Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सतारा में एकनाथ शिंदे का दरेगावी दौरा, किसानों से मुलाकात और वृक्षारोपण

TTTUSHAR TAPASE
Feb 22, 2026 07:16:36
Satara, Maharashtra
सातारा:राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी मुक्कामी आहेत. या दरम्यान नागरिकांच्या भेटीबरोबरच ते शेतातही रमलेले पाहायला मिळत आहेत अनेक वृक्षांची लागवड यावेळी त्यांनी केलेले आहे. या भागात झाडांच्या रूपाने नंदनवन केलं असल्याचा पाहायला मिळत आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Feb 22, 2026 08:57:27
Gadchiroli, Maharashtra:नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता 62 वर्षीय देवजी उर्फ थिप्पीरी तिरुपती याने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. त्याने तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात आपल्या सहकाऱ्यांसह शस्त्र खाली ठेवल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत दोन दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस प्रशासनाने या घडामोडीला दुजोर दिलेला नसला तरी या वृत्ताचे खंडन देखील केलेले नाही. या मोठ्या घडामोडीने देशातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याची स्पष्टता झाली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पूर्वी देशातून नक्सलवादाचे उच्चाटन करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यानुसार देशभर अभियान राबविले जात आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये नक्सलवाद्यांचा थिंक टॅंक समजला जाणारा भूपती उर्फ सोनूदादा यांनी गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मा समर्पण केले होते. त्यानंतरच्या काळात कुख्यात नक्सल कमांडर हीडमा याचाही चकमकीत मृत्यू झाला होता. नक्षल चळवळ खिळखिळी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च नेता देवजी याला आत्मसमर्पण करण्याचा दबाव होता. त्याला यश आल्याचे समजत आहे. त्याच्यावर विविध राज्य सरकारांचे एकूण दहा कोटी बक्षीस होते.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 22, 2026 08:53:23
Bhandara, Maharashtra:चेन्नई समुद्र दुर्घटना – महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला. महाराष्ट्रातील 15 विद्यार्थी Cognizant या IT कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी चेन्नई येथे गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार काल सुट्टी असल्याने 26 विद्यार्थी चेन्नई–पुडुचेरी रोडवरील कंथाट्टूर पोलीस स्टेशन हद्दीतील समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. तेथील मंदिरात दर्शन देखील घेतले व नंतर समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले. समुद्र सामान्य दिसत असला तरी या किनाऱ्यावर अचानक 10 ते 15 फूट उंच लाटा नेहमीच उसळतात. पण हा मनमोहक दृश्य आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्यासाठी मुले सेल्फी घेत असताना अचानक समुद्र खळखळला व मोठ्या लाटा उसळत लाटेने तिघांना समुद्रात ओढले. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला तिचं नाव मयुरी चौधरी असून भंडारा जिल्ह्याच्या वरठी येथील रहिवासी आहे. जळगाव जिल्ह्यातील एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. तर एका विद्यार्थ्याला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 25 दिवसांपूर्वी मयुरी चेन्नई येथे गेली होती. स्वप्नाची भरारी घेण्यापूर्वीच मयुरीने जगाचा निरोप घेतला. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तमिळनाडू सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे. शोधमोहीम वेगाने सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाकडून बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. समुद्रकिनारी जाताना सतर्कता बाळगणे किती आवश्यक आहे, याची ही वेदनादायी आठवण आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 22, 2026 08:45:26
Nashik, Maharashtra:रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डॉक्टर दांपत्याला अटक अँकर वैद्यकीय परवाना व मान्यताप्राप्त पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करून शेकडो रुग्णांच्या जिवाशी खेळ केल्याप्रकरणी डॉ. जयदीप सलील घोषाल व डॉ. सुजाता जयदीप घोषाल (पिंगे) या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे....नाशिक शहरातील विसे मळा परिसरात या बोगस डॉक्टर दाम्पत्याने वैद्यकीय पदवी नसतानाही त्वचारोगतज्ज्ञ असल्याचे भासवून उपचार केल्याचा तसेच बेकायदा प्लास्टिक सर्जरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता... याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार देवकर यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी घोषाल दाम्पत्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले होते. पीडित शुभम गुजर काही महिन्यांपूर्वी चेहऱ्यावरील त्वचारोगाच्या उपचारासाठी स्किनरेला क्लिनिकमध्ये गेला होता. मात्र योग्य पात्रता नसताना चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या उपचारांमुळे त्याच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली. या घटनेनंतर प्रकरणाला वाचा फुटली आणि तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे बाईट- शुभम गुजर (पीडित)
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 22, 2026 08:32:29
Latur, Maharashtra:निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे सख्ख्या भावाकडून सख्ख्या भावाचा खून…नात्याला काळिमा फासणारी घटना उघड…. शेतजमिनीच्या वादातून झाला खून... खून करून केला अपघाताचा बनाव... पोलीस तपासातून धक्कादायक माहीती उघड… गुलाब विलास खरोसे यांचा मृत्यू प्रकरणात धक्कादायक वळण… आरोपी भाऊ उल्हास विलास खरोसे अटकेत…\nनिलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे नात्याला काळिमा फासणारी थरारक घटना उघडकीस आली आहे. शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. या घटनेत गुलाब विलास खरोसे या युवकाचा मृत्यू झाला असून सुरुवातीला हा अपघात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. मात्र कासारशिरसी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेला संशय बळावला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली. सखोल चौकशीनंतर हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपी भाऊ उल्हास विलास खरोसे याला अटक करण्यात आली आहे....
