Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण-डोंबिवली महापालिका ने संविधान गौरव दिन की रैली निकाली

ABATISH BHOIR
Nov 26, 2025 09:01:02
Kalyan, Maharashtra
कल्याण डोंबिवली महानगरपालिका और बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारतीय संविधान गौरव दिन, तसेच अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून संविधान मिरवणूक सुरू करण्यात आली ही मिरवणूक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालय पर्यंत काढण्यात आली, यावेळेस सामूहिक उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला के डी एम सी आयुक्त अभिनव गोयल, सह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच आंबेडकरी जनता देखील उपस्थित होते, यावेळेस आयुक्त अभिनव गोयल यांनी बाबासाहेब आंबेडकर उद्यान विस्तारीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी जागा वाढवून देण्याची मागणी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Nov 26, 2025 08:58:14
Akola, Maharashtra:अकोल्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीपासून नगरपरिषदेमध्ये झालेल्या बदलाने स्थानिक नागरिकांचे आयुष्य बदलले की नाही माहित नाही पण श्रेय कोणाचे यावर मात्र राज्याच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जोरदार राजकीय कुस्ती रंगलेली पाहायला मिळाली.. काल हिवरखेड येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम शब्दांत दावा केला ,“हिवरखेड ग्रामपंचायत ही नगरपालिका करण्यातलं सर्वात मोठं पाऊल गेल्या 10 वर्षांत आम्हीच उचललं” म्हणजे नगरपरिषदेचा दर्जा मिळवून देण्याचे श्रेय आम्हालाच ,असा संदेशच त्यांनी दिला होता.मात्र आज अकोटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कमी न पडता थेट पलटवार केला.“हिवरखेड नगरपालिका होण्यासाठी आमदार Amol मिटकरी यांच्यामार्फत आम्हीच पुढाकार घेतला". आता दोन्ही नेत्यांचे दावे ऐकून हिवरखेडकरांचा एकच प्रश्न आहे ते म्हणजे नगरपालिका झाली खरी पण श्रेय कुणाला द्यायचं?”महायुतीतच या मुद्द्यावर श्रेयवादाची लढाई तापली असून स्थानिक जनता मात्र गोंधळलेली. कोणी म्हणतं “हिवरखेडला नगरपालिका मिळाली ही चांगली गोष्ट… पण या दोन्हांच्या भांडणामुळे आमचं मनोरंजन पक्कं होतंय”अखेर, फडणवीस की पवार ? नगरपरिषदेचं ‘श्रेय सिंहासन’ कोणाला मिळणार? यावर राजकीय रंगमंचावर सध्या रोमांचक रंगतदार मैफल रंगली आहे.
20
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 26, 2025 08:48:03
Nashik, Maharashtra:भगूर सावरकरांचे जन्मस्थान भगूर नगरपरिषद निवडणूक बनली हॉट.. शिंदे गटाविरोधात सर्वपक्ष एकवटले.. अँकर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूरमध्ये सध्या नगरपरिषदेच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि शिंदे सेना झुंजत आहे. विशेष म्हणजे भाजपने इथे नगराध्यक्षपदासाठी पुरोगामी राष्ट्रवादीला पुढे केले आहे. महायुतीतील घटक पक्षांना महाविकास आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात थेट पाठिंबा दिल्याने भगूर लक्षवेधी निवडणूक ठरते आहे. गेल्या तीन दशकोंांपासून नाशिकच्या भगूर नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता खांद्यावर मिरवणारे विजय करंजकर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कट्टर चेहरा. आता विधानसभेपासून शिंदे सेनेत गेल्याने या निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या उमेदवार अनिता विजय करंजकर निवडणुकीत उतरल्यात. ही अबाधित सत्ता टिकविण्याविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप, मनसे आणि महाविकास आघाडी असे सर्वच पक्ष एकवटलेयात. त्यामुळे शिंदे सेनेन ही निवडणूक प्रतिष्ठेची करत आपल्या मंत्र्यांना मैदानात उतरविले आहे. भाजपाने सावरकरांच्या या नगरीत थेट अजित पवार गटाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांना पाठींबा दिलाय. त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदार सरोज आहिरे आणि शिंदे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेचा विषय बनली आहे, विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही नेते आमने सामने आले होते, वैयक्तिक पातळीवर एकमेकांकडून टिकाटिप्पणी सुरू होती. सध्या या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार रॅली काढत भगूरमध्ये शक्ती प्रदर्शन केले जात असून आठवडे बाजार सारखी गर्दीची ठिकाणेही sध्या प्रचाराचं मैदान बनले आहे. राज्यात भगूर हे सावरकर प्रेमी आणि हिंदू संघटना यांचे पूज्य स्थान आहे. आता या नगरीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
