icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
SMSarfaraj Musa6 Oct 2025, 11:50 am

सांगली सहकारी बैंक घोटाला: भर्ती पारदर्शकता के लिए CM ने तात्कालिक निर्देश दिए

Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिला केंद्रीय सहकारी बँक चौकशी व नोकर भारती प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. आमदार सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी भेट घेऊन बँकेच्या चौकशीच्या प्रक्रियेची पारदर्शकता आणि भर्ती प्रक्रिया पारदर्शकतेसाठी मागणी केली. बँकेतील गैरव्यवहाराच्या संदर्भात सखोल चौकशी आणि भर्ती परीक्षा पारदर्शकतेसाठी आय.बी.पी.एस किंवा टाटा कन्सल्टंनसी या राष्ट्रीय स्तरावरील संस्थाद्वारे भरती केली जावी, अशी मागणी आदल्या बैठकीत करण्यात आली. मुख्यमंत्री यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले असल्याचे आमदार खोत यांनी स्पष्ट केले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जात-पात के प्रेमविवाह पर पंचायत का अजब फतवा, परिवार बहिष्कार

Shirdi, Maharashtra:कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे नंदीवाले तिरमली जातपंचायतीचा अजब फतवा समोर आलाय... मुलीने जातीतीलच तरुणासोबत प्रेमविवाह केल्यानंतर कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केल्याचा आरोप करण्यात आलाय.. जातपंचायतीने कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर त्यापैकी ५० हजार रुपये कर्ज काढून दिले, मात्र उर्वरित रक्कम न दिल्याने मारहाण आणि सामाजिक बहिष्कार टाकल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. कुटुंबाशी कुणीही बोलू नये, सुख-दुःखाच्या प्रसंगी त्यांना बोलावू नये, अशा धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आलाय..
0
0
Report

दुष्काळ के बीच बुलढाणा के विधायक गायकवाड की टिप्पणी पर सवाल, कोर्ट ने पुलिस पर फटकार लगाई

Buldhana, Maharashtra:आमदार संजय गायकवाड बाईट्स पॉइंटर... बुलढाणा फ्लॅश... आमदार संजय गायकवाड बाईट्स पॉइंटर... ऑन मंत्री संजय शिरसाट फुलांवर चालले... शेतकरी अडचणीत असताना अशा पद्धतीचे फुलावर चालणे, बैठकीमध्ये झोपा काढणे, काजू बदाम खाऊन मस्ती दाखवणे हे योग्य नाही.. हे संवेदनशील लोकप्रतिनिधींनी टाळलं पाहिजे... (४५ सेकंद) ऑन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर... बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात दुष्काळाची दाहकता वाढली आहे, याचीच पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौरा करत आहेत.. ते खामगाव, बुलढाणा, मोताळा तालुक्यातील विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत... (४८ सेकंद) ऑन आमदार संजय गायकवाड यांच्याकडील दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात कोर्टाने पोलिसांना फटकारले... आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवरून एका महिलेला दिलेल्या तक्रारीवरून महिलेला अपमानकारक बोलल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली, त्यानंतर अशा पद्धतीने गुन्हा दाखल होऊ शकत नाही, आणि पोलिसांनी या प्रकरणाची चार्जशीट पुढे पाठवू नये.. असं कोर्टाने स्पष्ट केल आहे... On--जिल्ह्यातील नुकसानी संदर्भात.. या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर कोरडवाहू शेती आहे ती 100% बरबाद झाली आहे.. On-कांध्रेसचे आमदार वेडेटीवार म्हणतात की नुसता दुष्काळी दौरे करून काय होणार नाही .. दौरे केल्याशिवाय दुष्काळी परिस्थिती कशी कळणार आहे का नुसतं वर्षावर बसून का दुष्काळ जाहीर करायचा आहे का बांधावर जर गेलो तर शेतकऱ्याला ही वाटते की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधावर येत आहे 0.38 बाईट - संजय गायकवाड, शिवसेना आमदार बुलढाणा
0
0
Report
Advertisement

