे विद्यार्थी घेऊन देवगोई घाटातून बस परतत असताना अमली बरी जवळ हा भीषण अपघात झाला. अपघाता वेळी बस मध्ये जवळपास 40 विद्यार्थी असल्याची समोर आली आहे. यातील बस खाली दाबून दोघां विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे आश्रम शाळेचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. या आश्रम शाळेच्या दोन बस आज दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आल्या होत्या. जखमींना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हालवले असून, दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे. या घाटामध्ये वारंवार अपघात होत असताना लोकांचा जीव जात असताना, प्रशासनाने सुरक्षेचे उपाय या ठिकाणी केलेले दिसून येत नाहीत. काही दिवसांपूर्वी अस्तंबा यात्रेतून परतणाऱ्या भाविकांचाही अपघात झाला होता. त्यातही अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते. विद्यार्थ्यांच्या या अपघातामुळे सर्व पालकांमध्ये आक्रोश दिसून येत आहे व संतापाची लाटही आहे.
11
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 09, 2025 12:05:49
Parbhani, Maharashtra:सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात निकाल दिला आहे, याच्या विरोधात उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी यामागणीसाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन केले होते. देशभरातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा लागू केली आहे, ज्यावेळी आम्ही सेवेत रुजू झालो त्यावेळी असला कुठला ही नियम नव्हता,त्यावेळची सर्व निययम पूर्ण करून आणि सेवेत रुजू झालोत, मग आता असा अन्याय कारक निर्णय आम्हा शिक्षकांवर का लादण्यात येतोय असा सवाल उपस्थित केलाय, 5 राज्यांनी या निर्णया विरोधात पुनरअवलोकन याचिका दाखल केलीय, आपल्या राज्यशासनाने ही आमच्या वतीने अशी पूर्णअवलोकन याचिका दाखल करावी या मागणीसाठी आज शिक्षक एकवटले होते,यावेळी शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तशी सरकारकडे मागणी केली.
6
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 09, 2025 11:53:39
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील ११ नगर परिषद आणि १ नगरपंचायत मधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या भाजपच्या उमेदवारीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मोहोर उमटणार आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला अकलूज या ठिकाणी इच्छुक प्रत्येक उमेदवाराशी वन टू वन संवाद साधत आहे. निवडून येण्याच्या पात्रतेवर मिळणार भाजपची उमेदवारी दिली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवण्याचा आग्रह धरलेला आहे. मित्र पक्षासोबत जर युती झाली तर त्या ठिकाणी त्यांना सामावून घेतले जाणार आहे. स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर त्यासाठी तयारी म्हणून आज पासून सांगोला अकलूज या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. प्रत्येक उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी काही दिवसात तयार होणार आहे.
9
comment0
Report
Advertisement
Back to top