Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

खेड–पुणे में कल मतदान, 30 लाख मतदाता मतदान का अधिकार निभाएंगे

HCHEMANT CHAPUDE
Feb 06, 2026 08:55:42
Shirur, Maharashtra
खेड/पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र असून, ३० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामुळे प्रशासना कडून कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य वाटप करण्यात येत आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Feb 06, 2026 10:50:43
Nagpur, Maharashtra:नागपूर ऍडव्हाटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सव उदघाट्न आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनात झालेल्या एडवांटेज विदर्भ औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे सामान्य करार करण्यात आले. आज उद्घाटन सोहळाला नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पंकज भोयर उपस्थित होते, 23 देशाचे विशेष प्रतिनिधी आले आहेत. नागपूर - (अडवांटेज विदर्भ- खासदार औद्योगिक महोत्सव उद्घाटन समारंभ) नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री - भाषण - विदर्भाचा सर्वांगीण विकास व्हावा या कल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कार्य करत आहोत - समाजाच्या सर्वच क्षेत्रात कार्य करत असताना सर्वात मोठं जे क्षेत्र आहे त्यात रोजगार मिळतात ते उद्योग आणि व्यापार हे क्षेत्र आहे - विदर्भात लोह खनिज, कोळसा, आणि मँगनीज खनिज आहे - आणि संत्रा आणि कापूस शेतकऱ्यांवर लक्ष दिलं आहे - येत्या पाच वर्षात ए आय चा वापर करून संत्र्याचे तंत्रज्ञानाला आम्ही बदललेले आहे - येत्या पाच वर्षात आमच्या संत्र्याचे उत्पादन पाचपट वाढेल असा विश्वास आहे - विदर्भातील पर्यटन हे महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकार यांचा धन्यवाद देतो - मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात जी टुरिझम पॉलिसी बनली ते शंभर टक्के मंजूर करण्यात आले आहेत - गडचिरोली मध्ये असलेल्या लोहखनिजाचा उत्खनन होत नव्हतं मात्र तिथे नक्षलवाद फोफावला होता - लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या वतीने आम्ही गडचिरोली मध्ये एकल विद्यालय गेल्या 27 वर्षापासून चालवत आहोत - उद्योगपती हे संपत्ती नाही वाढवत तर ते रोजगार वाढवतात - विदर्भात आलेल्या उद्योग हे विदर्भाचा विकास करतील - विदर्भात दहा हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, शेतकऱ्यांच्या तरुणांना रोजगार नाही, सिंचनाची सुविधा नव्हती, रस्ते आता चांगले झाले, विजेची कमतरता नाही, आता टेलीकम्युनिकेशनची सुविधा झाली आहे - हा जो बदल झालेला आहे तो विदर्भाच्या विकासासाठी, विदर्भाच्या पोटेन्शिअल साठी गती देणारी आहे आणि हाच विदर्भाचा विकास आहे - मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे विदर्भाच्या विकासाला आणखी गती आली आहे - बिझनेस मॅनेजमेंटच्या स्टुडन्ट असल्यामुळे मानतो उद्योगात पैसा आणि टेक्नॉलॉजी पेक्षा जुगाडू माणसाची गरज असते - विदर्भाची मानसिकता आता बदलत चालली आहे अगोदर येथे कोणताही व्यक्ती आला तर मी म्हणायचं की तुमची मनोवृत्तीच भुक्कड आहे - विदर्भात हजार कोटींच्या वर उद्योग टाकणारे शंभर उद्योजक नाही भेटणार तोपर्यंत विदर्भात बदल शक्य नाही - सत्यनारायण नुवाल रेल्वे स्टेशनवर झोपायचे, आज ते जगात प्रसिद्ध झाले आहे, त्यांच्यामुळे भारत जगात डिफेन्समध्ये सामोर जाणार आहे - प्रभाकरन यांनी स्टील मध्ये फार हिंमतीने काम केलं आहे, गडचिरोली मध्ये मी फार इंटिरियर मध्ये जायचो, - आता गडचिरोली महाविद्यालयापासून रुग्णालय येत आहे सकाळी तिथे चालण्याची सोय नव्हती - जगातील सर्वात चांगलं लोहखनिज हे गडचिरोलीत मिळतं - जगाचा सर्वात चांगला स्टील हब हे गडचिरोली बनत आहे - गडचिरोली साठीचे मॅनपावर लागणार आहे ते विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे हे आमचं मिशन आहे - विदर्भाचा विकास म्हणजे केवळ नागपूरचा विकास नाही - ट्रेन मॅन पॉवर साठी देखील आणि प्रयत्न करत आहोत - अदानी इथे आले आहेत, ते इंटरनॅशनल एअरपोर्ट करत आहेत त्यासाठी दहा हजार स्किल मॅनपावर लागेल - ते विमानांचा एम आर ओ संचालित करत आहेत - जर स्किल मॅन पॉवर मिळणार नाही तर ते कुठून आणायचे यासाठी नागपूर विद्यापीठाने प्रयत्न करायला हवे नागपुर मुख्यमंत्री फडणवीस भाषण - अधिक गती आणि उर्जेने आपण विदर्भाच्या विकासासाठी एकत्रित आलो आहे - गडकरींच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न केले - पण एक दुःख आमच्या मनात होत ऑटोमोबाइल इंडस्ट्री विदर्भात यावी यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले - अखेर महिंद्रा अँड महिंद्रा विदर्भात आले मी त्यांना धन्यवाद देतो - नागपूरात ऑटोमोबाईल इंडस्ट्रु मध्ये मोठा करार झाला - नेक्स्ट जनरेशन EV जे ग्लोबल मार्केट साठी देखील महत्वाची असेल - नागपुरातील पहिली ऑटोमोबाईल इंडस्ट्री महिंद्रा अँड महिंद्रा - ऑटोमोबाइल इंडस्ट्री मध्ये पुणे लीडर होता त्याचा विस्तार नागपूर, नाशिक, संभाजी नगर पर्यंत होत है - महिंद्रा 2028 मध्ये नागपुर मध्ये प्रत्यक्ष प्रोडक्शन ला सुरुवात करणार, आम्ही सरकार म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य विद्युत वेगाने करू - 10 दिवसात 10 कोटींची इन्व्हेस्टमेंट असलेला MOU झाला - गिगा कास्टिंग टेक्नॉलॉजी नागपूर मध्ये येणार त्याचा MOU काही मिनिटात करण्यात आला - 3 व्हीलर EV साठी रिबुशनैज करणारी गुंतवणूक - 2500 करोड गुंतवणूक 35 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळेल - एका काळात आम्ही जे बोलायचो ते आज प्रत्यक्षात करत आहे - 2014 नंतर सगळं प्रत्यक्षात उतरत असल्याने नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर देशाचं स्टील हब होत आहे - भविष्यात आम्ही गडचिरोली मध्ये नॅचरल गॅस घेऊन जाऊ - गडचिरोली उद्योगिक विकासाचा परिणाम चंद्रपूर वर्धा मध्ये दिसतोय - अमरावती मध्ये टेक्सटाईल पार्क तयार केले - एशिया मधील सगळ्यात आधुनिक एव्हीएशन स्कुल अमरावती मध्ये तयार केलं जातंय त्याचा फायदा बाजूच्या जिल्हानांना होतो - अमरावती, अकोला विमानतळ विस्तार होतोय, गडचिरोलीचा रण वे फुलस्केल रनवे असणार - रेल, एयर दोन्ही दळणवळण क्षेत्रात विदर्भ समोर येतोय - टियर दोन सिटी मध्ये नागपूर संभाजी नगर मध्ये लॉजीस्टिक, जिजीसी क्षेत्रात गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे - ज्या क्षेत्रात उद्योग नाही त्या भागात उद्योग आणण्यावर भर आहे - डाओस मधून त्या भागासाठी उद्योग आणण्यात यश मिळालं - गडचिरोली, धुळे, नंदूरबार मध्ये उद्योग आणण्यात यश आलं - वाशीम मध्ये उद्योग आणायचे आहेत - महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे, नळगंगा वैनगंगेला जोडण्यासाठी 500 किमीची नदी तयार केली जाणार - दुष्काळ प्रवण भागात समृद्ध भाग तयार करून उद्योगांना देखील पाणी देणार - औद्योगिक विकासासाठी उद्योजकांची महत्वाची भूमिका असते - संभाजी नगर च्या विकासात तिथल्या उद्योजकांची महत्वाची भूमिका - (मुख्यमंत्री बोलत असताना अचानक लाईट आणि माईक बंद झालेत, काही काळ भाषण थांबले) - ऊर्जा मंत्राच्या भाषणात ऊर्जा गेली,पण आमची ऊर्जा गेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणा दरम्यान व्यासपीठवर लाईट गेले.. माईक पण थोडा अवधी बंद होता मात्र लाईट आल्यावर फडणवीस बोलले की ऊर्जा मंत्री के भाषण मे ऊर्जा चली जाये --लेकिन हमारी ऊर्जा चल रही है
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 06, 2026 10:46:58
