Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पालकमंत्री गोरे: सोलापूर में भाजप उम्मीदवारों की वन-टू-वन मुलाकातें, अंतिम सूची जल्द

SKSACHIN KASABE
Nov 09, 2025 11:53:39
Pandharpur, Maharashtra
सोलापूर जिल्ह्यातील ११ नगर परिषद आणि १ नगरपंचायत मधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या भाजपच्या उमेदवारीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मोहोर उमटणार आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला अकलूज या ठिकाणी इच्छुक प्रत्येक उमेदवाराशी वन टू वन संवाद साधत आहे. निवडून येण्याच्या पात्रतेवर मिळणार भाजपची उमेदवारी दिली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवण्याचा आग्रह धरलेला आहे. मित्र पक्षासोबत जर युती झाली तर त्या ठिकाणी त्यांना सामावून घेतले जाणार आहे. स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर त्यासाठी तयारी म्हणून आज पासून सांगोला अकलूज या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. प्रत्येक उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी काही दिवसात तयार होणार आहे.
6
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Nov 09, 2025 14:51:58
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नर बछडा वाघ T-91 SAM-1 यशस्वीरित्या जेरबंद, मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार होता वावर अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार शिरकाव करत मानवी जीवितास धोका निर्माण करणारा नर बछडा वाघ T-91 SAM-1 वन विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे. जेरबंद केलेल्या वाघास सध्या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. 24 सप्टेंबर 2025 रोजी मोहर्ली (बफर) परिक्षेत्रातील नियतक्षेत्रानजीक शेतकाम करत असताना अमोल बबन नन्नवारे वय -37 वर्षे रा. भामडेळी यांचा सदर वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. 20 ऑक्टोबर 2025 रोजी आदेश जारी झाल्यावर्णमानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि आणखी मनुष्यहानी होऊ नये म्हणून या वाघाला जेरबंद करून ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलवण्याचे निर्देश दिले होते, त्याची अंमलबजावणी झाली आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 09, 2025 14:23:25
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील बिबट्याच्या गाईवर हल्ला व ताव मारतानाचा व्हिडिओ व्हायरल, शहरालगतच्या आयुध निर्माणी परिसरातील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या आयुध निर्माणी परिसरात वाघ व बिबट्याचा नेहमीच वावरणे दिसून येते. ताजा व्हिडिओ एक बिबट रस्त्याच्या कडेला गाईवर हल्ला करून ताव मारतानाचा आहे..जो वायरल झालाय. आयुध निर्माणीच्या मागचा परिसर ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाची बाह्य सीमा आहे. यामुळेच या भागात वाघ, बिबटे, अस्वल याचा नेहमीच संचार दिसून येतो. अनेकदा वनविभागाने या भागातून वाघ- बिबटे- अस्वल यांना जेरबंद करून अन्यत्र पाठवणी केली आहे. ताज्या व्हिडिओत पूर्ण वाढीचा बिबट एका गाईवर हल्ला करून तिला संपवताना दिसून येत आहे. रस्त्यावर अशा पद्धतीने गाईवर केलेला हल्ला परिसरात दहशत निर्माण करून गेला आहे.
1
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 09, 2025 13:33:18
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग- डायलॉगबाजीने शहाजीबापू तुम्ही आसामचा पर्यटन वाढवला,आता महाराष्ट्राचा पर्यटन वाढवा - शहाजीबापू पाटलांना पर्यटनाचा अँबेसिडर करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. अँकर - शहाजीबापूंना पर्यटनाचा ब्रँड अंबेसिडर करा,असे मिश्कील विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय, शहाजी बापू पाटलांनी डायलॉगबाजी केली,त्यामुळे आसामचा पर्यटन वाढलं, तशीच डायलॉगबाजी करून महाराष्ट्राचे पर्यटन वाढवावं,त्यासाठी पर्यटन मंत्री शंभुराजे देसाईंनी शहाजी बापू पाटलांना पर्यटनाचा ब्रांड अंबेसिडर करावे,असे देखील मुश्किल विधान या निमित्ताने केले, सांगलीच्या बोरगाव मध्ये चंद्रहार पाटलांकडून आयोजित बैलगाडी शर्यतीच्या प्रसंगी ते बोलत होते. साउंड बाईट - एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री
2
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 09, 2025 12:47:38
5
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 09, 2025 12:45:15
Dhule, Maharashtra:ANCHOR - अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावचे विद्यार्थी घेऊन देवगोई घाटातून बस परतत असताना अमली बरी जवळ हा भीषण अपघात झाला. अपघाता वेळी बस मध्ये जवळपास 40 विद्यार्थी असल्याची समोर आली आहे. यातील बस खाली दाबून दोघां विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे आश्रम शाळेचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. या आश्रम शाळेच्या दोन बस आज दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आल्या होत्या. जखमींना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हालवले असून, दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे. या घाटामध्ये वारंवार अपघात होत असताना लोकांचा जीव जात असताना, प्रशासनाने सुरक्षेचे उपाय या ठिकाणी केलेले दिसून येत नाहीत. काही दिवसांपूर्वी अस्तंबा यात्रेतून परतणाऱ्या भाविकांचाही अपघात झाला होता. त्यातही अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते. विद्यार्थ्यांच्या या अपघातामुळे सर्व पालकांमध्ये आक्रोश दिसून येत आहे व संतापाची लाटही आहे.
