Back
सांगली जिला परिषद में महाविकास आघाड़ी ने भाजपा को सत्ता से रोका
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 12:32:50
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम...नव्या समीकरणाची नांदी... अँकर - सांगली जिल्हा परिषदेमध्ये अखेर भाजपाचा करेक्ट कार्यक्रम झालाय,जयंत पाटील विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या त्रिमूर्तीनी भाजपला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून रोखत,महाविकास आघाडीचा झेंडा सांगली जिल्हा परिषदेवर फडकवलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटात पडलेली उभी फुट हे महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली,त्या जोरावर महाविकास आघाडीने भाजपाला सांगली जिल्हा परिषदेत सत्ते पासून रोखले आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम महाविकास आघाडीने फडकवला जिल्हा परिषदेवर झेंडा जयंत पाटील,विश्वजीत कदम आणि विशाल पाटील त्रिमूर्तीनी भाजपचा केला करेक्ट कार्यक्रम राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेऊन भाजपाला सत्तेपासून ठेवलं चार हात लांब सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाला बसला मोठा धक्का व्हि वो - सांगली जिल्हा परिषदेत सत्तेपासून भाजपाला रोखण्यात महाविकास आघाडीला अखेर यश आले आहे. भाजपाचा अध्यक्ष होईल असा दावा वारंवार पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून करण्यात येत होता मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फिरवत,सांगली जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस ( SP ) व्ही वो - वास्तविक सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हता,मात्र काँग्रेस महाविकास आघाडी ही सत्तेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली होती,महाविकास आघाडीचे 30 सदस्य संख्या निवडून आले,अवघ्या एका जागेमुळे महाविकास आघाडी ही सत्तेपासून दूर होती,भाजपाचे अवघे 16 सदस्य निवडून आले होते ,तर शिवसेना शिंदे गटाचे सात,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा असे सदस्य आणि जनसुराज्य व रयत क्रांती संघटनेचे प्रत्येकी एक,त्यामुळे भाजपाच्या सत्तेची मदार मित्र पक्षांवर अवलंबून होती. एक नजर टाकूया पक्षीय बलाबलवर.. भाजपा - 16 राष्ट्रवादी अजित पवार - 06 शिवसेना शिंदे पक्ष - 07 रयत क्रांती संघटना - 01 जनसुराज्य शक्ती पक्ष - 01 काँग्रेस - 11 राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - 18 शिवसेना ठाकरे पक्ष -01 व्ही वो - जिल्ह्यातील स्थानिक राजकारण जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर संघर्ष व भाजपा विरोधात असणारा रोष, यामुळे जयंत पाटील,विश्वजीत कदम,विशाल पाटील,रोहित पाटलांनी एकत्रित एक राष्ट्रवादी अजित पवार गटाला निवडणूक आधीच सोबत घेतलं होतं,त्यामुळे निवडणुकीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जोरावर सत्ता स्थापनेची व्यूहरचना आखली होती. व्हि वो - परंतु महायुती म्हणून राज्यातल्या सत्तेच्या समीकरणाप्रमाणेच जिल्हा परिषद सत्तेत देखील राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत येईल,अशी अपेक्षा भाजपाला होती, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटात उभी फूट पडल्याने चार सदस्य हे महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्याने,भाजपाची गोची झाली,मात्र तरी देखील निवडणुकीत चमत्कार होईल,अशी अशा शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाच्या नेत्यांना होती. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार - भाजपा. व्ही वो - काँग्रेस राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी एकत्रित भाजपाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून रोखायची अशी रणनीती आखली होती,माजी खासदार संजयकाका पाटील,यांनी ऐनवेळी भाजपाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत ऐनवेळी ट्विस्ट येण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात होती. बाईट - संजयकाका पाटील - माजी खासदार, - राष्ट्रवादी अजित पवार . व्ही वो - मात्र राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी माव विकास आघाडी सोबतच जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील या 34 मतांनी अध्यक्ष पदाच्या निवडीत तर उपाध्यक्ष पदाच्या निवडीत काँग्रेसचे ऋषिकेश लाड हे विजयी झाले त्या दोघांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार स्वप्नाली मासाळ जाधव यांचा नव मतांनी पराभव केला. व्ही वो - सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता काबीज करण्यात महाविकास आघाडीने यश तर मिळवलंचं,याशिवाय सांगली जिल्ह्यात भाजपाला रोखण्यासाठी नव्या समीकरणाच्या नांदीची सुरुवात झाल्याचे देखील दाखवून दिलंय..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 12:48:42999
Report
JMJAVED MULANI
FollowMar 18, 2026 12:46:471086
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 12:46:28928
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 18, 2026 12:43:111064
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 12:32:281023
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 12:32:111022
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 18, 2026 12:31:571066
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 12:18:291097
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 18, 2026 12:05:291008
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 11:51:031041
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:48:221024
Report
KJKunal Jamdade
FollowMar 18, 2026 11:34:041019
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 11:30:371073
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 11:16:21996
Report