icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
423203
VNVishal Nagesh More16 Feb 2026, 04:33 am

मालेगांव महापालिका: दुरुस्ती के बाद Tipu Sultan का चित्र फिर से कार्यालय में लगेगा

Malegaon, Maharashtra:उपमहापौर कार्यालयाचे दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पुन्हा टिपू सुलतान यांचे चित्र लावण्यात येईल. मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांची स्पष्टोक्ती. संपूर्ण महाराष्ट्रात टिपू सुलतान वरून जो वाद सुरू आहे तो वाद मालेगावातूनच सुरू झाला असून आता पुन्हा त्या वादाला नवीन वळण मिळण्याची शक्यता असून मालेगावच्या किल्ला परिसरात काल रात्री उपमहापौर शान ए हिंद यांची स्वागत सभा आयोजित करण्यात आली होती त्यात त्यांनी महापौर कार्यालयाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा कार्यालयात लावणार असे विधान करत टिपू सुलतान यांचे कौतुक देखील केले. ऑन साउंड बाईट: शान ए हिंद, उपमहापौर मालेगाव मनपा
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

आकोला नगरपालिका में बीजेपी–शिवसेना भिड़ंत, अश्विन नवले ने पद से इस्तीफा दिया

Akola, Maharashtra:अकोल्यात एकीकडे महापालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे मध्ये संघर्ष सुरू असताना एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अश्विन नवले यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात पक्षाचे माजी आमदार तथा नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी लिहल्या आहेत. तर आपण पदासाठी गुलाम म्हणून काम करू शकत नाही या शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या पत्राने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. काय लिहलं आहे अश्विन नवले यांनी आपल्या पत्रात पाहूया. प्रतिः मा. एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र state शिवसेना मुख्यनेते महाराष्ट्र. महोदय, जय महाराष्ट्र... साहेब सर्वप्रथम आपण विचारांची क्रांती केली तेव्हा सर्वप्रथम आपल्या सोबत अकोल्यातून येणारे आम्ही आहोत. एका विचाराने पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे अकोला जिल्ह्यात काम केले परंतु गोपीकिशन बाजोरिया या अशा विचारहीन व स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तीसोबत काम करणे आता माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मनाला पटत नाही. आम्ही समाजसेवक आहोत व राहू. परंतु पक्षाच्या पदासाठी बाजोरिया यांचे गुलाम बनून राहू शकत नाही. तेंव्हा माझा हा राजीनामा आपण स्वीकार करावा. जय महाराष्ट्र....
0
0
Report

कल्याण कोर्ट ने केडीएमसी आयुक्त समेत 7 अधिकारियों के खिलाफ बेलबल वारंट जारी किया

Kalyan, Maharashtra:पुनर्वसन प्रकरणात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह 7 अधिकाऱ्यांना बेलेबल वॉरंट जारी. 17 एप्रिल रोजी कल्याण कोर्टात हजर राहण्याचे आदेश. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोर्टाचा कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पुनर्वसन प्रकरणात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे केडीएमसी आयुक्तांसह सात अधिकाऱ्यांविरोधात कल्याण न्यायालयाने बेलेबल वॉरंट जारी केले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना 17 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डोंबिवलीतील राजाजीपथ परिसरात रस्ता रुंदीकरणाच्या कामात एका नागरिकाचे घर बाधित झाले. मात्र, केडीएमसीकडून कोणतेही पुनर्वसन किंवा आर्थिक मदत न मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. त्यामुळे बाधित नागरिक इंद्रमणी उपाध्याय यांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली. प्रकरणाची सुनावणी सुरू असताना संबंधित अधिकारी कोर्टात उपस्थित राहिले नाहीत. न्यायालयाने आयुक्त अभिनय गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त वंदना बुडवे, उपायुक्त प्रसाद बोरकर, शहर अभियंता अनिता परदेशी आणि मुख्य रचनाकार संतोष डोईफोडे यांच्या विरोधात बेलबल वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने सर्व अधिकाऱ्यांना 17 एप्रिल रोजी उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. इंद्रमणी उपाध्याय यांनी याचिका दाखल केली.
0
0
Report
Advertisement

