Back
सातारा में महाविकास आघाडी की सभा: विकास का वादा, भाजपा से बदला राजनीतिक संकेत
TTTUSHAR TAPASE
Nov 26, 2025 07:01:59
Satara, Maharashtra
सातारा जिल्ह्यात 9 नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा पार पडली या सभेमध्ये शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यासह काँग्रेस आणि उबाटा गटाचे नेते उपस्थित होते. यावेळी शशिकांत शिंदे यांनी सातारकरांना सर्व दडपशाही जुगारून माझ्या महाविकास आघाडीला संधी द्या मी सातारचा विकास करून दाखवतो... असं ते म्हणालेत. स्टेज बाईट: शशिकांत शिंदे. यावेळी राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांनी भाजपने फसवले असल्याचा आरोप करत. शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मलाही भाजपने फसवले असल्याचे यावेळी ते म्हणाले. स्टेज बाईट: महादेव जानकर. शरद पवार पक्षाच्या सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांनी मला ठेकेदार व्हायचं नाही कोणतेही टेंडर नको मला इथले भविष्य घडवायचा आहे. एक संधी मला द्या पाच वर्ष मी तुम्हाला देणार असा शब्द यावेळी त्यांनी आपल्या सभेत दिला आहे. स्टेज बाईट सुवर्णा पाटील (नगराध्यक्ष पदाच्या सातारा नगरपालिकेच्या उमेदवार). सातारा:राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे भाषण पॉइंटर. बरेच लोक या सभेला येण्यास इच्छुक आहेत मात्र साताऱ्यात मोकला श्वास घ्यायलाही परवानगी लागते. सातारकरांचे अंतर्गत पाठबळ महाविकास आघाडीला आहे. याचा उल्लेख मी मनापासून या सभेमध्ये करतोय. लोकसभेच्या निकालाबाबत निवडणुका आयोगाला उशिरा समजलं तुतारी आणि पिपाणी आता ते रद्द झालं. त्यावेळी पिपाणी नसती तर सातारकरांच्या मनातला खासदार निवडून आला असता. ही लढाई तत्वाची आहे. भाजपमध्ये जाणारे सर्व सुखी नाहीत सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था आहे. सर्वजण तिकडे गेले तर सामान्य जनतेचा आवाज कोण उठवणार .हा प्रश्न जसा देशात आहे तसाच सातार्यात आहे. याला वाचा फोडण्याचे काम सुवर्णा पाटील आणि महाविकास आघाडीच्या नगरपालिकेच्या उमेदवारांच्या माध्यमातून करायच आहे. ही लढाई सोपी नाही अवघड आहे ही फक्त सुरुवात आहे. कोणी ताम्रपट घेऊन आलेल्या नाही. मला माहित नाही विजय होईल की नाही. सत्याचा विजय होण्यासाठी जी चिंगारी तयार झाली. त्याची सुरुवात या सभेला बसलेल्या शिलेदारांनी केली याचा मला अभिमान आहे. ही निवडणूक नगरपालिके पुरती मर्यादित नसून देशाच्या आणि राज्याच्या हुकूमशाही विरोधातली आहे. महादेव जानकर यांना सरकारमध्ये गेल्यानुसार लक्षात आलं आणि त्यांनी पहिल्यांदा बंडाचा झेंडा असाच हाती घेतला.. आणि दुसरा झेंडा सुवर्ण पाटील यांनी घेतला. काहीजण म्हणत आहेत महाविकास आघाडीला उमेदवार मिळाला नाही. म्हणून आयात उमेदवार घेतला. तुम्हाला सोन्याची पारकच होत नाही त्यात आमचा दोष होता का?.. आमच्या कडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी डॉक्टर सुद्धा होते ज्यांनी साताऱ्याची हाफ हिल मॅरेथॉन जगाच्या पटलावर नेली. संविधान जरी बदललं नसलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला अधिकार या सरकारने काढून घेतला आहे. यासमोर बसलेल्या मतदाराला मतदानाचा अधिकार सुद्धा नाहीच तुमच्या आधी जाऊन दुसरा मतदान करतोय. पोलिस प्रशासन शासकीय यंत्रणा ठप्प... वोटर आयडी काही बघितला जात नाही मतदान जरी केलं तरी मतदान फिरवण्याची क्षमता या लोकांच्याकडे आहे. साडेतीन कोटी च कर्ज तुमच्या माथ्यावर मारलं अडीच वर्षांमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यासाठी... क्वालिटीचं तर बोलूच नका. सातारा शहराची ओळख काय? राज्यामध्ये