Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

अहिल्यानगर के भिंगार वारुळवाडी में बिबट्या दिखा, लोग डरे; पकड़ने के प्रयास जारी

LBLAILESH BARGAJE
Feb 16, 2026 06:01:55
Ahilyanagar, Maharashtra
अहिल्यानगर शहराजवळ असलेल्या भिंगार वारुळवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन... बिबट्या मानवी वस्तीत आल्याने नागरिकांमध्ये घाबरट... वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल मात्र बिबट्या एका जागेवर थांबत नसल्याने मोठी धावपळ... भिंगार आलमगीर परिसरात बिबट्याला पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू... वन विभाग पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Feb 16, 2026 07:31:34
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर शहराच्या जवळ असलेल्या भिंगार परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आलं आहे. भिंगार परिसरातील असलेल्या वडारवाडी, नागरदेवळे परिसरामध्ये सकाळपासून बिबट्या फिरत असल्याचं नागरिकांना आढळून आल होतं. भर नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याची माहिती मिळतात भिंगार कॅम्प पोलीस तसेच नगर तालुका पोलीस घटनास्थळाला दाखल झाले. यानंतर वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती कळल्यानंतर पथक दाखल झाले. सकाळपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या एका घराशेजारील बाथरूम मध्ये अडकला, तब्बल तीन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर डार्ट मारुन बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आलं. बेशुद्ध झाल्यानंतर जाळी टाकून त्याला जेरबंद करण्यात आल. बिबट्या पकडल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 16, 2026 07:04:46
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेत अनेकांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी भाजपाने सव्वा वर्षाचा एक स्वीकृत नगरसेवक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या पदाच्या खांडोळीनंतर स्वीकृत नगरसेवक पदाची देखील खांडोळी केली जात आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपा कार्यालयात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी याच्या पाच वर्षात बारा स्वीकृत नगरसेवक होतील अशी माहिती दिली आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 16, 2026 06:34:06
Satara, Maharashtra:कराड,सातारा- शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकাপूर शहरात व्हॅलेंटाईन डे ला घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकानेच ‘प्रपोज’ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले. “मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्स ॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत तिचा हात पकडल्याचा आरोप आहे.घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने मैत्रिणी आणि कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 16, 2026 05:46:53
Beed, Maharashtra:बीडच्या तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरडी बुद्रुक या शिवारात एका पारधी वस्तीवर झालेल्या हल्ल्यात महिला आणि पुरुषांना मारहाण करण्यात आली. या घटनेत संसार उपयोगी साहित्याची नासधूस करत रब्बीची पिके उपटण्यात आली. या प्रकरणात पोलीस ठाण्यात 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेवराई तालुक्यातील टाकरवन शिवारात काही लोक पारधी वस्तीच्या परिसरात शेळ्या मेंढ्या चारत होते. यावेळी वस्ती वरील पायल काळे या मुलीने त्यांना विरोध केला. या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ करत हल्ला करण्यात आला. यादरम्यान हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या इतरांवर देखील हल्ला चढविण्यात आला. यावेळी संसार उपयोगी सर्व साहित्याचे मोठे नुकसान करत नवी कोरी दुचाकी फोडण्यात आली तर शेतातील काढणीला आलेले गव्हाचे पीक उपटून टाकण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी जमाव पांगवला. तर या प्रकरणात एकूण 25 हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदविला गेला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 16, 2026 05:46:35
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 16, 2026 05:16:51
Nagpur, Maharashtra:नागपूर - जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाने दिलासा - नोव्हेंबर २०२५ प्रसिद्ध पदोन्नती यादीत नाव समाविष्ट करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा अंतरिम आदेश - गडचिरोली जिल्हा परिषदेला यादीत समावेशाचे निर्देश, अंतिम निर्णयापर्यंत आदेश लागू राहणार - ३३ शिक्षकांची उच्च न्यायालयात याचिका, १७ जानेवारी २०२६ रोजी टीईटी उत्तीर्ण, - २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पदोन्नती यादी प्रसिद्ध, त्या यादीत दहा ते बारा वर्षे अनुभव असलेल्या शिक्षकांचे नाव यादीत आहे... - २० ते २५ वर्षे सेवा असलेल्या शिक्षकांचा दावा केला होता, जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी सेवा जेष्ठता यादी मध्ये समावेश करण्याची विनंती केली होती मात्र ती अमान्य केल्यामुळे याचिका दाखल करण्यात आली. - राज्य सरकार आणि जिल्हा परिषद सीईओंना नोटीस, १२ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे खंडपीठांना निर्देश..