39
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 26, 2025 08:47:35
Shirdi, Maharashtra:काँग्रेस जिल्हाध्यक्ष अपहरण व मारहाण प्रकरण... मारहाणीचा निषेध करत काँग्रेस पदाधिकारी आक्रमक.. श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सकाळ पासून ठिय्या आंदोलन सुरू... काँग्रेस आमदार हेमंत ओगلے सह पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी.. हिंयानंतर बाळासाहेब थोरात आंदोलन स्थळी पोहचले मारहाण झालेले संजय गुजर यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती... श्रीरामपूर सह जिल्ह्यात दहशत पसरविण्याचे प्रयत्न जिल्हाध्यक्षांना मारहाण करण्याची दुर्देवी घटना.. घटनेचा आम्ही निषेध करतो.. मानवतेला लोकशाहीला काळीमा फासणारी घटना.. मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस यांनी राजधर्म पाळावा... राज्यभर गुंडांना अभय देण्याचे काम सुरू.. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला कसा महाराष्ट्र पाहिजे..अमली पदार्थाने भरलेला आणि गुंड पोसलेला.. आरोपींचा मागे कोण हे शोधलं पाहिजे.. ज्यावेळी महाराजांचा पुतळा कोसळला होता तेव्हा ही कुठे होते.. खोटे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू.. महाराजांचा अपमान करणारे तर तुमच्याकडेच बसलेले.. आम्ही घाबरणारे कार्यकर्ते नाही.. लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही तयार... या संपूर्ण प्रकाराबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील चर्चा करणार.... काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची झी24तास शी बोलताना आक्रमक प्रतिक्रिया.... काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केलिए आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
31
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 26, 2025 08:33:18
111
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 26, 2025 08:32:29
68
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 26, 2025 08:22:30
Nashik, Maharashtra:इलेक्ट्रिक बाईकमध्ये सापाचा थरार! तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू अँकर - नाशिकच्या गोविंदनगर परिसरात मंगळवारी साडेअकराच्या सुमारास सापाचा अक्षरशः थरार पाहायला मिळाला. एका सोसायटीमध्ये अचानक साप दिसल्याने रहिवासी घाबरून सुटले. प्रथम काठीच्या सहाय्याने सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यादरम्यान तो थेट एका इलेक्ट्रिक दुचाकीच्या आत शिरला… आणि मग सुरू झाला तब्बल सहा तासांचा थरार. दुचाकी मालकांनी तातडीने सर्पमित्रांना संपर्क साधला. सर्पमित्रांनी प्रयत्नांची शर्थ केली, बाईक उघडली, मेकॅनिकचीही मदत घेतली, दुचाकीच्या सर्व भागांची तपासणी करण्यात आली. पण चपळ साप खाली लपून बसल्यामुळे बाहेर काढणे अवघड झाले. सकाळी जवळपास बारा वाजता सुरू झालं रेस्क्यू ऑपरेशन अंधार पडेपर्यंत अखंड सुरूच होतं, अखेरीस सहा तासांच्या प्रयत्नानंतर सर्पमित्रांनी यशस्वीपणे सापाला सुरक्षितपणे बाहेर काढलं. साप बाहेर पडताच परिसरात उपस्थित रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. बाईट - कल्पेश भावसार - दुचाकी मालक बाईट - प्रतीक कदम - सर्पमित्र
122
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 26, 2025 08:22:08
91
