Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

आखाती युद्ध से सांगली की हल्दी पर संकट, निर्यात रुकी, कीमतें गिरी

SMSarfaraj Musa
Mar 06, 2026 08:21:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Pkg Sng_halad_dar स्लग - आखाती युद्धामुळे सांगलीच्या हळदीला फटका... हळदीचे दर घसरले.. अँकर - हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे,जगप्रसिद्ध असणार ही बाजारपेठ आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीमुळे आता संकटात सापडण्याची शक्यता आहे.देश भरातील हजारो टन हळद बंदर आणि जहाजांमध्ये अडकून पडली आहे,याशिवाय स्थानिक हळदीचे दर देखील घसरले आहेत. ग्राफिक्स in सांगलीच्या सोनेरी हळदीवर आखाती देशातील युद्धाचं संकट इराण-इजराईल अमेरिका युद्धामुळे हजारो टन हळद जहाज व बंदरावर अडकुन सांगली जिल्ह्यातुन गेलेली 350 टन हळद निर्यात अभावी पडली अडकुन जगात सांगलीची हळद उच्च प्रतिची म्हणून गणली जाते जागतिक पातळीवरील मसाल्या कंपनीकडुन सांगलीच्या हळदीचा केला जातो त्यामुळे सांगलीच्या हळदीला युरोप पाठोपाठ आखाती देशात देखील मोठी मागणी असते.. ग्राफिक्सवर out व्ही वो - सांगलीतली हळदीला आखाती देशातल्या युद्ध मुळे फटका बसत आहे. जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे,सांगलीत पिकणाऱ्या हळदीत कर्क्युमन अधिक असतो,त्यामुळे जगात सांगलीच्या हळदीला चांगली मागणी आहे, त्यामुळे हळदीचे जगातले दर हे सांगलीच्या बाजारपेठेत ठरतात. Wkt व्ही वो - सांगलीच्या हळदीच्या बाजारपेठेत सध्या हळदीचे साडेचौदा हजार रुपये सरासरी दर आहेत.मात्र हे दर आता आखाती देशातल्या युद्धामुळे घसरले आहेत, जवळपास साडेतेरा हजार रुपये सरासरी इतका दर प्रतिक्विंटल हळदीला मिळाला आहे. सांगलीच्या बाजारपेठेतून हळद 15 ते 20% हळद ही निर्यादीसाठी खरेदी केली जाते,मात्र आता ही खरेदी थांबली आहे. बाईट - मनोहर सारडा - हळद व्यापारी - सांगלי. व्ही वो - अगदी देशातल्या युद्ध परिस्थितीमुळे मुंबईच्या बंदर आणि जहाजांमध्ये जवळपास सांगली जिल्ह्यातील साडेतीनशे टन हळद अडकली आहे याशिवाय देशांतर्गत जाणारी हजारो टन हळद अडकली आहे आणि याचा परिणाम आता हळदीच्या खरेदी विक्रीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. निर्यात थांबल्यामुळे हळदीचे दर घसरले आहेत, त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी यांना मोठा फटका बसला आहे. व्ही वो - हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगला दर मिळाला होता,मात्र आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम थेट सांगलीच्या हळदीवर झाला पाहायला मिळत आहे, त्यामुळे आखाती देशातील युद्ध कधी थांबणार आणि हळदीची निर्यात कधी होणार याची प्रतीक्षा शेतकरी आणि व्यापारयांना लागली आहे。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 06, 2026 12:45:32
Ambernath, Maharashtra:बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणारी सोनल गरेवाल पाठवायची महिलांचे व्हिडिओ कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसताना हाताळायची सोनोग्राफी मशीन सोनोग्राफी सेंटरचा परवाना रद्द, सेंटर सील Anchor - बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर येतीय. या प्रकरणात उल्हासनगरतून अटक करण्यात आलेली सोनल गरेवार ही महिला प्रशिक्षण नसताना सोनोग्राफी मशीन हाताळायची. तसंच टोळीला महिलांचे 30 सेकंदाचे व्हिडिओ बनवून पाठवायची अशी माहिती पोलीस तपासात समोर आलीय. उल्हासनगर मधील एका सोनोग्राफी सेंटरमधून सोनल गरेवाल हिला पोलिसांनी अटक करण्यात आली होती. संबंधित सेंटरचा परवाना रद्द करण्यात आलाय तसंच हे सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आलय. उल्हासनगर आरोग्य अधिकाऱ्यांनी या सोनोग्राफी सेंटरमध्ये पाहाणी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केलीय. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आलीय.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 06, 2026 12:31:12
