Back
भगूर चुनाव में सत्ता-प्रतिष्ठा की जंग: शिंदे सेना बनाम राष्ट्रवादी
YKYOGESH KHARE
Nov 26, 2025 08:48:03
Nashik, Maharashtra
भगूर सावरकरांचे जन्मस्थान भगूर नगरपरिषद निवडणूक बनली हॉट.. शिंदे गटाविरोधात सर्वपक्ष एकवटले.. अँकर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूरमध्ये सध्या नगरपरिषदेच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि शिंदे सेना झुंजत आहे. विशेष म्हणजे भाजपने इथे नगराध्यक्षपदासाठी पुरोगामी राष्ट्रवादीला पुढे केले आहे. महायुतीतील घटक पक्षांना महाविकास आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात थेट पाठिंबा दिल्याने भगूर लक्षवेधी निवडणूक ठरते आहे. गेल्या तीन दशकोंांपासून नाशिकच्या भगूर नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता खांद्यावर मिरवणारे विजय करंजकर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कट्टर चेहरा. आता विधानसभेपासून शिंदे सेनेत गेल्याने या निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या उमेदवार अनिता विजय करंजकर निवडणुकीत उतरल्यात. ही अबाधित सत्ता टिकविण्याविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप, मनसे आणि महाविकास आघाडी असे सर्वच पक्ष एकवटलेयात. त्यामुळे शिंदे सेनेन ही निवडणूक प्रतिष्ठेची करत आपल्या मंत्र्यांना मैदानात उतरविले आहे. भाजपाने सावरकरांच्या या नगरीत थेट अजित पवार गटाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांना पाठींबा दिलाय. त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदार सरोज आहिरे आणि शिंदे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेचा विषय बनली आहे, विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही नेते आमने सामने आले होते, वैयक्तिक पातळीवर एकमेकांकडून टिकाटिप्पणी सुरू होती. सध्या या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार रॅली काढत भगूरमध्ये शक्ती प्रदर्शन केले जात असून आठवडे बाजार सारखी गर्दीची ठिकाणेही sध्या प्रचाराचं मैदान बनले आहे. राज्यात भगूर हे सावरकर प्रेमी आणि हिंदू संघटना यांचे पूज्य स्थान आहे. आता या नगरीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowNov 26, 2025 08:58:140
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 08:47:350
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 08:33:1859
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 26, 2025 08:33:0877
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:32:2968
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:22:3021
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 26, 2025 08:22:0853
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 08:06:51139
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 08:02:58157
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 26, 2025 07:38:46160
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 07:35:23169
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 07:33:10198
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 26, 2025 07:18:33231
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 26, 2025 07:17:16115
Report