Chendhare, Alibag, Maharashtra:जयंत पाटील यांच्या सुनेत्रा पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर   महाराणी येसुबाईंच्या कर्तव्याची करून दिली आठवण   अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावरून शेकापचे सरचिटणीस जयंत पटेल यांनी टीका केली होती. ते काही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद नव्हतं. १५ दिवसांनी शपथ घेतली असती तर काय बिघडलं असतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या सायली दळवी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. दळवी यांनी यावेळी महाराणी येसूबाई यांची आठवण करून दिली. संभाजी राजांच्या निधनानंतर दुःख बाजूला ठेवत येसूबाईनी रायगड झुंजत ठेवला होता. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोरका झाला होता. पक्ष सावरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना काळ कधीच माफ करणार नाही, असं सायली दळवी म्हणाल्या.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 06, 2026 10:23:08
Yavatmal, Maharashtra:देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी दुर्दैवी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. विविध सरकारी योजनांवर वारेमाप खर्च होत असतानाही शेतकरी आत्महत्यांचे सत्र मात्र थांबता थांबत नसल्याने कृषी संकट गडद झाले असून शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यवतमाळच्या लोणी येथील सुनील चव्हाण या 35 वर्षीय शेतकरी पुत्राने शेतीतील उत्पन्न घटल्यामुळे आपली जीवन यात्रा संपविली आहे. सुनील कडे वडिलोपार्जित दहा एकर शेत असून त्यात सोयाबीन आणि कापूस या पिकाची लागवड केली. मात्र झालेल्या अति पावसामुळे पिकांचे उत्पन्न घटले, लागवडीसाठी त्यांनी खाजगी व बँकेकडून कर्ज घेतले होते, शेतीवर झालेला खर्च भरून न निघाल्यामुळे चिंताग्रस्त सुनीलने विष प्राशन करून आत्महत्या केली. यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. नैसर्गिक अवकृपा आणि ठोस उपाय योजना अभावी सुनील प्रमाणेच शेतकरी आर्थिक विवंचनेचे बळी ठरू लागले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलाबाळांचे शिक्षण त्यांचे विवाह, आरोग्यावर होणारा खर्च पेलवेनासा झाला असल्याने शेतकरी वर्ग चिंतामग्न झाला आहे. शेतीमालाच्या आयात निर्यात धोरणात देखील शेतकरी भरडल्या जात आहे. सरकारच्या योजना आहेत मात्र त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत अशी कबुली राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली असून शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तर सरकार शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून काम करीत आहे, त्यामुळे आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा केला होता, तो फसला. कारण शेतकरी मूळ समस्यांमधून बाहेर आलेला नाही. शेतकरी कष्टाळू आहे, तो रक्ताचे पाणी करून शेती कसतो. अशा अन्नदात्या शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी लोकप्रतिनिधी शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 06, 2026 10:22:17
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात छत्तीसगड सीमा पर नक्सल विरोधी पथकातील जवान दीपक मडावी याला पोलीस दलाने अंतिम मानवंदना दिली. भामरागड तालुक्यातील फोदेवाडा गावापासून दूर जंगलात नक्सल्यांची तळ असल्याचे माहित असतानाच गडचिरोली पोलीस दलाच्या C-60 पथकाच्या विविध चमूंनी परिसर वेढला. गेल्या 24 तासापासून या परिसरात चकमक सुरू होती. चकमकीत 3 नक्सलवाद्यांना टिपण्यात यश आले. यात दीपक मडावी यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले; परंतु दुरगामी अरण्यामुळे हेलीकॉप्टर उतरू शकत नव्हते. प्रयत्न करून हेलीकॉप्टर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले. उपचारादरम्यान मडावी यांचा मृत्यू झाला. या चकमकीत आणखी एक जवान जखमी झाला आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस मुख्यालय मैदानावर शहीद मडावी यांना मानवंदना देण्यात आली. या कठीण प्रसंगी मडावी कुटुंबियांच्या पाठीशी पोलीस दल आणि प्रशासन असल्याचा दिलासा दिला.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 06, 2026 10:21:35