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या शिवजयंती मिरवणुकीत ‘एपस्टीन फाईल्स’वर ठाकरे गटाचा वादग्रस्त चित्ररथ पोलिस हस्तक्षेपानंतरही कारवाईच्या मागणीवर शिवसैनिक ठाम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे कल्याणमध्ये दरवर्षी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंती मिरवणुकांमध्ये विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ हे विशेष आकर्षण असते.यंदा कल्याण पश्चिमेतील रामबाग शाखेकडून ‘एपस्टीन फाईल्स’ संदर्भातील देखावा साकारण्यात आला आहे. शिवसेनेचे उपनेते विजय साळवी त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून हा देखावा तयार करण्यात आला आहे. अमेरिकेच्या United States Department of Justice कडून जाहीर झालेल्या कथित एपस्टीन फाईल्समध्ये काही भारतीय व्यक्तींचा उल्लेख असल्याचा मुद्दा या देखाव्यात मांडण्यात आला आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून या प्रकरणात भारतातील मंत्री, नेते, उद्योजक, कलाकार आणि खेळाडू यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवलेल्या स्त्री सन्मानाच्या संस्कृतीचा संदेशही या देखाव्यातून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा छत्रपतींनी मातेसमान सन्मान केल्याचा प्रसंगही चित्ररथात दाखवण्यात आला आहे. दरम्यान, चित्ररथावर काही शासकीय आणि संविधानिक पदांवरील व्यक्तींची नावे दाखवण्यात आल्याने पोलिसांनी आयोजकांना ती काढण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या सूचनेनंतर काही नावे चित्ररथातून हटवण्यात आली असली तरी संबंधितांवर चौकशी व कारवाईची मागणी कायम ठेवण्यात येणार असल्याची भूमिका ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 06, 2026 12:05:24
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील अनिता माळगे यांनी " यशस्विनी " च्या माध्यमातून उभा केल्या thousand महिलया उद्योजक ( महिला दिन विशेष ) अनिता माळगे... खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिता माळगे यांच्या प्रेरणादायी यशोगाथेची माहिती घेत त्यांना शाब्बासकीची थाप दिलीय. अनिता माळगे यांनी सोलापुर जिल्ह्यात 2015 साली केवळ महिलांच्या विकासासाठी यशस्विनी ऍग्रो प्रोड्यूसर नावाची कंपनी स्थापन केली. यशस्विनी ऍग्रो ही राज्यातील पहिली शेतकरी उत्पादन महिला कंपन्या असून मागील दहा वर्षात अडीच हजारांपेक्षा जास्त यशस्वी महिला उद्योजक घडवल्या आहे। यशस्विनी ऍग्रोच्या सर्वेसर्वा अनिता माळगे यांच्या आज पर्यंतच्या वेगवेगळ्या कार्याची दखल अनेक संस्था आणि संघटनांनी घेतलीय. आपला पंचक्रोशीतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनिता माळगे यांनी महिलांना ट्रॅक्टरचे प्रशिक्षण देणे, कुक्कुटपालन, रिक्षा चालवणे, आठवडी बाजार भरवणे असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. अनिता माळगे यांची सोलापूर जिल्ह्यात मिलेट वुमन म्हणून देखील ओळख आहे. जी ट्वेंटी परिषदेमध्ये अनिता माळगे यांनी एक महिला उद्योजक म्हणून आपला सहभाग नोंदविला होता. शासनाच्या विविध योजनांचे महिला शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे प्रसंगी आवाज उठवण्याचे देखील काम अनिता माळगे यांनी केले आहे. यशस्विनी उद्योगसमूहाला पुढे: ग्रामीण भागामध्ये महिलांनी घराबाहेर कामाला जायचं नाही अशी पद्धत आज देखील बघण्यासाठी. मात्र यशस्वीनी ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून अनिता माळगे यांनी ग्रामीण भागातील महिलांवरच विशेष काम केले आहे. खेडोपाड्यातील महिलांना विविध उद्योगांच्या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध करून दिलाय. यामुळे अनेक महिलांचा संसाराचा गाडा सुरळीत होण्यास मदत झालीय. कॉलेज महिलांनी आपला अनुभव झी - 24तासशी बोलताना सांगितले आहेत. यशस्विनी उद्योगसमूहाला पुढे: भविष्यात राज्यात विविध ठिकाणी महिलांसाठी मॉलची उभारणी देखील करण्यात येणार आहे यामध्ये केवळ शेतीशी निगडित वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. यात सोबत सोलापूर जिल्ह्यात विविध प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट बनवणे, विविध फळांपासून, पालेभाज्यांपासून पावडर निर्मिती करणे अशा पद्धतीचे प्रोजेक्टची उभारणी युद्ध पातळीवर सुरू आहे. म्हणूनच अनिता माळगे आणि यशस्वीिनी उद्योगसमूहाला अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खुप सार्‍या शुभेच्छा.... अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 06, 2026 11:31:51
