Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नासिक-सापुतारा मार्ग पर किसानों का प्रदर्शन, नुकसान के मुआवजे और ठोस मदद की मांग
YKYOGESH KHARE
Oct 06, 2025 13:00:23
Nashik, Maharashtra
वणी ब्रेकिंग.. वणीतील शेतकऱ्यांचा आक्रोश.. ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नाशिक - सापुतारा रस्ता रोखला.. द्राक्ष पिकाला १.५ लाख, भाजीपाल्याला ५० हजार नुकसानभरपाईची मागणी बिरसा मुंडा चौकात कांदे, टोमॅटो, बटाटे फेकत शेतकऱ्यांचा रास्ता रोको पावसाने उध्वस्त झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश वरवरचे पंचनामे नकोत; प्रत्यक्ष पाहणी करा अशी शेतकऱ्यांनी केली आहे.. सरकारची मदत तुटपुंजी; ठोस उपाययोजना करा आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकांना शेतकऱ्यांनी दिला मार्ग पोलिस आणि प्रशासनाकडून मध्यस्ती सुरू..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Oct 06, 2025 14:45:25
Vasai-Virar, Maharashtra:तीन जण गंभीर जखमी , रुग्णालयात उपचार सुरू अज्ञात आरोपीने घरात शिरून केला हल्ला अँकर - विरारच्या अर्नाला गावातील एका गोवारी कुटुंबावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना विरारच्या संयोग रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लीला गोवारी, जगन्नाथ गोवारी, नेत्रा जगन्नाथ गोवारी अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. रात्री कुटुंब झोपलेले असताना अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून आरोपीविरोधात यातील जगन्नाथ गोवारी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. हा हल्ला नेमका कोणी व कोणत्या वादातून केला हे समजू शकलेले नाही.. अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.. बाईट- विश्वास किनी, स्थानिक नागरिक.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 14:09:57
Akola, Maharashtra:Anchor : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर जोडा फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिवारी नावाच्या वकिलाच्या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प ) चे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.तिवारी यांची वकिलीची सनद तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्यांच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात बहुजन समाजातील व्यक्ती सर्वोच्च पदावर असल्याचा राग मनात धरून तिवारी यांनी हे अमानुष कृत्य केले असावे, असा आरोपही मिटकरी यांनी केला.दरम्यान, या घटनेनंतर समाजात कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी संयम बाळगावा, अशी विनंतीही आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 06, 2025 12:54:02
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 12:50:10
Akola, Maharashtra:अकोल्याात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या प्रयत्नाचा निषेध केलाय. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. ही घटना लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे आंदोलन करण्यात आले. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक समोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला संताप व्यक्त केला. या वेळी कार्यकर्त्यांनी “लोकशाहीवर हल्ला बंद करा” अशा घोषणा देत घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 06, 2025 12:06:53
Washim, Maharashtra:अँकर:अनंत चतुर्दशी नंतर आलेल्या भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत चिमुकल्या मुलींच्या बाहुली उत्सवाला सुरुवात होते. या उत्सवाची सांगता पारंपरिकरित्या कोजागिरी पौर्णिमेला होते. मात्र यावर्षी मातीच्या बाहुल्यांचे दर गगनाला भिडले असून, त्यामुळे पालकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. गणेश विसर्जनानंतर लगेचच बाहुली उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. यंदा सतत झालेल्या संततधार पावसामुळे कुंभारांना मातीची मूर्ती तयार करण्यात अडचणी आल्या. परिणामी मातीच्या बहुल्यांच्या जोड्या 300 ते 400 रुपये दराने विकल्या जात आहेत. तसेच उत्सवात लागणारे ‘बत्तीस खाऊ’ देखील महागले आहेत. तरीही चिमुकल्या ‘लाडकीचा लाड’ पुरवण्यासाठी पालकांनी बाजारात उस, ज्वारीचे धांडे आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 06, 2025 12:05:55
Jalna, Maharashtra:जालना शशिकांत शिंदे: जरांगेंच्या आरक्षणाच्या लढाईला राजकीय रंग लागू नये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची जरांगेंवर टीका जरांगेंनी सरकाकडून जीआर दुरुस्त करून घ्यावा अँकर- मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या लढाईला राजकीय रंग देऊ नये असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जरांगेंवर टीका केलीये.. मराठा समाजाचं वाटोळं हे शरद पवारांनी केलं असल्याचा आरोप जरांगेंनी केला होता. त्याला शशिकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर देत शरद पवार जेव्हा जरांगेंना भेटायला आले तेव्हा काय ऊर्जा आहे. असं जरांगे म्हणाले आता 1994 चा जीआर विषयी ते बोलतात. तर जरांगेंनी सरकारकून जीआर दुरुस्त करून घ्यावा. मात्र त्यांनी आरक्षणाच्या लढाईला राजकीय रंग देऊ नये असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी जरांगेंवर टीका केलीये..
