Back
कुसुम्बी गांव: नाचणी ने महिलाओं की आत्मनिर्भरता और गांव की पहचान बना दी
TTTUSHAR TAPASE
Mar 06, 2026 09:31:16
Satara, Maharashtra
सातारा -पारंपारिक शेती, महिलांचा सहभाग आणि नाविन्यपूर्ण प्रयोग yांचा संगम झाला तर छोटंसं गावही मोठी ओळख निर्माण करू शकतं. साताऱ्याच्या जावली तालुक्यातील कुसुंबी गावानं हे करून दाखवलं आहे. कधी दुष्काळाशी झुंज देणारं हे गाव आज “नाचणीचं गाव” म्हणून देश-विदेशात ओळखलं जातं. चला पाहूयात हा खास रिपोर्ट… व्हिओ 1 -साताऱ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं कुसुंबी हे छोटंसं गाव…साधं सरळ जीवन… पण शेतात काम करण्याची जिद्द आणि मेहनत…याच जोरावर या गावानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.एकेकाळी केवळ काही एकरांमध्ये घेतली जाणारी नाचणी…आज तब्बल सातशे हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते.कुसुंबीच्या नाचणीचा खमंग सुवास आता सातासमुद्रापर पोहोचला आहे.या गावातील जवळपास 250 महिला या नाचणी शेती आणि नाचणीपासून बनवलेली खाद्यपदार्थ उत्पादने तयार करण्यात सक्रिय आहेत,आणि त्यातून दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत.या यशामागे मोठा वाटा आहे तो संगीता वेंदे यांच्या प्रयत्नांचा.संगीता वेंदे यांनी गावातील महिलांना एकत्र आणत नाचणीवर विविध प्रयोग केले आणि नाचणीपासून तयार होणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांची निर्मिती सुरू केली.आज या महिलांच्या माध्यमातून नाचणीचे लाडू, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, केक आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ तयार केले जातात. बाईट - संगीता वेंदे व्हिओ 2 -या सर्व उत्पादनांना आता परदेशात अमेरिका, ऑस्ट्रेलिया तसेच मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. गावातील 232 महिलांना एकत्र आणत संगीता वेंदे यांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं मोठं काम केलं आहे.या महिलांनी एकत्र येत महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली असून त्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. बाईट - संगीता वेंदे आणि इतर महिला नाचणीचे फायदे कॅल्शियमचा उत्तम स्रोत – हाडे व दात मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त. डायबिटीज नियंत्रणात मदत – नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. फायबर भरपूर – पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. लोह (Iron) मुबलक – शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत. वजन नियंत्रणासाठी उपयुक्त – फायबर जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेले वाटते. हृदयासाठी फायदेशीर – कोलेस्टेरॉल कमी ठेवण्यास मदत. पौष्टिक आहार – प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात. लहान मुलांसाठी व वृद्धांसाठी चांगले – शरीराला ताकद आणि ऊर्जा देते. कमी पाण्यात येणारे पीक – शेतकऱ्यांसाठी टिकाऊ आणि दुष्काळातही चांगले उत्पादन देणारे. व्हिओ 3-हेल्दी फूडची जागतिक मागणी वाढत असताना कुसुंबी गावातील संगीता वेंदे आणि इतर महिलांनी नाचणीच्या माध्यमातून शाश्वत शेतीचं उत्कृष्ट उदाहरण घालून दिलं आहे.महिलांचा आत्मविश्वास, शेतकऱ्यांची जिद्द आणि नेतृत्वाची ताकद…यामुळेच आज कुसुंबी गाव “नाचणीचं गाव” म्हणून देश-विदेशात प्रसिद्ध झालं आहे.गावातील महिलांना एकत्र आणून त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम करणाऱ्या संगीता वेंदे यांच्या कार्याला खरंच सलाम. end PTC तुषार तपासे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 14:47:510
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 06, 2026 14:33:160
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 13:49:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 13:36:590
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 06, 2026 13:36:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 06, 2026 13:00:200
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 06, 2026 12:45:320
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 12:31:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 06, 2026 12:05:240
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 11:51:170
Report
PNPratap Naik1
FollowMar 06, 2026 11:31:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 06, 2026 11:18:040
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 06, 2026 11:05:280
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 06, 2026 11:03:280
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 06, 2026 09:37:130
Report