Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला में शरद पवार गट के विरोध पर न्यायपालिका के खिलाफ हल्ले की निंदा

JJJAYESH JAGAD
Oct 06, 2025 12:50:10
Akola, Maharashtra
अकोल्याात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या प्रयत्नाचा निषेध केलाय. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. ही घटना लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे आंदोलन करण्यात आले. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक समोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला संताप व्यक्त केला. या वेळी कार्यकर्त्यांनी “लोकशाहीवर हल्ला बंद करा” अशा घोषणा देत घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 08, 2025 04:02:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANCHOR : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. जंजाळ हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या देखील चर्चा आहे. अशात आता या वादावर थेट नागपूरात तोडगा निघणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तोडगा काढणार आहेत. यापूर्वी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत जंजाळ यांनी भेट घेतली होती. मात्र, खासदार शिंदे लोकसभा अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संभाजीनगरची बैठक आयोजित केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच याच बैठकित जंजाळ यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
220
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 08, 2025 04:02:29
Nagpur, Maharashtra:
158
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 08, 2025 03:50:27
Beed, Maharashtra:बीड ते वडवणी रेल्वे लोहमार्गावर पहिली इंजन चाचणी पार पडली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर 10 आणि 11 डिसेंबर रोजी CRS तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचणी केली जाणार आहे. पहिल्यांदाच या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन धावला आहे. बीड जिल्हा वासियांसाठी रेल्वेचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गावर रेल्वे धावल्यानंतर आता बीड परळी या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. बीड पासून वडवणी हे 30 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून रेल्वे विभागाकडून या मार्गावर चाचण्या केल्या जात आहेत. या मार्गावर कालच रेल्वे इंजिन चाचणी केली जाणार होती मात्र काही तांत्रिक बाबीमुळे इंजिन चाचणी होऊ शकली नाही. मात्र आज या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन धावले..
94
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 08, 2025 03:49:50
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम–हिंगोली मार्गावरील रेल्वे गेटजवळ सुरू असलेले लोअर हाइट सबवेचे काम गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरही सबवेचे काम अचानक थांबवण्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.सुरकंडी, मोहगव्हाण, देवाळा, उकळी पेन आणि फाळेगाव या गावांतील नागरिकांना दररोज मोठा फेरा मारावा लागत आहे.त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून वाहतुकीतही सातत्याने अडथळे निर्माण होत आहेत. सबवेचे काम पुन्हा कधी सुरू होणार याबाबत कोणती ही अधिकृत माहिती न मिळाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.काम तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
168
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 08, 2025 03:48:33
Nagpur, Maharashtra:नागपूर *गुप्तचर यंत्रणेचा हायल्टर, सूत्रांची माहिती* - ऑपरेशन सिंदूर’नंतर जेम (Jaish-e-Mohammad) कडून घातपाताचा धोका वाढल्याचा गुप्तचर यंत्रणांचा इशारा, नागपूर उपराजधानी हायअलर्टपर. - हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर महालमधील RSS मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिभवन, धार्मिक ठिकाणे गर्दीच्या जागांवर उच्चस्तरीय सुरक्षा यंत्रणेची करडी नजर, - विधानभवन परिसरात कडक बंदोबस्त, मुख्य स्थळांची बॉम्बशोधक नाशक पथकांकडून सखोल तपासणी. - सीसीटीव्ही, कठडे आणि AI-आधारित नजर ठेवणीद्वारे संवेदनशील परिसराची सतत मॉनिटरिंग. - साध्या वेशातील पोलिसांची असणारा करडी नजर, हॉटेल–लॉजची तपासणी वाढवली. - हिवाळी अधिवेशनासाठी फोर्स वन तुकड्या नागपूरात तैनात, राज्यातील विविध जिल्ह्यांतील अतिरिक्त 3 हजारावर पोलिस अधिकारीकर्मचारी दाखल. - SRPF च्या ५ तुकड्या, होमगार्डसह एकूण 10 हजार वर पोलिसांची उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर तैनाती.
186
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 08, 2025 03:17:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:कोल्हापुरच्या कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्याविरुद्ध जतमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. जत पोलिस ठाण्यात लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाला आहे. जत तालुक्यातील बिळूर येथे 9 ऑक्टोबर रोजी एका प्रवचनात कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजाकडून लिंगायत समाजाच्या भावना दुखवणारे भाषण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथील पोलीस ठाण्यात शंकरगौड शिवनगौड बिरादार यांनी तक्रार दाखल केली होती, त्यानुसार जत पोलीस ठाण्यात कणेर मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महारज यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
247
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 08, 2025 03:17:13
156
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 08, 2025 03:16:58
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यात थंडी वाढली... तापमान चार दिवशी १२ अंशांवर... मागील वर्षी थंडीने फारसे दर्शन दिले नव्हते. मात्र यंदाच्या हिवाळ्यात लातूर जिल्ह्यात थंडीने हजेरी लावली असून गेल्या दोन दिवसांपासून पहाटे तापमान तब्बल १३ अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटताना दिसत आहेत. तर अनेक जण पहाटेच्या वेळी व्यायामावर लक्ष केंद्रित केल्याचे पाहायला मिळत आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. काही दिवस गायब झालेली थंडी हि गेल्या चार दिवसांपासून थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. यामुळे लातूरकर चांगलेच गारठले आहेत. दिवसभरही वातावरण थंड राहत आहे. त्यामुळे थंडीमुळे नागरिक बेजार होताना दिसत आहेत...
125
comment0
Report
Advertisement
Back to top