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 16, 2026 04:49:39
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 16, 2026 04:49:00
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 16, 2026 04:33:25
Malegaon, Maharashtra:उपमहापौर कार्यालयाचे दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पुन्हा टिपू सुलतान यांचे चित्र लावण्यात येईल. मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांची स्पष्टोक्ती. संपूर्ण महाराष्ट्रात टिपू सुलतान वरून जो वाद सुरू आहे तो वाद मालेगावातूनच सुरू झाला असून आता पुन्हा त्या वादाला नवीन वळण मिळण्याची शक्यता असून मालेगावच्या किल्ला परिसरात काल रात्री उपमहापौर शान ए हिंद यांची स्वागत सभा आयोजित करण्यात आली होती त्यात त्यांनी महापौर कार्यालयाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा कार्यालयात लावणार असे विधान करत टिपू सुलतान यांचे कौतुक देखील केले. ऑन साउंड बाईट: शान ए हिंद, उपमहापौर मालेगाव मनपा
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 16, 2026 04:30:44
Thane, Maharashtra:भिवंडी महापालिका निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे व तब्बल एक महिन्यानंतर ही कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराकडून संख्याबळाचे गणित जुळून येण्यात अपयश आल्यामुळे भाजपा व शिवसेना या महायुतीतील दोन पक्षात फूट पडली असल्याचे समोर येत आहे. सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी महायुतीतील भाजपा पाठोपाठ शिवसेनेने सुद्धा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढवण्याचे स्पष्ट केले आहे. घोषणेनंतर भिवंडी पालिकेतील सत्तेची समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता असून त्यामध्ये कोण यशस्वी होतो हे 20 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार एवढे नक्की. भिवंडी पालिकेची सार्वत्रिक निवडणुकीत भाजप व शिवसेना महायुती म्हणून लढवली होती. यामध्ये भाजपाचे 22 व शिवसेनेचे 12 असे एकत्र महायुती म्हणून 34 सदस्य निवडून आले होते. परंतु बहुमतासाठीचा 46 ही संख्या जमवण्यात भाजपाला अपयश येत असतानाच शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या सोबतीने महापौर पदासाठी जुळवाजुळव सुरू केली. त्याच दरम्यान विलास पाटील यांना आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्याने भाजपा व शिवसेना यांच्यातील वितुष्ट समोर आले. त्यानंतर भाजपाने महापौर पदासाठीची निवडणूक लढवत असल्याचे घोषित केले. त्या पाठोपाठ शिवसेना पक्षाने सुद्धा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले आहे. भिवंडीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने अनेकांकडून सत्ता स्थापने साठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने भिवंडी पालिका महापौर व उपमहापौर पदासाठीच्या दोन्ही निवडणुका शिवसेना लढवत आहे. शिवसेना पक्षाचा हा निर्णय भाजपला कळवण्यात आला आहे. प्रयत्न तर दोघांकडून सुरू होते. अंतिम.निर्णय होऊ न शकल्याने भाजपा त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवेल तर शिवसेना आपल्या पद्धतीने निवडणूक लढवणार आहे. आमच्या सोबत विलास पाटील आले असताना त्यांना अटक झाली. त्यानंतर ही पक्षाने भूमिका ठाम ठेवली असून उमेदवार कोण असेल हे उद्या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कडून ज्यांचे नाव येईल ते उमेदवार असतील अशी माहिती पक्षनेते प्रकाश पाटील यांनी दिली.
0
comment0
Report
Advertisement
Back to top