पुणे शिक्षक मतदार संघ से दत्तात्रय सावंत फिर चुनाव मैदान में

Pandharpur, Maharashtra:Anchor - पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच बिगुल काल वाजल्यानंतर या मतदारसंघाचं माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुन्हा एकदा ही निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. येत्या आठ दिवसांमध्ये आपण राजकीय पक्षाची उमेदवारी घ्यायची का याबाबतचा निर्णय जाहीर करू असं वक्तव्य त्यांनी केला आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि शिक्षक चळवळीत काम करणारा माणूस आता कोणत्य पक्षाच्या गळाला लागतोय हे पहावं लागणार आहे. पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत हे महाराष्ट्र राज्य कृती शाळा शिक्षक समितीच्या माध्यमातून मोठी संघटना बांधणी करून शिक्षकांचे प्रश्न सोडवत आले आहेत. 2014 ते 2020 या काळामध्ये त्यांना या मतदारसंघातून आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.मात्र 20 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला ग्रामपंचायतच्या निवडणुकीप्रमाणे काही राजकीय लोकांनी या निवडणुकीत हस्तक्षेप केला. शिक्षकांवरती दबाव टाकण्यात आला असा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच आपला काही मतांनी पराभव झाल्याची खंत त्यांनी आता बोलून दाखवलेली आहे. ते ज्या शिक्षक संघटनेसाठी काम करतात त्याचा आता आग्रह आहे. यावेळी कोणत्यातरी राजकीय पक्षाची उमेदवारी घेऊन आपण निवडणूक लढवावी. त्यामुळे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी राजकीय पक्षाची उमेदवारी घेण्याचा निर्णय येत्या आठ दिवसात जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे मंगेश चिवटे हे तयारी करत आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुती मधून ही निवडणूक लढू मात्र वेळ पडल्यानंतर भाजप सुद्धा स्वतंत्रपणे या मतदारसंघात निवडणूक लढवेल असं वक्तव्य केल्याने दत्तात्रय सावंत यांना याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. माजी आमदार सावंत यांच्यासारखा सुसंस्कृत आणि शिक्षक चळवळीत काम करणारा उमेदवार भाजप गळाला लावू शकते.
0
0
Report

दापोली में 2800 मेगावॉट अणुऊर्जा प्रकल्प पर ठाकरे गट ने उठाया आक्रामक तूफान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोलीत अणुऊर्जा प्रकल्पावरून पेटला नवा राजकीय शिमगा; ग्रामस्थांचं कुलदैवतेला साकडं, तर ठाकरे गट आक्रमक!.. Tagline - दापोलीत ग्रीन प्रकल्पाचा दावा, ठाकरे गटाकडून जमीन घोटाळ्याचा दावा!.. पाकेज स्क्रिप्ट - दापोली अनुऊर्जा प्रकल्प.. अँकर intro रत्नागिरीच्या शांत आणि निसर्गरम्य किनारपट्टीवर पुन्हा एकदा मोठ्या प्रकल्पावरून राजकीय आणि जनआंदोलनाची ठिणगी पडली आहे. दापोली तालुक्यातील भिवबंदर येथे JSW ENERGYचा 2800 मेगावॅट क्षमतेचा प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प जाहीर होताच स्थानिक पातळीवर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या दापोलीत हा विनाशकारी प्रकल्प होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत थेट ग्राममंदिरात कुलदैवतेला साकडं घातलं आहे. दुसरीकडे, ग्रामस्थांच्या या संतापात आता राजकीय उडी पडली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पर्यटनाचा विध्वंस करणाऱ्या या प्रकल्पाविरोधात ठाकरे गटानं दंड थोपटले असून, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांवर थेट जमीन हडपल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पाहूयात, दापोलीच्या भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पावरून नेमकं काय रणकंदन सुरू आहे, या विशेष रिपोर्टमधून...
0
0
Report