अनेक जिल्हे ज्याप्रकारे विकसित झाले. तसं सातारमध्ये पाहायला मिळत नाही या चौकामध्ये सुद्धा आता अंधार दिसतोय. यासाठी बदल करणे गरजेचा आहे. निसर्ग आणि नियती मध्ये बदलाची क्रांती करण्याचा निर्णय असतो तो करण्याची गरज आहे. फक्त तुमचा मतासाठी वापर केला जातो... लोकशाहीमध्ये शशिकांत शिंदे यांना एखाद्या पेटीत मत जास्त पडली तर ते स्टॉल उघडून टाकले जातात हे दुर्दैव. भाजपने जाती-जातीमध्ये भांडण लावून तुम्हा आम्हाला फसवत आहे. मी सर्वसाधारणांना एक शब्द देतो. एक संधी द्या. दडपशाही जुगारून माझ्या महाविकास आघाडीला देऊन बघा मी सर्व खरं करून दाखवतो. दहा पंधरा हजाराचा भाव निघायला लागला आता चेक नाक्यावर नोटा चेक करतात म्हणून अकाउंट पे व्हायला लागले. तर निवडणूक आयोग काय करत असेल माहित नाही.. आजची ही सभा सातारकरांचा इतिहास घडवण्याची सभा आहे. महादेव जानकर (राष्ट्रीय नेते). सुवर्णा पाटील ज्या मुशीतून तयार झाल्या... त्या पक्षाला आम्ही देखील सत्तेवर आणण्यासाठी उभ केलं आहे. ही माफी मागण्यासाठी मी आज साताऱ्यात आलो आहे. भारताचे संविधान वाचवायचे असेल तर आपल्याला भाजप मुक्त भारत करायला हवा.. त्यावेळी काँग्रेसवाले आम्हाला विचारत नव्हते म्हणून आम्ही भाजपसोबत गेलोहोत. आम्हाला माहीत नव्हतं भाजप आम्हाला फसवतील. शरद पवारांच्या पक्षाची वाताहत केली, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पण केली आणि माझे पण चार आमदार पळवले म्हणूनच मी शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भेटलो आणि मी भारताचा संविधान वाचवण्यासाठी एकत्र राहावं अशी विनंती केलिये. मी कॅबिनेट मंत्री होतो त्यावेळेस मला समजलं की हे सरकार आपलं नाही. भाजपची इच्छा होती की माझा पक्ष त्यांच्यामध्ये विलीनीकरण करावा. पण शेवटपर्यंत मी माझा स्वतःचाच पक्ष काढून चार आमदार स्वतः मंत्री झालो. भाजप फक्त जाती-जातीमध्ये भांडण लावून तुम्हा आम्हाला फसवत आहे. सातारा नगरपालिका महाविकास आघाडी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुवर्णा पाटील स्टेज बाईट पॉईंटर. मला या साताऱ्याचा विकास करायचा आहे ज्यावेळेस मी 33 वर्षांपूर्वी लग्न होऊन साताऱ्यात आले त्यावेळचा सातारा आणि आत्ताचा सातारा त्यामध्ये काहीही बदल नाही. बाजारपेठेतील एखादा मजला वाढला असेल पण बदल झालेला नाही. शैक्षणिक व्यवस्था रोजगार नाही. एमआयडीसी ठप्प आहे. तुम्ही आत्ता थांबला तर पाच वर्ष थांबावं लागेल. आणि विकासही पाच वर्ष थांबेल. तुम्ही आत्ता नाहीतर कधीच नाही सातारा बदलायची गरज आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowNov 26, 2025 07:18:3350
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 26, 2025 07:17:1655
Report
JMJAVED MULANI
FollowNov 26, 2025 07:01:210
Report
SKShubham Koli
FollowNov 26, 2025 06:52:360
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 26, 2025 06:49:43122
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 26, 2025 06:39:4821
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 06:30:58102
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 26, 2025 06:30:2264
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 06:02:36106
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 05:50:31105
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 26, 2025 05:48:25118
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 05:48:14139
Report
MAMILIND ANDE
FollowNov 26, 2025 05:47:43152
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 05:47:23110
Report