Kolhapur, Maharashtra:धक्कादायक! पोषण आहाराच्या पाकिटात आढळली मेलेली बेडकी; गगनबावडा तालुक्यातील संतापजनक प्रकार. Anc:- गर्भवती माता आणि लहान मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या 'पोषण आहारा'बाबत एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. गगनबावडा तालुक्यातील शेणवडे पैकी चौगुलेवाडी येथे अंगणवाडीतून वाटप करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेली बेडकी मृतावस्थेत आढळून आल्याने पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागांतर्गत (ICDS) गर्भवती माता आणि सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना सकस आहार दिला जातो. यामध्ये डाळ, तांदूळ, तिखट, मीठ आणि 'सुकडी'च्या पाकिटांचा समावेश असतो. चौगुलेवाडी येथील अंगणवाडीतून लाभार्थ्यांना या आहाराचे वाटप करण्यात आले होते. मात्र, एका लाभार्थ्याने जेव्हा 'सुकडी'चे पाकीट उघडले, तेव्हा त्यात मेलेली बेडकी मृतावस्थेत आढळली. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. सरकारी योजनेतून मिळणाऱ्या अन्नातच जर अशा प्रकारे घाण आणि मृत प्राणी आढळत असतील, तर मुलांच्या आणि मातांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यामध्ये या पोषण आहाराचा पुरवठा एकाच ठेकेदाराकडून केला जातो. त्यामुळे पॅकेजिंगच्या वेळी ही बेडकी पाकिटात गेली कशी? उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छतेचे निकष पाळले जातात का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आता पालकवर्गातून जोर धरू लागली आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 06, 2026 11:18:04
Latur, Maharashtra:लातूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात खाजगी इंग्लिश माध्यमाच्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आपल्या मुलांनी इंग्लिश माध्यमात शिक्षण घ्यावे अशी पालकांची इच्छा वाढली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची क्षमता, सुरक्षितता आणि नियमांचे पालन होते का, याकडे मात्र कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. याचाच फायदा घेत काही खाजगी शाळांकडून विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक केली जात असल्याचा प्रकार निलंगा येथे समोर आला आहे. सात प्रवाशांची क्षमता असलेल्या कट ऑटोमध्ये तब्बल 19 ते 20 विद्यार्थ्यांना कोंबून ने-आण केली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. संतप्त पालकांनी या ऑटोचा व्हिडिओ काढत चालकाला जाब विचारला असून, वारंवार सूचना देऊनही शाळा प्रशासन, आरटीओ आणि पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया याच संदर्भातील ZEE 24 TAAS चार स्पेशल रिपोर्टमधून… दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वारंवार सूचना देऊनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षााबाबत कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या वाहनांची आरटीओकडून नियमित तपासणी होते का? जर तपासणी होत असेल, तर क्षमतेपेक्षा तिप्पट विद्यार्थी घेणारी अशी वाहने रस्त्यावर कशी चालतात? शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी असलेली जागा मानली जाते. मात्र क्षमतेपेक्षा तिप्पट विद्यार्थ्यांना कोंबून, तांत्रिक बिघाड असलेल्या वाहनातून ने-आण केली जात असेल तर हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळच ठरतो. आता या गंभीर प्रकारावर प्रशासन काय कारवाई करते, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा आणि वाहन चालकांवर कारवाई होते का आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 06, 2026 11:05:28
