Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण बाजारपेठ पुलिस ने घर से चार धारदार हथियार जब्त किए

ABATISH BHOIR
Mar 30, 2026 07:19:25
Kalyan, Maharashtra
धंदा मोबाईल रिपेरिंगचा,घरात सापडले धारदार शस्त्रे कळ्याण बाजारपेठ पोलिसांना माहिती मिळाली होती युसुफ हाइट्स नावाच्या इमारतीमधील एका घरात बंदूक ठेवली आहे. त्या आधारावर पोलीस पथकाने छापा टाकला; या छाप्यात घरामधून चार धारदार शस्त्र मिळून आली. बाजारपेठ पोलिसांनी ही शस्त्र जप्त करून शस्त्र ठेवणाऱ्या तरुणा विरोधात कारवाई केली. यूनुस सय्यद हा तरुण मोबाईल रिपेरिंगचे काम करतो. मात्र त्याच्या म्हणणे आहे की माझ्या घरात वडील असताना ही शस्त्र कोण आणली आणि कोण ठेवली, माहिती नाही; आता ही शस्त्र कशासाठी आणली आहे याचा तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Mar 30, 2026 08:48:53
Beed, Maharashtra:बीड: भाजपा आमदार सुरेश धस यांनी दीनदयाळ उपाध्याय अभियानांतर्गत कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण पार पडले. या अभियानात भाजपा आमदार सुरेश धस यांनी हिंदी चित्रपटातील गाणे गायले.. तुम तुम तारा रारा तुम तुम तारा.. या गीताचे बोल गायल्यानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवत दाद दिली. गीत गायनाबरोबर सुरेश धस यांनी स्वररंग कार्यक्रमात भीम गीतावर ठेका धरला. कडा येथील परमेश्वर मंगल कार्यालयात आष्टी आणि कडा मंडळाच्या आयोजनातील ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महाभियान 2026’ अंतर्गत सांस्कृतिक सत्रात “स्वररंग” कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार सुरेश धस यांनी गीत सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 30, 2026 08:46:08
Jalna, Maharashtra:जालना : आखाती युद्धाचा शेती क्षेत्राला चांगलाच फटका बसताना दिसून येतोय.डिझेलच्या तुटवडाअभावी शेतीमालांच्या मळणीच्या दरात वाढ झालीय.त्यामुळे पिकांची मळणी देखील महागलीय.याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यानं शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आलाय. व्हिओ :१:आखाती देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा देशातील वेगवेगळ्या क्षेत्रांवर परीणाम झाल्याचं चित्र भारतात पाहायला मिळतंय.याच युद्धाचा थेट फटका आता शेतीवर देखील झाल्याचं पहायला मिळतय. सध्या रब्बी पिकांची सोंगणी आणि मळणी करण्याचं काम वेगाने सुरुय.त्यात हवामान विभागानं 4 एप्रिल पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.त्यामुळे शेती पिकांच्या मळणीची जालना जिल्ह्यात एकच धांदल उडालीय.पण युद्धामुळे डिझेलचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरसाठी कधी जवळून तरी कधी दूरवरून डिझेल आणावं लागतंय.त्यामुळे पिकांची मळणी देखील महाग झालीय. बाईट :ज्ञानदेव गायके, शेतकरी, सोमठाणा(व्हाईट शर्ट) ग्राफिक्स व्हिओ :२: इंधन तुटवड्याअभावी शेतकऱ्यांना पिकांच्या मळणीसाठी लवकर ट्रॅक्टर किंवा हार्वेस्टर मिळत नाहीय.गेल्यावर्षी मका,हरभरा, ज्वारी,गहू पिकांच्या मळणीसाठी प्रति क्विंटल 250 ते 300 रुपये मोजावे लागत होते.यंदा याच पिकांची मळणी क्विंटलंमागे 100 ते 150 रुपयांनी महागलीय.यंदा ट्रॅक्टरद्वारे गहू मळणी करायचा असेल तर प्रतिक्विंटल 400 ते 450 ,हरभरासाठी 360,ज्वारीसाठी 350 ते 400 रुपये मोजावे लागतायत. तर हार्वेस्टरने गहू सोंगणी आणि मळणी करायचा असेल तर एकरी 3500 ते 4 हजार रुपये मोजावे लागत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. बाईट :दयाराम राठोड,मळणीयंत्र चालक(पिवळा शर्ट) बाईट : अनिल नागवे,शेतकरी(टी शर्ट असलेले ) व्हिओ :०३:इंधन टंचाई अभावी ट्रॅक्टरचालक आणि हार्वेस्टर चालक हतबल झालेत.त्यात पिकांच्या मळणीच्या भाववाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेत.त्यामुळे इंधन तुटवड्याचा प्रश्न शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागलीय.
