Back
नागपुर महोत्सव के साथ महिंद्रा EV प्लांट का बड़ा करार; Vidarbha विकास को मिलेगा गति
AKAMAR KANE
Feb 06, 2026 10:50:43
Nagpur, Maharashtra
नागपूर
ऍडव्हाटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सव उदघाट्न आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनात झालेल्या एडवांटेज विदर्भ औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे सामान्य करार करण्यात आले. आज उद्घाटन सोहळाला नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पंकज भोयर उपस्थित होते, 23 देशाचे विशेष प्रतिनिधी आले आहेत.
नागपूर -
(अडवांटेज विदर्भ- खासदार औद्योगिक महोत्सव उद्घाटन समारंभ)
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री - भाषण
- विदर्भाचा सर्वांगीण विकास व्हावा या कल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कार्य करत आहोत
- समाजाच्या सर्वच क्षेत्रात कार्य करत असताना सर्वात मोठं जे क्षेत्र आहे त्यात रोजगार मिळतात ते उद्योग आणि व्यापार हे क्षेत्र आहे
- विदर्भात लोह खनिज, कोळसा, आणि मँगनीज खनिज आहे
- आणि संत्रा आणि कापूस शेतकऱ्यांवर लक्ष दिलं आहे
- येत्या पाच वर्षात ए आय चा वापर करून संत्र्याचे तंत्रज्ञानाला आम्ही बदललेले आहे
- येत्या पाच वर्षात आमच्या संत्र्याचे उत्पादन पाचपट वाढेल असा विश्वास आहे
- विदर्भातील पर्यटन हे महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकार यांचा धन्यवाद देतो
- मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात जी टुरिझम पॉलिसी बनली ते शंभर टक्के मंजूर करण्यात आले आहेत
- गडचिरोली मध्ये असलेल्या लोहखनिजाचा उत्खनन होत नव्हतं मात्र तिथे नक्षलवाद फोफावला होता
- लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या वतीने आम्ही गडचिरोली मध्ये एकल विद्यालय गेल्या 27 वर्षापासून चालवत आहोत
- उद्योगपती हे संपत्ती नाही वाढवत तर ते रोजगार वाढवतात
- विदर्भात आलेल्या उद्योग हे विदर्भाचा विकास करतील
- विदर्भात दहा हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, शेतकऱ्यांच्या तरुणांना रोजगार नाही, सिंचनाची सुविधा नव्हती, रस्ते आता चांगले झाले, विजेची कमतरता नाही, आता टेलीकम्युनिकेशनची सुविधा झाली आहे
- हा जो बदल झालेला आहे तो विदर्भाच्या विकासासाठी, विदर्भाच्या पोटेन्शिअल साठी गती देणारी आहे आणि हाच विदर्भाचा विकास आहे
- मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे विदर्भाच्या विकासाला आणखी गती आली आहे
- बिझनेस मॅनेजमेंटच्या स्टुडन्ट असल्यामुळे मानतो उद्योगात पैसा आणि टेक्नॉलॉजी पेक्षा जुगाडू माणसाची गरज असते
- विदर्भाची मानसिकता आता बदलत चालली आहे अगोदर येथे कोणताही व्यक्ती आला तर मी म्हणायचं की तुमची मनोवृत्तीच भुक्कड आहे
- विदर्भात हजार कोटींच्या वर उद्योग टाकणारे शंभर उद्योजक नाही भेटणार तोपर्यंत विदर्भात बदल शक्य नाही
- सत्यनारायण नुवाल रेल्वे स्टेशनवर झोपायचे, आज ते जगात प्रसिद्ध झाले आहे, त्यांच्यामुळे भारत जगात डिफेन्समध्ये सामोर जाणार आहे
- प्रभाकरन यांनी स्टील मध्ये फार हिंमतीने काम केलं आहे, गडचिरोली मध्ये मी फार इंटिरियर मध्ये जायचो,
- आता गडचिरोली महाविद्यालयापासून रुग्णालय येत आहे सकाळी तिथे चालण्याची सोय नव्हती
- जगातील सर्वात चांगलं लोहखनिज हे गडचिरोलीत मिळतं
- जगाचा सर्वात चांगला स्टील हब हे गडचिरोली बनत आहे
- गडचिरोली साठीचे मॅनपावर लागणार आहे ते विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे हे आमचं मिशन आहे
- विदर्भाचा विकास म्हणजे केवळ नागपूरचा विकास नाही
- ट्रेन मॅन पॉवर साठी देखील आणि प्रयत्न करत आहोत
- अदानी इथे आले आहेत, ते इंटरनॅशनल एअरपोर्ट करत आहेत त्यासाठी दहा हजार स्किल मॅनपावर लागेल
- ते विमानांचा एम आर ओ संचालित करत आहेत
- जर स्किल मॅन पॉवर मिळणार नाही तर ते कुठून आणायचे यासाठी नागपूर विद्यापीठाने प्रयत्न करायला हवे
नागपुर
मुख्यमंत्री फडणवीस भाषण
- अधिक गती आणि उर्जेने आपण विदर्भाच्या विकासासाठी एकत्रित आलो आहे
- गडकरींच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न केले