Chendhare, Maharashtra:सड़क- Mumbai Goa महामार्गावर प्रवासासाठी अब टोल भरावा लागणार... आठवडाभरात अधिसूचना जारी होणार... महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच टोलवसुली? 13 वर्षे रखडलं आहे महामार्गाचे काम... अँकर - तब्बल 13 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण असतानाच प्रवाशांकडून टोल वसुलीचा घाट घातला जातोय. महामार्गावर ठिकठिकाणी उभारलेले टोलनाके कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवडा भरात याबाबतची अधिसूचना जारी होणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी दिलीय. हे टोलनाके सुरू झाल्यास कोकणात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. निधीची कमतरता, ठेकेदाराची निष्क्रियता, भूसंपादनातील अडचणी यामुळे हे काम रखडलं आहे. कुठे आहेत टोलनाके ? रायगड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात खारपाडा आणि खांब या दोन ठिकाणी टोल द्यावा लागणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पोलादपूर जवळ लोहारे येथे टोल वसून केला जाणार आहे. खारपाडा आणि खांब येथील टोल नाक्यांच्या उभारणीच्या कामांना वेग आला आहे. टोलनाक्यांची दुरुस्ती करून त्यांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. टोल नाक्यांवरील सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित झाली आहेत. टोल कर्मचाऱ्यांसाठी केबिन्स नव्याने उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच महामार्गावरील टोल नाके कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. टोल किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येत्या आठवड्यात टोल अधिसूचना प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतरच प्रवासाठी किती टोल द्यावा लागेल याची स्पष्टता होणार आहे अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कुठे कुठे रस्‍त्‍यांची कामे अर्धवट ? नागोठणे येथील उड्डाणपूलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. दोन्‍ही बाजूच्‍या सर्व्‍हीस रोडचीही दुरवस्‍था कोलाड येथील उडाणपूल आणि सर्व्हीस रोडचे काम प्रगतीपथावर आहे. माणगाव आणि इंदापूर येथील बायपासची कामे अपूर्ण असून या दोन्‍ही ठिकाणी प्रत्‍येकी एक लेन मे अखेरपर्यंत वाहतूकीसाठी खुली करण्‍याचा मानस आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 06, 2026 11:03:28
Nashik, Maharashtra:रनिंग करणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात समोर आली होती. या मुलीने पालकांना सांगण्याऐवजी थेट सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत नाशिक पोलिसांकडे मदतीची मागणी केली होती. या व्हिडिओमध्ये दुचाकीवरून आलेल्या एका मुलाने छेड काढल्याचा आरोप करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकर्‍यांनी पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक पोलिसांनी तपास सुरू केला. मुलीने दिलेल्या माहितीनुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. या तपासातून हिमांशू झा असे आरोपीचे नाव समोर आले असून तो वकिलीचे शिक्षण घेत आहे. गंगापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांच्या तत्परतेची चर्चा होत आहे...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 06, 2026 09:37:13
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील उगवा फाटा ते आगार तसेच रेल्वे गेट ते अमानतपूर, भोड आणि हातरुण या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज मोठे आंदोलन छेडले. या रस्त्यांचे डांबरीकरण तसेच काही ठिकाणी नवीन पुलांचे बांधकाम करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.याच पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केले. संबंधित रस्त्यांचे डांबरीकरण व पुलांचे बांधकाम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी यापूर्वीही अनेकदा करण्यात आली होती.दरम्यान, 12 फेब्रुवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र टेंडर रद्द झाल्याने 20 फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले होते, तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आज तीव्र आंदोलन छेडले. विशेष म्हणजे या कामासाठीचा निधी अनेक महिन्यांपूर्वीच मंजूर झाल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 06, 2026 09:35:35
