Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410401

लोणावळा नगरपरिषद के लिए राष्ट्रवादी कांग्रेस ने महापौर उम्मीदवार घोषित

CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 10, 2025 08:22:24
Pune, Maharashtra
लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी 15 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत तर लोणावळा नगराध्यक्षपदासाठीचे देखील नाव जाहीर करण्यात आले आहे.लोणावळा नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून राजू सोनवणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार नसल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपने 11 उमेदवारांची यादी जाहीर करत एकला चलो रे चा नारा दिला होता. त्यामुळे आता मावळ राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील स्वबळाचा नारा देत उमेदवारांची घोषणा केली आहे.
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Nov 10, 2025 09:58:33
2
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Nov 10, 2025 09:46:59
Karjat, Maharashtra:रायगड माथेरान नगरपालिका निवडणुकीचा धुरळा. शिंदे सेना भाजप एकत्र तर शिवराष्ट्र पॅनल कडून उंबाठा आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार. अपेक्षित उमेदवार दिनेश सुतार देखील निवडणुकीच्या रिंगणात. तिहेरी लढत होण्याची शक्यता. माथेरान नगरपालिकेवर यंदाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे सेना विरुद्ध शिवराष्ट्र पॅनल-उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी आमने सामने असणार आहेत. तर दुसरीकडे पक्ष उमेदवारांनी देखील यंदाच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कंबर कसली असून माथेरान नगरपालिकेसाठी तिहेरी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे. एकूण 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशी 21 उमेदवारांची संख्या असलेल्या माथेरान नगरपालिकेवर स्थानिक शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे देखील आपल वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसताना पाहायला मिळत आहेत. तर अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी दिनेश सुतार ज्यांनी 2 टर्म नगरसेवक पद, आणि शिक्षण सभापती कामगार नेता म्हणून काम पाहिलेल्या दिनेश सुतार यांची देखील मोठी ताकद माथेरान मध्ये असल्याने त्यांचा मोठा करिश्मा या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. कोंणता उमेदवार कोणत्या पक्षातून ते पाहूयात 1) चंद्रकांत चौधरी आणि मनोज खेडकर शिंदे सेनेकडून 2) शिवराष्ट्र पॅनल 4कडून अजय सावंत 3) अपक्ष म्हणून दिनेश सुतार सोबत उमेदवारांचे फोटो जोडत आहे. लोकेशन - माथेरान रायगड
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 10, 2025 09:41:00
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 10, 2025 09:37:59
Nagpur, Maharashtra:नागपुर दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कारभार सुरू असल्याचा आरोप मनसेकडून आलाय. लाच घेऊन नियमबाह्य दस्तावेज नोंदणी होत असल्याचा आरोप मनसेने केला. या संदर्भात तक्रारी केल्यानंतर अनेक नोंदणी करताना कागदपत्र नसताना खरेदी विक्री झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. अनेक महिन्यापासून तक्रार केली जात आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात कसा नियमबाह्य कारभार चालतो याचं सादरीकरण मनसे कडून पथनाट्य सादरीकरण करण्यात येतेय. शासनाचा महसूल बुडवत असल्याचा आरोपही मनसेकडून करण्यात आलाय. आंदोलनस्थळावरून मनसेच्या पथनाट्यादरम्यान चंदू लाडे यांच्याशी संवाद साधताना आमचे प्रतिनिधी अमर काळे यांनी आढावा घेतला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 10, 2025 09:33:03
Akola, Maharashtra:पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप होत असताना, अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज अकोल्यात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेसने पार्थ पवार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, तसेच या प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासह पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काँग्रेसच्या या आंदोलनावर टीका केली होती. मात्र काँग्रेसनेही मिटकरींच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 10, 2025 09:22:09
Dhule, Maharashtra:राज्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला भरभरून यश मिळेल याची खात्री आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करायची की नाही याबाबत निर्णय स्थानिक स्तरावरती होणार असला तरी, सर्वत्र युतीच विजयी होईल असा विश्वास भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. नंदुरबार येथे निवडणूक प्रचारासाठी आले असताना त्या बोलत होत्या. लोकांनी देशांमध्ये आणि राज्यांमध्ये आम्हाला वेळोवेळी सत्ता दिली आहे. लोकांच्या आमच्यावर विश्वास आहे. लोकांनी महायुतीला चांगलं यश दिलं तर विकासाला चालना मिळणार, असा सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सरकार उभा आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली सरकारने ३२ हजार कोटीच्या पॅकेज जाहीर करून दिलासा मिळालेला आहे असं सांगितले. सरकार अत्यंत चांगलं पद्धतीने चालू आहे म्हणून विरोधक टीका करत रराहतात सासू सांगत, बच्चू कडू यांचे टीकेवर उत्तर देत पंकजा मुंडे यांनी बच्चू कडू यांना उत्तर व्यवस्था देणार, असं सांगितले. युती संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाणार मात्र राज्यात महायुतीची सत्ता येणार असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत काँग्रेस निवडणूक लढणार असल्याने हा ज्याचे त्याच्या स्थानिक विषय आहे त्यामुळे या विषयावर मी बोलणार नाही असं पंकजा मुंडे यांनी सांगितले.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 10, 2025 09:21:52
