Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

बजट पर मंत्री बावनकुले का तंज: विरोध से दुकानदारी कैसे चलेगी?

SMSATISH MOHITE
Feb 02, 2026 06:48:22
Nanded, Maharashtra
खाजगीत बजेटची प्रशंसा करतात, पण विरोध केला नाहीतर त्यांची दुकानदारी कशी चालेल? अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या बजेट वरील टिकेबाबत दिली. केंद्र सरकारने बजेटमध्ये काय दिलं हे आम्ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवणार असे बावनकुळे म्हणाले. का घडले, कसे घडले हे ब्लॅक बॉक्स मधून समोर येणारच आहे अमोल मिटकरी यांच्या शंकेवर उत्तर. अजित दादांचा अपघात नेमका कश्यामुळे झाला, काय घडले, कसे घडले हे सर्व ब्लॅक बॉक्स मधून समोर येणारच आहे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अमोल मिटकरी यांनी विमान दुर्घटणेबाबत संशय उपस्थित केलाय. त्यावर बावनाकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राला कलंकित करू नका, या महाराष्ट्राला राजकारणासाठी इतके खाली नेऊ नका की देशात या महाराष्ट्राची पत जाईल अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजप अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांचा कधी गेम करतील सांगता येत नाही असे वक्तव्य न Nana पटोले यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Feb 02, 2026 08:20:01
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 02, 2026 08:19:33
Akola, Maharashtra:Anchor : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील ‘शेट्टी टॉवर’ या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित कुख्यात गँगस्टर शुभम लोणकर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे.‘शुभम लोणकर आरा बिश्नोई’ या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये शुभम लोणकर,आरा बिश्नोई, हरी बॉक्सर आणि हरमन शांडू यांच्या नावाने रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे.पोस्टमध्ये “कामात हस्तक्षेप करू नका, असे अनेकदा सांगितले होते, पण ऐकले गेले नाही. हा केवळ ट्रेलर आहे. पुढच्या वेळी गोळ्या छातीत घातल्या जातील,”असा इशारा देत थेट बॉलिवूड उद्योगालाही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्हरी गावचा रहिवासी असल्याच्‍या़ा. याआधीही शुभम लोणकरवर अकोला पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्याकडून तब्बल तीन पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले होते. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असलेल्या शुभम लोणकरला बंदूक तस्‍करी प्रकरणात अकोला पोलिसांनी अटक केली होती.शुभम काही काळ पुण्यातील वारजे परिसरात राहत होता आणि नंतर तो फरार झाला होता.त्यानंतर त्याला पुण्यातून अटक करण्यात आली होती, मात्र पुढे त्याची जामिनावर सुटका झाली होती.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 02, 2026 08:05:39
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार - महापौर विनायक कोंड्याल - सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी विनायक कोंड्याल यांची निवड निश्चित - महापौर म्हणून जाहीर करण्यासाठी केवळ औपचारिकता बाकी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार महापौर विनायक कोंड्याल - सोलापूरकरांसाठी विश्वासाने आणि प्रामाणिकपणे काम करणार - सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांचे आश्वासन याविषयी सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 08:02:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर. *मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर* ऑन एकनाथ शिंदे संभाजीनगर सभा. - आज गंगापूर - वैजापूर मध्यभागी असलेल्या ठिकाणी सभा होणार आहे. जिल्हापरिषद निवडणुकीला मिनी मंत्रालय समजला जात. याचा ग्रामीण भागाला, शेतकऱ्याला मोठा फायदा असते. तेथील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी एकनाथ शिंदे येत आहेत. ऑन अजित पवार फेल आरोप. - अशा चर्चा करणे योग्य नाही.त्यांची फाइल अजूनही मंत्रालयात आहे. तशी मागणी करायची तर वेगळी करा. काय झाले , नाही अशा कथा चालल्या आहेत ते योग्य नाही.चौकशी होऊ द्या.. ऑन जालना हिंगोली वसतिगृहात जेवणात अळ्या. - याप्रकरणी आयुक्त मुंडे यांना सूचना केल्या आहेत. तातडीने कंत्राटदार, अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा आणि अहवाल द्या असे सूचना दिल्या आहेत. ऑन आता राष्ट्रवादी पवार पाटील यांचा पक्ष राहिला नाही. - रात्रीची उतरली नाही तर तो सकाळी बोलायल लागतो.रात्री त्याला स्वप्न पडतात. ऑन संभाजीनगर भाजप आरोप. - भाजप काय टीका करतोय, यापेक्षा भाजपाने काय केले, आम्हाला माहिती आहे. राज्यात युतीत असल्याने एकनाथ शिंदे यांनी शांत राहायला सांगितले आहे. आम्ही टीका करू शकतो मात्र एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाल्यावर उत्तर देऊ... भाजपाने चूक केली आहे. त्यांनी काय केले , युती कशी तुटली समोर हे समोर बसल्यावर सांगतो.. आरोप केले जात आहेत.