Back
ताडोबा-अंधारी से चितळों की दूसरी सफल ट्रांसलोकेशन, एक भी मौत नहीं
AAASHISH AMBADE
Nov 26, 2025 06:02:36
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) येथून नवेंगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) येथे चितळ स्थानांतराची दुसरी फेरी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. कोणतीही जिवितहानी न होता एकूण 63 चितळे सुरक्षितपणे जामनी गवताळ परिसरातून नागझिरा प्रकल्पातील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजरमध्ये हलविण्यात आले. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकही मृत्यू झालेला नाही. चितळ हा अतिशय संवेदनशील प्राणी असून पकडण्याच्या प्रक्रियेदरम्यान किंवा मानवी जवळीक, हाताळणी, वाहतूक यावेळी तीव्र ताणामुळे त्यांना मानसिक धक्का बसू शकतो. या ताणामुळे हृदयाचे विकार निर्माण होऊन अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते, ज्याला ‘कॅप्चर मायोपथी’ असे म्हटले जाते. मात्र आजच्या स्थानांतरणात एकाही प्राणीाचा मृत्यू झालेला नाही, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. जामनी गवताळ परिसरात तयार करण्यात आलेल्या बोमा पद्धतीचा वापर करून चितळांना सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. या परिसरातील योग्य अधिवास आणि चितळांची उपलब्धता या प्रक्रियेस पूरक ठरल्या. बोमामधून प्राण्यांना विशेष तयार केलेल्या ट्रान्सलोकेशन वाहनांतून हलविण्यात आले. या वाहनांची रचना प्राण्यांचा ताण कमी करण्याच्या आणि प्रवास सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 05:50:3143
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 26, 2025 05:48:25118
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 05:48:1493
Report
MAMILIND ANDE
FollowNov 26, 2025 05:47:4384
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 05:47:2340
Report
AKAMAR KANE
FollowNov 26, 2025 05:37:3624
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 26, 2025 05:37:2218
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 05:37:0415
Report
AKAMAR KANE
FollowNov 26, 2025 05:35:0444
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 26, 2025 05:32:3655
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 26, 2025 05:30:2494
Report
ABATISH BHOIR
FollowNov 26, 2025 05:21:4563
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 04:30:49168
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 26, 2025 04:30:32140
Report