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 10, 2025 09:19:36
Amravati, Maharashtra:काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट काँग्रेस हे डुबत जहाज आहे काँग्रेस मध्ये जो बसला तो डुबला ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जहरी टीका अँकर :– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज चांदुर रेल्वे येथे कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे बावनकुळे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस मध्ये वडेट्टीवार नाना पटोले यांच्याकडे पाहत नाही नाना पटोले वडेट्टीवार कडे पाहत नाही. हे दोघे मिळून सुनील केदार कडे पाहत नाही. आणि हे तिघेही यशोमती ठाकूर यांच्याकडे पाहत नाही आणि हे चौघही हर्षवर्धन सपकाळ यांच्या कडे पाहत नाही आणि हे पाचही मिळून राहुल गांधीच्या चेहऱ्याकडे पाहत नाही. त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट. काँग्रेस हे डुबत जहाज आहे. काँग्रेस मध्ये जो बसला तो डुबला असे म्हणत बावनकुळे यांनी काँग्रेस नेते आणि काँग्रेस पक्षावर जहरी टीका केली आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 10, 2025 09:14:23
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यात यावर्षी तब्बल दोन वेळा अतिवृष्टी झाली. यामध्ये जिल्ह्यातील ५ लाख ६५ हजार ५८५ हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. यापैकी जवळपास ५ लाख १९ हजार २७४ शेतकरी बाधित झाले आहेत. प्रमुख पिक सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेलं… शेतकऱ्यांना पिकविम्याकडून मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र खात्यात जमा झाले फक्त १००, १५०, २०० रुपये… त्यामुळे सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, देवणी, जळकोट, रेणापूर, उदगीर या तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलं. सोयाबीन हे प्रमुख पिक असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. मात्र अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीन वाहून गेलं तर काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पिकात पाणी साचल्याने पीक हे कुजून गेलं आणि पूर्णपणे नष्ट झालं. तरीसुद्धा मायबाप सरकारला शेतकऱ्याची दया आली नाही असा आरोपच शेतकरी करत आहेत. या नुकसानात औसा तालुका सर्वाधिक बाधित होता. इथल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून प्रमुख पिक सोयाबीन लावलं होतं. अतिवृष्टीने पिक जमीनदोस्त झालं. मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यामध्ये भरघोस मदत मिळेल असं स्पष्ट आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात पिकविमा कंपनीने दिलेली १००, १५० किंवा २०० रुपयांची रक्कम पाहून शेतकरी संतप्त झालेत. शेतकरी संघटनांनी पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांचा हिडमोड केला असा आरोप केला आहे. हे नुकसान भरपाई नाही… तर शेतकऱ्यांचा अपमान आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया जिल्ह्यातून उमटत आहे. आता सरकार पुनर्मूल्यांकन करणार का? की शेतकऱ्यांना पुन्हा एकदा केवळ आश्वासनांवरच समाधान मानावं लागणार? वैभव बालकुंदे ZEE 24 TAAS Latur
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 10, 2025 09:01:33
Washim, Maharashtra:वाशिम: File:1011ZT_WSM_NOMINATION_APPLICATION रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यातील वाशिम,कारंजा, मंगरूळपीर, रिसोड या चार नगरपरिषदांसह मालेगाव नगरपंचायती च्या सार्वत्रिक निवडणुका २डिसेंबर रोजी होणार आहेत. आज १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून,अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.उमेदवारी प्रक्रियेची तारीख जवळ आल्याने राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.अद्याप महायुती वा महा_Aघाडीचा निर्णय स्पष्ट नसल्याने स्थानिक राजकारणात सस्पेन्स कायम आहे.वाशिम नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चुरस असून,प्रमुख पक्षांतून उमेदवार निवडीबाबत उत्सुकता वाढली आहे. पक्षांकडून उमेदवारी पुढील दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली असून,सर्व पाच ठिकाणी स्वतंत्र कक्ष,आवश्यक मनुष्यबळ तसेच नामांकन अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 10, 2025 08:56:58
Bhandara, Maharashtra:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी मध्ये भंडारा गोंदियात अलाईन्स आमच्याकडे नसेल तर स्वबळावर लढावे लागेल. भंडारा गोंदिया जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे... मुंबई महानगरपालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असे विजय वाडेट्टीवर यांनी बोलले आहे.. तर भंडारा गोंदिया मध्ये काँग्रेसची भूमिका काय असेल यावर बोलतांना नाना पटोले म्हणाले की,अलाईन्स आमच्याकडे नसेल तर स्वबळावर लढावे लागेल आणि ही काँग्रेसच म्हणताय अशी भूमिका नाही तर सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तयारी करीत आहेत त्यामुळे हा स्वबळ हे जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लागू होत नाही जिथे जिथे जशी जशी परिस्थिती असेल हा तिथे निर्णय होतील.
