Back
KDMC के तीन अस्पताल अम्बरनाथ मेडिकल कॉलेज से जुड़ेंगे; सुविधाओं की उम्मीद बढ़ी
ABATISH BHOIR
Feb 06, 2026 09:33:07
Kalyan, Maharashtra
कल्याण–डोंबिवलीकरांसाठी आरोग्य क्षेत्रात दिलासादायक मोठी बातमी
केडीएमसी ची बाई रुक्मिणीबाई, गौरीपाडा व शक्तिधाम रुग्णालये अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा येथील रुग्णालय आणि पूर्वेकडील कोळसेवाडी येथील शक्तिधाम रुग्णालय ही तीन रुग्णालये अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी सात वर्षांच्या कालावधीसाठी संलग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पालिका आयुक्त आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्यात अधिकृत सामंजस्य करार अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्ण होणार आहे.या संलग्नतेमुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, इंटर्न, निवासी डॉक्टर तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार असून, रुग्णांना तत्पर आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होणार आहे. लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा महत्त्वाचा निर्णय घेऊन, आरोग्यासारखा संवेदनशील विषय राजकीय ओढाताणीमध्ये अडकू नये, याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.राज्य शासनाने जुलै २०२३ मध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयाच्या मंजुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र सध्या वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत व संलग्न रुग्णालयाचे काम पूर्ण झालेले नसल्याने, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी KDMC ची रुग्णालये वापरण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राधान्याने अति दक्षता विभाग (ICU) सुरू करण्याचे प्रयत्न अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयामार्फत करण्यात येणार आहेत. महाविद्यालयाच्या आस्थापनेवर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर गौरीपाडा येथील रुग्णालय ताब्यात घेण्यात येईल, तर शक्तिधाम रुग्णालयाचे आरक्षण बदल पूर्ण झाल्यानंतर ते महाविद्यालयाकडे हस्तांतरित केले जाणार आहे.या संलग्नतेसंबंधीचा प्रशासकीय ठराव आयुक्त अभिनव गोयल आणि पालिका सचिव किशोर शेळके यांच्या स्वाक्षरीने मंजूर करण्यात येणार असून आला आहे. ही संलग्नता सात वर्षांसाठी असली तरी महाविद्यालयाची स्वतःची रुग्णालय इमारत लवकर उभी राहिल्यास या कराराचा कालावधी कमी केला जाऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.पालिका आयुक्त आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यात झालेला हा सामंजस्य करार भविष्यात KDMC च्या आरोग्य व्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरणार असून, अत्यावश्यक वैद्यकीय सुविधाअधिक बळकट होतील, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowFeb 06, 2026 11:04:340
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 11:03:350
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 10:50:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:46:580
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:34:570
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:33:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 06, 2026 10:23:080
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 06, 2026 10:22:170
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:21:350
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 06, 2026 10:21:170
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:15:500
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 06, 2026 09:50:390
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 06, 2026 09:33:390
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 06, 2026 09:31:490
Report