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात भाजपच्या दृष्टीने आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. आजवर काँग्रेस–राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली कोल्हापूर महानगरपालिका अखेर महायुतीच्या ताब्यात आली आहे. भाजपच्या रूपाराणी निकम यांच्या रूपाने कोल्हापूर महानगरपालिकाेला पहिल्यांदाच भाजपचा महापौर मिळाला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात आज भाजपासाठी सुवर्ण दिवस हा ठरला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या रूपाराणी निकम यांनी काँग्रेसचे उमेदवार सचिन शेडे यांचा 46 विरुद्ध 35 मतांनी पराभव केला आहे. आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सत्तेत असलेली कोल्हापूर महानगरपालिका उलथवून लावत महायुतीने स्पष्ट बहुमतासह सत्ता काबीज केली आहे. महायुतीकडे भाजपचे 26, शिवसेनेचे 15, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि जनसुराज्य पक्षाचा 1 असे एकूण 46 नगरसेवक आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे 34 आणि शिवसेना ठाकरे गटाचा 1 असे एकूण 35 नगरसेवक आहेत. या राजकीय समीकरणांमुळे महापौर पदी रूपाराणी निकम आणि उपमहापौर पदी जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे.. महायुतीच्या या विजयाने कोल्हापूरच्या राजकारणात नवं पर्व सुरू झालं आहे.. त्यामुळे भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे.. चंद्रकांत पाटील यांनी देखील कोल्हापूर महानगरपालिका सभागृहाच्या इतिहासाची आठवण करून देत भाजपचा पहिला महापौर झाल्याने आनंद व्यक्त केला.त्याच बरोबर 1972 साली अस्तित्वात आलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला या बद्दल मनस्वी आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. आज महापौर निवडीच्या निमित्ताने महायुतीच्या नेत्यांसह नगरसेवकांनीही जल्लोष करत हा विजय साजरा केला. कारण कोल्हापूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासन एकदाही भाजपाला महानगरपालिकेमध्ये विजय मिळवता आलेला नव्हता. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात पहिल्यांदा भाजपचा महापौर आणि महायुतीचा झेंडा फडकला आहे... त्यामुळे भाजप आणि महायुतीच्या पक्षांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. कोल्हापूरकरांनी काँग्रेसला बाजूला सारत विकासासाठी महायुतीला साथ दिली आहे.. त्यामुळे केंद्रात राज्यात सत्ता आहे, त्यामुळे महापालिकेत सत्ता द्या कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलू असं आश्वासन देणाऱ्या भाजपचे आणि पर्यायाने महायुतीची जबाबदारी वाढली आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 06, 2026 10:21:17
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़ के रावेत इलाके में एक वसाहती के सामने रहने वाले कुत्ते को दूसरे ठिकाने लगाते समय कुछ पशु प्रेमी ने इस वसाहती में काम करने वाले एक कर्मचारी की बेरहमी से पिटाई कर दी. यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. घटना के अनुसार, कुत्ता रात में भौंक रहा था और कुछ लोग उसे परेशान कर रहे थे; इसके बाद निवासी पक्ष ने कर्मी पर चाक-चौबंद कार्रवाई के बजाय मारपीट कर दी. आरोपी ने कहा कि मारहाणी घटना संपूर्ण रूप से जानबूझकर नहीं बल्कि गुस्से के कारण हुई थी. प्रत्यक्षदर्शियों की राय है कि यदि कुत्ते के संबंध में शिकायत होनी थी तो समाज के रहवासियों को संभालना चाहिए था, न कि किसी कर्मचारी की मार पीट. पुलिस ने कहा कि इस समय इस मामले में कोई शिकायत नहीं मिली है और कोई कार्रवाई नहीं की गई.'