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 10, 2025 08:45:33
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या विटा येथे एक तीन मजली इमारतीला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पती-पत्नी, मुलगी आणि नात अशा चौघांचा मृत्यू झाला असून यात एका दोन वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. विष्णु जोशी वय 47, सुनंदा विष्णु जोशी वय 42, प्रियांका योगेश इंगळे वय 25 आणि सुष्टी इंगळे वय 2 अशी मृतांची नावे आहेत; या कुटुंबातील आणखी दोन जण जखमी आहेत ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जोशी कुटुंबाचे सावरकर नगर येथे three-मजली इमारती असून त्यामध्ये स्टील फर्नीचरचे दुकान आहे. पहाटेच्या सुमारास या दुकानाला आग लागली आणि काही वेळात आगीने भीषण रूप धारण केले. त्यामुळे आगीमुळे बाहेर पडता न आल्याने चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले.16 नोव्हेंबर रोजी जोशी कुटुंबामध्ये लग्नकार्य होतं, त्यामुळे त्यांच्या मुली प्रियंका आई-वडील आणि तिच्या मुली यांच्या सहित विटा येथे आली होती आणि या घटनेमध्ये तिची आई-वडील व मुलीचा समावेश आहे.
4
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 10, 2025 08:44:03
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Anchor :- शरद पवार काँग्रेसला कमकुवत करते असं माझं म्हणण्याचा अर्थ नव्हता त्या बातमीमध्ये काहीतरी चुकीचा आलेला आहे... महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्ष मिळून काँग्रेसला कमकुवत करत आहे. हा प्रकार आज नाही तर अनेक वर्षापासून महाराष्ट्रात सुरू आहे.Parth Pawarचा जो जमीन घोटाळा पुढे आलेला आहे त्यामध्ये वस्तुस्थिती समोर आलेली आहे... महाराष्ट्रात पार्थ पवार हा एक मुद्दा नाही... अनेक मुद्दे आहेत... मुंबईमध्ये बीकेसी मध्ये भारत नगर मध्ये एक घोटाळा पुढे येईल दुसरा आपण सिलिंगच्या बाजूला जी जमीन आहे जी रस्ते विकास महामंडळ जमीन होती सगळी त्या मित्रांना मोदी साहेबांच्या मित्रांना दिलेली आहे... आता नवी मुंबईमध्ये जी मार्केट यार्डची जमीन पूर्ण देण्याचा काम सुरू आहे... सगळ्याकडे आयटी पार्क उल्लेख करण्याच्या काम केलेल्या त्याच्यामुळे जमिनीच्या किंमती कसा कमी केले गेलेले आहेत... त्याच्यातले स्टॅम्प ड्युटी कशी चोरली गेली हे सगळे मुद्दे आहेत हा पार्थ पवार त्याच्यातला सॅम्पल आहे... पण महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रातल्या जमिनी विकण्याचं महाराष्ट्राची प्रॉपर्टी विकण्याचा जे सत्तेतले डीलर बसलेले आहेत हे लीडर नाही.... हे डीलर आहेत आणि ह्या डीलर महाराष्ट्र मध्ये विकण्याचा सपाटा सुरू केलेला आहे.... त्याच्यातला पार्थ पवार एक नमुना आहे.. आणि पवार साहेब जेष्ठ नेते आहेत राज्यातले मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना या प्रकरणाची सर्व माहिती आहे.. आमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे... महाराष्ट्रात डीलरची सरकार आहे लीडरची सरकार नाही ...यांचा परदा फास केलाच पाहिजे अशी भूमिका काँग्रेसची आहे
3
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 10, 2025 08:42:58
4
comment0
Report
Advertisement
Back to top