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 26, 2025 08:06:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदेच्या शिवसेनेतच आता दुफळी पडली आहे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर धमक्या देण्याचे आणि पक्ष डुबवण्याचे आरोप केलेले आहे आणि याबाबतची तक्रार एकनाथ शिंदे कडे करणार असल्याचं सांगितला आहे तर संजय शिरसाठ यांनी पक्ष कोण वाढवते तुम्ही स्वतःला तपासा असा उलटवार केला आहे जशास तसे उत्तर मिळेल असा इशारा दिला आहे यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतली दुफळी पुढे आली आहे... छत्रपती संभाजी नगरात निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत कलह वाढला आहे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर गंभीर आरोप केलेत, शिरसाठ कार्यकर्त्यांना धमक्या देतात,एकहाती पक्ष डुबवण्याचं काम शिरसाठ करत असल्याचा त्यांचा आरोप आहे, सातत्याने पहिल्या दिवसापासून सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना डावलून स्वतःच्या मर्जीचे लोक पक्षात घेताय यातून संघटनेचे नुकसान होतेय त्यामुळं शिरसाठ यांची तक्रार एकनाथ शिंदे कडे करणार असल्याचे जंजाळ यांचे म्हणणे आहे... तर जंजाळ यांना जिल्हाध्यक्ष पद ही मी दिलं, माझ्यावर आरोप करताना आणि पक्ष डुबवतो म्हणताना यांना लाज वाटली पाहिजे. मी सुद्धा जशास तसे उत्तर देईल असा उलटवार संजय शिरसाठ यांनी केला आहे आणि जिल्हा प्रमुखांची नाराजी उडवून लावली आहे.. शिरसाठ आणि जंजाळ यांच्यामध्ये गेली काही दिवस सुप्त वाद सुरू होते मात्र आता त्याचं रूपांतर आरोप प्रत्यारोपात झालं , या दरम्यान जंजाळ यांना एकनाथ शिंदे यांचे फोन करून शांत राहण्याचं सांगितलं आहे याबाबत लवकरच भेट घेऊन हा वाद सोडवू असे आश्वासन त्यांनी दिलाय मात्र या सगळ्या नंतर जंजाळ लवकरच शिवसेनेला रामराम करणार अशा चर्चांना मात्र उधाण आलं आहे... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
139
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 26, 2025 08:02:58
Nashik, Maharashtra:अँकर नाशकात होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातून सुरुवात होणाऱ्या शासनाच्या प्रमुख प्रकल्प असणारा रामकाल पथाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तेथील जुने वाड्यांमधील असलेले रहिवासी यांचे पुनर्वसन देखील करण्यात येणार आहे. पंचवटी भागातील असलेल्या हिरावाडी परिसरामध्ये महानगरपालिकेच्या जागांमध्ये त्यांना पुनर्वसन करून येथे राहण्यासाठी घर बांधून देण्यात येणार होती. मात्र शेजारीच असलेल्या अर्पण विहार ह्या सोसायटीमधील नागरिकांनी येथील पुनर्वसन होणाऱ्या बिल्डिंगला महापालिकेच्या विरोधात आंदोलन पुकारलय. ही जागा रहिवासी म्हणून न देता इतर अमेनिटी साठी द्यावी. त्या ठिकाणी शासनाची शाळा किंवा हॉस्पिटल असं काही बांधावं असं अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि आंदोलकांकडून करण्यात येत आहे. पुनर्वसन करण्याआधी महापालिकेने तेथील कुठल्याही रहिवाशांची परवानगी न घेता तेथे पुनर्वसन करायचं ठरवल आहे. यामुळे नागरिकांकडून गेल्या एका आठवडाभरापासून या ठिकाणी आंदोलन करत विरोध सुरू केला आहे. जर दोन दिवसात महापालिका आयुक्तांकडून कुठलाही निर्णय घेतला नाही...तर आत्मदहनाचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
157
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 26, 2025 07:38:46
Pune, Maharashtra:Headline - गढूळ राजकारणात लोणावळ्यात सकारात्मक चित्र पेरू विक्रेत्या महिलेला निवडणूकीचे थेट तिकीट राज्यातील राजकारणाने अनेक मर्यादा ओलांडलेल्या आहेत. अशात लोणावळ्यात मात्र एक सकारात्मक चित्र पहायला मिळतंय. फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलीये, त्यामुळं आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलंय. पण राजकारणाचा गंध ही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान असणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून जगताप कुटुंबाचं उदरनिर्वाह फळ विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. अशा प्रसंगी त्यांना व्यवसाय सांभाळत प्रचाराची धुरा ही सांभाळावी लागते. त्यामुळं भाग्यश्री दिवसा फळ विक्री करता-करता ही प्रचार करतायेत अन सायंकाळी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत ही पोहचतायेत. राजकारणाच्या बाजारात तिकीट मिळवण्यापूणस्ती मतं मिळवण्यापर्यंत काय-काय करावं लागतं, हे उघड्या डोळ्याने आपण सर्वजण पाहतोय. अशात फळ विक्रेत्या भाग्यश्री स्वतःचं नशीब अजमवतायेत. तर खंडाळा बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासींच्या पट्ट्यात भाग्यश्री जगताप यांचे जंगी स्वागत होत असून पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते अन त्याचं माणुसकीच्या जोरावर मी नगरसेविका होणार, असं प्रांजळ मत त्या व्यक्त करतायेत. आणि आपलं भाग्यश्री आपलं भाग्य आजमावत आहे.