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 06, 2026 09:50:39
Baramati, Maharashtra:बारामती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बाईट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भेट Ajit पवार यांच्या अपघाती निधन झालं, आज दहा दिवस होत आहेत. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली त्यांना विश्वास दिला की आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. दादांच्या नंतर या राज्यातील जनतेच्या अपेक्षा आहेत आपण सर्वजण एकत्र काम करूया. आज कोणताही राजकीय विषय नव्हता दादांच्या आठवणी जागवल्या. मी दादांच्या अतिशय जवळ होतो हे संपूर्ण कुटुंबाला माहिती आहे राष्ट्रवादी विलीनीकरण सुनेत्रा वहिनी दुखात आहेत सर्व पवार कुटुंब दुःखात आहे घटनेला तेरा दिवस व्हायचे आहेत. तेरा दिवसानंतर आमचे वरिष्ठ मंडळी एकत्र बसतील सर्वांच्या भावना ऐकतील. तेरा दिवस होईपर्यंत या विषयावर बोलणं योग्य नाही तेरा दिवसानंतर या गोष्टीवर चर्चा केली जाईल अजित पवारांसोबत विलीनीकरणाची चर्चा माझं म्हणणं आहे की या गोष्टीला कोणीही वेगळा रंग देऊ नये. तेरा दिवस झाल्यानंतर चर्चा झाली किंवा नाही झाली ही चर्चा करण्यापेक्षा मग निश्चित प्रकारे बाबतीत चर्चा करू. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष सर्व आमदारांचं मत हेच आहे की सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव की नाही व्हावं याबाबत सर्व आमदारांची चर्चा होईल दादांच्या नंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याचा कारभार देशाचा कारभार पक्षाचा कारभार पहावा ही सर्व आमदारांची इच्छा असली तरी त्याबाबतीत तेरावा झाल्यानंतर सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय होईल तुमचं वैयक्तिक मत काय ? मी पवार कुटुंबीयांच्या जवळचा आहे माझं मत वैयक्तिक घेण्यापेक्षा माझं हि मत आहे की 13 दिवस होऊ द्या त्यानंतर निश्चित प्रकारे निर्णय होईल अ(amol) मिटकरी अजित पवार यांच्या जाण्याची सर्वांसाठी दुःखद बातमी आहे याबाबतीमध्ये कोणीही राजकारण करू नये तो विमानाचा अपघातच होता विनाकारण त्याला वेगळं काही जोडू नये. अशी माझी सर्वांना विनंती आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घेता परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे. या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि 30 जून पूर्वी या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल अर्थ खात राज्याचे मुख्यमंत्री हे प्रमुख असतात अजित दादांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे अधिवेशन आलेलं आहे त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेट मांडतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील. बजेट कर्जमुक्ती चर्चा हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केलेला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. बजेटमध्ये थोडीफार तरतूद करता येईल परंतु दिलेला शब्द निश्चित प्रकारे आमचं युतीचं सरकार पाळेल इंदापूर जिल्हा परिषद निकाल इंदापूरची जनता फार हुशार आहे कोणाच्याच भाषणाला प्रचार सभेला ही जनता कधीच भुलणार नाही. आज मी आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आहोत पूर्वी आमच्या दोघांमध्ये विरोध असायचा परंतु तालुक्याचे विकासासाठी आम्ही एकत्र आलो राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हावर 24 च्या 24 सर्व उमेदवार निवडणूक लढवत आहेत तुम्हाला नऊ तारखेला निकाल दिसेल आमचे राष्ट्रवादीचे 24 च्या 24 उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 06, 2026 09:33:39
Shirdi, Maharashtra:जागतिक किर्तीच्या साईनगरी शिर्डीत बालकांच्या शोषणाविरोधात पोलीस प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. मंदिर परिसरात लहान मुलांकडून भिक्षा मागवणे तसेच वस्तू विक्रीस भाग पाडणाऱ्या पालकांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...शिर्डी पोलिसांनी राबवलेल्या या विशेष मोहिमेत 10 मुले आणि 4 मुली अशा एकूण 14 बालकांची सुटका करण्यात आली...या बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी येथील बाल निरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे.बाल न्याय अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या पालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी दिलाय...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 06, 2026 09:33:07
