Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018

पिंपरी चिंचवड में घर मरम्मत के दौरान दो मजदूरों के बीच विवाद बना, एक की मौत

KPKAILAS PURI
Mar 30, 2026 07:01:02
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी चिंचवडच्या चिंचवड परिसरात घर दुरुस्तीच्या कामादरम्यान दोन मजुरांमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन एकाचा मृत्यू झाला आहे. केशवकुमार महतो या मजुराला दुसऱ्या मजल्यावरून ढकलल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुनीत राम नक्षत्र शुक्ला याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. किरकोळ भांडणातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
RMRavindra Manohar Kokate
Mar 30, 2026 08:21:02
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण चिपळूण दुय्यम निबंध कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा राडा चिपळूण तालुक्यात सावकारांकडून कर्जदारांकडून वाढीव व्याजदराने वसुली होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या पीडित कर्जदारांनी थेट दुय्यम निबंधक कार्यालय गात्रत न्यायाची मागणी केली. दरम्यान, या घटनेवरून वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद भरण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जोरदार राडा घातला. अधिकाऱ्यांना जाब विचारत सावकारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. वाढीव व्याजदराच्या जाचाला कंटाळलेले अनेक कर्जदार यावेळी एकवटले होते. संबंधित सावकारावर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 30, 2026 07:32:56
988
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 30, 2026 07:19:58
Satara, Maharashtra:सातारा मिडिया ची जशी सूत्र असतात त्या प्रमाणे आमची सुद्धा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या प्रकरणाविषयी मला माहिती घ्यावी लागणार आहे. सक्तीच्या रजेवर पाठवल आहे हे माध्यमांमध्ये देखील आले आहे. माझ्या माहितीनुसार ते आज कार्यालयात देखील उपलब्ध होत नाहीत. त्यांना कार्यालय सोडून जायची परवानगी मिळाली आहे. या संदर्भात माहिती घेऊन आपल्याला वाटलंच तर प्रतिक्रिया देईन.. मीडिया नको तो भाग दाखवतो आणि बाकीची मुलाखत कट करतो असा अनुभव मला आहे. मीडिया सर्व निलंबना विषय दाखवणार असेल तर मी बोलतो. विधान मंडळामध्ये तुषार दोषी यांच्या निलंबनाचा निर्णय झाला. मात्र सभापती महोदयांनी हा निर्णय राखून ठेवला. उपसभापती नीलम गोरे यांनी दिलेल्या निर्णयाबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक झाली याबाबत सभापती महोदयांनी तज्ञांची माहिती घेऊन या प्रकरणावर निर्णय घेऊ.. उपसभापतींचे निर्देश माझ्या माहितीनुसार पारित झाले आहेत. मात्र सभापतींनी लावलेल्या तज्ञांचे निर्देश प्रलंबित आहेत. हे सर्व विधिमंडळाच्या कस्टडीत आहे. ज्यावेळेस कायदे तज्ञांचे निर्णय येतील त्यावेळेस सभापती महोदय निर्णय देतील.. या आधी याची चौकशी डिक्लेअर केली आहे. दोनन्ही विधिमंडळाने चौकशीचा अहवाल जो येईल त्याप्रमाणे कार्यवाही करू असं सांगितला आहे. माझं व्यक्तिगत मत आहे. माझ्या राजकीय अनुभवानुसार एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी सुरू होते त्यावेळी त्या अधिकाऱ्याला त्या पदावर ठेवत नाहीत. त्याला जर ठेवले तर चौकशीत बाधा येऊ शकते. कदाचित ही चौकशी असेल त्यामुळेच त्यांना रजेवर जायला सांगितलं आहे。
986
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 30, 2026 07:19:25
1002
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 30, 2026 07:05:07
Varasoli, Maharashtra:स्‍लग – पाणीटंचाईमुळे म्हसळयातील ग्रामस्थ आक्रमक. खारगावच्‍या संतप्त ग्रामस्थांचा तहसीलवर मोर्चा. सात दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्‍याचा इशारा. मार्च महिन्याच्या अखेरीस म्हसला तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरूवात झाली आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेले खारगाव खुर्दचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी म्हसला तहसील व पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक देत निषेध नोंदवला. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्‍या मतदार संघातील हे गाव आहे. इथल्या महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. या महिलांच्‍या डोक्‍यावरील हंडा उतरणार कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आजच्या आंदोलनात एकही महिला सहभागी झाली नव्हती. आंदोलनाची धुरा महिलांनी खांद्यावर घेतली होती. पुढील 7 दिवसात पाणीपरवठा सुरळीत न झाल्यास गावातील सर्व महिलांना सोबत घेऊन आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.