नागपुर पदवीधर सीट पर BJP–Congress की तकरार, सुधाकर कोहळे आगे

Nagpur, Maharashtra:Ngp Sudhakar kohale 121 live u ने फीड पाठवले काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे कोवळे सोळे आणि दिवे यांचे फोटो 2c ला जोडले आहे नागपूर ताब्बल 58 वर्षांनंतर भाजपचा किल्ला भेदत काँग्रेसने 2020 मध्ये नागपूर पदवीधर मतदार संघात विजय मिळवला होता... त्यानंतर आता नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणुकीची घोषणा झाल्यावर भाजप आणि काँग्रेस मधील राजकीय हालचालींना वेग आलाय... एकीकडे प्रतिष्ठेची पदवी पुन्हा परत मिळावी याकरता भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केलीय. तर दुसरीकडे पुन्हा एकदा इतिहास घडवण्याकरता काँग्रेसकडून अभिजीत वंजारी ही सज्ज झालेय .. 2020 मध्ये वंजारी यांनी भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांना 18हजार 910 मतांनी पराभव केला होता... त्यावेळी वंजारी यांना 61, हजार 701 तर भाजपाचे संदीप जोशी यांना 42 हजार 792मते मिळाली होती.या मतदारसंघात सलग 58 वर्ष भाजपचे वर्चस्व होते... त्यामुळे गेल्यावेळेस गमावलेला हा गड पुन्हा एकदा काबीज करण्याकरता भाजपा सर्वतोपरी ताकद लावेल.. मात्र भाजपामध्ये आधी तिकिटासाठी लढाई होणार आहे. यावेळी भाजपाचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्याकडे या मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती... यावेळी तेच भाजपकडून तिकिटाचे सगळ्यात प्रबळ दावेदार आहे.. त्याचबरोबर माजी आमदार अनिल सोले यांनीही मतदारसंघासाठी तयारी सुरू केलीय. गेल्या वेळेस सोले आमदार असतानाही त्यांना दूर सारून संदीप जोशी यांना तिकीट देण्यात आले होते.. याशिवाय सुधीर दिवे ही भाजपाकडून तिकिटासाठी दावेदार आहे.. दरम्यान भाजपच यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा हा मतदारसंघ काबीज करेल असा दावा भाजपचे दावेदार सुधाकर कोहळे यांनी केलाय.पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात भाजपाच्या संघटनाच्या जोरावर नक्की विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.. त्याँच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के भद्रावती में 40 वर्षीय मजदूर की धारदार हथियार से हत्या, पुलिस सक्रिय

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात निर्घृण हत्याकांडने खळबळ उडाली आहे. नाग मंदिर चौकाजवळ दुचाकीने जाणाऱ्या एका ४० वर्षीय बांधकाम मजुरांची अज्ञात हल्लेखोरांनी मानेवर धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली. या रक्तपाताच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, जुन्या पैशाच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भद्रावतीच्या शिवाजीनगर येथे वास्तव्यास असलेले उमेश मेş्राम (वय ४०) हा बांधकाम मजूर आपल्या दुचाकीने घरून कामासाठी निघाले. सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास नाग मंदिर चौकाजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी अचानक हल्ला चढवला. उमेश रस्त्यावरच कोसळले आणि घटनेच्या ठिकाणीच त्यांचा अंत झाला. दिवसाढवळ्या आणि गजबजलेल्या भागात झालेल्या या हल्ल्याने परिसर हादरून गेला. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत संशयितांची धरपकड सुरू केली आहे. पथकांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून, घटनेतील दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत.
0
0
Report

रोहयो की विहीर निर्माण के भुगतान के लिए किसान ठिय्या आंदोलन; 3 करोड़ लंबित

Amravati, Maharashtra:रोहयो अंतर्गत बांधलेल्या विहिरीच्या बांधकामाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; तिवसा तालुक्यातील 90 शेतकऱ्यांचे सुमारे 3 कोटी शासनाकडे थकीत शेतकरी 3 वर्षांपासून रोहयो अंतर्गत विहीर बांधकामाचे देयकेपासून वंचित अँकर :- अस्मानी आणि सुलतानी संकटातून कोरड्या दुष्काळाचा सामना करतांना शेतकऱ्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांचा सुद्धा सामना करावा लागतो आहे. तब्बल 3 वर्षांपासून एकट्या तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रोहयो अंतर्गत उभारण्यात आलेल्या विहिरीच्या बांधकामाचे तब्बल 3 कोटी शासनाकडे थकीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आधीच कोरड्या दुष्काळाचा झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत असतांना आता, उसनवारी, कर्जबाजारी आणि सोनं नान विकून अन्नधान्य विकून उभारण्यात आलेल्या विहिरीच्या बांधकामाचे पैसे निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या कॅबिनपुढे अडीच तास ठिय्या आंदोलन केले आहे. बाईट :- प्रशांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
0
0
Report
Advertisement

वैजी में प्रतीक बैकर ने घर पर रामेश्वर ज्योतिर्लिंग की पर्यावरण-प्रिय प्रतिकृति तैयार की

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील वैजी येथील प्रतीक बैकर यांनी आपल्या घरातील बाप्पासाठी एक अनोखा आणि पर्यावरणपूरक देखावा सादर केला आहे. प्रतीक यांनी थेट बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या दक्षिण भारतातील 'रामेश्वर ज्योतिर्लिंग' मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आपल्या घरात साकारली आहे. सध्या गणेशोत्सवात थर्माकोल आणि प्लास्टिकच्या अतिवापरावर मर्यादा येत असताना, प्रतीक बैकर यांनी पूर्णपणे पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करून ही कलाकृती उभारली आहे. बैकर यांच्या या पर्यावरणपूरक संकल्पनेचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
0
0
Report