Wardha, Maharashtra:*वर्धा ब्रेकिंग* SLUG : 0603_WARDHA_MORCHA - भारत नागपाल हत्याकांडतील आरोपीना फाशीची शिक्षा द्या! - प्रकरणाचा तपास जलदगतीने करत खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा - वर्धेत निघाला मुक विरोध मोर्चा - भारत नागपाल यांच्या दोन वर्षाचा चिमुकला सुद्धा मोर्चात सहभागी भारत नागपाल यांची होळीच्या पूर्वसध्येला वाळू घाटात कट रचून हत्या करण्यात आली होती. नागपाल पूलगांव येथील उद्योजक असून भाजपाचा महामंत्री होता. नागपालच्या हत्येचे पडसाद विधानसभेत सुद्धा पाहायला मिळाले. या घटनेच्या निषेधात आज वर्धेच्या नामदेव मठ येथून मूक विरोध मोर्चा काढण्यात आलं. मोर्चा शहराच्या मुख्यमार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. या मोर्चात भारत यांचा नागपाल यांचे बंधू दिनेश आणी राम हे सुद्धा उपस्थित होते. शहरात काढण्यात आलेल्या या मूक मोर्चात महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यासोबतच पंजाबी समाज आणी मित्र परिवार सुद्धा भरतला न्याय देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला दिसला. नेत्यांनी या धंद्यात उडू घेऊ नये असे आवाहन पण केले आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 06, 2026 09:31:16
Satara, Maharashtra:सातारा -पारंपारिक शेती, महिलांचा सहभाग आणि नाविन्यपूर्ण प्रयोग yांचा संगम झाला तर छोटंसं गावही मोठी ओळख निर्माण करू शकतं. साताऱ्याच्या जावली तालुक्यातील कुसुंबी गावानं हे करून दाखवलं आहे. कधी दुष्काळाशी झुंज देणारं हे गाव आज “नाचणीचं गाव” म्हणून देश-विदेशात ओळखलं जातं. चला पाहूयात हा खास रिपोर्ट… व्हिओ 1 -साताऱ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं कुसुंबी हे छोटंसं गाव…साधं सरळ जीवन… पण शेतात काम करण्याची जिद्द आणि मेहनत…याच जोरावर या गावानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.एकेकाळी केवळ काही एकरांमध्ये घेतली जाणारी नाचणी…आज तब्बल सातशे हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते.कुसुंबीच्या नाचणीचा खमंग सुवास आता सातासमुद्रापर पोहोचला आहे.या गावातील जवळपास 250 महिला या नाचणी शेती आणि नाचणीपासून बनवलेली खाद्यपदार्थ उत्पादने तयार करण्यात सक्रिय आहेत,आणि त्यातून दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत.या यशामागे मोठा वाटा आहे तो संगीता वेंदे यांच्या प्रयत्नांचा.संगीता वेंदे यांनी गावातील महिलांना एकत्र आणत नाचणीवर विविध प्रयोग केले आणि नाचणीपासून तयार होणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांची निर्मिती सुरू केली.आज या महिलांच्या माध्यमातून नाचणीचे लाडू, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, केक आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ तयार केले जातात. बाईट - संगीता वेंदे व्हिओ 2 -या सर्व उत्पादनांना आता परदेशात अमेरिका, ऑस्ट्रेलिया तसेच मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. गावातील 232 महिलांना एकत्र आणत संगीता वेंदे यांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं मोठं काम केलं आहे.या महिलांनी एकत्र येत महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली असून त्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. बाईट - संगीता वेंदे आणि इतर महिला नाचणीचे फायदे कॅल्शियमचा उत्तम स्रोत – हाडे व दात मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त. डायबिटीज नियंत्रणात मदत – नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. फायबर भरपूर – पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. लोह (Iron) मुबलक – शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत. वजन नियंत्रणासाठी उपयुक्त – फायबर जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेले वाटते. हृदयासाठी फायदेशीर – कोलेस्टेरॉल कमी ठेवण्यास मदत. पौष्टिक आहार – प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात. लहान मुलांसाठी व वृद्धांसाठी चांगले – शरीराला ताकद आणि ऊर्जा देते. कमी पाण्यात येणारे पीक – शेतकऱ्यांसाठी टिकाऊ आणि दुष्काळातही चांगले उत्पादन देणारे. व्हिओ 3-हेल्दी फूडची जागतिक मागणी वाढत असताना कुसुंबी गावातील संगीता वेंदे आणि इतर महिलांनी नाचणीच्या माध्यमातून शाश्वत शेतीचं उत्कृष्ट उदाहरण घालून दिलं आहे.