Back
बालविवाह के आरोप: दलाल के जरिए किशोरी की खरीद-फरोख्त, चार गिरफ्तार
UJUmesh Jadhav
Oct 06, 2025 11:32:01
Thane, Maharashtra
कातकरी-आदिवासी मुलींना लग्नाचे आमिष दाखवून दलाल मार्फत खरेदी विक्री... किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... चौघांना केली अटक... किन्हवली पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ प्रमाणे गुन्हा दाखलण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करत असतांना पोलिसांना गुन्हयातील पिडीत बालिका व आरोपी दत्तात्रेय विठ्ठल वातेस, वय ५० वर्षे, याच्याकडे याबाबत चौकशी केली असता काही गोष्टी निष्पन्न झाल्या. त्यांची आर्थिक परिस्थीती बेताची असल्याने त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतांना देखील मध्यस्थी आरोपी प्रकाश मुकणे याचे मदतीने जय लक्ष्मण शिर्के, रा. बाबुलवाडे, ता-पारनेर, जि-अहिल्यानगर याचे सोबत जमवुन त्यासाठी मुलीच्या बदल्यात मुलीच्या आई-वडीलांना ५०,०००/- रुपये देण्याचे ठरविले. त्यापैकी १०,०००/- रुपये एक महीन्यापूर्वी आरोपीत जय लक्ष्मण शिर्के व लक्ष्मण नारायण शिर्के यांनी मुलीचे आई-वडील यांना दिले होते. शिर्के कुटुं आज उच्च जातीतील असल्याने त्यांनी पिडीत बालिका ही अल्पवयीन असल्याचे माहीत असुन देखील त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेवुन पिडीत बालिके सोबत विवाह करण्याचे ठरवुन दिनांक ०५/१०/२०२५ रोजी पिडीत मुलीचे व आरोपीत कु.जय शिर्के यांचे लग्न लावुन देणार होते अशी माहिती तपासात पोलिसांनी निष्पन्न केली आहे. सदर गुन्हयास भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १४३(४), ३ (५) सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम कलम ३ (२) (व्हीए) या कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowOct 06, 2025 13:00:230
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 06, 2025 12:54:020
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 12:50:100
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 06, 2025 12:06:530
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 06, 2025 12:05:550
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 06, 2025 12:04:500
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 06, 2025 12:03:190
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 06, 2025 11:50:100
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 06, 2025 11:46:170
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 06, 2025 11:21:560
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 11:21:170
Report
JMJAVED MULANI
FollowOct 06, 2025 11:20:510
Report
JMJAVED MULANI
FollowOct 06, 2025 11:20:200
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 06, 2025 11:17:070
Report