Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

आंबेपूर में शिवसेना के बैनर फाड़े, जिला प्रमुख के आरोप से असंतोष बढ़ा

PPPRAFULLA PAWAR
Feb 02, 2026 04:47:39
Chendhare, Alibag, Maharashtra
जिल्हा परिषद निवडणुकीचा ज्वर शिगेला ...... आंबेपूर मतदार संघात शिवसेनेचे बॅनर फाडले ...... शिवसेनेत संतापाचे वातावरण ....... विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने प्रकार ....... जिल्हाप्रमुख राजा केणी यांचा आरोप .........
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 02, 2026 07:00:39
Latur, Maharashtra:लातूरच्या राजकारणात हप्तेखोरीचा स्फोट... अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर आमनेसामने... निलंगा मतदारसंघातील शासकीय कार्यालयांतून हप्ते जात असल्याचा अमित देशमुख यांचा थेट आरोप....मी बोललो तर लातूर सोडावं लागेल... निलंगेकरांचा देशमुखांना थेट इशारा... लातूर जिल्ह्यातील राजकारणात आता हप्तेखोरीच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात या मुद्द्यावरून जोरदार आरोप–प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आमदार अमित देशमुख यांनी थेट आरोप करत निलंगा मतदारसंघात एकही शासकीय कार्यालय असं नाही, जिथून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना हप्ते जात नाहीत. असा गंभीर आरोप देशमुख यांनी केला आहे. या आरोपांना उत्तर देताना आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आक्रमक होत मी जर बोललो, तर तुम्हाला लातूर सोडून जावं लागेल अशा शब्दांत निलंगेकर यांनी देशमुख यांना थेट इशाराच दिला आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 02, 2026 06:48:22
Nanded, Maharashtra:खाजगीत बजेटची प्रशंसा करतात, पण विरोध केला नाहीतर त्यांची दुकानदारी कशी चालेल? अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या बजेट वरील टिकेबाबत दिली. केंद्र सरकारने बजेटमध्ये काय दिलं हे आम्ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवणार असे बावनकुळे म्हणाले. का घडले, कसे घडले हे ब्लॅक बॉक्स मधून समोर येणारच आहे अमोल मिटकरी यांच्या शंकेवर उत्तर. अजित दादांचा अपघात नेमका कश्यामुळे झाला, काय घडले, कसे घडले हे सर्व ब्लॅक बॉक्स मधून समोर येणारच आहे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अमोल मिटकरी यांनी विमान दुर्घटणेबाबत संशय उपस्थित केलाय. त्यावर बावनाकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राला कलंकित करू नका, या महाराष्ट्राला राजकारणासाठी इतके खाली नेऊ नका की देशात या महाराष्ट्राची पत जाईल अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजप अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांचा कधी गेम करतील सांगता येत नाही असे वक्तव्य न Nana पटोले यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 02, 2026 06:33:02
Shirdi, Maharashtra:लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर लेकर देवांना मोहिनीराजांच्या यात्रेचे निमंत्रण देण्याची अनोखी परंपरा नेवासा येथील मोहिनीराज मंदिरात जपली जातेय.. धगधगत्या अग्नीचे भांडे हातात घेऊन नाचत गात भळंद कार्यक्रम साजरा करण्यात आला.... यात्रेचे हे 256 वे वर्ष असून 5 दिवस मुख्य यात्रा उत्सव साजरा होत असल्याने या कालावधीत लाखो भाविक श्री मोहिनीराजांच्या दर्शनाचा लाभ घेतात. भगवान विष्णू के मोहिनी अवतार के एकमेव स्थान असलेल्या अमृत कुंभनगरी श्रीक्षेत्र नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवानिम्मित मोहिनी मायच्या जयघोषात आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात भळंद कार्यक्रम पार पडला। बोल मोहिनीराज महाराज की जय
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 02, 2026 06:05:28
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर शहरातील मनपावर सत्ता स्थापनेच्या संदर्भात काँग्रेसमधील मतभेद विचित्र वळणावर, धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या घरावर वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाने नोटीस लावल्या, बैठकीला हजर राहण्याचे आवाहन अँकर:-- चंद्रपूर शहरातील मनपावर सत्ता स्थापनेच्या संदर्भात काँग्रेसमधील मतभेद विचित्र वळणावर पोचले आहेत. खा. धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या घरावर विरोधी आ. वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाने नोटीस चक्क नोटीस लावल्या असून बैठकीला हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे. काँग्रेस गट नेता निवड करणे आणि गट नोंदणी करण्यासाठी विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी बैठक आयोजित केली. या बैठकीला न चुकता हजर रहावे या आशयाची