मालेगांव महापालिका में शिक्षा मंत्री भुसे की अध्यक्षता में समीक्षा बैठक

Malegaon, Maharashtra:शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मनपात आढावा बैठक मालेगाव महापालालिकेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. मनपाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागातील अडचणी, आवश्यक सोयी-सुविधा आणि विकासकामांवर चर्चा. बैठकीस आमदार मुफ्ती इस्माईल, महापौर नसरीन शेख, उपमहापौर शान-ए-हिंद, सर्व नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित. मनपा शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश. नवीन अंगणवाड्या, शाळांसाठी इमारती आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत नवीन प्रस्तावांवर विचारविनिमय. माजी राष्ट्रपती A. P. J. Abdul Kalam यांच्या नावाने सायन्स पार्क उभारण्याची योजना. मनपाने जागा उपलब्ध करून दिल्यास चार महिन्यांत सायन्स पार्क प्रकल्प उभारता येईल, असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.
0
0
Report

जमानत अर्ज पर सुनवाई 22 अप्रैल तक टली; अदालत ने वकीलों के देरी के कारण की नाराज़गी

Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash कल्पना खरात अटकपूर्वक जामीन अर्जावर सुनावणी लांबणीवर... पुढील सुनावणी आता 22 एप्रिल ला... आरोपीचे वकील व सरकारी पक्ष हजर असतानाही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर... मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयाकडे मागितला वेळ... मूळ फिर्यादीच्या विनंती नंतर न्यायालयाने दिली वाढीव मुदत.. सुनावणी सुरू होताच न्यायालयाने आरोपींच्या वकिलांविषयी उशिरा आल्याने केली नाराजी व्यक्त. तपास अधिकारी व आरोपीचे वकील असल्याने सुनावणी घेण्यास न्यायालय होता अनुकूल.. मात्र फिर्यादीच्या विनंतीमुळे पुढील सुनावणी आता 22 एप्रिलला...
0
0
Report
Advertisement

लातूर एमआईडीसी फैक्ट्री में भीषण आग, कुछ कर्मी झुलसे, गैस सिलेंडरों से खतरा

Latur, Maharashtra:लातूर एमआयडीसी परिसरातील ॲल्युमिनियम फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत काही कामगार भाजले असून त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तर काही कामगार आत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या फॅक्टरीत २० ते २५ गॅस सिलेंडरच्या टाक्या असल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. स्फोटाचा धोका लक्षात घेता परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ६ गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत。
0
0
Report

उल्हासनगर में पुराने विवाद के चलते युवक पर चाकू हमला; आठ आरोपियों के खिलाफ मामला दर्ज

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर शहरातील नेताजी चौक परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अस्लम शेख हा रात्री नेताजी चौक येथे एचडीएफसी बँक परिसरात चहा पिण्यासाठी गेला असता जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी सलमान शेख, शाहरुख शेख, रजमान शेख, इरफान शेख, अल्ताफ शेख, साहिल शेख, इकरार शेख आणि इशान शेख यांनी मिळून असलम शेख याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूने डोक्यावर वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जखमी अस्लम शेख याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आठही आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0
0
Report

नवी मुंबई के 11 होल्डिंग पॉन्ड में 240 हेक्टेयर खारफुटी, पानी स्टोरेज क्षमता घटी

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुम्बई में 11 होल्डिंग पॉण्डों में 240 हेक्टेयर क्षेत्र में खारफुटी उग आने से होल्डिंग पॉण्ड की क्षमता घट गई है। पॉण्ड का गाळ भी इसी कारण बाहर नहीं निकाला जा रहा है, जिससे भारी बारिश के समय शहर में पानी जमा होने की fear है। महापालिका ने पर्यावरण और वन विभाग को इस बारे में पत्राचार किया है और खारफुटी हटवाने की अनुमति न्यायालय से मांगने की योजना है। इसके साथ ही खारफुटी को अन्य स्थान पर ट्रांसप्लांट करने के लिए जगह तलाशने की कोशिश भी चल रही है। वजह से अधिक तेज बारिश होने पर शहर में पानी बाहर निकालने हेतु अधिक क्षमता वाले पंप लगाने की आवश्यकता होगी, इस बारे में हमारे प्रतिनिधि Swati Naik ने Navi Mumbai Mahapalika के आयुक्त Kailas Shinde से बातचीत की है।
0
0
Report
Advertisement

