Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018

पिंपरी-चिंचवड महापालिका का 2026-27 अर्थसंकल्प स्थायी समिति के सामने प्रस्तुत होगा

KPKAILAS PURI
Feb 16, 2026 02:00:53
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर केला जाणार आहे. चार वर्षांच्या खंडानंतर लोकप्रतिनिधी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षात शहराला नवीन प्रकल्प काय मिळणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. २०२६-२७ चा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम जून २०२५ पासून सुरू होते. नागरिकांनीही १० लाख रुपये खर्चापर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्यांचा समावेश करून अंतिम अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Feb 16, 2026 05:46:53
Beed, Maharashtra:बीडच्या तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरडी बुद्रुक या शिवारात एका पारधी वस्तीवर झालेल्या हल्ल्यात महिला आणि पुरुषांना मारहाण करण्यात आली. या घटनेत संसार उपयोगी साहित्याची नासधूस करत रब्बीची पिके उपटण्यात आली. या प्रकरणात पोलीस ठाण्यात 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेवराई तालुक्यातील टाकरवन शिवारात काही लोक पारधी वस्तीच्या परिसरात शेळ्या मेंढ्या चारत होते. यावेळी वस्ती वरील पायल काळे या मुलीने त्यांना विरोध केला. या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ करत हल्ला करण्यात आला. यादरम्यान हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या इतरांवर देखील हल्ला चढविण्यात आला. यावेळी संसार उपयोगी सर्व साहित्याचे मोठे नुकसान करत नवी कोरी दुचाकी फोडण्यात आली तर शेतातील काढणीला आलेले गव्हाचे पीक उपटून टाकण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी जमाव पांगवला. तर या प्रकरणात एकूण 25 हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदविला गेला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 16, 2026 05:46:35
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 16, 2026 05:16:51
Nagpur, Maharashtra:नागपूर - जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाने दिलासा - नोव्हेंबर २०२५ प्रसिद्ध पदोन्नती यादीत नाव समाविष्ट करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा अंतरिम आदेश - गडचिरोली जिल्हा परिषदेला यादीत समावेशाचे निर्देश, अंतिम निर्णयापर्यंत आदेश लागू राहणार - ३३ शिक्षकांची उच्च न्यायालयात याचिका, १७ जानेवारी २०२६ रोजी टीईटी उत्तीर्ण, - २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पदोन्नती यादी प्रसिद्ध, त्या यादीत दहा ते बारा वर्षे अनुभव असलेल्या शिक्षकांचे नाव यादीत आहे... - २० ते २५ वर्षे सेवा असलेल्या शिक्षकांचा दावा केला होता, जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी सेवा जेष्ठता यादी मध्ये समावेश करण्याची विनंती केली होती मात्र ती अमान्य केल्यामुळे याचिका दाखल करण्यात आली. - राज्य सरकार आणि जिल्हा परिषद सीईओंना नोटीस, १२ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे खंडपीठांना निर्देश..
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 16, 2026 04:49:39
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 16, 2026 04:49:00
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 16, 2026 04:33:25
Malegaon, Maharashtra:उपमहापौर कार्यालयाचे दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पुन्हा टिपू सुलतान यांचे चित्र लावण्यात येईल. मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांची स्पष्टोक्ती. संपूर्ण महाराष्ट्रात टिपू सुलतान वरून जो वाद सुरू आहे तो वाद मालेगावातूनच सुरू झाला असून आता पुन्हा त्या वादाला नवीन वळण मिळण्याची शक्यता असून मालेगावच्या किल्ला परिसरात काल रात्री उपमहापौर शान ए हिंद यांची स्वागत सभा आयोजित करण्यात आली होती त्यात त्यांनी महापौर कार्यालयाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा कार्यालयात लावणार असे विधान करत टिपू सुलतान यांचे कौतुक देखील केले. ऑन साउंड बाईट: शान ए हिंद, उपमहापौर मालेगाव मनपा
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 16, 2026 04:30:44
Thane, Maharashtra:भिवंडी महापालिका निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे व तब्बल एक महिन्यानंतर ही कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराकडून संख्याबळाचे गणित जुळून येण्यात अपयश आल्यामुळे भाजपा व शिवसेना या महायुतीतील दोन पक्षात फूट पडली असल्याचे समोर येत आहे. सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी महायुतीतील भाजपा पाठोपाठ शिवसेनेने सुद्धा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढवण्याचे स्पष्ट केले आहे. घोषणेनंतर भिवंडी पालिकेतील सत्तेची समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता असून त्यामध्ये कोण यशस्वी होतो हे 20 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार एवढे नक्की. भिवंडी पालिकेची सार्वत्रिक निवडणुकीत भाजप व शिवसेना महायुती म्हणून लढवली होती. यामध्ये भाजपाचे 22 व शिवसेनेचे 12 असे एकत्र महायुती म्हणून 34 सदस्य निवडून आले होते. परंतु बहुमतासाठीचा 46 ही संख्या जमवण्यात भाजपाला अपयश येत असतानाच शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या सोबतीने महापौर पदासाठी जुळवाजुळव सुरू केली. त्याच दरम्यान विलास पाटील यांना आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्याने भाजपा व शिवसेना यांच्यातील वितुष्ट समोर आले. त्यानंतर भाजपाने महापौर पदासाठीची निवडणूक लढवत असल्याचे घोषित केले. त्या पाठोपाठ शिवसेना पक्षाने सुद्धा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले आहे. भिवंडीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने अनेकांकडून सत्ता स्थापने साठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने भिवंडी पालिका महापौर व उपमहापौर पदासाठीच्या दोन्ही निवडणुका शिवसेना लढवत आहे. शिवसेना पक्षाचा हा निर्णय भाजपला कळवण्यात आला आहे. प्रयत्न तर दोघांकडून सुरू होते. अंतिम.