160
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 26, 2025 07:35:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट PC ऑन संभाजीनगर हॉस्टेल पाल सापडली काल मला कळले, त्यावेळी मी स्वतः रुग्णालयात फोन केले, त्यातल्या 21 जणांना उपचार करण्यात आले, अत्यंत गांभीर्याने हे प्रकरण घेतले आहे, यात जो कुणी दोषी असेल त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे, पाहणी देखील करणार. मी शंकर राव चव्हाण यांच्यावर टीका केली नाही, एवढे निधी येऊन गेले कुठे असे मी म्हटले होते, त्यांना लागले असेल, एवढे पैसे खातात पण रस्ते खराब आहेत, या बाबत स्थानिक आमदार यांनी वाच्यता केली आहे, त्यानी माहिती दिली म्हणून विधान केले. ज्यांना हा कीडा आहे, दानवेंची अशी अवस्था आहे, त्यामुळे भुकत असतात. महाराष्ट्र नवे देशात अशी परिस्थिती आहे, जातीय तणाव वाढत आहे, जे काही गंभीर गुन्ह्यात पकडले जात आहे, त्याचे वत 21 मध्ये आहे, त्यामुळे नाना पाटेकर यांनी वक्तव्य केले. हे सर्व प्रकरण न्यायालयात असल्याने, प्रत्येक आरोपी असेच खोटे असल्याचे सांगत असतात, काही नसेल तर चौकशी होऊ द्या. गुलाबराव पाटील, गुलाबराव यांचे वाक्य मजाक म्हणून केले असेल, सिरीयस घेऊ नका. काँग्रेस सोबत असेच झालं त्यांनी जे काही सांगितले, त्यात गांभीर्याने घेण्यासारखे आहे, आता कुठपर्यंत त्रास सहन करावे, घर आहे त्रास होणारच. मराठी शाळा: मराठी शाळा बंद करण्याचा आमचा उद्देश नाही, एक शिक्षक पाच विद्यार्थी अशी परिस्थिती आहे, शाळा बंद करण्याचा उद्देश नाही. शाळच्या नावावर लूटमार करण्याला बंद करण्याचे प्रयत्न. राजेंद्र जंजाळ: विद्वान आहे, ते तक्रार करतात त्याचे कारण त्यांना मला माहित आहे, सगळीकडे असे बोबलत फिरणे, काही अडचण असल्यास मला सांगितले पाहिजे. जिल्हा प्रमुख करण्याचे काम मी केली, अति महत्वकांक्षा वाढल्याने असे होतात, एकहाती पक्ष, असे आरोप करताना मनाची नाही तर जणाची लाज वाटली पाहिजे, चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतो. आदित्य ठाकरे मतदारसंघात यादी घोळ: चौकशी केली पाहिजे. माकडे पकडणे: माकडंच ना, सरकार चांगले आहे, त्यात काही गैर नाही. आयआयटी मुंबई नाव: मुंबई नामांतर झालं आहे, त्या मुंबई म्हणून उल्लेख करावे. काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मारहाण: नगराध्यक्ष पळवा पळवी सुरू आहे, उमेदवार पळवणे वेगळा प्रकार पाहायला मिळत आहे, आशा निवडणूक होत नाही, उद्या खून होतील, असे चित्र झाल्यास महाराष्ट्र संस्कृतीला शोभणार नाही. भारत पाकिस्तान सामना: त्याला हरकत नाही, जिकणार आम्हीच आहे, ज्याला मार खायचा आहे त्यांनी यावं आणि मार खाऊन जावे. घाटी जन्म प्रमाणपत्र: जी काही चौकशी सुरू आहे, त्यात तफावत आढळून आली आहे, नाबालिक मुलीला प्रमाणपत्र दिले आहे, गांभीर्याने घेतले पाहिजे, त्याची कारणे पुढे येतील. देवेंद्र फडणवीस लंका: बरोबर, आम्ही त्यांना उद्देशाने बोलले नाही, भाजपने मनावर घेऊ नयेत.