वाशिम बाजार में सोयाबीन के दाम 5250-5700 तक, किसान उन्नत भाव पर बिक्री शुरू

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ५,२५० रुपये तर कमाल ५,७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. दरात झालेल्या या सुधारण्यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढताना दिसत आहे. आज वाशिम बाजार समितीत सुमारे ५,७०० क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली. एकूणच, दरातील वाढ लक्षात घेता येत्या काही दिवसांत सोयाबीनची आवक आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0
0
Report

सोलापुर कृष्णामाई नर्सिंग होम में प्रसूति के बाद महिला मौत, डॉक्टरों पर लापरवाही आरोप

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील कृष्णामाई नर्सिंग होममध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या २५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. अनुजा बावळे यांच्या मृत्यू मागे नेमका दोष डॉक्टरांचा की नशिबाचा? डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा दावा. प्रसूतीनंतर महिलेने जन्म दिलेला नवजात बालक आईविना पोरके झाला. अनुजा बावळे यांच्यावर डॉ. माधुरी दबडे यांच्या कृष्णामाई नर्सिंग होममध्ये सिझरची प्रक्रिया झाली. सिझर यशस्वी झाला, बाळ सुरक्षित होते, परंतु आठ तासांमध्ये अनुजा बावळे यांना त्रास झाला. नातेवाईकांनी वारंवार डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याची माहिती दिली तरी दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यू झाला आहे. पती सनी बावळे यांनीही ती प्रतिक्रिया दिली. चौकशी समिती नेमण्यात आली असून अहवाल काय समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं.
0
0
Report

राम शिंदे ने प्राजक्त तनपुरे को भाजपा में शामिल होने का आमंत्रण दिया

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर के राहुरी विधानसभा पोटनिवडणूक के लिए भाजपा कार्यकर्ताओं का मेळावा पार पड़ा। इस मेळावे में विधान परिषद के सभापति राम शिंदे ने राष्ट्रवादी शरद पवार गुट के पूर्व मंत्री प्राजक्त तनपुरे को भाजपा में शामिल होने का आमंत्रण दिया है। यह चुनाव सार्वत्रिक नहीं बल्कि पोटनिवडणूक है, इसलिए प्राजक्त तनपुरे ने मन बड़ा दिखाकर चुनाव से माघार ली और अप्रत्यक्ष रूप से समर्थन दिया है... इसलिए आने वाले तीन से चार दिनों में उन्होंने प्रत्यक्ष रूप से समर्थन की घोषणा करनी चाहिए, ऐसा निमंत्रण सभापति राम शिंदे ने दिया है।
0
0
Report
Advertisement

राहुरी उपचुनाव प्रचार में भाजपा अध्यक्ष रविंद्र चव्हाण ने कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाने का संदेश दिया

Ahilyanagar, Maharashtra:स्लग- राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रदेशाध्यक्ष भाजप कार्यकर्ता मेळावा अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला राहुरी शहरामध्ये घेतलेल्या या मेळाव्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आमदार प्रसाद लाड आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू आहे...दरम्यान याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्वाचे वक्तव्य केलंय...देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक समविचारी नेते मनानी जोडले गेलेत...जर तनपुरे आमच्यासोबत जोडले आम्हाला नक्कीच आनंद होईल असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलंय. बाईट- रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजप राहुरी पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सामोरे गेले पाहिजे, सध्या उष्मा वाढलेला आहे तर सकाळच्या टप्प्यातच जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना आम्ही दिल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हंटले आहे...भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले यांच्या प्रचारार्थ भाजपने कार्यकर्ता मेळावा घेतला...त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. बाईट- रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजप
0
0
Report

रत्नागुरी में गर्मी-आर्द्रता से लोग परेशान, कोकण में तापमान बढ़ने की संभावना

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. तापमानाचा वाढतोय चटका. आद्रतेचा मोठा फटका. कोकणासह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी प्रमाण सर्वाधिक. पुढील काही दिवस उकाड्यात वाढ होण्याची शक्यता. सध्या तापमानाचा परा वाढत आहे. त्यामुळे आता उन्हाचा चटका चांगला जाणू लागला आहे. मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात आद्रता सर्वाधिक असल्याने घामाच्या धारांनी रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत. अन्य जिल्ह्यात तापमान अधिक असले तरी वातावरण कोरडे आहे. विशेष म्हणजे कोकण विभागात किमान तापमानात वाढ झालेली असली तरी रत्नागिरीत आद्रता कमालीची वाढली आहे. पुढील दोन दिवस कोकणात तापमान आणि आद्रता वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
0
0
Report