0
comment0
Report
RMRavindra Manohar Kokate
Mar 30, 2026 08:21:02
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण चिपळूण दुय्यम निबंध कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा राडा चिपळूण तालुक्यात सावकारांकडून कर्जदारांकडून वाढीव व्याजदराने वसुली होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या पीडित कर्जदारांनी थेट दुय्यम निबंधक कार्यालय गात्रत न्यायाची मागणी केली. दरम्यान, या घटनेवरून वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद भरण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जोरदार राडा घातला. अधिकाऱ्यांना जाब विचारत सावकारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. वाढीव व्याजदराच्या जाचाला कंटाळलेले अनेक कर्जदार यावेळी एकवटले होते. संबंधित सावकारावर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
978
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 30, 2026 07:32:56
988
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 30, 2026 07:19:58
Satara, Maharashtra:सातारा मिडिया ची जशी सूत्र असतात त्या प्रमाणे आमची सुद्धा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या प्रकरणाविषयी मला माहिती घ्यावी लागणार आहे. सक्तीच्या रजेवर पाठवल आहे हे माध्यमांमध्ये देखील आले आहे. माझ्या माहितीनुसार ते आज कार्यालयात देखील उपलब्ध होत नाहीत. त्यांना कार्यालय सोडून जायची परवानगी मिळाली आहे. या संदर्भात माहिती घेऊन आपल्याला वाटलंच तर प्रतिक्रिया देईन.. मीडिया नको तो भाग दाखवतो आणि बाकीची मुलाखत कट करतो असा अनुभव मला आहे. मीडिया सर्व निलंबना विषय दाखवणार असेल तर मी बोलतो. विधान मंडळामध्ये तुषार दोषी यांच्या निलंबनाचा निर्णय झाला. मात्र सभापती महोदयांनी हा निर्णय राखून ठेवला. उपसभापती नीलम गोरे यांनी दिलेल्या निर्णयाबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक झाली याबाबत सभापती महोदयांनी तज्ञांची माहिती घेऊन या प्रकरणावर निर्णय घेऊ.. उपसभापतींचे निर्देश माझ्या माहितीनुसार पारित झाले आहेत. मात्र सभापतींनी लावलेल्या तज्ञांचे निर्देश प्रलंबित आहेत. हे सर्व विधिमंडळाच्या कस्टडीत आहे. ज्यावेळेस कायदे तज्ञांचे निर्णय येतील त्यावेळेस सभापती महोदय निर्णय देतील.. या आधी याची चौकशी डिक्लेअर केली आहे. दोनन्ही विधिमंडळाने चौकशीचा अहवाल जो येईल त्याप्रमाणे कार्यवाही करू असं सांगितला आहे. माझं व्यक्तिगत मत आहे. माझ्या राजकीय अनुभवानुसार एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी सुरू होते त्यावेळी त्या अधिकाऱ्याला त्या पदावर ठेवत नाहीत. त्याला जर ठेवले तर चौकशीत बाधा येऊ शकते. कदाचित ही चौकशी असेल त्यामुळेच त्यांना रजेवर जायला सांगितलं आहे。
1095
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 30, 2026 07:05:07
Varasoli, Maharashtra:स्‍लग – पाणीटंचाईमुळे म्हसळयातील ग्रामस्थ आक्रमक. खारगावच्‍या संतप्त ग्रामस्थांचा तहसीलवर मोर्चा. सात दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्‍याचा इशारा. मार्च महिन्याच्या अखेरीस म्हसला तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरूवात झाली आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेले खारगाव खुर्दचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी म्हसला तहसील व पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक देत निषेध नोंदवला. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्‍या मतदार संघातील हे गाव आहे. इथल्या महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. या महिलांच्‍या डोक्‍यावरील हंडा उतरणार कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आजच्या आंदोलनात एकही महिला सहभागी झाली नव्हती. आंदोलनाची धुरा महिलांनी खांद्यावर घेतली होती. पुढील 7 दिवसात पाणीपरवठा सुरळीत न झाल्यास गावातील सर्व महिलांना सोबत घेऊन आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.
