Back
चेन्नई समुद्र हादसा: महाराष्ट्र के 15 इंटर्न प्रभावित, एक की मौत, एक लापता
PTPRAVIN TANDEKAR
Feb 22, 2026 08:53:23
Bhandara, Maharashtra
चेन्नई समुद्र दुर्घटना – महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला. महाराष्ट्रातील 15 विद्यार्थी Cognizant या IT कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी चेन्नई येथे गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार काल सुट्टी असल्याने 26 विद्यार्थी चेन्नई–पुडुचेरी रोडवरील कंथाट्टूर पोलीस स्टेशन हद्दीतील समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. तेथील मंदिरात दर्शन देखील घेतले व नंतर समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले. समुद्र सामान्य दिसत असला तरी या किनाऱ्यावर अचानक 10 ते 15 फूट उंच लाटा नेहमीच उसळतात. पण हा मनमोहक दृश्य आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्यासाठी मुले सेल्फी घेत असताना अचानक समुद्र खळखळला व मोठ्या लाटा उसळत लाटेने तिघांना समुद्रात ओढले. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला तिचं नाव मयुरी चौधरी असून भंडारा जिल्ह्याच्या वरठी येथील रहिवासी आहे. जळगाव जिल्ह्यातील एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. तर एका विद्यार्थ्याला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 25 दिवसांपूर्वी मयुरी चेन्नई येथे गेली होती. स्वप्नाची भरारी घेण्यापूर्वीच मयुरीने जगाचा निरोप घेतला. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तमिळनाडू सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे. शोधमोहीम वेगाने सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाकडून बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. समुद्रकिनारी जाताना सतर्कता बाळगणे किती आवश्यक आहे, याची ही वेदनादायी आठवण आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowFeb 22, 2026 10:35:300
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 22, 2026 10:20:260
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 22, 2026 10:20:050
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 22, 2026 10:06:180
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 22, 2026 09:02:140
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 22, 2026 08:57:270
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 22, 2026 08:45:260
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 22, 2026 08:32:290
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 22, 2026 07:34:210
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 22, 2026 07:16:360
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 22, 2026 07:03:270
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 22, 2026 06:52:240
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 22, 2026 06:48:360
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 22, 2026 06:48:230
Report