बीड़ में अपराध का बाढ़: कानून-व्यवस्था पर सवाल उठ रहे हैं

Beed, Maharashtra:बीड: बीड जिला गुन्हेगारीचा बालेकिल्ला..! ANC- कधीकाळी पुरोगामी म्हणून घेणारा बीड जिल्हा गेल्या दोन ते अडीच वर्षात गुन्हेगारीचा बालेकिल्ला बनला आहे. रोजच्याच हाणामाऱ्या, खून, महिलांवरील अत्याचार अशा विविध घटनांनी बीड जिल्हा पूर्णपणे हादरला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गुन्हे आणि गुन्हेगारींचे वाढते प्रमाण चिंता वाढवणारे आहे... बीड जिला कायद्याचा नव्हे तर गुन्हेगारीचा बालेकिल्ला असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. पाहुयात एक खास रिपोर्ट. पाहण्याकरीता कायद्याचा धाक कोणालाही नाहीये.. इथे जीवाचा मोल नाही.. बीडमधील स्थानिक गुंडांच्या घटना ताज्याच असताना आता राजकीय गुंडगिरीने देखील डोके वर काढले आहे. बाईट: एड सतीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते. VO 2.... बीडच्या औरंगपूर गावामध्ये माहिती मागण्यावरून बाप लेकाला चांगलेच महागात पडले आहे. माहिती मागितल्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाय तोडले, हाताची बोटे छाटली... प्रकरण ताजेच असताना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा मागे घे म्हणून एका तरुणाला अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. बाईट: ( 2 बाईट्स). VO 3... बीडमधील हा सीसीटीव्ही जरा नीट पहा. भाजपच्या नगरसेविकेच्या पतीला शिवसेना शिंदे गटाच्या पराभूत उमेदवाराने त्याच्या मित्रांसह अमानुष मातांना केली. या घटनेमुळे बीड शहरात खळबळ माजली आहे. तर पाटोदा तालुक्यात महेंद्रवाडी येथे सखा मेव्हणाचा वैरी झालाय. दोन वर्षात दीडशेहून जास्त हाणामाऱ्या विविध पोलिस ठाण्यात नोंद झाल्या आहेत. आजही कारवाईसाठी पीडित आर्त हाक देतायत. VO 4.... बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस दल देखील हतबल झाले आहे. हत्या आणि हत्येचा प्रयत्न करणे हे बीड जिल्ह्यासाठी साधारण आहे. गुन्ह्याचा वाढता आलेख पाहता पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलिस दलासाठी विशेष सीसीटीव्ही वाहन मागवले आहे. या वाहनातून दहा किलोमीटर अंतरावरील सर्वच हालचाली कैद होतात. त्यामुळे यापुढे अशा घटनांना आळा बसेल और गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल असा विश्वास नवनीत काँवत यांना वाटतो. अब बीडमध्ये सीसीटीव्हीची नजर दहा किलोमीटरपर्यंत पोहोचणार असल्याचा दावा बीड पोलिसांनी केला आहे... म्हणजे गुन्हेगारांनीही आता ‘लाँग डिस्टन्स’ प्लॅनिंग करावं लागणार का, हा प्रश्नच आहे! परंतु कायद्याचा धाक वाढणं जास्त गरजेचं आहे. कारण कॅमेरे फक्त गुन्हे दाखवतात, ते थांबवत नाहीत! बीडला पुन्हा ‘पुरोगामी’ ओळख मिळवून द्यायची असल्यास कायद्याचा धाक तितका महत्त्वाचा आहे. अन्यथा बीडला पुन्हा ‘गुन्हेगारीचा बालेकिल्ला’ असेच म्हणण्याची दुर्दैवी वेळ येईल... हे मात्र निश्चित..! महेंद्रकुमार मुधोळकर, झी 24 तास बीड..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top