गणेशोत्सव के बाद पर्यावरण-अनुकूल मॉडल छात्रों के लिए ज्ञानवर्धक बना रहा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक देखावा आता विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी! आधुनिक ‘Sanitation Resource Park’चा पर्यावरणपूरक देखावा; विसर्जनानंतर शाळेला सुपूर्द गणेशोत्सव संपला... देखावे विसर्जित झाले... पण एक देखावा मात्र विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी कायमचा जपला गेलाय! ओंकार मुकुंद काणे यांनी गणेशोत्सवात आधुनिक ‘Sanitation Resource Park’ या संकल्पनेवर पर्यावरणपूरक देखावा साकारला होता. उत्सवानंतर हा देखावा त्यांनी स्वतः शिकलेल्या युनायटेड इंग्लिश स्कूलला सुपूर्द केला. स्वच्छता, मलनिस्सारण आणि कचरा व्यवस्थापनाची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजावी, यासाठी हा देखावा शाळेत खुला ठेवण्यात आला आहे. उत्सवातून साकारलेली संकल्पना शिक्षण आणि पर्यावरण जनजागृतीसाठी वापरण्याचा हा अभिनव उपक्रम सध्या कौतुकाचा विषय ठरतोय.
0
0
Report
Advertisement

बीड़ में भीषण आग; दमकल की गाड़ी बंद, छह दुकानें जलीं, व्यापारी नाराज़

Beed, Maharashtra:बीड़मध्ये अग्नितांडव.. अग्निशामक बंब बंद पडला; सहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी.. वडापाव दुकानासह कापड दुकानांचे मोठे नुकसान; व्यापाऱ्यांत संताप पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. अमिरोद्दीन मणियार यांच्या वडापाव दुकानाचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेजारील दुकानातील शेळ्याही आगीत भाजल्या. बाजूलाच असलेल्या दोन कापड दुकानांसह अन्य दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील आहे. आगीची माहिती मिळूनही अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचण्यास सुमारे दीड तासाचा विलंब झाला. त्यातच आलेला बंब बंद पडल्याने आग विझविण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाली. दुसरा बंब येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले आणि सर्व दुकाने जळून खाक झाली. परिसरात धुराचे लोट पसरल्याने बचावकार्यही अडचणीचे ठरले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नगरपालिका के सर्वसाधारण सभेत नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी अग्निशामक दलाच्या वाहनांच्या स्थितीबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र त्यावर अद्याप प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. अग्निशामक दलाची वाहने वेळेत व सुस्थितीत उपलब्ध झाली असती, तर व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळले असते. यापूर्वी देखील सरकीच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. मात्र नेहमीप्रमाणे अग्निशामक दलाची गाडी आली. परंतु ऐन वेळी गाडी बंद पडल्याने संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले होते. दरम्यान आज लागलेल्या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. साऊंड बाईट: अमर नाईकवाडे, नगरसेवक
0
0
Report

येवला में छगन भुजबळ के विकास कार्य गणराय के समक्ष प्रस्तुत

Yeola, Maharashtra:राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या नाशिकच्या येवल्यात त्यांनी केलेल्या विकास कामांचा देखावा गायकवाड कुटुंब यांनी आपल्या घरगुती गणरायापुढे सादर केला आहे अंगणगाव येथील नितीन गायकवाड व त्यांची कन्या समृद्धी नितीन गायकवाड यांनी येवला ते पिंपळस रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण, मांजरपाडा प्रकल्प, येवला पाणीपुरवठा योजना, एमआयडीसी मधील मका प्रक्रिया उद्योग याची प्रतिकृती गणराया पुढे स्थापीत केली आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report

6 फुट की इको-फ्रेंडली गणेश मूर्ति के साथ रहेजा भारवाणी मंडळ का पर्यावरणीय गणेशोत्सव

Kalyan, Maharashtra:रहेजा भारवानी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव; 6 फुटी इको-फ्रेंडली मूर्तीची स्थापना कल्याण पश्चिम येथील रहेजा भारवनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. मंडळाचे हे २२ वे वर्ष असून दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करण्याची परंपरा मंडळाने जपली आहे. यंदाही या परंपरेला कायम ठेवत सहा फूट उंचीची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती मंडळात विराजमान करण्यात आली आहे. गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करून मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांकडून मनोभावे पूजा-अर्चा करण्यात येत आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि गणेशोत्सवाची धार्मिक परंपरा यांचा सुंदर मेळ साधत मंडळाने यंदाही पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहत आहेत. पर्यावरणपूरक मूर्तीच्या माध्यमातून ‘उत्सवही आनंदाचा आणि पर्यावरणाचीही काळजी’ असा संदेश मंडळाच्या वतीने देण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top