1084
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 30, 2026 07:03:37
1060
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 30, 2026 06:53:26
Dharashiv, Maharashtra:आखाती युद्धाचा फटाका उद्योगाला फटका … फटाके महागले, तेऱखेडा येथील फटका उद्योग संकटात! आखिराती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता फटाका उद्योगावर दिसू लागलाय… धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील फटाका उद्योग अडचणीत सापडला असून कच्चा माल महागल्यामुळे उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे… यामुळे येणाऱ्या सणांमध्ये फटाके महागण्याची शक्यता व्यक्त होतेय… फटाके बनवण्यासाठी लागणारा गंधक, सल्फर आणि अॅल्युमिनियम पावडर यांचे दर तब्बल तिपटीने वाढलेत… युद्धापूर्वी घेतलेल्या ऑर्डर्स आता जुन्या दरात पूर्ण कराव्या लागत असल्याने उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागताय… कच्चा माल फक्त काही दिवसांसाठीच शिल्लक असल्यामुळे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे… कच्चा माल तीन पट महाग झालाय… आधी घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करताना तोटा होतोय… आता उत्पादन थांबण्याची वेळ आली असल्याचे फटाका निर्मिती कारखान्याची मालक सांगताहेत फटाके निर्मितीचा खर्च दुप्पट झाल्यामुळे फटाक्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे… त्यामुळे बाजारात मागणी घटली असून विक्रीवरही परिणाम झालाय… आगामी सणांमध्ये ग्राहकांना महागडे फटाके घ्यावे लागणार असून व्यापाऱ्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे… फटाके महाग झाल्यामुळे ग्राहक कमी झालेत… यंदा सणात विक्रीवर मोठा परिणाम होणार आहे… जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता थेट स्थानिक उद्योगधंद्यांना बसताना दिसतोय… धाराशिवचा फटाका उद्योग संकटात सापडल्याने हजारो कामगारांच्या रोजगारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे…
1071
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 30, 2026 06:17:07
Nagpur, Maharashtra:नागपूर राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला असला तरी मार्च महिन्यातच विदर्भात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलाय. अकोला, अमरावती आणि वर्धा येथे पारा 41 वर पोहोचला आहे. अकोल्यात सर्वाधिक 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर अमरावतीला 41.2 आणि वर्धा 41. 0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. नागपूरलाही 40.6 अंश सेल्सिअस तापमान होते... मार्च महिन्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहे.दुपारहुन बाहेर पडताना चेहरा झाकल्याशिवाय बाहेर पडणे अवघड झालेय । शहर तापमान अकोला - 41.4 अमरावती -41.2 वर्धा - 41.0 भंडारा - 40. 0 चंद्रपूर - 40.2 नागपूर - 40.6 गोंदिया - 39.4 गडचिरोली -40.0 वाशिम - 40.2 यवतमाळ -39.8 बुलडाणा -38.0
1011
comment0
Report
Advertisement
Back to top