Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सतारा के शाहूनगर में बिबट्या पिल्ला मिला, वन विभाग ने ताब्यात लिया

TTTUSHAR TAPASE
Nov 26, 2025 06:39:48
Satara, Maharashtra
सातारा - साताऱ्यातील शाहूनगर भागात नागरीवस्तीमध्ये बिबट्याचे पिल्लू सापडले आहे. एका अपार्टमेंट खाली रात्री या बिबट्याच्या पिल्लाचा ओरडण्याचा आवाज आल्यावर नागरिक त्या ठिकाणी जमले. त्यानंतर वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. वन विभागाने हे पिल्लू ताब्यात घेतले मात्र हे पिल्लू पुन्हा मादी बिबट्याने घेऊन जाण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत सुरू होते मात्र मादी बिबट्या न आल्याने आज पुन्हा हे बिबट्या पिल्लू मादी बिबट्या घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Nov 26, 2025 06:49:43
Bhandara, Maharashtra:परिणय फुके व नाना पटोले यांची साठगाठ.... मित्र पक्षावर परिणय फुके करता आरोप.... नरेंद्र भोंडेकर यांची टीका.... भंडारा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नाना पटोले व परिणय फुके यांची साठगाठ आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे वक्तव्य .... भंडारा जिल्ह्यात चार नगर परिषद निवडणुका लागल्या असून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक सभेत परिणय फुके हे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका करतात. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस वर टीका करत नाही. भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पण कामे करत असताना टप्पा टप्प्याची पैसे येतात. भ्रष्टाचार कसा झाला. तर दुसरीकडे परिणय फुके व नाना पटोले यांची साठगाठ झाली आल्याच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केला आहे.. एकीकडे राज्यात देवेंद्र फडणवीस, अजित दादा, शिंदे साहेब टीका करत नाही पण या ठिकाणी खालच्या पातळीवर टीका केली जाते....
122
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 26, 2025 06:30:58
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 26, 2025 06:30:22
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक जामिनावर सुटलेल्या सराईत गुंडावर विरोधी टोळीने केला होता गोळीबार उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक झाली आहे. जामिनावर सुटलेल्या सराईत गुंडावर विरोधी टोळीने गोळीबार केल्याची घटना उल्हासनगर मध्ये two days earlier घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत त्याने घराशेजारी लपवलेले पिस्तूल हस्तगत केले आहे. उल्हासनगर कॅम्प तीन मधील इमली पाडा येथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सचिन उर्फ बाबूजी बहादूर करोतिया हा राहतो. काही महिन्यांपूर्वीच हा गुंड जेलमधून सुटून आला आहे. तो इमली पाडातील गोगाजी मंदिराजवळ शुक्रवारी रात्री मित्रां बरोबर उभा असताना तिथे मोटार सायकल वरून पाच ते सहा जणांची टोळी आली. यातील मोहित हिंदुजा याचा सचिन करोतीया याच्या भावाशी जुना वाद असल्याने या रागातून सचिनवर दोन राऊंड फायर केले आणि निघून गेले. तसेच झालेल्या गडबडीत मोहित याच्या कडून दोन राऊंड खाली पडले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास करण्यात आला. पोलीस पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत त्याने घराशेजारी लपवलेले पिस्तूल मध्यवर्ती पोलिसांनी हस्तगत केले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या कडून चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 26, 2025 06:02:36
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) येथून नवेंगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) येथे चितळ स्थानांतराची दुसरी फेरी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. कोणतीही जिवितहानी न होता एकूण 63 चितळे सुरक्षितपणे जामनी गवताळ परिसरातून नागझिरा प्रकल्पातील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजरमध्ये हलविण्यात आले. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकही मृत्यू झालेला नाही. चितळ हा अतिशय संवेदनशील प्राणी असून पकडण्याच्या प्रक्रियेदरम्यान किंवा मानवी जवळीक, हाताळणी, वाहतूक यावेळी तीव्र ताणामुळे त्यांना मानसिक धक्का बसू शकतो. या ताणामुळे हृदयाचे विकार निर्माण होऊन अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते, ज्याला ‘कॅप्चर मायोपथी’ असे म्हटले जाते. मात्र आजच्या स्थानांतरणात एकाही प्राणीाचा मृत्यू झालेला नाही, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. जामनी गवताळ परिसरात तयार करण्यात आलेल्या बोमा पद्धतीचा वापर करून चितळांना सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. या परिसरातील योग्य अधिवास आणि चितळांची उपलब्धता या प्रक्रियेस पूरक ठरल्या. बोमामधून प्राण्यांना विशेष तयार केलेल्या ट्रान्सलोकेशन वाहनांतून हलविण्यात आले. या वाहनांची रचना प्राण्यांचा ताण कमी करण्याच्या आणि प्रवास सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे.