Kalyan, Maharashtra:कल्याण–डोंबिवलीकरांसाठी आरोग्य क्षेत्रात दिलासादायक मोठी बातमी केडीएमसी ची बाई रुक्मिणीबाई, गौरीपाडा व शक्तिधाम रुग्णालये अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा येथील रुग्णालय आणि पूर्वेकडील कोळसेवाडी येथील शक्तिधाम रुग्णालय ही तीन रुग्णालये अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी सात वर्षांच्या कालावधीसाठी संलग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पालिका आयुक्त आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्यात अधिकृत सामंजस्य करार अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्ण होणार आहे.या संलग्नतेमुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, इंटर्न, निवासी डॉक्टर तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार असून, रुग्णांना तत्पर आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होणार आहे. लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा महत्त्वाचा निर्णय घेऊन, आरोग्यासारखा संवेदनशील विषय राजकीय ओढाताणीमध्ये अडकू नये, याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.राज्य शासनाने जुलै २०२३ मध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयाच्या मंजुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र सध्या वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत व संलग्न रुग्णालयाचे काम पूर्ण झालेले नसल्याने, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी KDMC ची रुग्णालये वापरण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राधान्याने अति दक्षता विभाग (ICU) सुरू करण्याचे प्रयत्न अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयामार्फत करण्यात येणार आहेत. महाविद्यालयाच्या आस्थापनेवर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर गौरीपाडा येथील रुग्णालय ताब्यात घेण्यात येईल, तर शक्तिधाम रुग्णालयाचे आरक्षण बदल पूर्ण झाल्यानंतर ते महाविद्यालयाकडे हस्तांतरित केले जाणार आहे.या संलग्नतेसंबंधीचा प्रशासकीय ठराव आयुक्त अभिनव गोयल आणि पालिका सचिव किशोर शेळके यांच्या स्वाक्षरीने मंजूर करण्यात येणार असून आला आहे. ही संलग्नता सात वर्षांसाठी असली तरी महाविद्यालयाची स्वतःची रुग्णालय इमारत लवकर उभी राहिल्यास या कराराचा कालावधी कमी केला जाऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.पालिका आयुक्त आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यात झालेला हा सामंजस्य करार भविष्यात KDMC च्या आरोग्य व्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरणार असून, अत्यावश्यक वैद्यकीय सुविधाअधिक बळकट होतील, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 06, 2026 09:31:49
Jalna, Maharashtra:जालना : जालन्यात भाजपचे महापौर, उपमहापौर ठरले कैलास गोरंटयाल समर्थक वंदना मगरे जालना महानगरपालिकेच्या पहिल्या mahापौर उपमहापौरपदी राजेश राऊत,औपचारिक घोषणा बाकी अँकर : जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी वंदना मगरे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे तर उपमहापौर पदी राजेश राऊत यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.वंदना मगरे या माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही मुदत 15 महिन्यांसाठी असणार आहे.जालना महानगरपालिकेच्या महापौरपदी वंदना मगरे यांची तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांचे नाव निश्चित करण्याची शिफारस माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यासह भाजपा महानगराध्यक्ष भास्कर दानवेंनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यानुसार 15 महिन्यांसाठी महापौरपदी वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांचे नाव निश्चित करण्यात आल्यानंतर आज महापौर पदासाठी वंदना मगरे आणि उपमहापौर पदासाठी राजेश राऊत या दोघांचेही अर्ज दाखल करण्यात आले.त्यांच्या विरोधात एकहीं अर्ज महापौर आणि उपमहापौर पदासाठी दाखल न झाल्यानं या दोघांच्याही निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे.दरम्यान जालना महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 9 फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पडणार आहे.त्यामुळे 9 फेब्रुवारी रोजी या निवडीबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.महानगरपालिका निवडणुकीत 65 पैकी 41 जागा जिंकून जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली आहे.दरम्यान या निवडीवर माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यासह भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top