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 22, 2026 07:34:21
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात जिद्दीचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले. गणिताचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेलेल्या एका विद्यार्थिनीला अचानक भोवळ आली. श्रेया देशमुख असे या विद्यार्थिनीचे नाव असून घटनेनंतर विद्यालय प्रशासनाने तत्काळ तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अचानक तब्येत बिघडल्याने श्रेयाचा गणिताचा पेपर अपूर्ण राहणार की काय, अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र पेपर राहिल्याची खंत तिच्या मनात होती. प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिने आपला गणिताचा पेपर पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. विद्यालय प्रशासनाने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व विशेष परवानगी मिळवली. डॉक्टरांनी तपासणी करून विद्यार्थिनीची प्रकृती समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय देखरेखीखाली श्रेयाने थेट रुग्णालयातूनच आपला गणिताचा पेपर पूर्ण केला. विद्यार्थिनीच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या चिकाटीने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 22, 2026 07:03:27
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्याच्या मालशिरसच्या नातेपुतेमध्ये हातावर सुसायड नोट लिहून विवाहिता ने आपले जीवन संपवले आहे. कुटुंबातील चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नातेपुते येथे पायल रणदिवे या 22 वर्षीय विवाहिता ब्युटी पार्लर क्लास करायचा होता. मात्र कुटुंबाने लावलेला क्लास बंद केला. काल सायंकाळी घरात कोणी नसताना पायल ने आत्महत्या केली. तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि जखमांचे हार्ड केस आहेत. त्यामुळे पायलचे वडिलांनी पतीसह सासू-सासरे आणि दीर यांच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे. पायल ने हातावर लिहिलेलं मजकूर: "हसू झालं माझे, माझं पार्लर बंद केले. जीव होता माझा स्वप्न होत ग.. आज पर्यंत शांत बसले पण आता नाही चागल्या आई बापाची लेक आहे म्हणून म्हणून निघून पण नाही गेले.. माझ्या मुळे त्रास झाला त्याच्या साठी माफी मागते.. Sorry"
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 22, 2026 06:48:23
Dhule, Maharashtra:शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथे वर्णेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व सोन्याची वस्तू चोरी करणाऱ्या संशयित चोराला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाल्यानंतर गावकऱ्यांनी साहुर शिवारातील ऊसाच्या शेतात शेतमजूरीसाठी आलेल्या आरोपी मुक्या कांतीलाल पवार (वय ४०, रा. अजनाळे, ता. जि. धुळे) याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याकडे दानपेटीतून चोरी करणात आलेल्या पैसे आढळून आले यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करत पोलिसांनी आरोपीकडून एकूण २३,०५० रुपये रोख रक्कम व अंदाजे १ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा हस्तगत करण्यात आला.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 22, 2026 05:46:58
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी यात्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे... मढी ग्रामपंचायतीकडून मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोधाची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे... ग्रामपंचायत कडून तसा ठराव करण्यात आला आहे मात्र, देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा मुस्लिम समाजाकडून व्यक्त केली जात आहे... त्यामुळे हिंदू-मुस्लिम व्यावसायिकांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून यात्रेच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.... मात्र, मागील वर्षी मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजातील व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोध दर्शवणारा ठराव घेतला होता... या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि हे प्रकरण न्यायालयातही गेले होते... अद्याप अंतिम निर्णय झालेला नसतानाही यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करू देण्याची भूमिका माजी सरपंच तथा प्रशासक संजय मरकड यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे... गेली वर्षात मुस्लिम व्यापार्‍यांना विरोध करणारा ठराव 327 मतांनी हा संमत झाला होता. यात्रा उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात जनावरांची कथन केली जाते ही कथन आता कमी झाली असली तरी काही प्रमाणात होत आहे आणि ही मुस्लिम समाजाकडून होत असल्याने मुस्लिम समाजाला व्यवसाय करू देण्याचा निर्णय योग्य असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे... ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असून सध्या प्रशासक कार्यरत असल्यामुळे संजय मरकड यांना असा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे... तसेच देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा मुस्लिम बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 22, 2026 05:45:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आर्थिक अडचणीमुळे पोटच्या दोन बालकांना एका आईने 40 हजार रुपयांना दत्तक दिल्याचा प्रकार.. अँकर - पैसे घेऊन पोटची दोन मुलांची एका आईने बेकायदेशीर रित्या दत्तक विक्री केल्याची घटना घडली आहे.सांगलीच्या मिरजेमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आईसह चौघां जणांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखল झाला आहे.मिरजेच्या सुभाषनगर येथील एका आईने आपल्या दोन बालकांना कौटुंबिक आर्थिक अडचणीमुळे चाळीस हजार रुपयांना विकल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कक्षाला मिळाली होती,त्यानंतर चौकशी करण्यात आल्यानंतर यामध्ये मनीषा जाधव याईने माधवनगर येथील दोघा दाम्पत्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे आपली दोन पुरुष जातीची बालक दत्तक दिल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये आईसह चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाईट - किरण चौगुले - पोलीस निरीक्षक मिरज शहर.
0
comment0
Report
Advertisement
Back to top