त्यांच्या या प्रयत्नावर आम्ही पाणी फेरू.. जिल्ह्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सोडून आमची युती आहे. ऑन संभाजीनगर मनपा. - भाजपने आम्हाला प्रस्तावही दिला नाही, आम्ही देखील भाजपला कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही. कल्याण डोंबिवली मनपा सारखे सामंजस्य पाहिजे. ऑन फडणवीस वक्तव्य. - अजितदादा आणि फडणवीस यांची जवळीक होती. म्हणून हे वक्तव्य असेल. आम्हला कल्पना नाही. मात्र वरिष्ठ पातळीवर काय घडले त्यांनाच माहिती... ऑन सामना टीका. - सामनामध्ये काय लिहिले जाते त्यावर जास्त सिरियस घेऊ नका, प्रफुल पटेल, तटकरे हे अजितदादा पुढे जाणारे न्हवते. लीड कोण करणार हे प्रश्न आहे. ऑन बच्चू कडू विधान. - Ed फाईल तयार आहे. हे बच्चू कडू यांना कोठून कळले माहीत नाही, सर्व बेसलेस आहे. ऑन तामिळ रॅली. - तमिळ नेत्यांनी बॉम्बे नाव घेतल्याने त्यावेळी आम्ही सर्वांनी विरोध केला होता, आता देशात जातीच्या पातळीवरचे राजकारण सुरू आहे. आता तमिळ नेत्याने रॅली काढली, मात्र मराठी माणसावर परिणाम होणार नहीं. ऑन अजित पवार - अजित दादा कुठलेही मत मांडायला खंबीर नेते होते. कुठला निर्णय घेतला असता, येावर आता भाष्य करणे योग्य नाहीं . ते गेल्यावर अशा चर्चा करणे योग्य नाही. ऑन गिरगावकर रस्त्यावर ,क्रीडांगण. - कोणतेही क्रीडांगणचा फायदा हा स्थानिक नागरिकांना झाले पाहिजे.स्थानिकांच्या मताशी आम्ही बांधील आहोत. ऑन गौतम अदानी, पवार भेट. - दोघांचे अनेकवर्ष संबंध आहे. काही लोक असे देखील म्हणता त्यांचे औद्योगिक संबंध आहे. त्यांच्या नात्याला,मैत्रीला इतर कंगोरे देणे योग्य नाही. ऑन विमान अपघात 5 की 6 मृत्यू? - याची चौकशी सुरू आहे.चौकशीमधे सर्व समोर येईल, चौकशी होऊ द्या.नंतर बोलू (हिंदी)
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 02, 2026 07:00:39
Latur, Maharashtra:लातूरच्या राजकारणात हप्तेखोरीचा स्फोट... अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर आमनेसामने... निलंगा मतदारसंघातील शासकीय कार्यालयांतून हप्ते जात असल्याचा अमित देशमुख यांचा थेट आरोप....मी बोललो तर लातूर सोडावं लागेल... निलंगेकरांचा देशमुखांना थेट इशारा... लातूर जिल्ह्यातील राजकारणात आता हप्तेखोरीच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात या मुद्द्यावरून जोरदार आरोप–प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आमदार अमित देशमुख यांनी थेट आरोप करत निलंगा मतदारसंघात एकही शासकीय कार्यालय असं नाही, जिथून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना हप्ते जात नाहीत. असा गंभीर आरोप देशमुख यांनी केला आहे. या आरोपांना उत्तर देताना आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आक्रमक होत मी जर बोललो, तर तुम्हाला लातूर सोडून जावं लागेल अशा शब्दांत निलंगेकर यांनी देशमुख यांना थेट इशाराच दिला आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 02, 2026 06:33:02
Shirdi, Maharashtra:लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर लेकर देवांना मोहिनीराजांच्या यात्रेचे निमंत्रण देण्याची अनोखी परंपरा नेवासा येथील मोहिनीराज मंदिरात जपली जातेय.. धगधगत्या अग्नीचे भांडे हातात घेऊन नाचत गात भळंद कार्यक्रम साजरा करण्यात आला.... यात्रेचे हे 256 वे वर्ष असून 5 दिवस मुख्य यात्रा उत्सव साजरा होत असल्याने या कालावधीत लाखो भाविक श्री मोहिनीराजांच्या दर्शनाचा लाभ घेतात. भगवान विष्णू के मोहिनी अवतार के एकमेव स्थान असलेल्या अमृत कुंभनगरी श्रीक्षेत्र नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवानिम्मित मोहिनी मायच्या जयघोषात आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात भळंद कार्यक्रम पार पडला। बोल मोहिनीराज महाराज की जय
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 02, 2026 06:05:28
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर शहरातील मनपावर सत्ता स्थापनेच्या संदर्भात काँग्रेसमधील मतभेद विचित्र वळणावर, धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या घरावर वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाने नोटीस लावल्या, बैठकीला हजर राहण्याचे आवाहन अँकर:-- चंद्रपूर शहरातील मनपावर सत्ता स्थापनेच्या संदर्भात काँग्रेसमधील मतभेद विचित्र वळणावर पोचले आहेत. खा. धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या घरावर विरोधी आ. वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाने नोटीस चक्क नोटीस लावल्या असून बैठकीला हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे. काँग्रेस गट नेता निवड करणे आणि गट नोंदणी करण्यासाठी विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी बैठक आयोजित केली. या बैठकीला न चुकता हजर रहावे या आशयाची नोटीस चिपकविल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आ. वडेट्टीवार आणि खा. धानोरकर अशा दोन गटात विभागले आहेत. वडेट्टीवार यांच्याकडे २० तर धानोरकर यांच्याकडे ७ नगरसेवक असल्याची माहिती आहे. अशातच वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व २७ नगरसेवकांची बैठक बोलावली. या बैठकीची नोटीस धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या हाती देण्याऐवजी त्यांच्या घरावर नोटीस चिपकविण्यात आली. एखाद्याच्या घरावर कुठलीही नोटीस कुठल्याही संदर्भात चिपकवणे हे अवमानकारक मानले जाते. अशा स्थितीत पक्षाच्या अंतर्गत बाबींची नोटीस नगरसेवकांच्या घरावर डकवणे हे कितपत योग्य आहे याबाबतही चर्चाना ऊत आला आहे. या कृतीतून काँग्रेेस पक्षात दोन्ही किती खोलवर गेली आहे हेही स्पष्ट झाले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top