106
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 26, 2025 05:50:31
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील खिरडी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव, डिजिटल मीटरविरोधात ग्रामसभेचा एकमुखी निर्णय, वाढीव विद्युत बिलांच्या तक्रारींवरून जुन्या मीटरची होत आहे मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील खिरडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वाढीव आणि अवास्तव विद्युत बिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर डिजिटल मीटरविरोधात ऐतिहासिक ठराव एकमताने पारित करण्यात आला आहे. डिजिटल मीटर तात्काळ हटवण्यात यावेत आणि जुन्या पद्धतीचे मीटर पुन्हा बसवण्यात यावेत असा ठराव करण्यात आला आहे. डिजिटल मीटर बसवल्यापासून वीजबिलात अनियमित वाढ झाली असून काही घरांचे बिल दुप्पट तर काहींचे तिप्पट प्रमाणात येऊ लागले आहे. त्यामुळे आर्थिक तणाव निर्माण होत असून गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गडचांदूर कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थ स्वतः मीटर काढून ते महावितरण कार्यालयात जमा करणार आहेत.
87
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 26, 2025 05:48:25
Dharashiv, Maharashtra:तुळजापूर नगराध्यक्षपदाची निवडणूक — महंत इच्छागिरी महाराजांची माघार! भाजपामधील बंडखोरी निवळली तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिराचे महंत इच्छागिरी महाराज यांनी निवडणुकीतून नाट्यमय माघार घेतली आहे. प्रसिद्धीपत्रक जारी करून, “पवित्र परंपरेच्या रक्षणासाठी हा निर्णय घेतला” असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाने उमेदवारी डावल्यानंतर इच्छागिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र आज अचानक माघार घेत, “तुळजापूरची प्रतिमा काही दिवसांपासून वाईट दिशेला वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मतदारांनी काम करणाऱ्या व्यक्तीचीच निवड करावी,” असे आवाहन त्यांनी तुळजापूरकरांना केले.
118
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 26, 2025 05:48:14
139
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 26, 2025 05:47:43
152
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 26, 2025 05:47:23
Yavatmal, Maharashtra:राज्यमंत्री यांची पत्नी मोहिनी नाईक ह्या पुसद च्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्या निवडणूक लढत असून विरोधकांनी त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला आहे, मंत्री इंद्रनील यांचे यांचे दोन भाऊ देखील सून मोहिनी नाईक यांच्या विरोधात प्रचार करीत आहे. अशा परिस्थितीत मी नाईकांची सून आहे, हे माझे भाग्य आहे आणि माझे कार्यकर्तृत्वामुळे मला उमेदवारी मिळाली आहे. कोणत्या नाईकाने किती कामं केले हे जनतेला माहिती असल्याचा टोला मोहिनी नाईकांनी कुटुंबातील विरोधकांना लगावला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सासू अनिता नाईक यांनी पुसद चे नगराध्यक्ष पद भूषवले आहे आता मला संधी मिळाली त्यामुळे विकासाची ब्लू प्रिंट घेऊन आपण जनतेपुढे जात असल्याचे मोहिनी नाईक यांनी सांगितले आहे. त्यांनी घरोघरी भेटी देऊन प्रचाराचा धुराळा उडविला आहे.
110
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 26, 2025 05:37:36
Nagpur, Maharashtra:नागपूर * *गांजा तस्करीत सहा जणांना अटक, तर फरार असलेल्या दोघांचा शोध सुरू..* अटकेतील एक आरोपी भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीणच्या अध्यक्ष असल्याची माहिती * अटकेतील आरोपीकडून 6 लाख 72 हजार रुपयांच्या 33.600 किलो गांजासह एकूण 17 लाख लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.. * काटोल पोलिस आणि एनडीपीएस सेल यांच्या संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली.. * *अटकेतील आरोपी वैभव काळे हा डोरली(भांडवलकर) येथील सरपंच आणि भाजपा युवा मोर्चा काटोलचा ग्रामीण अध्यक्ष आहे...* * तर या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर राऊत हा एका या सामाजिक संघटनेचा पदाधिकारी आहे.. - हा गांजा ओडीसामधून नागपूरमध्ये काटोल जिल्ह्यात आला होता,
59
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 26, 2025 05:37:22
91
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 26, 2025 05:35:04
Nagpur, Maharashtra:नागपुर - नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या - गणेशपेठ परिसरात गाडीखाना चौकात तरुणाची हत्या - मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मृतक अमन मेश्राम याला आरोपीने भेटीसाठी बोलवले असता दोघात वाद होऊन आरोपीने साथीदारच्या मदतीने धारदार shस्त्राने केले वार... - जखमीला पोलिसांनी तरुणाला मेयो हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉक्टरांनी मूर्त घोषित केले - अमन मेश्राम असे मृतकाचे नाव तर अमित शिवलकर असे आरोपीचे नाव आहे..ही हत्या प्रेम प्रकरणातून घडल्याची माहिती समोर आली आहे.. - आरोपीने स्वतःची दुचाकी सोडून पळ काढला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे...
155
comment0
Report
Advertisement
Back to top