Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

राहुरी के जोगेश्वरी आखाडा स्कूल के पास बिबटिया दिखने से घबराहट, वीडियो वायरल

KJKunal Jamdade
Feb 22, 2026 06:52:24
Shirdi, Maharashtra
राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे शाळेच्या भिंतीवर बिबट्या... बिबट्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल, 19 तारखेचा व्हिडीओ असल्याची माहिती... शाळेच्या बाजूलाच सुरू होता शिवजयंतीचा कार्यक्रम, बिबट्याच्या दर्शनाने घबराटीचे वातावरण... सुदैवाने कोणतीही हानी नाही... वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी... नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेच्या बाजूलाच बिबट्याचे वास्तव्य असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 22, 2026 08:32:29
Latur, Maharashtra:निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे सख्ख्या भावाकडून सख्ख्या भावाचा खून…नात्याला काळिमा फासणारी घटना उघड…. शेतजमिनीच्या वादातून झाला खून... खून करून केला अपघाताचा बनाव... पोलीस तपासातून धक्कादायक माहीती उघड… गुलाब विलास खरोसे यांचा मृत्यू प्रकरणात धक्कादायक वळण… आरोपी भाऊ उल्हास विलास खरोसे अटकेत…\nनिलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे नात्याला काळिमा फासणारी थरारक घटना उघडकीस आली आहे. शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. या घटनेत गुलाब विलास खरोसे या युवकाचा मृत्यू झाला असून सुरुवातीला हा अपघात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. मात्र कासारशिरसी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेला संशय बळावला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली. सखोल चौकशीनंतर हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपी भाऊ उल्हास विलास खरोसे याला अटक करण्यात आली आहे....
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 22, 2026 07:34:21
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात जिद्दीचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले. गणिताचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेलेल्या एका विद्यार्थिनीला अचानक भोवळ आली. श्रेया देशमुख असे या विद्यार्थिनीचे नाव असून घटनेनंतर विद्यालय प्रशासनाने तत्काळ तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अचानक तब्येत बिघडल्याने श्रेयाचा गणिताचा पेपर अपूर्ण राहणार की काय, अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र पेपर राहिल्याची खंत तिच्या मनात होती. प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिने आपला गणिताचा पेपर पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. विद्यालय प्रशासनाने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व विशेष परवानगी मिळवली. डॉक्टरांनी तपासणी करून विद्यार्थिनीची प्रकृती समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय देखरेखीखाली श्रेयाने थेट रुग्णालयातूनच आपला गणिताचा पेपर पूर्ण केला. विद्यार्थिनीच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या चिकाटीने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 22, 2026 07:03:27
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्याच्या मालशिरसच्या नातेपुतेमध्ये हातावर सुसायड नोट लिहून विवाहिता ने आपले जीवन संपवले आहे. कुटुंबातील चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नातेपुते येथे पायल रणदिवे या 22 वर्षीय विवाहिता ब्युटी पार्लर क्लास करायचा होता. मात्र कुटुंबाने लावलेला क्लास बंद केला. काल सायंकाळी घरात कोणी नसताना पायल ने आत्महत्या केली. तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि जखमांचे हार्ड केस आहेत. त्यामुळे पायलचे वडिलांनी पतीसह सासू-सासरे आणि दीर यांच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे. पायल ने हातावर लिहिलेलं मजकूर: "हसू झालं माझे, माझं पार्लर बंद केले. जीव होता माझा स्वप्न होत ग.. आज पर्यंत शांत बसले पण आता नाही चागल्या आई बापाची लेक आहे म्हणून म्हणून निघून पण नाही गेले.. माझ्या मुळे त्रास झाला त्याच्या साठी माफी मागते.. Sorry"
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 22, 2026 06:48:23
Dhule, Maharashtra:शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथे वर्णेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व सोन्याची वस्तू चोरी करणाऱ्या संशयित चोराला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाल्यानंतर गावकऱ्यांनी साहुर शिवारातील ऊसाच्या शेतात शेतमजूरीसाठी आलेल्या आरोपी मुक्या कांतीलाल पवार (वय ४०, रा. अजनाळे, ता. जि. धुळे) याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याकडे दानपेटीतून चोरी करणात आलेल्या पैसे आढळून आले यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करत पोलिसांनी आरोपीकडून एकूण २३,०५० रुपये रोख रक्कम व अंदाजे १ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा हस्तगत करण्यात आला.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 22, 2026 05:46:58
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी यात्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे... मढी ग्रामपंचायतीकडून मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोधाची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे... ग्रामपंचायत कडून तसा ठराव करण्यात आला आहे मात्र, देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा मुस्लिम समाजाकडून व्यक्त केली जात आहे... त्यामुळे हिंदू-मुस्लिम व्यावसायिकांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून यात्रेच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.... मात्र, मागील वर्षी मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजातील व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोध दर्शवणारा ठराव घेतला होता... या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि हे प्रकरण न्यायालयातही गेले होते... अद्याप अंतिम निर्णय झालेला नसतानाही यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करू देण्याची भूमिका माजी सरपंच तथा प्रशासक संजय मरकड यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे... गेली वर्षात मुस्लिम व्यापार्‍यांना विरोध करणारा ठराव 327 मतांनी हा संमत झाला होता. यात्रा उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात जनावरांची कथन केली जाते ही कथन आता कमी झाली असली तरी काही प्रमाणात होत आहे आणि ही मुस्लिम समाजाकडून होत असल्याने मुस्लिम समाजाला व्यवसाय करू देण्याचा निर्णय योग्य असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे... ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असून सध्या प्रशासक कार्यरत असल्यामुळे संजय मरकड यांना असा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे... तसेच देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा मुस्लिम बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 22, 2026 05:45:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आर्थिक अडचणीमुळे पोटच्या दोन बालकांना एका आईने 40 हजार रुपयांना दत्तक दिल्याचा प्रकार.. अँकर - पैसे घेऊन पोटची दोन मुलांची एका आईने बेकायदेशीर रित्या दत्तक विक्री केल्याची घटना घडली आहे.सांगलीच्या मिरजेमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आईसह चौघां जणांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखল झाला आहे.मिरजेच्या सुभाषनगर येथील एका आईने आपल्या दोन बालकांना कौटुंबिक आर्थिक अडचणीमुळे चाळीस हजार रुपयांना विकल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कक्षाला मिळाली होती,त्यानंतर चौकशी करण्यात आल्यानंतर यामध्ये मनीषा जाधव याईने माधवनगर येथील दोघा दाम्पत्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे आपली दोन पुरुष जातीची बालक दत्तक दिल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये आईसह चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाईट - किरण चौगुले - पोलीस निरीक्षक मिरज शहर.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 22, 2026 05:01:02
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 22, 2026 04:47:52
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 22, 2026 04:03:30
Beed, Maharashtra:माजलगावातील सिमरी पारगाव येथे शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत ट्रॅक्टरसह एक एकर ऊस जळून खाक झाला. ट्रॅक्टरचा चालक पाणी प्यायला गेला असता ट्रॅक्टरच्या हेडमधून ठिणगी किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेलाय. ऊसाचा फड कोरडा असल्याने आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले. ट्रॅक्टर पूर्णतः जळून खाक झाला तर शेतातील सुमारे एक एकर ऊस आगीत भस्मसात झाला. स्थानिक शेतकरी व नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.यानंतर सदरील शेतकऱ्याने तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top