महिलांचा आत्मविश्वास, शेतकऱ्यांची जिद्द आणि नेतृत्वाची ताकद…यामुळेच आज कुसुंबी गाव “नाचणीचं गाव” म्हणून देश-विदेशात प्रसिद्ध झालं आहे.गावातील महिलांना एकत्र आणून त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम करणाऱ्या संगीता वेंदे यांच्या कार्याला खरंच सलाम. end PTC तुषार तपासे
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 06, 2026 09:22:54
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे बारावी पेपर फुटीच अजून एक महत्त्वाचं केंद्र असल्याचं तपासात उघडकीस आलय.. सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर व्हॉट्सअप च्या माध्यमातून पेपर फुटीच्या प्रकरणानंतर उमरेड येथील शिकवणी क्लासमध्ये सराव परीक्षेतील बरेचसे प्रश्न बोर्डाच्या परीक्षाेत जसेच्या तसे आले होते. बोर्डाकडून चौकशी केल्यानंतर याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली... आणि गुन्हा दाखल करण्यात आला. उमरेड पोलिसांत बारावी पेपरफुटी प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला, उमरेडमधील शिकवणी वर्गाचालक डॉ. अतुल चौधरी पोलिसांनी ताब्यात घेतलेय. 26 जानेवारीला बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली. सराव परीक्षेत दिलेला रसायनशास्त्राचा पेपर आणि बोर्डाचा पेपर जशेच्या तशी आले होते; 50% पेपरमध्ये साधर्म्यता आढळली. या प्रकरणी चौकशी झाली.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 06, 2026 09:04:01
Jalna, Maharashtra:जालना : 108 कोटींचा सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी अभावी रखडला गया. अँकर: जालना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी तसेच कुंडलिका नदी स्वच्छ राहावी यासाठी 108 कोटींचा प्रकल्प सुरू करण्यात आलं होतं, मात्र निधी अभावी काम रखडले. प्रकल्प 2014 मध्ये भूमिपूजन झाला असताना 12 वर्षांनंतरही पूर्ण झालेला नाही. 108 कोटींपैकी कंत्राटदाराला 94 कोटी रुपये दिले गेले असले तरी महापालिकेनं 16 कोटी रुपये दिले नाहीत, त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्याचा प्रश्नचिन्ह बनलेला आहे. या प्रकल्पासाठी पाईपलाईन कुंडलिका नदीतून टाकण्यात आली होती, परंतु अंडर ग्राउंड पाईपलाइनच्या सिमेंट काँक्रिट खड्डे उघडे असल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका यांनी वरिष्ठता देऊनच हा प्रश्न हाताळावा असे नागरिकांचे अपेक्षा आहेत. महापालिका महापौर वंदना मगरे यांनी प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय आणि पर्सनालिटीजचे म्हणणे आहे की निधीची कमतरता दूर केल्याशिवाय योजना पूर्ण होणार नाही. 12 वर्षात 2 वेळा मुदतवाढ देऊनही प्रकल्प पूर्ण झालेला नाही; नागरिकांमधून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 06, 2026 09:03:40
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे इमारतीचा स्लॅब स्लॅब कोसळून चार विद्यार्थी आणि एक शिक्षिका जखमी झाल्या असून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई मनपा विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतलाय. यासोबतच जखमी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च शिवसेना करणार असून मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यावेळी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी सत्ताधारी भाजपावर टीका करत श्वेतपत्रिका काढणाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांची श्वेतपत्रिका काढावी असा टोला लगावलाय.
0
comment0
Report
Advertisement
Back to top