नोटीस चिपकविल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आ. वडेट्टीवार आणि खा. धानोरकर अशा दोन गटात विभागले आहेत. वडेट्टीवार यांच्याकडे २० तर धानोरकर यांच्याकडे ७ नगरसेवक असल्याची माहिती आहे. अशातच वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व २७ नगरसेवकांची बैठक बोलावली. या बैठकीची नोटीस धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या हाती देण्याऐवजी त्यांच्या घरावर नोटीस चिपकविण्यात आली. एखाद्याच्या घरावर कुठलीही नोटीस कुठल्याही संदर्भात चिपकवणे हे अवमानकारक मानले जाते. अशा स्थितीत पक्षाच्या अंतर्गत बाबींची नोटीस नगरसेवकांच्या घरावर डकवणे हे कितपत योग्य आहे याबाबतही चर्चाना ऊत आला आहे. या कृतीतून काँग्रेेस पक्षात दोन्ही किती खोलवर गेली आहे हेही स्पष्ट झाले आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 02, 2026 06:01:23
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगला में फळाचा राजा आंबा दाखल, 4 हजार ते 6 हजार 100 रुपये विक्रमी दर. फळांचा राजा आंबा आता सांगलीत दाखल झाला है, विष्णूआण्णा फळ मार्केट में कोकणात कुणकेश्वर देवगड हापूस आंबा दाखल झाला है. यावेळी पार पडलेल्या पहिल्याचं सौदयात 4 हजार पासून 6 हजार 100 रुपये प्रति डझन इतका दर मिळाला आहे. कुणकेश्वर देवगड मधून देवगड हापूस आंब्याच्या 8 ते 10 पेट्याची आवक सांगली फळ मार्केट मध्ये दाखल झाली. ज्या मध्ये दोन ठिकाणी आंब्याचे सौदे पार पडले आहेत. यावर्षी फळ पिकांना पोषक वातावरण आणि पाऊस काळ चांगले झाल्याने मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सांगली फळ मार्केट होणार असल्याचे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदा सांगलीकरांना मनसोक्त आंबा चाखण्यास मिळणार असल्याची चिन्ह आहेत.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 02, 2026 05:46:17
Kolhapur, Maharashtra:महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. हा अस्थिकलश मार्केट यार्ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेकांनी दिवंगत अजित पवार याच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. या अस्थिकलशाचे दर्शन घेत असताना अनेकांना अश्रू आणावर झाले. दरम्यान यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र शुकसागरात बुडाला असल्याचं म्हटल आहे. तसेच हा अपघातच असल्याचे यापूर्वीच शरद पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे यावर चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगितलं. तसंच हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांच्या नाते संबंधांविषयी हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारताच ते भावुक झाले..
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 02, 2026 05:35:42
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: खुल्या बाजारात तुरीच्या दरात मोठी वाढ झाली असून वाशिम जिल्ह्यात नव्या तुरीचे दर प्रतिक्विंटल ९ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीला कमाल ९,१५० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. अतिवृष्टीमुळे यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे दरवाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात ३.३७ लाख टन तुरीची हमीभावाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा निर्णय जाहीर केला असून लवकरच शासकीय खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 02, 2026 05:18:21
Amravati, Maharashtra:अमरावती महापालिकेत आज ठरणार भाजपचा महापौर पदाचा उमेदवार; मिलिंद बांबल, ऋषिकेश देशमुख, आशिष अतकरे ही 3 नावे चर्चेत अमरावतीत भाजपचा महापौर करण्याच्या हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काल नागपुरात बैठक संपन्न झाली असून या बैठकीत मिलिंद बांबल, ऋषिकेश देशमुख, आशिष अतकरेया 3 नावांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. कोअर कमिटीकडे अंतिम मान्यतेसाठी ही तीनही नावे पाठवली असून आज 11 वाजता कोर कमिटीची बैठक होणार असून यावेळी भाजप पुरुष महापौर देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असून 6 फेब्रुवारी रोजी अमरावतीला नवा महापौर मिळणार आहे मॅजिक फिगर जुडविण्यासाठी राजकीय हालचाली वाढल्या असून आकड्यांचे राजकीय गणित सुरू झाले आहे. दरम्यान महापालिकेत एकूण सदस्य 87 आहे तर बहुमतासाठी 44 सदस्यांची गरज आहे. भाजप कडे 25, युवा स्वाभिमान 15 तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 3 नगरसेवक आहे. त्यामुळे भाजप, युवा स्वाभिमान आणि शिवसेनेचे एकूण 43 नगरसेवक होत असून BSP चे 3 नगरसेवक काय भूमिका घेतात हे महत्वाचे आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top