- पण एक दुःख आमच्या मनात होत ऑटोमोबाइल इंडस्ट्री विदर्भात यावी यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले
- अखेर महिंद्रा अँड महिंद्रा विदर्भात आले मी त्यांना धन्यवाद देतो
- नागपूरात ऑटोमोबाईल इंडस्ट्रु मध्ये मोठा करार झाला
- नेक्स्ट जनरेशन EV जे ग्लोबल मार्केट साठी देखील महत्वाची असेल
- नागपुरातील पहिली ऑटोमोबाईल इंडस्ट्री महिंद्रा अँड महिंद्रा
- ऑटोमोबाइल इंडस्ट्री मध्ये पुणे लीडर होता त्याचा विस्तार नागपूर, नाशिक, संभाजी नगर पर्यंत होत है
- महिंद्रा 2028 मध्ये नागपुर मध्ये प्रत्यक्ष प्रोडक्शन ला सुरुवात करणार, आम्ही सरकार म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य विद्युत वेगाने करू
- 10 दिवसात 10 कोटींची इन्व्हेस्टमेंट असलेला MOU झाला
- गिगा कास्टिंग टेक्नॉलॉजी नागपूर मध्ये येणार त्याचा MOU काही मिनिटात करण्यात आला
- 3 व्हीलर EV साठी रिबुशनैज करणारी गुंतवणूक
- 2500 करोड गुंतवणूक 35 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळेल
- एका काळात आम्ही जे बोलायचो ते आज प्रत्यक्षात करत आहे
- 2014 नंतर सगळं प्रत्यक्षात उतरत असल्याने नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर देशाचं स्टील हब होत आहे
- भविष्यात आम्ही गडचिरोली मध्ये नॅचरल गॅस घेऊन जाऊ
- गडचिरोली उद्योगिक विकासाचा परिणाम चंद्रपूर वर्धा मध्ये दिसतोय
- अमरावती मध्ये टेक्सटाईल पार्क तयार केले
- एशिया मधील सगळ्यात आधुनिक एव्हीएशन स्कुल अमरावती मध्ये तयार केलं जातंय त्याचा फायदा बाजूच्या जिल्हानांना होतो
- अमरावती, अकोला विमानतळ विस्तार होतोय, गडचिरोलीचा रण वे फुलस्केल रनवे असणार
- रेल, एयर दोन्ही दळणवळण क्षेत्रात विदर्भ समोर येतोय
- टियर दोन सिटी मध्ये नागपूर संभाजी नगर मध्ये लॉजीस्टिक, जिजीसी क्षेत्रात गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे
- ज्या क्षेत्रात उद्योग नाही त्या भागात उद्योग आणण्यावर भर आहे
- डाओस मधून त्या भागासाठी उद्योग आणण्यात यश मिळालं
- गडचिरोली, धुळे, नंदूरबार मध्ये उद्योग आणण्यात यश आलं
- वाशीम मध्ये उद्योग आणायचे आहेत
- महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे, नळगंगा वैनगंगेला जोडण्यासाठी 500 किमीची नदी तयार केली जाणार
- दुष्काळ प्रवण भागात समृद्ध भाग तयार करून उद्योगांना देखील पाणी देणार
- औद्योगिक विकासासाठी उद्योजकांची महत्वाची भूमिका असते
- संभाजी नगर च्या विकासात तिथल्या उद्योजकांची महत्वाची भूमिका
- (मुख्यमंत्री बोलत असताना अचानक लाईट आणि माईक बंद झालेत, काही काळ भाषण थांबले)
- ऊर्जा मंत्राच्या भाषणात ऊर्जा गेली,पण आमची ऊर्जा गेली नाही मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणा दरम्यान व्यासपीठवर लाईट गेले.. माईक पण थोडा अवधी बंद होता
मात्र लाईट आल्यावर फडणवीस बोलले की
ऊर्जा मंत्री के भाषण मे ऊर्जा चली जाये --लेकिन हमारी ऊर्जा चल रही है
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 12:08:280
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 11:35:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 06, 2026 11:04:340
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 11:03:350
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:46:580
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:34:570
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:33:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 06, 2026 10:23:080
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 06, 2026 10:22:170
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:21:350
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 06, 2026 10:21:170
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:15:500
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 06, 2026 09:50:390
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 06, 2026 09:33:390
Report