1084
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 30, 2026 07:03:37
1060
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 30, 2026 06:53:26
Dharashiv, Maharashtra:आखाती युद्धाचा फटाका उद्योगाला फटका … फटाके महागले, तेऱखेडा येथील फटका उद्योग संकटात! आखिराती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता फटाका उद्योगावर दिसू लागलाय… धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील फटाका उद्योग अडचणीत सापडला असून कच्चा माल महागल्यामुळे उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे… यामुळे येणाऱ्या सणांमध्ये फटाके महागण्याची शक्यता व्यक्त होतेय… फटाके बनवण्यासाठी लागणारा गंधक, सल्फर आणि अॅल्युमिनियम पावडर यांचे दर तब्बल तिपटीने वाढलेत… युद्धापूर्वी घेतलेल्या ऑर्डर्स आता जुन्या दरात पूर्ण कराव्या लागत असल्याने उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागताय… कच्चा माल फक्त काही दिवसांसाठीच शिल्लक असल्यामुळे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे… कच्चा माल तीन पट महाग झालाय… आधी घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करताना तोटा होतोय… आता उत्पादन थांबण्याची वेळ आली असल्याचे फटाका निर्मिती कारखान्याची मालक सांगताहेत फटाके निर्मितीचा खर्च दुप्पट झाल्यामुळे फटाक्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे… त्यामुळे बाजारात मागणी घटली असून विक्रीवरही परिणाम झालाय… आगामी सणांमध्ये ग्राहकांना महागडे फटाके घ्यावे लागणार असून व्यापाऱ्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे… फटाके महाग झाल्यामुळे ग्राहक कमी झालेत… यंदा सणात विक्रीवर मोठा परिणाम होणार आहे… जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता थेट स्थानिक उद्योगधंद्यांना बसताना दिसतोय… धाराशिवचा फटाका उद्योग संकटात सापडल्याने हजारो कामगारांच्या रोजगारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे…
1071
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 30, 2026 06:17:07
Nagpur, Maharashtra:नागपूर राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला असला तरी मार्च महिन्यातच विदर्भात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलाय. अकोला, अमरावती आणि वर्धा येथे पारा 41 वर पोहोचला आहे. अकोल्यात सर्वाधिक 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर अमरावतीला 41.2 आणि वर्धा 41. 0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. नागपूरलाही 40.6 अंश सेल्सिअस तापमान होते... मार्च महिन्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहे.दुपारहुन बाहेर पडताना चेहरा झाकल्याशिवाय बाहेर पडणे अवघड झालेय । शहर तापमान अकोला - 41.4 अमरावती -41.2 वर्धा - 41.0 भंडारा - 40. 0 चंद्रपूर - 40.2 नागपूर - 40.6 गोंदिया - 39.4 गडचिरोली -40.0 वाशिम - 40.2 यवतमाळ -39.8 बुलडाणा -38.0
1011
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 30, 2026 05:37:05
Beed, Maharashtra:बीड: पोटच्या मुलाकडून वडिलांच्या डोक्यात दगड घालून हत्या बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा बस स्थानक परिसरात पोटच्या मुलानेच वडिलांची निर्घुण हत्या केलीय. अनिल मुळे असे मृत पित्याचे नाव असून आरोपी मुलगा किरण मुळे फरार आहे. किरण मुळे हा कायम दारूच्या नशेत असायचा त्यानेच आपल्या राहत्या झोपडीत झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात दगड घातून हत्या केली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पिसादेवी येथील रहिवासी असलेले हे कुटुंब अनेक वर्षांपासून कडा शहरात मजुरीसाठी स्थायिक झालेले आहेत. आज पहाटेच्या सुमारास किरण दारूच्या नशेत घरी आला. वडील गाढ झोपेत असताना त्यांने अचानक त्यांच्या डोक्यात मोठा दगड घातला. या हल्ल्यात अनिल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे मृताची पत्नी झोपेतून उठली असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी इथे धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोटच्या मुलाने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणाने उचलले? याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. आरोपी मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पहाटे घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आष्टी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
1071
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 30, 2026 05:34:06
Pandharpur, Maharashtra:Anchor - महाराष्ट्रातील प्रवीण एक खोड डाळिंब लागवड पॅटर्न चार राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी स्विकारला आहे. सोलापूरच्या मोडनिंब मध्ये यशस्वी डाळिंब उत्पादक शेतकरी यांची कार्यशाळा आणि सन्मान सोहळा पार पडला सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथील प्रवीण माने यांनी 24 वर्ष संशोधन करून प्रवीण एक खोड डाळिंब लागवडीचा पॅटर्न तयार केला. यामुळे उध्वस्त झालेल्या 80 टक्के डाळिंब बागा पुनर्जीवित झाल्या. डाळींबावर पडणारे मर , तेल्या , खोड आळी असे विविध रोग आटोक्यात आले. महाराष्ट्र सोबत गुजरात राजस्थान आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यातील शेतकऱ्यांनी एक खोड तंत्रज्ञान स्वीकारल. या नव्या डाळिंब लागवड तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे.शेवाय निर्यातीचा टक्क देखील वाढला आहे. अशा यशस्वी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान प्रवीण माने यांनी केला. ----- Byte - प्रवीण माने, संशोधक एक खोड डाळिंब तंत्रज्ञान
1023
comment0
Report
Advertisement
Back to top