169
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 26, 2025 07:33:10
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषद निवडणुकित सर्वच प्रमुख पक्षांचे नगराध्यक्ष पद उमेदवार माजी शिवसैनिक आहेत. 1998 पासून या पालिकेवर सातत्याने शिवसेनेची सत्ता आहे. राज्यात सलग इतके वर्ष एखाद्या नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता असल्याचं हे एकमेव उदाहरण आहे. ताज्या राजकीय आखाड्यात शिवसैनिकच एकमेकांविरोधात उभे आहेत. भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले अनिल धानोरकर मावळत्या पालिकेत अध्यक्ष होते. ते दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे बंधू आहेत, सध्या भाजपात आहेत. कोंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील नामोजवार देखील या शहराचे शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष होते, आता भाजपातून काँग्रेसमध्ये पोचले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे प्रफुल्ल चटकी एकीकृत शिवसेनेत नगर परिषद उपाध्यक्ष होते. शिवसेना उबाठा गटाचे नंदू पढाल देखील शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. हे सर्व आजी-माजी शिवसैनिक आता निवडणूक रिंगणात दंड थोपटून आहेत. भद्रावतीची जनता यापैकी कोणता शिवसैनिक निवडते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे या नगरपरिषदक्षेत्रात स्थानिक व्यापाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या व्यापार संकुलाच्या कुचकामी सुविधा ,शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची दुरवस्था, शहरातील तलावांच्या सौंदर्यीकरणाचे रखडलेले प्रस्ताव, क्रीडांगण व बगीचे यांच्या निर्मितीसह अभ्यासिका उभारणे व आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण हे मुद्दे प्रचारात प्रामुख्याने रेटले जात आहेत. बाईट १) अनिल धानोरकर, भाजप ,नगराध्यक्ष उमेदवार बाईट २) सुनील नामोजवार, काँग्रेस ,नगराध्यक्ष उमेदवार बाईट ३) प्रफुल्ल चटकी, शिवसेना शिंदे ,नगराध्यक्ष उमेदवार बाईट ४) नंदू पढाल, शिवसेना उबाठा ,नगराध्यक्ष उमेदवार
198
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 26, 2025 07:18:33
Akola, Maharashtra:आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सभा घेत असताना अंबाजोगाई आणि बीड येथील सभेत त्यांनी केलेल्या ‘राम कृष्ण Hari’ या विधानाची मोठी चर्चा रंगली. या विधानानंतर सभेतून ‘वाजवा तुतारी’ असा प्रतिसादही मिळाला. मात्र ही सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची असल्याने त्यांनी लगेचच या विधानाबाबत स्पष्टीकरण देत सारवासारव केली.दरम्यान, हे वक्तव्य चांगलेच व्हायरल झाल्यानंतर आज अकोल्यातील अकोट येथील जाहीर सभेत अजित पवारांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. “मी अंबाजोगाईला विकासाबाबत बोललो, पण मीडियाने ते वेगळ्या संदर्भात दाखवलं, त्यांचा तो अधिकार आहे. त्या दिवशी चुकीचा शब्द माझ्याकडून वापरला गेला. माझा उद्देश फक्त शहरात स्वच्छता असावी, बकालपणा नसावा एवढाच होता. चुकीचा शब्द वापरला गेल्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो ”अस अजित पवार म्हणाले.तसेच लोक मला लाखोंच्या मतांनी निवडून देतात, हे सोपं नाही. लोकांना चांगलं काम करणारा नेता हवा असतो,आम्ही ते काम करत आहोत अस ही ते म्हणाले.विकासासाठी मी मदत करतो, पण लोक माझ्या शब्दालाच पकडतात म्हणत अजित पवारांनी खंत व्यक्त केलं.
231
comment0
Report
Advertisement
Back to top