निर्णय होऊ न शकल्याने भाजपा त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवेल तर शिवसेना आपल्या पद्धतीने निवडणूक लढवणार आहे. आमच्या सोबत विलास पाटील आले असताना त्यांना अटक झाली. त्यानंतर ही पक्षाने भूमिका ठाम ठेवली असून उमेदवार कोण असेल हे उद्या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कडून ज्यांचे नाव येईल ते उमेदवार असतील अशी माहिती पक्षनेते प्रकाश पाटील यांनी दिली.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 16, 2026 04:17:36
Thane, Maharashtra:भिवंडी पालिका महापौर पदासाठी दुरावलेले भाजपाचे दोन गट उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला शहर पक्ष कार्यालयात सर्व मतभेद विसरून एकत्र आले होते. निवडणूक प्रभारी आमदार महेश चौघुले, शहराध्यक्ष रवी सावंत, गटनेते संतोष शेट्टी यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या या बैठकीस महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी त्यांना विरोध करणारे सुमित पाटील, निलेश चौधरी, प्रकाश टावरे, हनुमान चौधरी, यशवंत टावरे यांसह सर्व २२ नगरसेवक उपस्थित होते. यानिमित्ताने दोन गटात विभागलेले नगरसेवक पुन्हा एकत्र आले असल्याने उद्या त्यांचे महापौर पदासाठी जुळवाजुळव कशी असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. भाजपमध्ये कोणतेही दोन गट नव्हते. कोणाची नाराजी दूर केली नाही. भारतीय जनता पार्टी मोठी पार्टी आहे. ही पार्टी कोणामुळे थांबणार नाही. सर्वजण एकत्र होतो आज पण उद्या पण एकत्र राहणार. नारायण चौधरी व सुमित पाटील यांनी महापौर पदासाठी इच्छुकता शहर पक्षाकडे दाखवली होती. प्रदेश पदाधिकाऱ्यांनी नारायण चौधरी यांचे नाव निश्चित केल्याने ते उमेदवार असणार आहेत. त्यामुळे थोडी नाराजी होती ती दोन दिवसात संपली त्यानंतर सर्व पुन्हा एकत्र आले त्यानंतर सर्व पुन्हा कामाला लागले. महायुती म्हणून वरिष्ठांसोबत बैठका सुरू आहेत. त्यातून निर्णय होईल. गरज असली आणि त्यांची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अथवा काँग्रेस पक्षाची सुद्धा सोबत घेणार असल्याचे निवडणूक प्रभारी आमदार महेश चौघुले यांनी स्पष्ट केले.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 16, 2026 04:17:08
Nanded, Maharashtra:जुन्या भांडणातून दोघा अल्पवयीन युवकांनी 17 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खूण केला. नांदेड शहरातील गोवर्धन घाट रोडवर भरदिवसा ही घटना घडली. गोवर्धन घाट भागात राहणाऱ्या कमलप्रीत सिंघ खालसा याचा त्याच्या मित्रासोबत आठ दहा दिवसापूर्वी वाद झाला होता. या वादातून कमलप्रीतसिंघने मित्राला मारहान केली होती. मारहाणीत मित्राला टाकेही पडले होते. हाच राग मनात धरून कमलप्रीत सिंघ याला दोघा जणांनी गोवर्धन घाट पुलाजवळ गाठले. त्याच्यावर चाकुने जबर हल्ला केला. पोटात चाकू भोसकला. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कमलप्रीतसिंघाला कौठा भागातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गंभीर अवस्थेत असलेल्या कमलप्रीतसिंघचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान दोघा अल्पवयीन आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासात अटक केली.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 16, 2026 04:15:43
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर चांगभलंच्या गजरात खेटे सुरू आहेत. रविवारी दुसरा खेटा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रविवार आणि त्यात महाशिवरात्रि यामुळे तब्बल एक लाखाहून अधिक भक्तांनी जोतिबाचे दर्शन घेतले.. गुलाल खोबऱ्याची उधळण आणि तोंडी जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर त्यामुळे जोतिबा डोंगर परिसर भक्तांनी फुलून गेला होता. जोतिबा खेट्याच्या निमित्ताने हजारो भक्त पायी जोतिबा डोंगरावर दाखल होतात. अनेक भक्त पाच खेटे करतात, तर काही भक्त या काळात देवाचे दर्शन करण्यासाठी जोतिबा डोंगरावर उपस्थिती लावतात. एक एप्रिलला जोतिबाची चैत्र यात्रा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रशासन आतापासूनच तयारीला लागले आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 16, 2026 04:01:17
Washim, Maharashtra:वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार वाशिम येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. शासन निर्णयात संत सेवाल बाल महाराज यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करण्यात झाला असून, त्यांनी समाजात समता, नैतिकता, व्यसनमुक्ती, परिश्रम आणि स्वावलंबनाचा संदेश दिला असल्याचे नमूद करण्यात आले. त्यांच्या विचारांमुळे समाजात जागृती आणि सदाचाराला चालना मिळाल्याने त्यांच्या नावाने संस्थेचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नामांतरामुळे बंजारा समाजाच्या आराध्य दैवताला शासकीय पातळीवर सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top