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 06, 2025 12:04:50
Nanded, Maharashtra:नांदेडमध्ये आज मूळ आदिवासी समाजाने आदिवासी बचाव मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सामील झाले होते. आदिवासी समाजातून येणारे किनवट मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांच्या नेर्तृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. बंजारा जातीचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करू नये यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज मोर्चे काढत असल्याने त्याला प्रतिउत्तर म्हणून आता आदिवासी समुदाय मोर्चे काढत आहे. तालुका स्तरावर मोर्चा काढल्या नंतर आज आदिवासी बांधवानी नांदेड शहरात मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्याल्यावर काही वेळात हा मोर्चा धडकला. या मोर्चात पारंपरिक वेशभूषेत हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सामील झाले आहेत. ड्रोन दृश्यातून या मोर्चातील प्रचंड गर्दी दिसून आली. आदिवासी आरक्षण हे घटनात्मक आरक्षण असून कोणत्याही समाजाचा समावेश खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी आमदार भीमराव केराम यांनी दिला.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 06, 2025 12:03:19
Pune, Maharashtra:अहिल्यानगर यहाँ बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा धडकला...नगर शहरातील क्लेरा ब्रुस शाळेच्या मैदानावरून हा मोर्चा निघाला होता... समाजातील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते... या मोर्चात बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली... अनेक वर्षांपासून या मागणीसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू असून अद्याप योग्य निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे आम्हांला हैद्राबाद गॅजेट नुसार ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी करण्यात आली आहे...यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले...दरम्यान सरकारने लवकरात लवकर मागणी पूर्ण केली नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 06, 2025 11:50:10
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिला केंद्रीय सहकारी बँक चौकशी व नोकर भारती प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. आमदार सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी भेट घेऊन बँकेच्या चौकशीच्या प्रक्रियेची पारदर्शकता आणि भर्ती प्रक्रिया पारदर्शकतेसाठी मागणी केली. बँकेतील गैरव्यवहाराच्या संदर्भात सखोल चौकशी आणि भर्ती परीक्षा पारदर्शकतेसाठी आय.बी.पी.एस किंवा टाटा कन्सल्टंनसी या राष्ट्रीय स्तरावरील संस्थाद्वारे भरती केली जावी, अशी मागणी आदल्या बैठकीत करण्यात आली. मुख्यमंत्री यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले असल्याचे आमदार खोत यांनी स्पष्ट केले.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 06, 2025 11:32:01
Thane, Maharashtra:कातकरी-आदिवासी मुलींना लग्नाचे आमिष दाखवून दलाल मार्फत खरेदी विक्री... किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... चौघांना केली अटक... किन्हवली पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ प्रमाणे गुन्हा दाखलण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करत असतांना पोलिसांना गुन्हयातील पिडीत बालिका व आरोपी दत्तात्रेय विठ्ठल वातेस, वय ५० वर्षे, याच्याकडे याबाबत चौकशी केली असता काही गोष्टी निष्पन्न झाल्या. त्यांची आर्थिक परिस्थीती बेताची असल्याने त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतांना देखील मध्यस्थी आरोपी प्रकाश मुकणे याचे मदतीने जय लक्ष्मण शिर्के, रा. बाबुलवाडे, ता-पारनेर, जि-अहिल्यानगर याचे सोबत जमवुन त्यासाठी मुलीच्या बदल्यात मुलीच्या आई-वडीलांना ५०,०००/- रुपये देण्याचे ठरविले. त्यापैकी १०,०००/- रुपये एक महीन्यापूर्वी आरोपीत जय लक्ष्मण शिर्के व लक्ष्मण नारायण शिर्के यांनी मुलीचे आई-वडील यांना दिले होते. शिर्के कुटुं आज उच्च जातीतील असल्याने त्यांनी पिडीत बालिका ही अल्पवयीन असल्याचे माहीत असुन देखील त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेवुन पिडीत बालिके सोबत विवाह करण्याचे ठरवुन दिनांक ०५/१०/२०२५ रोजी पिडीत मुलीचे व आरोपीत कु.जय शिर्के यांचे लग्न लावुन देणार होते अशी माहिती तपासात पोलिसांनी निष्पन्न केली आहे. सदर गुन्हयास भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १४३(४), ३ (५) सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम कलम ३ (२) (व्हीए) या कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 06, 2025 11:21:56
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईतील आरोपीकडून ५२८ ग्रॅम एम.डी ड्रग्जसह ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत मुंबईच्या वसीम इमदाद खान (वय ३७) याला एम.डी (MEPHEDRONE) ड्रग्जसह अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण ५२८ ग्रॅम एम.डी पावडर, कार, मोबाईल व रोख रक्कम असा ३५ लाख ७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शहरातील साखरवाही फाट्याजवळ गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. आरोपीवर पडोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सन २०२५ मध्ये आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एनडीपीएस अधिनियमांतर्गत १५७ गुन्ह्यांमध्ये १९२ आरोपींवर कारवाई करून ८० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात विशेषतः गांजा, एम.डी ड्रग्ज व ब्राउन शुगर प्रकरणांचा समावेश आहे. दरम्यान, चंद्रपूर पोलीस दलाकडून "ड्रग फ्री चंद्रपूर" अभियान राबविले जात असून शाळा- कॉलेजमध्ये जनजागृती व्याख्याने, सायकल रॅली, पोस्टर स्पर्धा आणि नशामुक्ती उपक्रम राबविण्यात येत आहेत. अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास ११२ क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले है. चंद्रपूर
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top