Back
भिवंडी में भाजपा-शिवसेना में फूट: महापौर-उपमहापौर चुनाव की गहराती जंग
UJUmesh Jadhav
Feb 16, 2026 04:30:44
Thane, Maharashtra
भिवंडी महापालिका निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे व तब्बल एक महिन्यानंतर ही कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराकडून संख्याबळाचे गणित जुळून येण्यात अपयश आल्यामुळे भाजपा व शिवसेना या महायुतीतील दोन पक्षात फूट पडली असल्याचे समोर येत आहे. सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी महायुतीतील भाजपा पाठोपाठ शिवसेनेने सुद्धा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढवण्याचे स्पष्ट केले आहे. घोषणेनंतर भिवंडी पालिकेतील सत्तेची समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता असून त्यामध्ये कोण यशस्वी होतो हे 20 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार एवढे नक्की.
भिवंडी पालिकेची सार्वत्रिक निवडणुकीत भाजप व शिवसेना महायुती म्हणून लढवली होती. यामध्ये भाजपाचे 22 व शिवसेनेचे 12 असे एकत्र महायुती म्हणून 34 सदस्य निवडून आले होते. परंतु बहुमतासाठीचा 46 ही संख्या जमवण्यात भाजपाला अपयश येत असतानाच शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या सोबतीने महापौर पदासाठी जुळवाजुळव सुरू केली. त्याच दरम्यान विलास पाटील यांना आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्याने भाजपा व शिवसेना यांच्यातील वितुष्ट समोर आले. त्यानंतर भाजपाने महापौर पदासाठीची निवडणूक लढवत असल्याचे घोषित केले. त्या पाठोपाठ शिवसेना पक्षाने सुद्धा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले आहे.
भिवंडीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने अनेकांकडून सत्ता स्थापने साठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने भिवंडी पालिका महापौर व उपमहापौर पदासाठीच्या दोन्ही निवडणुका शिवसेना लढवत आहे. शिवसेना पक्षाचा हा निर्णय भाजपला कळवण्यात आला आहे. प्रयत्न तर दोघांकडून सुरू होते. अंतिम.निर्णय होऊ न शकल्याने भाजपा त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवेल तर शिवसेना आपल्या पद्धतीने निवडणूक लढवणार आहे. आमच्या सोबत विलास पाटील आले असताना त्यांना अटक झाली. त्यानंतर ही पक्षाने भूमिका ठाम ठेवली असून उमेदवार कोण असेल हे उद्या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कडून ज्यांचे नाव येईल ते उमेदवार असतील अशी माहिती पक्षनेते प्रकाश पाटील यांनी दिली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 16, 2026 07:31:340
Report
PNPratap Naik1
FollowFeb 16, 2026 07:04:460
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 16, 2026 06:46:330
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 16, 2026 06:34:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 16, 2026 06:30:180
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 16, 2026 06:01:550
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 16, 2026 05:46:530
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 16, 2026 05:46:350
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 05:16:510
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 16, 2026 04:49:390
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 16, 2026 04:49:000
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 16, 2026 04:48:390
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 16, 2026 04:33:250
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 16, 2026 04:31:510
Report