7
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 09, 2025 12:05:49
Parbhani, Maharashtra:सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात निकाल दिला आहे, याच्या विरोधात उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी यामागणीसाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन केले होते. देशभरातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा लागू केली आहे, ज्यावेळी आम्ही सेवेत रुजू झालो त्यावेळी असला कुठला ही नियम नव्हता,त्यावेळची सर्व निययम पूर्ण करून आणि सेवेत रुजू झालोत, मग आता असा अन्याय कारक निर्णय आम्हा शिक्षकांवर का लादण्यात येतोय असा सवाल उपस्थित केलाय, 5 राज्यांनी या निर्णया विरोधात पुनरअवलोकन याचिका दाखल केलीय, आपल्या राज्यशासनाने ही आमच्या वतीने अशी पूर्णअवलोकन याचिका दाखल करावी या मागणीसाठी आज शिक्षक एकवटले होते,यावेळी शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तशी सरकारकडे मागणी केली.
5
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 09, 2025 11:34:09
7
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 09, 2025 11:32:42
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:बैलगाड़ी शर्यतीचा इतिहासातील सगळ्यात मोठ्या बैलगाड़ी शर्यतींचा थरार सांगलीच्या बोरगाव मध्ये पार पडत आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतींचा आयोजन करण्यात आलंय आणि हजारो बैलगाडी बोरगाव इथल्या कोड्याच्या माळेराणावर धावत आहेत. बैलगाड़ी शर्यतींचा धुरळा या ठिकाणी उडाला असून कोड्याचं माळ हे लाखो बैलगाड़ी शौकिनांनी फुलून गेलेला आहे. बैलगाड़ी शर्यतींचा मैदान आणि त्या निमित्ताने या ठिकाणी लागलेले स्टॉल्स असतील, उसळलेला जनसागर असेल. हा सर्व अद्भुत असं दृश्य ड्रोनच्या माध्यमातून झी 24 तास च्या प्रेक्षकांसाठी आपण घेऊन आलोय. एखाद्या वसलेलं गाव आणि त्या ठिकाणी भरलेली जत्रा अशा पद्धतीचं स्वरूप या बैलगाड़ी शर्यतीच्या मैदानाला आलेला ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पाहूया डोळ्यांचे पारणे फेडणारे महा बैलगाड़ी शर्यतीचे मैदान.
6
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 09, 2025 11:11:08
Akola, Maharashtra:निवडणुका जवळ आल्या की रोहित पवार आणि अंजली दमानिया सारखे लोक सरकारवर टीका करत असतात. मात्र आज टीका करणारे रोहित पवारच सरकार येण्यापूर्वी महायुतीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करत होते, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.रोहित पवार यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना मिटकरी म्हणाले की, “महायुतीने नकार दिल्यानंतरच ते जाणीवपूर्वक अशा प्रकारे बोलू लागले आहेत. त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत.” अशा ट्विटमुळे फक्त मनोरंजनच होतं, असा टोला ही त्यांनी लगावला.सत्तेसाठी हापापलेले रोहित पवार इतक्या खालच्या पातळीवर येतील, अशी अपेक्षा नव्हती असेही मिटकरी म्हणाले..
7
comment0
Report
Advertisement
Back to top