Back
भिवंडी महापौर पद के लिए बीजेपी के दो गुट फिर मिले, सहयोग संकेत
UJUmesh Jadhav
Feb 16, 2026 04:17:36
Thane, Maharashtra
भिवंडी पालिका महापौर पदासाठी दुरावलेले भाजपाचे दोन गट उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला शहर पक्ष कार्यालयात सर्व मतभेद विसरून एकत्र आले होते. निवडणूक प्रभारी आमदार महेश चौघुले, शहराध्यक्ष रवी सावंत, गटनेते संतोष शेट्टी यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या या बैठकीस महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी त्यांना विरोध करणारे सुमित पाटील, निलेश चौधरी, प्रकाश टावरे, हनुमान चौधरी, यशवंत टावरे यांसह सर्व २२ नगरसेवक उपस्थित होते. यानिमित्ताने दोन गटात विभागलेले नगरसेवक पुन्हा एकत्र आले असल्याने उद्या त्यांचे महापौर पदासाठी जुळवाजुळव कशी असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
भाजपमध्ये कोणतेही दोन गट नव्हते. कोणाची नाराजी दूर केली नाही. भारतीय जनता पार्टी मोठी पार्टी आहे. ही पार्टी कोणामुळे थांबणार नाही. सर्वजण एकत्र होतो आज पण उद्या पण एकत्र राहणार. नारायण चौधरी व सुमित पाटील यांनी महापौर पदासाठी इच्छुकता शहर पक्षाकडे दाखवली होती. प्रदेश पदाधिकाऱ्यांनी नारायण चौधरी यांचे नाव निश्चित केल्याने ते उमेदवार असणार आहेत. त्यामुळे थोडी नाराजी होती ती दोन दिवसात संपली त्यानंतर सर्व पुन्हा एकत्र आले त्यानंतर सर्व पुन्हा कामाला लागले. महायुती म्हणून वरिष्ठांसोबत बैठका सुरू आहेत. त्यातून निर्णय होईल. गरज असली आणि त्यांची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अथवा काँग्रेस पक्षाची सुद्धा सोबत घेणार असल्याचे निवडणूक प्रभारी आमदार महेश चौघुले यांनी स्पष्ट केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 16, 2026 07:31:340
Report
PNPratap Naik1
FollowFeb 16, 2026 07:04:460
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 16, 2026 06:46:330
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 16, 2026 06:34:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 16, 2026 06:30:180
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 16, 2026 06:01:550
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 16, 2026 05:46:530
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 16, 2026 05:46:350
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 05:16:510
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 16, 2026 04:49:390
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 16, 2026 04:49:000
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 16, 2026 04:48:390
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 16, 2026 04:33:250
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 16, 2026 04:31:510
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 04:30:440
Report