Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

रुग्णों के साथ खिलवाड़ करने वाले डॉक्टर दंपत्ति गिरफ्तार

SGSagar Gaikwad
Feb 22, 2026 08:45:26
Nashik, Maharashtra
रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डॉक्टर दांपत्याला अटक अँकर वैद्यकीय परवाना व मान्यताप्राप्त पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करून शेकडो रुग्णांच्या जिवाशी खेळ केल्याप्रकरणी डॉ. जयदीप सलील घोषाल व डॉ. सुजाता जयदीप घोषाल (पिंगे) या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे....नाशिक शहरातील विसे मळा परिसरात या बोगस डॉक्टर दाम्पत्याने वैद्यकीय पदवी नसतानाही त्वचारोगतज्ज्ञ असल्याचे भासवून उपचार केल्याचा तसेच बेकायदा प्लास्टिक सर्जरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता... याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार देवकर यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी घोषाल दाम्पत्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले होते. पीडित शुभम गुजर काही महिन्यांपूर्वी चेहऱ्यावरील त्वचारोगाच्या उपचारासाठी स्किनरेला क्लिनिकमध्ये गेला होता. मात्र योग्य पात्रता नसताना चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या उपचारांमुळे त्याच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली. या घटनेनंतर प्रकरणाला वाचा फुटली आणि तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे बाईट- शुभम गुजर (पीडित)
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Feb 22, 2026 10:20:05
Virar, Maharashtra:Virar Viral Video: सापासोबत स्टंटबाजी बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू सोशल मीडियावर व्हिडीओ बनवण्यासाठी किंवा अति उत्साहाच्या भरात अनेकजण नको ते धाडस दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. कधी कधी अशा प्रकारचे धाडस करणं ही जीवावर बेतू शकते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्याने सापाला हातात पकडून त्याच्या सोबत मस्ती करणे त्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सापाची छेड काढणे आणि विनाकारण त्याच्याशी खेळणे हे अनेकांना महागात पडू शकते हे तुम्ही ऐकलं असेल, पण त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात हे विरारच्या व्हायरल व्हिडिओमधून समोर आहे आहे. एका व्यक्तीने सापासोबत केलेली मस्ती त्यांच्या अंगलट आली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विरार पश्चिमेच्या नवापूर येथील भागात साप आला होता. याच वेळी मद्याच्या नशेत असलेल्या एका तरुणाने त्याला पकडले. व त्यांच्या सोबत मस्ती सुरू केली होती. या सापासोबतचा हा स्टंट त्याला भलताच भारी पडला.या विचित्र चाळ्यातून याच सापाने त्याला दंश केला. त्यामुळे तेथील नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या खारोडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजू चंदू बरड (४०) असे या मयत तरुणाचे नाव आहे. साप गळ्यात घेऊन फिरत असताना त्याच्या हाताला दंश झाला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 22, 2026 10:06:18
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवलीतल्या 65 रेरा इमारती मधील समर्थ कॉम्प्लेक्सला नोटीस. सहा मार्च पर्यंत इमारत खाली करा नाहीतर कारवाई करू महापालिकेची नोटीस.. कल्याण डोंबिवली मधील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारती मधील डोंबिवली आयरे गावातील समर्थ कॉम्प्लेक्सला KDMCची पुन्हा नोटीस दिली आल्याने इमारती मधील रहिवासी चितेत. आम्ही घर घेऊन चूक केली का ? मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री ,आमदार आश्वासन देतात मात्र त्यानंतर ही कारवाईची नोटिस येते इमारतीवर कारवाई झाल्यास आमच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही . समर्थ कॉम्प्लेक्स मधील महिलांचा टाहो निवडणुकांचा संपल्यानंतर कल्याण डोंबिवली मधील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारातीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे . 65 इमारतींमधील डोंबिवली आयरेगाव परिसरातील समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीला केडीएमसीने पुन्हा एकदा नोटीस दिली आहे जागेच्या वादातून न्यायालयाच्या आदेशानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार या इमारतीला नोटीस दिल्याचे एडीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे मात्र पुन्हा एकदा नोटीस आल्याने या समर्थ कॉम्प्लेक्समधील रहिवाशांमध्ये एकच भीतीच वातावरण पसरले आहे. परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने या इमारतीमध्ये राहणारे विद्यार्थी देखील तणावात आहेत. समर्थ कॉम्प्लेक्स मधील अनेक कुटुंंबीयांचे घराचं लोन देखील सुरू आहे इमारतीवर कारवाई झाल्यास पुढे काय करायचं कुठे जायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रकरणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदारांनी देखील इमारतींवर कारवाई होणार नाही असे आश्वासन दिले मात्र त्यानंतरही या नोटीस येत असल्याने रहिवाशी रहिवाशांमध्ये चिंतेचा वातावरण आहे आम्ही आमची जमापुंजी या घरांमध्ये लावली आहे तर कारवाई होणार असेल तर आमच्याकडे आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही तुम्ही कारवाई करा आम्ही आत्महत्या करतो असा काहो या महिलांनी माध्यमांसमोर मांडला . त्यामुळे एकंदरीतच आता या इमारतीाबाबत सरकार राजकीय नेते केडीएमसी न्यायालय काय भूमिका घेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर याबाबत सहाय्यक आयुक्त भरत पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही इमारत 65 इमारतींमधीलच आहे मात्र जागामालकाच्या वादातून न्यायालयाने इमारत निष्काशीत करण्याचे आदेश दिलेत आयुक्तांच्या सूचनेनुसार या इमारतीवर कारवाई करण्यात येणार आहे त्या संबंधित या इमारतीला सहा तारखेपूर्वी घरे रिकामे करण्याचे नोटिसा देण्यात आले असल्याचे सांगितले एक तर आम्हला व्याजासहित पैसे दया नाहीतर आम्हला जीवदेण्या पलिकेडे काही उरलं नाही.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 22, 2026 08:57:27
Gadchiroli, Maharashtra:नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता 62 वर्षीय देवजी उर्फ थिप्पीरी तिरुपती याने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. त्याने तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात आपल्या सहकाऱ्यांसह शस्त्र खाली ठेवल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत दोन दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस प्रशासनाने या घडामोडीला दुजोर दिलेला नसला तरी या वृत्ताचे खंडन देखील केलेले नाही. या मोठ्या घडामोडीने देशातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याची स्पष्टता झाली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पूर्वी देशातून नक्सलवादाचे उच्चाटन करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यानुसार देशभर अभियान राबविले जात आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये नक्सलवाद्यांचा थिंक टॅंक समजला जाणारा भूपती उर्फ सोनूदादा यांनी गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मा समर्पण केले होते. त्यानंतरच्या काळात कुख्यात नक्सल कमांडर हीडमा याचाही चकमकीत मृत्यू झाला होता. नक्षल चळवळ खिळखिळी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च नेता देवजी याला आत्मसमर्पण करण्याचा दबाव होता. त्याला यश आल्याचे समजत आहे. त्याच्यावर विविध राज्य सरकारांचे एकूण दहा कोटी बक्षीस होते.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 22, 2026 08:53:23
Bhandara, Maharashtra:चेन्नई समुद्र दुर्घटना – महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला. महाराष्ट्रातील 15 विद्यार्थी Cognizant या IT कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी चेन्नई येथे गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार काल सुट्टी असल्याने 26 विद्यार्थी चेन्नई–पुडुचेरी रोडवरील कंथाट्टूर पोलीस स्टेशन हद्दीतील समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. तेथील मंदिरात दर्शन देखील घेतले व नंतर समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले. समुद्र सामान्य दिसत असला तरी या किनाऱ्यावर अचानक 10 ते 15 फूट उंच लाटा नेहमीच उसळतात. पण हा मनमोहक दृश्य आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्यासाठी मुले सेल्फी घेत असताना अचानक समुद्र खळखळला व मोठ्या लाटा उसळत लाटेने तिघांना समुद्रात ओढले. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला तिचं नाव मयुरी चौधरी असून भंडारा जिल्ह्याच्या वरठी येथील रहिवासी आहे. जळगाव जिल्ह्यातील एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. तर एका विद्यार्थ्याला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 25 दिवसांपूर्वी मयुरी चेन्नई येथे गेली होती. स्वप्नाची भरारी घेण्यापूर्वीच मयुरीने जगाचा निरोप घेतला. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तमिळनाडू सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे. शोधमोहीम वेगाने सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाकडून बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. समुद्रकिनारी जाताना सतर्कता बाळगणे किती आवश्यक आहे, याची ही वेदनादायी आठवण आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 22, 2026 08:32:29
Latur, Maharashtra:निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे सख्ख्या भावाकडून सख्ख्या भावाचा खून…नात्याला काळिमा फासणारी घटना उघड…. शेतजमिनीच्या वादातून झाला खून... खून करून केला अपघाताचा बनाव... पोलीस तपासातून धक्कादायक माहीती उघड… गुलाब विलास खरोसे यांचा मृत्यू प्रकरणात धक्कादायक वळण… आरोपी भाऊ उल्हास विलास खरोसे अटकेत…\nनिलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे नात्याला काळिमा फासणारी थरारक घटना उघडकीस आली आहे. शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. या घटनेत गुलाब विलास खरोसे या युवकाचा मृत्यू झाला असून सुरुवातीला हा अपघात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. मात्र कासारशिरसी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेला संशय बळावला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली. सखोल चौकशीनंतर हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपी भाऊ उल्हास विलास खरोसे याला अटक करण्यात आली आहे....
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 22, 2026 07:34:21
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात जिद्दीचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले. गणिताचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेलेल्या एका विद्यार्थिनीला अचानक भोवळ आली. श्रेया देशमुख असे या विद्यार्थिनीचे नाव असून घटनेनंतर विद्यालय प्रशासनाने तत्काळ तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अचानक तब्येत बिघडल्याने श्रेयाचा गणिताचा पेपर अपूर्ण राहणार की काय, अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र पेपर राहिल्याची खंत तिच्या मनात होती. प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिने आपला गणिताचा पेपर पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. विद्यालय प्रशासनाने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व विशेष परवानगी मिळवली. डॉक्टरांनी तपासणी करून विद्यार्थिनीची प्रकृती समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय देखरेखीखाली श्रेयाने थेट रुग्णालयातूनच आपला गणिताचा पेपर पूर्ण केला. विद्यार्थिनीच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या चिकाटीने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 22, 2026 07:03:27
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्याच्या मालशिरसच्या नातेपुतेमध्ये हातावर सुसायड नोट लिहून विवाहिता ने आपले जीवन संपवले आहे. कुटुंबातील चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नातेपुते येथे पायल रणदिवे या 22 वर्षीय विवाहिता ब्युटी पार्लर क्लास करायचा होता. मात्र कुटुंबाने लावलेला क्लास बंद केला. काल सायंकाळी घरात कोणी नसताना पायल ने आत्महत्या केली. तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि जखमांचे हार्ड केस आहेत. त्यामुळे पायलचे वडिलांनी पतीसह सासू-सासरे आणि दीर यांच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे. पायल ने हातावर लिहिलेलं मजकूर: "हसू झालं माझे, माझं पार्लर बंद केले. जीव होता माझा स्वप्न होत ग.. आज पर्यंत शांत बसले पण आता नाही चागल्या आई बापाची लेक आहे म्हणून म्हणून निघून पण नाही गेले.. माझ्या मुळे त्रास झाला त्याच्या साठी माफी मागते.. Sorry"
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 22, 2026 06:48:23
Dhule, Maharashtra:शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथे वर्णेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व सोन्याची वस्तू चोरी करणाऱ्या संशयित चोराला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाल्यानंतर गावकऱ्यांनी साहुर शिवारातील ऊसाच्या शेतात शेतमजूरीसाठी आलेल्या आरोपी मुक्या कांतीलाल पवार (वय ४०, रा. अजनाळे, ता. जि. धुळे) याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याकडे दानपेटीतून चोरी करणात आलेल्या पैसे आढळून आले यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करत पोलिसांनी आरोपीकडून एकूण २३,०५० रुपये रोख रक्कम व अंदाजे १ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा हस्तगत करण्यात आला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top